मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जुलै, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पुसदच्या वीज वितरण विभागाच्या हलगर्जीपणाचा वीज ग्राहकांना फटका, बकरी ईदच्या दिवशीही वारंवार वीज पुरवठा खंडीत

पुसदच्या वीज वितरण विभागाच्या हलगर्जीपणाचा वीज ग्राहकांना फटका, बकरी ईदच्या दिवशीही वारंवार वीज पुरवठा खंडीत  प्रतिनिधी/पुसद गेल्या दोन दिवसापासून पुसद तालुक्यात पावसाची हजेरी लागत आहे. अशातच वीज पुरवठा देखील वारंवार खंडित होत आहे. गेल्या दोन दिवसापासून गोविंदनगर, काकडदाती अभियांत्रिकी महाविद्यालय समोरील परिसर श्रीरामपूरसह आदी भागामध्ये वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे. पुसद शहरातील व आजूबाजूच्या ग्रामपंचायतीमध्ये राहणाऱ्या मुस्लिम बांधवांना तर बकरी ईदचा दिवस विजेविना व अंधारातच साजरी करण्याची वेळ येत आहे.यामुळे वीज ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून वीज वितरण विभागाच्या हलगर्जीपणाकडे वरिष्ठांनी लक्ष केंद्रित करण्याची मागणी ग्राहकाकडून आता होत आहे. पुसदच्या विज वितरण विभागाचे अभियंता यांच्याकडून नियोजनशून्य कारभाराचा वीज ग्राहकांना फटका बसत आहे. पुसद शहरातील व ग्रामीण भागात पावसाळ्यापूर्वी कामाचा विसर पडल्यामुळे अनेक ठिकाणी डीपी जवळाल्याच्या व तार तुटल्याच्या घटना घडत आहे. वीज वितरण विभागाचे अभियंताकडून वीज वितरण विभागाने नियुक्त केलेल्या त्या ठेकेदाराला जाब सुद्धा विचारल्या सुद

महाराष्ट्रातील लोकशाही वाचवा दिन, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

महाराष्ट्रातील लोकशाही वाचवा दिन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने यवतमाळ:- आज यवतमाळ महाराष्ट्रातील लोकशाही वाचवा दिन म्हणून स्थानीक एलआयसी चौकात, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा जिल्हा महामंत्री (संघटन) राजू पडगिलवार, शहराध्यक्ष प्रशांत यादव पाटील यांच्या नेतृत्वात निदर्शने करण्यात आली.  महाराष्ट्र विधिमंडळाचे दोन दिवसाचे अधिवेशन सुरू होणार आहे.परंतु हे अधिवेशन म्हणजे लोकशाहीची क्रूर थट्टाच ठरणार आहे. कारण राज्यासमोरील कोणत्याही महत्त्वाच्या प्रश्नाची चर्चा या अधिवेशनात होणार नाही. विधिमंडळ सदस्यांचे घटनेने दिलेले अधिकार प्रश्न  विचारणे, स्थगन प्रस्ताव देणे, लक्षवेधी सूचना मांडणे इत्यादी व्यपगत केले आहे. जनतेच्या प्रश्नांना उत्तर द्यायला हे सरकार घाबरते हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आजचा 5 जुलै चा हा दिवस महाराष्ट्रातील लोकशाही वाचवा दिन म्हणून पाळला आहे.  लोकशाही वाचली पाहिजे, ठाकरे सरकारचा आघाडी सरकारचा निषेध करत आंदोलन करण्यात आले.  .   यावेळी जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा, जिल्हा महामंत्री (सघटंन)राजू पडगिलवार, शहराध्यक्ष प्रशांत यादव पाटील, राजेंद्र डांगे ,प्रवीण