मुख्य सामग्रीवर वगळा
पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने जिल्ह्याला 83 लक्ष रुपये प्राप्त

v संजय गांधी, श्रवणबाळ, इंदिरा गांधी वृध्दापकाळच्या लाभार्थ्यांना मिळणार लाभ

यवतमाळ, दि. 22 : अनेक निराधार लोकांचा उदरनिर्वाह व्हावा, या उद्देशाने त्यांच्या खात्यात शासनाच्यावतीने थेट रक्कम जमा केली जाते. कोरोनामुळे सगळे जनजीवन विस्कळीत झाल्यानंतर या निराधार लोकांना त्यांच्या हक्काची रक्कम मिळावी यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी शासनाकडे पाठपुरावा केला. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून संजय गांधी निराधार योजना, श्रवणबाळ निवृत्तीवेतन योजना तसेच इंदिरा गांधी वृध्दापकाळ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी जिल्ह्याला 83 लक्ष 45 हजार 284 रुपये प्राप्त झाले आहे. ही रक्कम कोषागार कार्यालयात जमा झाली असून वरील योजनेच्या लाभार्थ्यांना त्वरीत वाटप करण्यात येणार आहे.

लॉकडाऊन तसेच संचारबंदीची झळ सर्वांनाच पोहचत आहे. रोजगार नसल्यामुळे दैनंदिन कुटुंबाचा गाडा हाकणे कठीण होत आहे. त्यामुळे निराधार तसेच वृध्दापकाळ असणा-या लोकांना मिळणारे अर्थसहाय्य त्वरीत उपलब्ध व्हावे, या उद्देशाने पालकमंत्री श्री. राठोड यांनी वित्त व कोषागार विभागाचे सचिव तसेच वरिष्ठ अधिका-यांशी बोलणी केली. तसेच जिल्ह्यातील अशा लोकांसाठी त्वरीत निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. त्यानुसार संजय गांधी निराधार योजनेकरीता 41 लक्ष 7 हजार 884 रुपये, श्रवणबाळ निवृत्तीवेतन योजनेकरीता 33 लक्ष 91 हजार 100 रुपये, इंदिरा गांधी निराधार वृध्दापकाळ योजनेकरीता 8 लक्ष 43 हजार 900 रुपये, इंदिरा गांधी अपंग योजनेकरीता 2400 रुपये असे एकूण 83 लक्ष 45 हजार 284  रुपये जिल्हा कोषागार कार्यालयात प्राप्त झाले आहे.

जिल्ह्यात संजय गांधी निराधार योजनेचे एकूण 43860 लाभार्थी, श्रवणबाळ निवृत्तीवेतन योजनेचे 81955 लाभार्थी तर इंदिरा गांधी वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजनेचे 39590 लाभार्थी आहेत. या लाभार्थ्यांच्या खात्यात लवकरात लवकर हा निधी वळता करावा, अशा सुचना पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दाते महीला बँक वाचवण्यासाठी महिला सहकारी बँक कृती समिती यवतमाळ ची संघर्ष परिषद

