मुख्य सामग्रीवर वगळा
कोरोनाविरुध्दच्या लढाईत सर्वांनी एकत्र यावे

                 - गृहमंत्री अनिल देशमुख
v जिल्हा प्रशासनाचे काम उत्तम

यवतमाळ, दि.20 : विदर्भ मुकाबला -

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने विविध उपाययोजना केल्या आहेत. पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाने सर्व विभागामध्ये अतिशय चांगला समन्वय घडवून आणला असून प्रशासनाचे काम उत्तम आहे. कोरोना विरुध्दची लढाई ही सर्वांच्या सहकार्याने लढणे आवश्यक असल्यामुळे या लढाईत एकत्र यावे, असे आवाहन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले.

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासनाचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, आमदार सर्वश्री ख्वाजा बेग, डॉ. अशोक उईके, डॉ. संदीप धुर्वे, जिल्हाधिकारी एम.डी.सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, पोलिस अधिक्षक एम. राजकुमार आदी उपस्थित होते.

3 मे पर्यंत सर्व राज्य व जिल्ह्यांच्या सीमा सील करण्याचे आदेश देण्यात आले आहे, असे सांगून गृहमंत्री श्री. देशमुख म्हणाले, जिल्ह्यात असलेल्या परप्रांतीयांची व इतर जिल्ह्यातील नागरिकांच्या राहण्याची व भोजनाची व्यवस्था जिल्हा प्रशासनाला करण्याचे आदेशित केले आहे. आहे त्या ठिकाणी राहणे, हाच सध्या एकमेव मार्ग आहे. कुटुंबात एखाद्याचे निधन किंवा कोणी अतिशय गंभीरावस्थेत असले तर अशा परिस्थितीत जिल्हास्तरावरील समितीकडून परवानगी घेऊन संबंधितांना जाता येऊ शकते. शासनाच्या वतीने अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत सर्वांना लाभ तसेच बीपीएम, एपीएल, अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांना धान्य देण्यात येत आहे. ज्या नागरिकाकडे राशन कार्ड नाही, अशा लोकांसाठी जिल्हास्तरावर विशेष निधीची तरतूद करून त्यांना प्राधान्याने धान्य पोहचवावे, अशा सुचना त्यांनी जिल्हा प्रशासनाला केल्या.

यावेळी पालकमंत्री संजय राठोड म्हणाले, आदिवासी बहुल जिल्हा असल्यामुळे खावटी देण्याचा निर्णय शासनाच्या वतीने लवकरात लवकर घेण्यात येईल. तसेच ज्यांच्याकडे कार्ड नाही त्यांना धान्य देण्यासाठी निधीची तरतूद करण्याचे नियोजन करण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी आमदारांनी शासन व प्रशासनाच्या कामाचे कौतुक केले. तसेच काही सुचना देखील त्यांनी केल्या.

गृहमंत्र्यांची मेमन सोसायटीमध्ये पाहणी : यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शहरातील प्रतिबंधित असलेल्या मेमन सोसायटीमध्ये भेट देऊन प्रशासनाच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी बोलतांना गृहमंत्री म्हणाले, जिल्हा व पोलिस प्रशासन चांगले काम करीत असून सर्व विभागचा समन्वय चांगला आहे. कोरोना संदर्भात डॅशबोर्डच्या माध्यमातून नागरिकांना रोज अपडेट माहिती उपलब्ध होते. ग्रामस्तरावरील सर्व यंत्रणा चांगल्या काम करीत असून इंदिरा नगर, जाफर नगर, मेमन सोसायटी हा भाग पूर्णपणे सील करण्यात आला आहे. या भागात प्रशासनाच्यावतीने अत्यावश्यक सेवा पुरविण्यात येत आहे. जिल्ह्यात एकूण 63 तबलिगी समाजाचे लोक आले होते. यासर्वांकडे प्रशासनाने अतिशय गांभिर्याने लक्ष दिले. सोशल मिडीयाच्या माध्यमातून सामाजिक तेढ निर्माण होणार नाही, याची काळजी नागरिकांनी घ्यावी. असे आढळल्यास त्यांच्यावर सक्त कारवाई करण्यात येईल. यवतमाळ जिल्हा लवकरच रेड झोनमधून ऑरेंज व नंतर ऑरेंज झेानमधून ग्रीन झोनकडे वाटचाल करेल, त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी त्यांनी एकूण 670 चाचण्या करण्यात आल्याचे सांगितले. तसेच आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 16 पॉझेटिव्ह रुग्णांपैकी 9 जणांना सुट्टी देण्यात आली असून सद्यस्थितीत 7 पॉझेटिव्ह रुग्ण भरती आहे. संस्थात्मक विलगीकरणात एकूण 142 जण तर गृह विलगीकरणात एकूण 789 जण असल्याचेही त्यांनी सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दाते महीला बँक वाचवण्यासाठी महिला सहकारी बँक कृती समिती यवतमाळ ची संघर्ष परिषद

