मुख्य सामग्रीवर वगळा
नोंदणीकृत बांधकाम कामगारांना शासनातर्फे आर्थिक सहाय्य,
दोन हजार रुपये थेट बँक खात्यात जमा करणार


यवतमाळ, दि. 19 : विदर्भ मुकाबला न्यूूूज-

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जिल्हृयात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे.  लॉकडाऊन कालावधीत इमारत व इतर बांधकाम बंद झाले असल्याने जिल्ह्यातील इमारत व इतर बांधकामावर काम करणाऱ्या नोंदणीकृत सक्रीय बांधकाम कामगारांना कोणतेही कामकाज करता येत नाही. त्यामुळे या सर्व नोंदणीकृत बांधकाम कामगारांना बांधकामाच्या ठिकाणी अथवा घरीच थांबावे लागत आहे. त्यांना दररोजची रोजंदारी मिळत नसल्याने दैनंदिन गरजा भागविण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागतो.
त्यामुळे सध्याची लॉकडाऊनची परिस्थिती लक्षात घेता मंडळाकडील नोंदणीकृत सक्रीय (जिवित) बांधकाम कामगारांना प्रत्येकी दोन हजार रुपये आर्थिक सहाय्य त्यांच्या  बँक खात्यात थेट जमा करण्यास शासनाने परवानगी दिली असल्याने ही रक्कम आता त्यांच्या खात्यात जमा करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकरी एम.डी.सिंह यांनी कळविले आहे.

टिप्पण्या