मुख्य सामग्रीवर वगळा
दोन दिवसांत चार स्वस्त धान्य दुकानावर कारवाई

v एकाचे प्राधिकारपत्र रद्द तर तिघांचे निलंबित

यवतमाळ, दि. 22 : 
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर स्वस्त धान्य दुकानांमधून गरजू व गरीब नागरिकांना नियमानुसार धान्य देण्याचे शासनाचे निर्देश आहे. मात्र या आदेशाचे उल्लंघन करून लाभार्थ्यांना कमी धान्य देणे, शासकीय दरापेक्षा जास्त भावाने धान्य देणे, अंत्योदय व प्राधान्य कुटुंबातील नागरिकांना नियमानुसार धान्य वाटप न करणे आदी बाबी निदर्शनास आल्यामुळे जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांच्या सुचनेवरून जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी जिल्ह्यातील चार स्वस्त धान्य दुकानावर कारवाई केली आहे. यात एका स्वस्त धान्य दुकानाचे प्राधिकारपत्र रद्द तर इतर तिन जणांचे निलंबित केले आहे.
उमरखेड येथील स्वस्त धान्य दुकानदार डी.वाय. माळवे यांच्या दुकानाची तपासणी केली असता दुकानात फलक न लावणे, तपासणीवेळी 423  किलो गहू, 368 किलो तांदूळ, 4 किलो तूरडाळ, 3 किलो साखरेची असलेली तूट (बाजारभावाने किंमत 24176 रुपये), दुकानाच्या दर्शनी भागात योजनानिहाय सर्व योजनांचे धान्याच्या मुल्यमापनाबाबत फलक न लावणे, योजनेनिहाय अन्नधान्य वाटपाचे फलक न लावणे, शिधापत्रिकाधारकांनी तक्रार कोणाकडे करावी याबाबत माहिती व शासनाचा टोल फ्री क्रमांक न लावणे, विक्री नोंदवही, स्टॉक नोंदवही, व्हीजीट नोंदवही, तक्रार नोंदवही असे कोणतेच अभिलेख तपासणीकरीता उपलब्ध करून न देणे आदी कारणावरून उमरखेड येथील डी.वाय. माळवे यांच्या स्वस्त धान्य दुकानाचे प्राधिकारपत्र रद्द करण्यात आले आहे. तसेच येथील शिधापत्रिकाधारकांना शिधावस्तुंचे वितरण नियमितरित्या होण्याच्या दृष्टीने  उमरखेड तहसीलदार यांनी सर्व शिधापत्रिका नजीकच्या रास्त भाव धान्य दुकानास जोडून दिल्या आहेत.
कळंब तालुक्यातील मौजा सावरगाव येथील रास्त भाव धान्य दुकानदार अशोक वडेरा हे गत अडीच वर्षांपासून वर्षांपासून दोन व्यक्तिंचे 10 किलो धान्य कमी देत असल्याची तक्रार रमेश कोहळे, रा. पिंपळखुटी यांनी केल्यावर या तक्रारीत तथ्य आढळून आल्याने वडेरा यांच्या दुकानाचे प्राधिकारपत्र निलंबित करण्यात आले आहे. वणी तालुक्यातील मौजा राजूर येथील स्वस्त धान्य दुकानदार मारोती मानकर हे शिधापत्रिकाधारकांना शासकीय दरापेक्षा जास्त भावाने धान्य देणे तसेच अंत्योदय व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना नियमानुसार धान्य वाटप न करणे याबाबत तपासणीत आढळून आल्याने त्यांच्या दुकानाचे प्राधिकारपत्र निलंबित केले आहे. उमरखेड तालुक्यातील जनुना येथील स्वस्त धान्य दुकानदार हरी बुरकुले यांनीसुध्दा धान्यवाटपात अनियमितता केल्याने तसेच तपासणीदरम्यान कोणतेही कागदपत्रे उपलब्ध करून न दिल्याने त्यांच्या दुकानाचे प्राधिकारपत्र निलंबित करण्यात आले आहे.
वरील स्वस्त धान्य दुकानदारांनी महाराष्ट्र अनुसूचित वस्तु (वितरणाचे विनियमन) 1975 व त्याअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या अटी व शर्तींचे उल्लंघन केल्याचे सिध्द होत असल्याने जिल्हाधिकारी यांच्या सुचनेवरून जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी सदर दुकानदारांवर कारवाई केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दाते महीला बँक वाचवण्यासाठी महिला सहकारी बँक कृती समिती यवतमाळ ची संघर्ष परिषद

