मुख्य सामग्रीवर वगळा
कोरोना चाचणी प्रयोगशाळा व अद्ययावत रूग्णालयासाठी अडीच कोटी, 

खनिज विकास निधीतून पालकमंत्र्यांनी उपलब्ध करून दिला निधी

यवतमाळ, दि. 18 : मुकाबला न्यूज
कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने उपाययोजना करण्याच्या दृष्टीने पालकमंत्री संजय राठोड यांनी खनिज विकास निधीमधून अडीच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीतून कोरोना चाचणी प्रयोगशाळा व अद्ययावत रुग्णालय उभारण्याचे निर्देश त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहे.
जिल्ह्यात कोरोना संसर्ग पसरू नये व संशयित नागरिकांची कोरोना चाचणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तातडीने व्हावी म्हणून 500 खाटांचे अद्ययावत रूग्णालय व प्रयोगशाळा उभारण्याचा निर्णय पालकमंत्री संजय राठोड यांनी घेतला. त्यासाठी खनिज क्षेत्र कल्याण योजनेच्या निधीतून तत्काळ अडीच कोटी रूपयांचे अनुदान मंजूर करण्याचे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी जिल्हाधिकारी एम. डी. सिंग यांना दिले.
कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून प्रशासन सर्वतोपरी खबरदारी घेत आहे. या स्थितीत नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवू नये व त्यांच्यावर तातडीने उपचार करता यावे, यासाठी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मुलांच्या आणि मुलींच्या नवीन वसतीगृहाचे रूपांतर 500 खाटांच्या अद्ययावत रूग्णालयात करण्याचा निर्णय पालकमंत्री संजय राठोड यांनी घेतला. या रूग्णालयात कोरोनाबाधितांवर औषधोपचार, चिकित्सालयीन साहित्य, स्वच्छताविषयक बाबी, विविध किट्स, रसायने व आवश्यक साधनसामग्रीकरीता खनिज क्षेत्र कल्याण निधीतून तातडीने एक कोटी रूपयांचा निधी मंजूर केला. यामुळे भविष्यात अशा रूग्णांवर अद्ययावत उपचार करणे सोईचे होणार आहे. 
याशिवाय सध्या करोना संशयितांचे अहवाल तपासणीकरीता नागपूर येथे पाठवावे लागतात. हे अहवाल विलंबाने प्राप्त होत असल्याने प्रशासन आणि रूग्ण दोघांचाही जीव टांगणीला लागतो. ही अडचण जाणून घेत पालकमंत्री राठोड यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातच करोना चाचणी करण्यासाठी अद्ययावत प्रयोगशाळा उभारण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयाच्या यंत्रणेस दिशानिर्देश करून राज्य शासनाकडे पाठपुरावा केला. करोनाबाधित व संशयितांची तपासणी करण्याकरीता ‘व्हायरल रिसर्च डायग्नोस्टिक लेबॉरेटरी’ (व्हीआरडीएल) उभारण्याचा निर्णय घेतला. या सुसज्ज प्रयोगशाळेकरीता खनिज क्षेत्र कल्याण निधीतून दीड कोटींचा निधी मंजूर केला. या निधीतून प्रयोगशाळेकरीता लागणारी आवश्यक यंत्रसामग्री व साहित्य खरेदी केले जाणार आहे. अनुक्रमे एक आणि दीड कोटींच्या या दोन्ही निधींच्या वितरणाबाबत पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हा खनिज प्रतिष्ठान व्यवस्थापकीय समितीचे अध्यक्ष एम.डी. सिंह यांनी प्रशासकीय मान्यता देऊन आदेश निर्गमित केले.
कोरोना विरोधात लढाईस बळ – पालकमंत्री संजय राठोड
कोरोना विरोधात लढाई लढण्यासाठी यंत्रणेस बळ मिळावे आणि येथील रूग्णांची वैद्यकीय सुविधांअभावी गैरसोय होऊ नये म्हणून खनिज क्षेत्र कल्याण निधीतून या सुविधा उपलब्ध करून दिल्या. येत्या आठवडाभरात 500 खाटांचे हे रूग्णालय व कोरोना चाचणी प्रयोगशाळा कार्यान्वित होईल, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री संजय राठोड यांनी दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दाते महीला बँक वाचवण्यासाठी महिला सहकारी बँक कृती समिती यवतमाळ ची संघर्ष परिषद

दाते महीला बँक वाचवण्यासाठी महिला सहकारी बँक कृती समिती यवतमाळ ची संघर्ष परिषद यवतमाळ येथील बाबाजी दाते महीला बँक मध्ये अनेक खातेदार, ठेवीदार यांचे पैसे आहेत अनेकांच्या खूप समस्या आहेत. पण कायद्याने आपण आपले पैसे कसे काढू शकतो यासाठी आज संघर्ष परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी मुंबई येथून विश्वास उटगी यांना आमंत्रित करण्यात आले होते. विश्वास उटगी हे माजी सचिव ऑल इंडिया बँक फेडरेशन आहेत. ज्या बँका डुबले आहेत त्या बँकांमधील खातेदारांना आपले पैसे काढण्यासाठी मार्गदर्शन करतात. कायद्याने सल्ला देतात. यासाठी ते मार्गदर्शन करतात. यासाठी आज संघर्ष परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या संघर्ष परिषदेमध्ये हजाराच्या वर पीडित खातेदार, ठेवीदार सहभागी झाले होते .या संघर्ष परिषदेमध्ये येणाऱ्या समोरच्या काळात लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, कर्जदार ,संचालक यांच्या घरासमोर डफडे वाजवा आंदोलन ,रिझर्व्ह बँकेसमोर धरणे, कायदेशीर मार्गासाठी उच्च न्यायालयात धाव ,अशा अनेक आंदोलनात्मक विषय घेऊन विविध समित्यांचे गठन करण्यात आले. यावेळी नितीन बोदे, राजू पडगिलवार, सुनील पुनवटकर, शैलेश काळबांडे, पिसाळकर ...

जिल्ह्यात सर्व व्यवहार नियमितपणे सुरू करण्यास दिली जिल्हाधिकारी यांनी परवानगी; जिल्हयाचा समावेश श्रेणी एकमध्ये

 *जिल्ह्यात सर्व व्यवहार नियमितपणे  सुरू करण्यास दिली जिल्हाधिकारी यांनी परवानगी*  *जिल्हयाचा समावेश श्रेणी एकमध्ये* *लग्न व अंथविधीसाठी 50  लोकांच्या उपस्थितीस परवानगी* *शासकीय कार्यलये 100 टक्के क्षमतेने सुरू* *कोविड नियमांचे पालन तसेच दुकाने व आस्थापना चालकास व कर्मचाऱ्यांना कोविड चाचणी बंधनकारक* यवतमाळ, दि. 6 जून :    शासनाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे यवतमाळ जिल्ह्याचा समावेश श्रेणी -1 मध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी  यवतमाळ जिल्ह्याकरीता 7 जून 2021 पासून ब्रेक दि चेन अंतर्गत घालून देण्यात आलेले निर्बंध शिथिल केले असून सर्वच बाबी नियमितपणे सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे.  अत्यावश्यक सेवेंची दुकाने व अत्यावश्यक सेवा तसेच इतर दुकाने व सेवा  नियमितपणे सुरु राहतील. तथापि अत्यावश्यक सेवेंच्या व इतर आस्थापना धारकांनी दुकानात नागरिकांची होणारी गर्दी कमी करण्याच्या दृष्टीने जास्तीत जास्त होम डिलेव्हरीद्वारे वस्तूंचा पुरवठा करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. त्यादृष्टीने आस्थापना धारकांनी स्वत:चे व्हॉटसॲप नंबर दुकाना...

शिवशक्ती महाविद्यालय बाभुळगाव वतीने आयोजित "तीस दिवसीय राज्यस्तरीय व्यक्तिमत्व विकास प्रमाणपत्र कोर्स" संपन्न

 शिवशक्ती महाविद्यालय बाभुळगाव वतीने आयोजित "तीस दिवसीय राज्यस्तरीय व्यक्तिमत्व विकास प्रमाणपत्र कोर्स" संपन्न यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव येथील शिवशक्ती कला व वाणिज्य महाविद्यालय येथे अर्थशास्त्र विभाग आणि ग्रंथालय व ज्ञान संसाधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने तीस दिवसीय राज्यस्तरीय व्यक्तिमत्व विकास प्रमाणपत्र कोर्सचे आयोजन दि. 15 एप्रिल ते 15 मे 2021 दरम्यान आभासी पद्धतीने करण्यात आले होते. या कोर्सचा समारोपीय कार्यक्रम दि. 16 मे 2021 रोजी संपन्न झाला. या सोहळ्याचे अध्यक्ष सन्माननीय प्रा. बाळासाहेब धांदे व्यवस्थापक, शिवशक्ती शिक्षण संस्था, कोठा हे होते तर विशेष अतिथी म्हणून डॉ. मोहन खेरडे, संचालक, ज्ञान संसाधन केंद्र, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती हे होते. तर प्रमुख उपस्थिती म्हणून प्रा. डॉ. कविता तातेड अणे महिला महाविद्यालय यवतमाळ, डॉ. शशिकांत वानखेडे ग्रंथपाल, भारती महाविद्यालय आर्णी आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दीपक कोदूरवार हे होते. याप्रसंगी मान्यवरांनी व्यक्तिमत्व विकास प्रमाणपत्र कोर्स कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीत विद्यार्थ्यांना नवचेतना, नवउमेद...