मुख्य सामग्रीवर वगळा
जिल्ह्यातील 19 लक्ष नागरिकांना मिळणार मोफत तांदूळ


                                                                 - पालकमंत्री संजय राठोड

⏩ अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेतील कार्डधारकांचा समावेश

⏩ एप्रिल, मे आणि जून या महिन्यात अतिरिक्त वाटप

यवतमाळ दि.  2 : 
कोरोना विषाणु (कोव्हिड-19) प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली असून कलम 144 ची अंमलबजावणी सुरू आहे. त्यामुळे सर्वत्र दैनंदिन व्यवहार ठप्प झाले आहे. याची झळ सर्वांनाच बसत आहे. मात्र रोजमजुरी करून उदरनिर्वाह करणा-या गरीब आणि गरजू नागरिकांना दोन वेळचे जेवण उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. याचाच भाग म्हणून जिल्ह्यातील 19 लक्ष 28 हजार 953 नागरिकांना प्रतिमहिना प्रतिव्यक्ति पाच किलो अतिरक्त तांदूळ देण्यात येणार आहे. हे वाटप नियमित धान्याच्या व्यतिरिक्त असून एप्रिल, मे आणि जून असे तीन महिने तांदूळ देण्यात येईल, असे राज्याचे वने, भुकंप पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब योजनेच्या पात्र लाभार्थ्यांसाठी माहे एप्रिल ते जून या तीन महिन्यात मोफत तांदळाचे वाटप करण्यात येईल. जिल्ह्यात अंत्योदय अन्न योजनेंतर्गत शिधापत्रिकाधारकांची संख्या 1 लक्ष 22 हजार 622 असून सदस्य संख्या 5 लक्ष 28 हजार 623 आहे. तर प्राधान्य कुटुंब योजनेंतर्गत शिधापत्रिकाधारकांची संख्या 3 लक्ष 13 हजार 219 आहे. यातील सदस्य संख्या 14 लक्ष 330 आहे. अंत्योदय अन्न व प्राधान्य कुटुंब योजनेंतर्गत एकूण 19 लक्ष 28 हजार 953 लाभार्थ्यांना प्रत्येकी पाच किलो प्रति माह असे तीन महिने मोफत तांदूळ देण्यात येईल. यासाठी अंत्योदय अंतर्गत मा‍सिक नियतन 2643 मेट्रीक टन तर प्राधान्य कुटुंब अंतर्गत मासिक नियतन 7002 मेट्रीक टन तांदूळ लागणार आहे. तीन महिन्यात दोन्ही योजनेंतर्गत एकूण 28935 मेट्रीक टन तांदूळ वाटण्यात येणार आहे. या मालाची उचल सुरू असून स्वस्त धान्य दुकानातून नागरिकांना त्याचा लाभ मिळणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.

मोफत तांदळाचे वाटप करतांना त्या लाभार्थ्यांनी नियमित अन्नधान्याची उचल केली आहे की नाही, याची खतरजमा करण्यात येईल. लोकांना मोफत तांदूळ वाटण्यासाठी विहित कालावधीत तांदळाची उचल होणे गरजेचे आहे. यात कसूर केल्यास संबंधित अधिका-यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे शासन आदेशात म्हटले आहे. भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामातून तांदूळ स्वीकारतांना शासनाच्या निर्देशानुसार नमुने घ्यावे. तसेच संयुक्तपणे तांदळाचा दर्जा तपासून तो समाधानकारक असल्याची खात्री करूनच उचल करावी. तांदळाचे वितरण करतांना रास्तभाव दुकानदारांनी ई-पॉस मशीनद्वारे अन्नधान्य वितरीत करणे अनिवार्य आहे, असे आदेशात नमुद आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दाते महीला बँक वाचवण्यासाठी महिला सहकारी बँक कृती समिती यवतमाळ ची संघर्ष परिषद