दाते महीला बँक वाचवण्यासाठी महिला सहकारी बँक कृती समिती यवतमाळ ची संघर्ष परिषद यवतमाळ येथील बाबाजी दाते महीला बँक मध्ये अनेक खातेदार, ठेवीदार यांचे पैसे आहेत अनेकांच्या खूप समस्या आहेत. पण कायद्याने आपण आपले पैसे कसे काढू शकतो यासाठी आज संघर्ष परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी मुंबई येथून विश्वास उटगी यांना आमंत्रित करण्यात आले होते. विश्वास उटगी हे माजी सचिव ऑल इंडिया बँक फेडरेशन आहेत. ज्या बँका डुबले आहेत त्या बँकांमधील खातेदारांना आपले पैसे काढण्यासाठी मार्गदर्शन करतात. कायद्याने सल्ला देतात. यासाठी ते मार्गदर्शन करतात. यासाठी आज संघर्ष परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या संघर्ष परिषदेमध्ये हजाराच्या वर पीडित खातेदार, ठेवीदार सहभागी झाले होते .या संघर्ष परिषदेमध्ये येणाऱ्या समोरच्या काळात लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, कर्जदार ,संचालक यांच्या घरासमोर डफडे वाजवा आंदोलन ,रिझर्व्ह बँकेसमोर धरणे, कायदेशीर मार्गासाठी उच्च न्यायालयात धाव ,अशा अनेक आंदोलनात्मक विषय घेऊन विविध समित्यांचे गठन करण्यात आले. यावेळी नितीन बोदे, राजू पडगिलवार, सुनील पुनवटकर, शैलेश काळबांडे, पिसाळकर ...

शिवशक्ती महाविद्यालय बाभुळगाव वतीने आयोजित "तीस दिवसीय राज्यस्तरीय व्यक्तिमत्व विकास प्रमाणपत्र कोर्स" संपन्न

 शिवशक्ती महाविद्यालय बाभुळगाव वतीने आयोजित "तीस दिवसीय राज्यस्तरीय व्यक्तिमत्व विकास प्रमाणपत्र कोर्स" संपन्न यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव येथील शिवशक्ती कला व वाणिज्य महाविद्यालय येथे अर्थशास्त्र विभाग आणि ग्रंथालय व ज्ञान संसाधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने तीस दिवसीय राज्यस्तरीय व्यक्तिमत्व विकास प्रमाणपत्र कोर्सचे आयोजन दि. 15 एप्रिल ते 15 मे 2021 दरम्यान आभासी पद्धतीने करण्यात आले होते. या कोर्सचा समारोपीय कार्यक्रम दि. 16 मे 2021 रोजी संपन्न झाला. या सोहळ्याचे अध्यक्ष सन्माननीय प्रा. बाळासाहेब धांदे व्यवस्थापक, शिवशक्ती शिक्षण संस्था, कोठा हे होते तर विशेष अतिथी म्हणून डॉ. मोहन खेरडे, संचालक, ज्ञान संसाधन केंद्र, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती हे होते. तर प्रमुख उपस्थिती म्हणून प्रा. डॉ. कविता तातेड अणे महिला महाविद्यालय यवतमाळ, डॉ. शशिकांत वानखेडे ग्रंथपाल, भारती महाविद्यालय आर्णी आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दीपक कोदूरवार हे होते. याप्रसंगी मान्यवरांनी व्यक्तिमत्व विकास प्रमाणपत्र कोर्स कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीत विद्यार्थ्यांना नवचेतना, नवउमेद...
जस्टिस नरीमन पर क्रिमिनल केस करने वाले रशीद खान और अन्य के समर्थन में सुप्रिम कोर्ट के इतिहास में सबसे जादा वकीलों का वकालतनामा. रिटायर्ड जस्टिस रंजन गोगोई की अपराधिक साजिश उजागर सुप्रिम कोर्ट के जस्टिस रोहींटन नरीमन और विनीत सरण पर केस करने वाले रशीद खान पठाण, ऍड. निलेश ओझा और ऍड. विजय कुर्ले के समर्थन में सुप्रिम कोर्ट के हजारो वकीलो ने अपना समर्थन दिया है. ऑल इंडिया एस. सी., एस. टी एंड मायनॉरिटि लॉयर्स असोसिएशन, सुप्रिम कोर्ट एंड हाई कोर्टस लिटीगंटस असोसिएसन, इंडियन बार असोसिएशन, मानव अधिकार सुरक्षा परीषद ने लिखित रुपमे चीफ जस्टिस ऑफ़ इंडिया श्री. शरद बोबडे, राष्ट्रपती श्री. रामनाथ कोविद, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को पत्र लिखकर दोषी जजेस रोहिंटन नरीमन, विनीत सरण, अनिरुद्ध बोस, रिटायर्ड जस्टिस दीपक गुप्ता और वकील सिद्धार्थ लूथरा, मिलिंद साठे, कैवान कल्यानीवाला के खिलाफ एफ. आय. आर. (FIR) दर्ज करने, सीबीआय (CBI) को जाच आदेश देने तथा इन जजेस को जाच पूरी होने तक सुप्रीम कोर्ट की किसी भी कारवाई में भाग लेने की अनुमति नहीं देने की मांग की है. ज्ञात हो की इससे पहले भी 10 जनवरी 2020 क...