दाते महीला बँक वाचवण्यासाठी महिला सहकारी बँक कृती समिती यवतमाळ ची संघर्ष परिषद यवतमाळ येथील बाबाजी दाते महीला बँक मध्ये अनेक खातेदार, ठेवीदार यांचे पैसे आहेत अनेकांच्या खूप समस्या आहेत. पण कायद्याने आपण आपले पैसे कसे काढू शकतो यासाठी आज संघर्ष परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी मुंबई येथून विश्वास उटगी यांना आमंत्रित करण्यात आले होते. विश्वास उटगी हे माजी सचिव ऑल इंडिया बँक फेडरेशन आहेत. ज्या बँका डुबले आहेत त्या बँकांमधील खातेदारांना आपले पैसे काढण्यासाठी मार्गदर्शन करतात. कायद्याने सल्ला देतात. यासाठी ते मार्गदर्शन करतात. यासाठी आज संघर्ष परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या संघर्ष परिषदेमध्ये हजाराच्या वर पीडित खातेदार, ठेवीदार सहभागी झाले होते .या संघर्ष परिषदेमध्ये येणाऱ्या समोरच्या काळात लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, कर्जदार ,संचालक यांच्या घरासमोर डफडे वाजवा आंदोलन ,रिझर्व्ह बँकेसमोर धरणे, कायदेशीर मार्गासाठी उच्च न्यायालयात धाव ,अशा अनेक आंदोलनात्मक विषय घेऊन विविध समित्यांचे गठन करण्यात आले. यावेळी नितीन बोदे, राजू पडगिलवार, सुनील पुनवटकर, शैलेश काळबांडे, पिसाळकर ...

जिल्ह्यात सर्व व्यवहार नियमितपणे सुरू करण्यास दिली जिल्हाधिकारी यांनी परवानगी; जिल्हयाचा समावेश श्रेणी एकमध्ये

 *जिल्ह्यात सर्व व्यवहार नियमितपणे  सुरू करण्यास दिली जिल्हाधिकारी यांनी परवानगी*  *जिल्हयाचा समावेश श्रेणी एकमध्ये* *लग्न व अंथविधीसाठी 50  लोकांच्या उपस्थितीस परवानगी* *शासकीय कार्यलये 100 टक्के क्षमतेने सुरू* *कोविड नियमांचे पालन तसेच दुकाने व आस्थापना चालकास व कर्मचाऱ्यांना कोविड चाचणी बंधनकारक* यवतमाळ, दि. 6 जून :    शासनाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे यवतमाळ जिल्ह्याचा समावेश श्रेणी -1 मध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी  यवतमाळ जिल्ह्याकरीता 7 जून 2021 पासून ब्रेक दि चेन अंतर्गत घालून देण्यात आलेले निर्बंध शिथिल केले असून सर्वच बाबी नियमितपणे सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे.  अत्यावश्यक सेवेंची दुकाने व अत्यावश्यक सेवा तसेच इतर दुकाने व सेवा  नियमितपणे सुरु राहतील. तथापि अत्यावश्यक सेवेंच्या व इतर आस्थापना धारकांनी दुकानात नागरिकांची होणारी गर्दी कमी करण्याच्या दृष्टीने जास्तीत जास्त होम डिलेव्हरीद्वारे वस्तूंचा पुरवठा करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. त्यादृष्टीने आस्थापना धारकांनी स्वत:चे व्हॉटसॲप नंबर दुकाना...

शिवशक्ती महाविद्यालय बाभुळगाव वतीने आयोजित "तीस दिवसीय राज्यस्तरीय व्यक्तिमत्व विकास प्रमाणपत्र कोर्स" संपन्न

 शिवशक्ती महाविद्यालय बाभुळगाव वतीने आयोजित "तीस दिवसीय राज्यस्तरीय व्यक्तिमत्व विकास प्रमाणपत्र कोर्स" संपन्न यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव येथील शिवशक्ती कला व वाणिज्य महाविद्यालय येथे अर्थशास्त्र विभाग आणि ग्रंथालय व ज्ञान संसाधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने तीस दिवसीय राज्यस्तरीय व्यक्तिमत्व विकास प्रमाणपत्र कोर्सचे आयोजन दि. 15 एप्रिल ते 15 मे 2021 दरम्यान आभासी पद्धतीने करण्यात आले होते. या कोर्सचा समारोपीय कार्यक्रम दि. 16 मे 2021 रोजी संपन्न झाला. या सोहळ्याचे अध्यक्ष सन्माननीय प्रा. बाळासाहेब धांदे व्यवस्थापक, शिवशक्ती शिक्षण संस्था, कोठा हे होते तर विशेष अतिथी म्हणून डॉ. मोहन खेरडे, संचालक, ज्ञान संसाधन केंद्र, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती हे होते. तर प्रमुख उपस्थिती म्हणून प्रा. डॉ. कविता तातेड अणे महिला महाविद्यालय यवतमाळ, डॉ. शशिकांत वानखेडे ग्रंथपाल, भारती महाविद्यालय आर्णी आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दीपक कोदूरवार हे होते. याप्रसंगी मान्यवरांनी व्यक्तिमत्व विकास प्रमाणपत्र कोर्स कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीत विद्यार्थ्यांना नवचेतना, नवउमेद...