दाते महीला बँक वाचवण्यासाठी महिला सहकारी बँक कृती समिती यवतमाळ ची संघर्ष परिषद यवतमाळ येथील बाबाजी दाते महीला बँक मध्ये अनेक खातेदार, ठेवीदार यांचे पैसे आहेत अनेकांच्या खूप समस्या आहेत. पण कायद्याने आपण आपले पैसे कसे काढू शकतो यासाठी आज संघर्ष परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी मुंबई येथून विश्वास उटगी यांना आमंत्रित करण्यात आले होते. विश्वास उटगी हे माजी सचिव ऑल इंडिया बँक फेडरेशन आहेत. ज्या बँका डुबले आहेत त्या बँकांमधील खातेदारांना आपले पैसे काढण्यासाठी मार्गदर्शन करतात. कायद्याने सल्ला देतात. यासाठी ते मार्गदर्शन करतात. यासाठी आज संघर्ष परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या संघर्ष परिषदेमध्ये हजाराच्या वर पीडित खातेदार, ठेवीदार सहभागी झाले होते .या संघर्ष परिषदेमध्ये येणाऱ्या समोरच्या काळात लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, कर्जदार ,संचालक यांच्या घरासमोर डफडे वाजवा आंदोलन ,रिझर्व्ह बँकेसमोर धरणे, कायदेशीर मार्गासाठी उच्च न्यायालयात धाव ,अशा अनेक आंदोलनात्मक विषय घेऊन विविध समित्यांचे गठन करण्यात आले. यावेळी नितीन बोदे, राजू पडगिलवार, सुनील पुनवटकर, शैलेश काळबांडे, पिसाळकर ...

शिवशक्ती महाविद्यालय बाभुळगाव वतीने आयोजित "तीस दिवसीय राज्यस्तरीय व्यक्तिमत्व विकास प्रमाणपत्र कोर्स" संपन्न

 शिवशक्ती महाविद्यालय बाभुळगाव वतीने आयोजित "तीस दिवसीय राज्यस्तरीय व्यक्तिमत्व विकास प्रमाणपत्र कोर्स" संपन्न यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव येथील शिवशक्ती कला व वाणिज्य महाविद्यालय येथे अर्थशास्त्र विभाग आणि ग्रंथालय व ज्ञान संसाधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने तीस दिवसीय राज्यस्तरीय व्यक्तिमत्व विकास प्रमाणपत्र कोर्सचे आयोजन दि. 15 एप्रिल ते 15 मे 2021 दरम्यान आभासी पद्धतीने करण्यात आले होते. या कोर्सचा समारोपीय कार्यक्रम दि. 16 मे 2021 रोजी संपन्न झाला. या सोहळ्याचे अध्यक्ष सन्माननीय प्रा. बाळासाहेब धांदे व्यवस्थापक, शिवशक्ती शिक्षण संस्था, कोठा हे होते तर विशेष अतिथी म्हणून डॉ. मोहन खेरडे, संचालक, ज्ञान संसाधन केंद्र, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती हे होते. तर प्रमुख उपस्थिती म्हणून प्रा. डॉ. कविता तातेड अणे महिला महाविद्यालय यवतमाळ, डॉ. शशिकांत वानखेडे ग्रंथपाल, भारती महाविद्यालय आर्णी आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दीपक कोदूरवार हे होते. याप्रसंगी मान्यवरांनी व्यक्तिमत्व विकास प्रमाणपत्र कोर्स कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीत विद्यार्थ्यांना नवचेतना, नवउमेद...
जस्टिस नरीमन पर क्रिमिनल केस करने वाले रशीद खान और अन्य के समर्थन में सुप्रिम कोर्ट के इतिहास में सबसे जादा वकीलों का वकालतनामा. रिटायर्ड जस्टिस रंजन गोगोई की अपराधिक साजिश उजागर सुप्रिम कोर्ट के जस्टिस रोहींटन नरीमन और विनीत सरण पर केस करने वाले रशीद खान पठाण, ऍड. निलेश ओझा और ऍड. विजय कुर्ले के समर्थन में सुप्रिम कोर्ट के हजारो वकीलो ने अपना समर्थन दिया है. ऑल इंडिया एस. सी., एस. टी एंड मायनॉरिटि लॉयर्स असोसिएशन, सुप्रिम कोर्ट एंड हाई कोर्टस लिटीगंटस असोसिएसन, इंडियन बार असोसिएशन, मानव अधिकार सुरक्षा परीषद ने लिखित रुपमे चीफ जस्टिस ऑफ़ इंडिया श्री. शरद बोबडे, राष्ट्रपती श्री. रामनाथ कोविद, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को पत्र लिखकर दोषी जजेस रोहिंटन नरीमन, विनीत सरण, अनिरुद्ध बोस, रिटायर्ड जस्टिस दीपक गुप्ता और वकील सिद्धार्थ लूथरा, मिलिंद साठे, कैवान कल्यानीवाला के खिलाफ एफ. आय. आर. (FIR) दर्ज करने, सीबीआय (CBI) को जाच आदेश देने तथा इन जजेस को जाच पूरी होने तक सुप्रीम कोर्ट की किसी भी कारवाई में भाग लेने की अनुमति नहीं देने की मांग की है. ज्ञात हो की इससे पहले भी 10 जनवरी 2020 क...