दाते महीला बँक वाचवण्यासाठी महिला सहकारी बँक कृती समिती यवतमाळ ची संघर्ष परिषद यवतमाळ येथील बाबाजी दाते महीला बँक मध्ये अनेक खातेदार, ठेवीदार यांचे पैसे आहेत अनेकांच्या खूप समस्या आहेत. पण कायद्याने आपण आपले पैसे कसे काढू शकतो यासाठी आज संघर्ष परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी मुंबई येथून विश्वास उटगी यांना आमंत्रित करण्यात आले होते. विश्वास उटगी हे माजी सचिव ऑल इंडिया बँक फेडरेशन आहेत. ज्या बँका डुबले आहेत त्या बँकांमधील खातेदारांना आपले पैसे काढण्यासाठी मार्गदर्शन करतात. कायद्याने सल्ला देतात. यासाठी ते मार्गदर्शन करतात. यासाठी आज संघर्ष परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या संघर्ष परिषदेमध्ये हजाराच्या वर पीडित खातेदार, ठेवीदार सहभागी झाले होते .या संघर्ष परिषदेमध्ये येणाऱ्या समोरच्या काळात लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, कर्जदार ,संचालक यांच्या घरासमोर डफडे वाजवा आंदोलन ,रिझर्व्ह बँकेसमोर धरणे, कायदेशीर मार्गासाठी उच्च न्यायालयात धाव ,अशा अनेक आंदोलनात्मक विषय घेऊन विविध समित्यांचे गठन करण्यात आले. यावेळी नितीन बोदे, राजू पडगिलवार, सुनील पुनवटकर, शैलेश काळबांडे, पिसाळकर ...
जस्टिस नरीमन पर क्रिमिनल केस करने वाले रशीद खान और अन्य के समर्थन में सुप्रिम कोर्ट के इतिहास में सबसे जादा वकीलों का वकालतनामा. रिटायर्ड जस्टिस रंजन गोगोई की अपराधिक साजिश उजागर सुप्रिम कोर्ट के जस्टिस रोहींटन नरीमन और विनीत सरण पर केस करने वाले रशीद खान पठाण, ऍड. निलेश ओझा और ऍड. विजय कुर्ले के समर्थन में सुप्रिम कोर्ट के हजारो वकीलो ने अपना समर्थन दिया है. ऑल इंडिया एस. सी., एस. टी एंड मायनॉरिटि लॉयर्स असोसिएशन, सुप्रिम कोर्ट एंड हाई कोर्टस लिटीगंटस असोसिएसन, इंडियन बार असोसिएशन, मानव अधिकार सुरक्षा परीषद ने लिखित रुपमे चीफ जस्टिस ऑफ़ इंडिया श्री. शरद बोबडे, राष्ट्रपती श्री. रामनाथ कोविद, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को पत्र लिखकर दोषी जजेस रोहिंटन नरीमन, विनीत सरण, अनिरुद्ध बोस, रिटायर्ड जस्टिस दीपक गुप्ता और वकील सिद्धार्थ लूथरा, मिलिंद साठे, कैवान कल्यानीवाला के खिलाफ एफ. आय. आर. (FIR) दर्ज करने, सीबीआय (CBI) को जाच आदेश देने तथा इन जजेस को जाच पूरी होने तक सुप्रीम कोर्ट की किसी भी कारवाई में भाग लेने की अनुमति नहीं देने की मांग की है. ज्ञात हो की इससे पहले भी 10 जनवरी 2020 क...

आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयास क्रांतीसुर्य बिरसा मुंडाची भव्य प्रतीमा भेट

आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयास क्रांतीसुर्य बिरसा मुंडाची भव्य प्रतीमा भेट        पुसद : महानायक धरतीआबा बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त पुसद आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय पुसद येथे नवनियुक्त पुसद आदिवासी विकास समिती अध्यक्ष तथा आदिवासी युवा परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुनील ढाले यांच्या तर्फे आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयास भगवान बिरसा मुंडा यांच्या भव्य प्रतिमेची भेट देण्यात आली. बिरसाचे विचार समस्त युवकांनी अंगीकारून वंचितांना न्याय देण्याचे काम करावे असे प्रतिपादन भेट सोहळ्याचे अध्यक्ष आदिवासी सेवक रामकृष्ण चौधरी सर , जी प सदस्य गजानन उघडे , वसंता  चिरमाडे , पुंडलिक  टारफे , श्रीकांत चव्हाण , राज्य संघटक जीवन फोपसे , जिल्हा उपाध्यक्ष संतोष गारुळे , तालुकाध्यक्ष गजानन टारफे , कर्मचारी संघटनेचे तालुका सचीव संदेश पांडे , आ.विकास परिषदेचे सचिव सुरेश बोके , श्री खूपसे , जयवंत भुरके , तुकाराम भुरके , समाधान टारफे , गंगाराम काळे साहेब , रामदास शेळके , विजय टारफे , दत्ता भडंगे , दशरथ भुरके , समाधान चोंढकर , हनुमान गोदमले , भगवान सुरोशे , सुरेश पित्रे , बालाजी शे...