मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑगस्ट, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
अंतरराष्ट्रीय महात्मा गांधी पीस फाउंडेशन तर्फे सत्यनिर्मिति महिला मंडळ अध्यक्षा सौ शबाना खान यांना शांतीदूत पदवी ने सम्मानित. उमरखेड (ता.प्र.) जातीयवाद मुक्त भारत अभियान जन सामान्य मानसा पर्यंत पोचवींन्याची देशात एकता कायम राखण्यासाठी विश्वात शांतिच्या मार्गावर नेहमी कार्य करणाऱ्या प्रतिष्ठित समाज सेवी व्यक्तिना अंतरराष्ट्रीय महात्मा गांधी फाउंडेशन नेपाळ ह्यनच्यावतीने सम्मानित करण्यात येते या वेळी यवतमाळ जिल्ह्यातील महिला व बाल कल्याणसाठी,निराधार महिलाना न्याय मिळवून देण्यासाठी, जातीय स्लोखा कायम राहवा या साठी नेहमी प्रयत्नशील राहनारी,विद्यार्थिनीना शिक्षणसाठी सहकार्य करणारी,महिलांना स्वावलंबी बनविन्या साठी नेहमी मदद करणारी,भ्र्ष्टाचार विरुद्ध नेहमी आवाज़ बुलंद करणारी,महिलांचे संसार उध्वस्त होण्यापासुन वाचवीणारी,गोर गरीबांच्या अधिकारा साठी नेहमी नई स्वार्थ संघर्ष करणारी महाराष्ट्राची महिलांची शक्ति महिलांच्या विकासाची धारा सत्यनिर्मिति महिला मंडळ उमरखेड च्या कार्याला सम्पूर्ण देशात प्रशंसनीय प्रतिसाद मिळत आहे मंडळाच्या सामाजिक क्षेत्रात केलेले कार्याची दखल घेत अंतरराष्ट्रीय महात
पोलिस शिपाई भरतीपूर्व परीक्षा प्रशिक्षण अल्पसंख्यांक समाजातील तरुणांची 19 ऑगस्ट रोजी निवड चाचणी यवतमाळ दि.14 :  अल्पसंख्यांक समाजातील मुस्लीम, ख्रिश्चन, बौध्द, पारसी, शिख, जैन व ज्यु या समाजातील उमेदवारांना पोलिस दलामध्ये नोकरीच्या समान संधी मिळण्याच्या दृष्टीने पोलिस शिपाई भरतीपूर्व परीक्षा योजना सुरू करण्यात आली आहे. सन 2019-20 करीता या योजनेंतर्गत मुस्लीम, ख्रिश्चन, बौध्द, पारसी, शिख, जैन व ज्यु या अल्पसंख्यांक समाजातील इच्छुक उमेदवारांची 19 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा मुख्यालयातील पोलिस परेड ग्राऊंड, यवतमाळ येथे अटी व शर्तीच्या अधिन राहून निवड चाचणी घेण्यात येणार आहे. यासाठी प्रशिक्षणार्थींचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2.50 लाखांपेक्षा जास्त नसल्याचा पुरावा, उमेदवार अल्पसंख्यांक समाजातील असावा, उमेदवारा 18 ते 28 वयोगटातील असावा. उमेदवाराची उंची (पुरूष 165 सेमी) व छाती 76 सेमी (फुगवून 84 सेमी)  तसेच महिला उमेदवाराची उंची 155 सेमी असावी. उमेदवार इयत्ता 12 वी उत्तीर्ण असावा. उमेदवारांनी शैक्षणिक अर्हता, आधार कार्ड इत्यादी कागदपत्रांच्या सत्यप्रती अर्जासोबत देणे आवश्यक
यवतमाळ जि ल्ह्या त जमावबंदी आदेश लागू यवतमाळ, दि.  1 4  :    जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी जिल्ह्यात मुंबई पोलीस अधिनियमातील तरतुदी अन्वये जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. या आदेशानुसार जिल्ह्यात  23 ऑगस्ट  पर्यंत जमावास बंदी राहणार आहे. या आदेशान्वये जिल्ह्यात जमाव करणे, शस्त्र बाळगणे, माणसांचे एकत्रिकरण व पुतळ्याचे प्रदर्शन करणे आदी प्रकारांवर बंदी घालण्यात आली आहे. या कलमाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द मुंबई पोलीस कायदा 1951 च्या कलम 37 (1) व 37 (3)   अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा दंडाधिका ऱ्यांनी   प्रसिध्दी पत्रकांद्वारे कळविले आहे.
भीम टायगर सेनेने केली लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती साजरी. पुसद /  लोकशाहीर, सयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रणी, काॅम्रेड , फकीरा, वारणेचा वाघ या कादंब-यातून उपेक्षीतांना नायकत्व प्रदान करणा-या आण्णाभाऊ साठे यांना भिम टायगर सेनेकडून मानवंदना करित बसस्थानकावर प्रतिमा लावून केली जयंती साजरी.        अराजकीय संघटना असलेल्या भिम टायगर सेनेकडून महामानवांचे विचार पेरण्याचे कार्य नेहमीच केल्या जाते. महामानवांच्या विचाराचे शिक्षण देऊन त्यांना संघटित करण्यासोबत संघटन शक्ती वाढवून येणाऱ्या संकटाशी दोन हात करण्याचा संघर्ष कसा करावा यासाठी प्रबोधनाच्या माध्यमातून व प्रत्यक्ष कृतीतून कार्य करणारे एकमेव संघटना म्हणजे भिम टायगर सेना होय.  सर्वधर्म समभाव व मानवतावादी दृष्टिकोन शिकविणाऱ्या सर्वच महामानवांच्या विचारांची गरज आज समाजाला भासत आहे व ते विचार तेवत ठेवण्यासाठी सर्वांनीच आपापल्या परीने प्रयत्न करण्याची गरज आहे आणि त्यातीलच एक भाग म्हणून भिम टायगर सेनेकडून यवतमाळ जिल्हयतिल पुसद शहर बस स्थानकावर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्य टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोर दादा कांबळे य
वीज वितरण कंपनी च्या कार्यकारी अभियंत्यांना तात्काळ निलंबित करा -जिल्हा काँग्रेस कमिटी ची मागणी यवतमाळ: 3 ऑगस्ट यवतमाळ शहरासह जिल्यातील विद्युत डीपी उघड्या असल्याबाबत अनेक वृत्तपत्रातून प्रसिद्धीस आले अनेकांचे प्राणही गेलेत परंतु निगरगट्ट झालेल्या प्रशासनाने याची कोणतीही दखल घेतलेली नाही या उलट सर्वत्र उघड्या डीपी आपल्याला पहावयास मिळतात अनेक ठिकाणी तर केवळ 3 फूट अंतरावर उघड्या डीपी आहेत यात लहान मुलांचा बळी जाण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे, या सर्व डीपी झाकण्याबाबत सतत दुर्लक्ष करणाऱ्या कार्यकारी अभियंत्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे ही मागणी एका प्रसिद्ध पत्रकातून जिल्हा काँग्रेस कमिटी च्या वतीने सरचिटणीस अनिल गायकवाड यांनी केलेली आहे, जर या प्रकारात जिल्यात कोणत्याही नागरिकांचा अथवा लहान मुलांचा दुर्घटना होऊन बळी गेल्यास कार्यकारी अभियंत्यांवर 302 कलमा अंतर्गत कारवाही करण्यास प्रशासनाला भाग पाडू असा ही इशारा या वेळी देण्यात आला, भर पावसात अनेक डीपी च्या आतमध्ये सुद्धा पाणी साचलेले असून हा वीज वितरण कंपनी चा  प्रकार अत्यंत निंदनीय असून तात्काळ कार्यकारी अभियंत्यांन
आर्णी येथिल श्री म द भारती विद्यालयात शिक्षक पालक सभा संपन्न आर्णी : दि. ३१ प्रतिनिधि : शाहरुख काझी आर्णी येथिल श्री म द भारती विद्यालय येथे दिनांक 31 जूलै 2019 ला शिक्षक पालक सभेचे आयोजन करण्यात आले या प्रसंगी पालकांनी खुप कमी प्रमाणात उपस्थीती दर्शविली. या सभेत विद्यार्थ्याच्या सर्वांगीन विकासासाठी कोणत्या उपाय योजणा करण्यात याव्या जसे क्रिडा क्षेत्र चांगला भर देण्यात यावा, विद्यार्थ्यांना पिण्या करिता फिल्टरच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी, एका वर्गात 120 मुले बसतात ते 70 ते 80 करण्यात यावे व नविन शैक्षणिक क्षेत्रात बदल करणे अशा अनेक समस्या पालकांनी यावेळी उपस्थित केले यावर शाळेचे मुख्याध्यापक ए डी जगताप सर यांनी मार्गर्शन करुन समस्याचे निराकरण करण्यात येईल याची ग्वाही दिली तसेच एस टी आगाराने शाळा सुटल्या नंतरच ग्रामिण भागातील बसेस सोडावे अशी विनंती आगार प्रमुखांना केली या कार्यक्रमा प्रसंगी अध्यक्ष ए डी जगताप (मुख्याध्यापक), सचिव ए एम उत्तरवार व सदस्य शेख युनूस सह समितीचे इतर सर्व सदस्य, शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षिका व पदाधिकारी तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होत