मुख्य सामग्रीवर वगळा
जिल्ह्यातील 2.87 लक्ष उज्वला ग्राहकांना मोफत सिलेंडर


यवतमाळ, दि. 2 : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने प्रधानमंत्री  उज्ज्वला योजनेतील सर्व ग्राहकांना पुढील तीन महिन्यांकरिता म्हणजे 1 एप्रिल 2020 ते 30 जून 2020 पर्यंत विनामूल्य रिफिलची घोषणा केली आहे.  प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या आठ कोटी लाभार्थ्यांना घरगुती एलपीजी सिलिंडरचा लाभ विनामूल्य मिळणार असून यात यवतमाळ जिल्ह्यातील 2 लाख 87 हजार 40 लाभार्थीचा समावेश आहे. 

या योजनेअंतर्गत एप्रिल महिन्यातील घरगुती सिलिंडरचा रिफिल खर्च उज्ज्वला लाभार्थ्यांच्या लिंक बँक खात्यात आगाऊ जमा केली जाईल. प्रत्येक उज्वला ग्राहकांना दरमहा एक मोफत रिफील सिलिंडर मिळेल. लाभार्थी अंतिम रिफिल मिळाल्यानंतर केवळ 15 दिवसानंतरच पुढील रिफिल बुक करू शकतो. मात्र बुकिंग नोंदणीकृत मोबाईल नंबर द्वारे करणे आवश्यक आहे.

   तेल कंपन्यांचे एलपीजी  भरणारे केंद्र सुरळीतपणे कार्यरत आहेत.  सर्व एलपीजी भरणा केंद्रात पुरेसा एलपीजी साठा असून  महानगरपालिकेच्या एलपीजी वितरकांचा साठाही चांगला आहे आणि त्यात कोणतीही कमतरता नाही. म्हणून एल.पी.जी.  रिफील प्राप्त करण्यासाठी ग्राहकांना त्यांच्या एलपीजी वितरकांच्या शोरूम आणि गोदामांना भेट देण्याची आवश्यकता नाही.

 तेल कंपनीत कार्यरत कर्मचारी, शोरूमचे कर्मचारी, एलपीजी वितरण कर्मचारी, वखार-रखवालदार, एलपीजी मेकॅनिक आणि रिटेल आउटलेट, ग्राहक परिचर,  ट्रक चालक यांना या कठीण काळात सेवा देताना  कोरोनामुळे बाधीत होऊन  मृत्यू झाल्यास अशा कामगारांच्या वारसदाराला रु. पाच लाख सानुग्रह मदत  जाहीर केली आहे.  वारसदार नसल्यास मृताच्या कुटूंबाला पैसे दिले जातील, असे हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन चे नोडल अधिकारी विशाल सूर्यवंशी यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दाते महीला बँक वाचवण्यासाठी महिला सहकारी बँक कृती समिती यवतमाळ ची संघर्ष परिषद

दाते महीला बँक वाचवण्यासाठी महिला सहकारी बँक कृती समिती यवतमाळ ची संघर्ष परिषद यवतमाळ येथील बाबाजी दाते महीला बँक मध्ये अनेक खातेदार, ठेवीदार यांचे पैसे आहेत अनेकांच्या खूप समस्या आहेत. पण कायद्याने आपण आपले पैसे कसे काढू शकतो यासाठी आज संघर्ष परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी मुंबई येथून विश्वास उटगी यांना आमंत्रित करण्यात आले होते. विश्वास उटगी हे माजी सचिव ऑल इंडिया बँक फेडरेशन आहेत. ज्या बँका डुबले आहेत त्या बँकांमधील खातेदारांना आपले पैसे काढण्यासाठी मार्गदर्शन करतात. कायद्याने सल्ला देतात. यासाठी ते मार्गदर्शन करतात. यासाठी आज संघर्ष परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या संघर्ष परिषदेमध्ये हजाराच्या वर पीडित खातेदार, ठेवीदार सहभागी झाले होते .या संघर्ष परिषदेमध्ये येणाऱ्या समोरच्या काळात लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, कर्जदार ,संचालक यांच्या घरासमोर डफडे वाजवा आंदोलन ,रिझर्व्ह बँकेसमोर धरणे, कायदेशीर मार्गासाठी उच्च न्यायालयात धाव ,अशा अनेक आंदोलनात्मक विषय घेऊन विविध समित्यांचे गठन करण्यात आले. यावेळी नितीन बोदे, राजू पडगिलवार, सुनील पुनवटकर, शैलेश काळबांडे, पिसाळकर ...

