मुख्य सामग्रीवर वगळा
गाण्‍याच्‍या माध्‍यमातुन महसूल विभागातील अव्‍वल कारकुनाची ‘कोरोना’ जनजागृती


श्री जनार्दन बापुराव बावणे यांचे जि.प. शिक्षक मित्र श्री संदीप इंगळे व शिलवंत इंगोले या दोघांनी लिहुन दिलेले कोरोना जनजागृती वरील गाणे श्री बावणे यांनी स्‍वतः गायन करुन कोरोनाबाबत जनजागृती केली. या गाण्‍याची चर्चा सध्‍या सोशल मिडियावर सुरु आहे.
श्री बावणे हे उपविभागीय अधिकारी कार्यालय, पुसद (महसूल विभाग) येथे अव्‍वल कारकुन या पदावर कार्यरत आहे. त्‍यांना गाण्‍याची आवड आहे. सर्वत्र कोरोना या विषाणुचा हाहाकार माजलेला असुन बरेच लोक रस्‍त्‍यावर विनाकारण भटकत असतात, कोरोनाबाबत जनजागृती करण्‍यासाठी प्रशासनाला मदत व्‍हावी, या उद्देशाने त्‍यांनी हे गाणे लोकप्रिय गाण्‍याच्‍या चालीवर गायिले आहे. 
व्‍हाट्अप, फेसबुक, युट्युबवर त्‍यांनी कोरोनाबाबत जनजागृती करण्‍याबाबतचा व्हिडीओ प्रसारित केला असून सोशल मिडियावर सदर व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. सहज-सोप्‍या शब्‍दांचा वापर करुन रचलेल्‍या या गाण्‍याच्‍या माध्‍यमातुन कोरोना आजाराला घाबरुन न जाता घरातच थांबण्‍याबाबत तसेच शासनाच्‍या निर्देशाचे पालन करुन प्रशासनास सहकार्य करण्‍याबाबत श्री बावणे यांनी जनतेला आवाहन वजा विनंती केली आहे. 
सदर गाणे https://www.youtube.com/channel/UC6ex61oP8XevFGxfvGFuL8Q या युट्युब चॉनल वर उपलब्‍ध आहे.
कराओके ट्रॅकवरील संगीताचा वापर करुन त्‍यांनी घराच्‍या बाहेर न पडता, घरातच राहण्‍याबाबत त्‍यांनी ध्‍वनी चित्रफितीच्‍या माध्‍यमातुन प्रसार केला आहे.



"सध्‍या लॉकडाउन मुळे बरिच जनता, कर्मचारी घरीच राहत असल्‍यामुळे सोशल मिडीयावर जास्‍त अॅक्‍टीव्‍ह आहेत. त्‍यांच्‍यापर्यंत सोशल मिडियाच्‍या माध्‍यमातुन कोरोनाबाबत जनजागृती करण्‍यासाठी मी हा प्रयत्‍न केला आहे.”

- जनार्दन बावणे, अ.का.-
उ.वि.अ. कार्यालय, पुसद

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दाते महीला बँक वाचवण्यासाठी महिला सहकारी बँक कृती समिती यवतमाळ ची संघर्ष परिषद

