अरुण राऊत यांना मातृशोक,
वनमाला पंढरीनाथ राऊत पंचत्वात विलीन
यवतमाळ : दि 3 एप्रिल
यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष, जिल्हा परिषदेचे माजी सभापती व वडगाव रोड चे माजी सरपंच श्री अरुण पंढरीनाथ राऊत यांच्या मातोश्री श्रीमती वनमाला पंढरीनाथ राऊत यांचे आज दुपारी 12 च्या सुमारास यवतमाळ येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले यावेळी त्या 81 वर्षाच्या होत्या, पोफळणी ता कळंब या शेतकरी कुटुंबात संसाराचा गाढा ओढतांना व मोठा व्याप असतांनाही शेती चा व्याप सांभाळत यवतमाळ येथे स्थायिक होत व कित्तेक दशक सामाजिक व राजकीय वाटचाल करीत मायेचा हात देतांना आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या मागे चार मूल अरुण, विलास, राजेश व अनिल. चार मुली शालू, सुनीता, ललिता व सोनाली यांचे सह जावई व नातवंड असा मोठा आप्त परिवार आहे, कोरोना ची वैश्विक साथ लक्षात घेता राऊत परिवाराने घरघुती व मर्यादित स्वरूपात तात्काळ अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला व वडगाव रोड येथील स्मशानभूमीत त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले व सामूहिक श्रद्धांजली देण्यात आली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा