मुख्य सामग्रीवर वगळा
यवतमाळ शहरातील भाजी मंडी पुर्ववत सुरु
पासधारक व आधारकार्ड धारकांनाच मिळणार प्रवेश

यवतमाळ, दि. 30 : विदर्भ मुकाबला-
यवतमाळ शहरातील स्थानिक विठ्ठलवाडी येथील भाजी मंडीमध्ये ठोक भाजीपाला खरेदी 1 मे 2020 पासून सुरुवात करण्यात येत आहे. पालकमंत्री संजय राठोड व जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी कोव्हिड –19 च्या प्रादुर्भावात सर्व नियमांचे पालन करण्याच्या अटीवर भाजी मंडी सुरु करण्याचे निर्देश दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत याअनुषंगाने यवतमाळ शहरामध्ये एकूण 24 ग्रीन झोन विभागातील मैदान व जागेत दररोज सकाळी 8 ते 12 या कालावधीत भाजीपाला विक्री केंद्र सुरु करण्यात येणार आहे. ठोक भाजीपाला विक्रेते व ठोक खरेदीदार, हातगाडीधारक हे भाजीपाल्याचा व्यवहार दररोज सकाळी 3 ते 6 वाजता दरम्यान विठ्ठलवाडी मार्केट मंडीमध्ये करतील. फक्त पासधारक व आधारकार्ड धारकांनाच प्रवेश मंडीत मिळेल. शहरातील प्रतिबंधित क्षेत्रातील व्यापारी व खरेदीदार यांना प्रवेश मिळणार नाही. तसेच कोणत्याही चिल्लर व वैयक्तिक ग्राहकांना प्रवेश नाही.
सकाळी 6 वाजता सदर भाजी मंडी बंद करण्यात येईल. कोणत्याही संशयीत व्यक्तीने नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा प्रशासनामार्फत कळविण्यात आले आहे.
ठोक खरेदीदारांनी व हातगाडी धारकांनी भाजीपाला खरेदी केला असेल त्यांनी नगर परिषदेने तयार केलेल्या यवतमाळ शहरातील 24 केंद्रावरच भाजीपाला विक्री करावा. त्या ठिकाणी सामाजिक अंतर व इतर नियमांचे सक्त पालन करावे, असे जिल्हाधिका-यांचे निर्देश आहेत.
सदर बैठकीला अपर जिल्हाधिकारी सुनिल महेंद्रकर, जिल्हा उपनिबंधक रमेश कटके, उपजिल्हाधिकारी संगिता राठोड, नगर परिषद मुख्याधिकारी शशिमोहन नंदा, भाजीपाला असोशिएशनचे अध्यक्ष श्री.बरे, सचिन कुडमेथे, राजेश गुर्जर, गजानन वडेकर, विक्रेता खरेदीदार यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

नोडल अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधकाची नियुक्ती : यवतमाळ शहरात मुख्य भाजी मंडीतून यवतमाळ शहराच्या सर्व भागात योग्यरितीने भाजीचे वितरण होण्याच्या कामावर नियंत्रण ठेवण्याकरीता सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक रमेश कटके यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
यवतमाळ शहरातील ठोक भाजी मंडी दररोज सकाळी 3 ते सकाळी 6 वाजेपर्यंत सुरु राहील व सकाळी 6.15 वाजेनंतर त्या ठोक भाजी मंडीमध्ये कोणीही राहणार नाही याची दक्षता घ्यावी. यवतमाळ शहरातील प्रतिबंधीत क्षेत्रातून सदर ठोक भाजी मंडीमध्ये कोणतेही हमाल, एजंट, ठोक विक्रेता, किरकोळ विक्रेता किंवा नागरिक येणार नाही याची दक्षता घ्यावी. ठोक भाजी मंडीमध्ये ठोक भाजीची दुकाने Odd-Even या पध्दतीने सुरु राहतील याची दक्षता घ्यावी. यवतमाळ शहरातील ठोक भाजी मंडीमध्ये ठोक भाजीच्या दुकानाव्यतिरिक्त इतर कोणतीही दुकाने लागणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच परिसरात निर्जंतूकीकरण, नियमित स्वच्छता मुख्याधिकारी, न.प. यवतमाळ यांच्या यंत्रणेमार्फत करून घ्यावी. ठोक भाजी मंडीमध्ये प्रत्येक किरकोळ भाजी विक्रेता व ठोक भाजी विक्रेता यांनी सामाजिक अंतराचे पालन करावे व त्यांनी तोंडावर मास्क लावणे बंधनकारक आहे. तसेच त्या ठिकाणी सॅनिटायझर, हॅन्डवॉशची व्यवस्था करावी. वेळोवेळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मदतीने आवश्यक त्या उद्घोषणा भाजी मंडीमध्ये कराव्यात. वरीलप्रमाणे सर्व बाबींची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी नोडल अधिकारी यांची राहील. या कामात कोणतीही हयगय होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांनी आदेशित केले आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

यवतमाल जिले के तरोडा गांव में शहीद जवान रहाटे को दीगई अंतिम विदाई. अरणी:- प्रतिनिधि (शाहरुख काझी) महाराष्ट्र के गडचिरोली में 1 तारीख को हुए नक्सली हमले में शहीद जवान आग्रमन रहाटे को उसके गांव में अंतिम विदाई दे दी गई लेकिन इनके परिजनों ने इनकी टुकड़ी का नेतृत्व करने वाले अधिकारी की मिलीभगत से यह हादसा होने का गंभीर आरोप लगाया है गडचिरोली के कुरखेड़ा में 1 मई के दिन नक्सलियों द्वारा पुलिस गाड़ी को विस्फोट से उड़ाकर 15 जवानों को शहीद किया था उनमें से एक यवतमाल जिले के अरणी तहसील के तरोड़ा गांव का जवान अग्रमन रहाटे भी शहीद हुआ है शहीद जवान के गांव में 3 में को नम आंखों से अंतिम विदाई दे दी गई शहीद के परिजनों ने इस हमले को इनका नेतृत्व करने वाला अधिकारी काले के मिलीभगत से अंजाम दिया गया है ऐसा गंभीर आरोप लगाया है इस अधिकारी पर कार्रवाई करने की मांग परिजनों ने की है.
पुसद विधानसभा के युवा उमेदवार इंद्रनील मनोहरराव नाईक इनकी ऐतेहासिक जीत. महाराष्ट्र - यवतमाल जिले के पुसद विधानसभा निर्वाचन क्षेत्र से महाराष्ट्र के पूर्वमंत्री मनोहरराव नाईक के सुपुत्र युवा उमेदवार इंद्रनील मनोहर नाईक ने भाजपा के उमेदवार निलय नाईक को करारी हार देते हुए कुल 89143 मत हासिल करके एक ऐतिहासिक जीत हासिल की । आपको बतादे के राष्ट्रवादी का किला माने जाने वाले इस चुनाव क्षेत्र में एक ही परिवारज के दो भाई निलय नाईक और छोटे भाई इंद्रनील नाईक चुनाव मैदान में होने के कारण पूरे महाराष्ट्र की नज़र पुसद विधानसभा की इस सीट पर बानी हुई थी । आखिरकार 2019 के इस विधानसभा चुनाव में राष्ट्रवादी के युवा उमेदवार इंद्रनील मनोहरराव नाईक की 9701 ओठों से ऐतेहासिक जीत होने के चलते पुसद विधानसभा का इतिहास कायम रहा ।
टीप्पर हॉटेलमध्ये घुसल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान,एक जखमी   पुसद प्रतिनिधी (प्रा. अकरम शेख) पुसद/ दि.१३ पी एन कॉलेज व फार्मसी कॉलेज च्या दरम्यान असलेल्या एका जगदंबा टी सेंटर मध्ये अचानक टीप्पर घुसल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन किरकोळ जखमी झाल्याची घटना आज दिनांक १३ जून रोजो दुपारी एक वाजता घडल्याने सर्वत्र खळबळ माजली होती.           याबाबत सविस्तर सविस्तर वृत्त असे की पुसद दिग्रस मार्गावरील फुलसिंग नाईक महाविद्यालय व फार्मसी कॉलेजच्या मध्यभागात असलेल्या चौकातील नूतनताई क-हाले यांच्या घरामध्येच हॉटेल व पानठेला हा व्यवसाय चालू असताना अचानकपणे दुपारी दिग्रस रोड कडून पुसद कडे येणाऱ्या टीप्पर क्रमांक एम पी 09/जी आई  7785 ने  पोलिस ब्रेकेट तोडून हॉटेलला जबर धडक दिली त्यामध्ये पानठेला, हॉटेल चे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन हॉटेल समोर असलेल्या स्कुटी क्रमांक एम एच 29/बी एल  5110 क्रमांकाच्या ॲक्टिवा गाडीला जबर धडक बसल्याने दुचाकीस्वार जखमी झाला असून त्यांना खाजगी दवाखान्यांमध्ये उपचारासाठी भरती केले  तर घर मालक तथा हॉटेलचे मालक असलेल्या नूतनताई क-हाळे यांनी हा प्रत्यक्