दाते महीला बँक वाचवण्यासाठी महिला सहकारी बँक कृती समिती यवतमाळ ची संघर्ष परिषद यवतमाळ येथील बाबाजी दाते महीला बँक मध्ये अनेक खातेदार, ठेवीदार यांचे पैसे आहेत अनेकांच्या खूप समस्या आहेत. पण कायद्याने आपण आपले पैसे कसे काढू शकतो यासाठी आज संघर्ष परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी मुंबई येथून विश्वास उटगी यांना आमंत्रित करण्यात आले होते. विश्वास उटगी हे माजी सचिव ऑल इंडिया बँक फेडरेशन आहेत. ज्या बँका डुबले आहेत त्या बँकांमधील खातेदारांना आपले पैसे काढण्यासाठी मार्गदर्शन करतात. कायद्याने सल्ला देतात. यासाठी ते मार्गदर्शन करतात. यासाठी आज संघर्ष परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या संघर्ष परिषदेमध्ये हजाराच्या वर पीडित खातेदार, ठेवीदार सहभागी झाले होते .या संघर्ष परिषदेमध्ये येणाऱ्या समोरच्या काळात लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, कर्जदार ,संचालक यांच्या घरासमोर डफडे वाजवा आंदोलन ,रिझर्व्ह बँकेसमोर धरणे, कायदेशीर मार्गासाठी उच्च न्यायालयात धाव ,अशा अनेक आंदोलनात्मक विषय घेऊन विविध समित्यांचे गठन करण्यात आले. यावेळी नितीन बोदे, राजू पडगिलवार, सुनील पुनवटकर, शैलेश काळबांडे, पिसाळकर ...
जस्टिस नरीमन पर क्रिमिनल केस करने वाले रशीद खान और अन्य के समर्थन में सुप्रिम कोर्ट के इतिहास में सबसे जादा वकीलों का वकालतनामा. रिटायर्ड जस्टिस रंजन गोगोई की अपराधिक साजिश उजागर सुप्रिम कोर्ट के जस्टिस रोहींटन नरीमन और विनीत सरण पर केस करने वाले रशीद खान पठाण, ऍड. निलेश ओझा और ऍड. विजय कुर्ले के समर्थन में सुप्रिम कोर्ट के हजारो वकीलो ने अपना समर्थन दिया है. ऑल इंडिया एस. सी., एस. टी एंड मायनॉरिटि लॉयर्स असोसिएशन, सुप्रिम कोर्ट एंड हाई कोर्टस लिटीगंटस असोसिएसन, इंडियन बार असोसिएशन, मानव अधिकार सुरक्षा परीषद ने लिखित रुपमे चीफ जस्टिस ऑफ़ इंडिया श्री. शरद बोबडे, राष्ट्रपती श्री. रामनाथ कोविद, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को पत्र लिखकर दोषी जजेस रोहिंटन नरीमन, विनीत सरण, अनिरुद्ध बोस, रिटायर्ड जस्टिस दीपक गुप्ता और वकील सिद्धार्थ लूथरा, मिलिंद साठे, कैवान कल्यानीवाला के खिलाफ एफ. आय. आर. (FIR) दर्ज करने, सीबीआय (CBI) को जाच आदेश देने तथा इन जजेस को जाच पूरी होने तक सुप्रीम कोर्ट की किसी भी कारवाई में भाग लेने की अनुमति नहीं देने की मांग की है. ज्ञात हो की इससे पहले भी 10 जनवरी 2020 क...

आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयास क्रांतीसुर्य बिरसा मुंडाची भव्य प्रतीमा भेट

आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयास क्रांतीसुर्य बिरसा मुंडाची भव्य प्रतीमा भेट        पुसद : महानायक धरतीआबा बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त पुसद आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय पुसद येथे नवनियुक्त पुसद आदिवासी विकास समिती अध्यक्ष तथा आदिवासी युवा परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुनील ढाले यांच्या तर्फे आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयास भगवान बिरसा मुंडा यांच्या भव्य प्रतिमेची भेट देण्यात आली. बिरसाचे विचार समस्त युवकांनी अंगीकारून वंचितांना न्याय देण्याचे काम करावे असे प्रतिपादन भेट सोहळ्याचे अध्यक्ष आदिवासी सेवक रामकृष्ण चौधरी सर , जी प सदस्य गजानन उघडे , वसंता  चिरमाडे , पुंडलिक  टारफे , श्रीकांत चव्हाण , राज्य संघटक जीवन फोपसे , जिल्हा उपाध्यक्ष संतोष गारुळे , तालुकाध्यक्ष गजानन टारफे , कर्मचारी संघटनेचे तालुका सचीव संदेश पांडे , आ.विकास परिषदेचे सचिव सुरेश बोके , श्री खूपसे , जयवंत भुरके , तुकाराम भुरके , समाधान टारफे , गंगाराम काळे साहेब , रामदास शेळके , विजय टारफे , दत्ता भडंगे , दशरथ भुरके , समाधान चोंढकर , हनुमान गोदमले , भगवान सुरोशे , सुरेश पित्रे , बालाजी शे...