मुख्य सामग्रीवर वगळा
भारती मैंद नागरी सहकारी पतसंस्थेच्या सौजण्यातून नगरपालिका परिसरात सॅनिटायझरिंग कक्षाची उभारणी.



पुसद - 
संपूर्ण देश कोरोना या विषाणूमुळे राष्ट्रीय आपत्तीत असतांना शहराचा मुख्य दुव्वा असलेल्या स्थानिक नगरपालिका प्रांगणात भारती मैंद नागरी सहकारी पतसंस्थेच्या सामाजिक उपक्रमांअंतर्गत उभारण्यात आलेल्या  सॅनिटायझरिंग कक्षाचे उद्घाटन दि.18 एप्रिल रोजी आ.इंद्रनील नाईक यांचेहस्ते फित कापून करण्यात आले यावेळी विधानपरिषद सदस्य तथा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ.डॉ. वजाहात मिर्झा,नगरपालिकेच्या मुख्याधिकारी सौ.निर्मला राशीनकर(यमगर),आरोग्य सभापती राजु साळुंखे,पुसद चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष सूरज डूबेवार हे प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी विशेषतः सोशल डिस्टनसिंग पाळून प्रत्येकजण उभे होते.
       स्थानिक नगरपालिका प्रशासनाच्या मागणीवरून उभारण्यात आलेल्या सॅनिटायझरिंग कक्षाचा लाभ दररोज कर्मचारी, सफाई कामगार असे एकूण पाचशे ते सातशे नागरिक घेत आहेत. अत्यावश्यक सेवेत असणारा प्रत्येक नागरिक,कर्मचारी हा देशसेवेचेच कार्ये करीत असल्यामुळे त्यास घरी जाण्यापूर्वी किंवा कर्तव्यावर येत असताना निर्जंतुक करण्याचा उदात्त हेतू बाळगून पुसद अर्बन बँकेचे तसेच भारती मैंद नागरी सहकारी पतसंस्थेच्या सामाजिक उपक्रम समितीचे अध्यक्ष शरद मैंद यांनी नगरपालिका प्रांगणात सॅनिटायझरिंग कक्ष उभारला. औपचारिक उदघाटनाप्रसंगी आ.इंद्रनील नाईक यांनी एरवी शहरातील नागरिकांच्या हिताची जपणूक करणारे जेष्ठबंधु शरद मैंद यांनी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सॅनिटायझरिंग कक्ष उभारून पुन्हा एकदा आपल्या समाजसृजन कर्तृत्वाचा प्रत्येय दिल्याचे मत व्यक्त केले हे विशेष..तर विधानपरिषद सदस्य आ.वजाहत मिर्झा यांनी  पोलीस विभाग,महसूल प्रशासन,नगरपालिका आदींच्या  मदतीस वेळोवेळी शरद मैंद समर्थपणे उभे राहत असल्याची बोलकी प्रतिक्रिया यावेळी दिली. आमच्या आरोग्य विभागातील सफाई कामगारांना वेळोवेळी निर्जंतुक करणे गरजेचे होते त्यासाठी भारती मैंद पतसंस्थेने उभारलेले सॅनिटायझर कक्ष मोलाचे साधन ठरल्याचे मनोगत मुख्याधिकारी सौ.निर्मला राशीनकर यांनी व्यक्त केले.
      याप्रसंगी नगरसेवक डॉ. मोहंमद नदीम,शिवसेना गटनेते ऍड.उमाकांत पापीनवार, पतसंस्थेचे संस्थेचे उपाध्यक्ष ऍड.भारत जाधव,निशांत बयास,ललित सेता,महेश बजाज,आरोग्य निरीक्षक राठोड,पतसंस्थेचे प्रभारी मुख्याधिकारी गजानन नाकाडे, पुसद अर्बन बँकेचे प्रभारी मुख्याधिकारी विनायक सेवकर,अमोल व्हडगिरे,राहुल कांबळे तसेच नगरपालिका कर्मचारी, भारती मैंद नागरी सहकारी पतसंस्थेचे-पुसद अर्बन बँकेचे कर्मचारी व सफाई कामगार सोशल डिस्टनसिंगने उभे होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दाते महीला बँक वाचवण्यासाठी महिला सहकारी बँक कृती समिती यवतमाळ ची संघर्ष परिषद

दाते महीला बँक वाचवण्यासाठी महिला सहकारी बँक कृती समिती यवतमाळ ची संघर्ष परिषद यवतमाळ येथील बाबाजी दाते महीला बँक मध्ये अनेक खातेदार, ठेवीदार यांचे पैसे आहेत अनेकांच्या खूप समस्या आहेत. पण कायद्याने आपण आपले पैसे कसे काढू शकतो यासाठी आज संघर्ष परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी मुंबई येथून विश्वास उटगी यांना आमंत्रित करण्यात आले होते. विश्वास उटगी हे माजी सचिव ऑल इंडिया बँक फेडरेशन आहेत. ज्या बँका डुबले आहेत त्या बँकांमधील खातेदारांना आपले पैसे काढण्यासाठी मार्गदर्शन करतात. कायद्याने सल्ला देतात. यासाठी ते मार्गदर्शन करतात. यासाठी आज संघर्ष परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या संघर्ष परिषदेमध्ये हजाराच्या वर पीडित खातेदार, ठेवीदार सहभागी झाले होते .या संघर्ष परिषदेमध्ये येणाऱ्या समोरच्या काळात लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, कर्जदार ,संचालक यांच्या घरासमोर डफडे वाजवा आंदोलन ,रिझर्व्ह बँकेसमोर धरणे, कायदेशीर मार्गासाठी उच्च न्यायालयात धाव ,अशा अनेक आंदोलनात्मक विषय घेऊन विविध समित्यांचे गठन करण्यात आले. यावेळी नितीन बोदे, राजू पडगिलवार, सुनील पुनवटकर, शैलेश काळबांडे, पिसाळकर ...
जस्टिस नरीमन पर क्रिमिनल केस करने वाले रशीद खान और अन्य के समर्थन में सुप्रिम कोर्ट के इतिहास में सबसे जादा वकीलों का वकालतनामा. रिटायर्ड जस्टिस रंजन गोगोई की अपराधिक साजिश उजागर सुप्रिम कोर्ट के जस्टिस रोहींटन नरीमन और विनीत सरण पर केस करने वाले रशीद खान पठाण, ऍड. निलेश ओझा और ऍड. विजय कुर्ले के समर्थन में सुप्रिम कोर्ट के हजारो वकीलो ने अपना समर्थन दिया है. ऑल इंडिया एस. सी., एस. टी एंड मायनॉरिटि लॉयर्स असोसिएशन, सुप्रिम कोर्ट एंड हाई कोर्टस लिटीगंटस असोसिएसन, इंडियन बार असोसिएशन, मानव अधिकार सुरक्षा परीषद ने लिखित रुपमे चीफ जस्टिस ऑफ़ इंडिया श्री. शरद बोबडे, राष्ट्रपती श्री. रामनाथ कोविद, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को पत्र लिखकर दोषी जजेस रोहिंटन नरीमन, विनीत सरण, अनिरुद्ध बोस, रिटायर्ड जस्टिस दीपक गुप्ता और वकील सिद्धार्थ लूथरा, मिलिंद साठे, कैवान कल्यानीवाला के खिलाफ एफ. आय. आर. (FIR) दर्ज करने, सीबीआय (CBI) को जाच आदेश देने तथा इन जजेस को जाच पूरी होने तक सुप्रीम कोर्ट की किसी भी कारवाई में भाग लेने की अनुमति नहीं देने की मांग की है. ज्ञात हो की इससे पहले भी 10 जनवरी 2020 क...

आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयास क्रांतीसुर्य बिरसा मुंडाची भव्य प्रतीमा भेट

आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयास क्रांतीसुर्य बिरसा मुंडाची भव्य प्रतीमा भेट        पुसद : महानायक धरतीआबा बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त पुसद आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय पुसद येथे नवनियुक्त पुसद आदिवासी विकास समिती अध्यक्ष तथा आदिवासी युवा परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुनील ढाले यांच्या तर्फे आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयास भगवान बिरसा मुंडा यांच्या भव्य प्रतिमेची भेट देण्यात आली. बिरसाचे विचार समस्त युवकांनी अंगीकारून वंचितांना न्याय देण्याचे काम करावे असे प्रतिपादन भेट सोहळ्याचे अध्यक्ष आदिवासी सेवक रामकृष्ण चौधरी सर , जी प सदस्य गजानन उघडे , वसंता  चिरमाडे , पुंडलिक  टारफे , श्रीकांत चव्हाण , राज्य संघटक जीवन फोपसे , जिल्हा उपाध्यक्ष संतोष गारुळे , तालुकाध्यक्ष गजानन टारफे , कर्मचारी संघटनेचे तालुका सचीव संदेश पांडे , आ.विकास परिषदेचे सचिव सुरेश बोके , श्री खूपसे , जयवंत भुरके , तुकाराम भुरके , समाधान टारफे , गंगाराम काळे साहेब , रामदास शेळके , विजय टारफे , दत्ता भडंगे , दशरथ भुरके , समाधान चोंढकर , हनुमान गोदमले , भगवान सुरोशे , सुरेश पित्रे , बालाजी शे...