शिवशक्ती महाविद्यालय बाभुळगाव वतीने आयोजित "तीस दिवसीय राज्यस्तरीय व्यक्तिमत्व विकास प्रमाणपत्र कोर्स" संपन्न

 शिवशक्ती महाविद्यालय बाभुळगाव वतीने आयोजित "तीस दिवसीय राज्यस्तरीय व्यक्तिमत्व विकास प्रमाणपत्र कोर्स" संपन्न यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव येथील शिवशक्ती कला व वाणिज्य महाविद्यालय येथे अर्थशास्त्र विभाग आणि ग्रंथालय व ज्ञान संसाधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने तीस दिवसीय राज्यस्तरीय व्यक्तिमत्व विकास प्रमाणपत्र कोर्सचे आयोजन दि. 15 एप्रिल ते 15 मे 2021 दरम्यान आभासी पद्धतीने करण्यात आले होते. या कोर्सचा समारोपीय कार्यक्रम दि. 16 मे 2021 रोजी संपन्न झाला. या सोहळ्याचे अध्यक्ष सन्माननीय प्रा. बाळासाहेब धांदे व्यवस्थापक, शिवशक्ती शिक्षण संस्था, कोठा हे होते तर विशेष अतिथी म्हणून डॉ. मोहन खेरडे, संचालक, ज्ञान संसाधन केंद्र, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती हे होते. तर प्रमुख उपस्थिती म्हणून प्रा. डॉ. कविता तातेड अणे महिला महाविद्यालय यवतमाळ, डॉ. शशिकांत वानखेडे ग्रंथपाल, भारती महाविद्यालय आर्णी आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दीपक कोदूरवार हे होते. याप्रसंगी मान्यवरांनी व्यक्तिमत्व विकास प्रमाणपत्र कोर्स कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीत विद्यार्थ्यांना नवचेतना, नवउमेद...

जिल्ह्यात सर्व व्यवहार नियमितपणे सुरू करण्यास दिली जिल्हाधिकारी यांनी परवानगी; जिल्हयाचा समावेश श्रेणी एकमध्ये

 *जिल्ह्यात सर्व व्यवहार नियमितपणे  सुरू करण्यास दिली जिल्हाधिकारी यांनी परवानगी*  *जिल्हयाचा समावेश श्रेणी एकमध्ये* *लग्न व अंथविधीसाठी 50  लोकांच्या उपस्थितीस परवानगी* *शासकीय कार्यलये 100 टक्के क्षमतेने सुरू* *कोविड नियमांचे पालन तसेच दुकाने व आस्थापना चालकास व कर्मचाऱ्यांना कोविड चाचणी बंधनकारक* यवतमाळ, दि. 6 जून :    शासनाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे यवतमाळ जिल्ह्याचा समावेश श्रेणी -1 मध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी  यवतमाळ जिल्ह्याकरीता 7 जून 2021 पासून ब्रेक दि चेन अंतर्गत घालून देण्यात आलेले निर्बंध शिथिल केले असून सर्वच बाबी नियमितपणे सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे.  अत्यावश्यक सेवेंची दुकाने व अत्यावश्यक सेवा तसेच इतर दुकाने व सेवा  नियमितपणे सुरु राहतील. तथापि अत्यावश्यक सेवेंच्या व इतर आस्थापना धारकांनी दुकानात नागरिकांची होणारी गर्दी कमी करण्याच्या दृष्टीने जास्तीत जास्त होम डिलेव्हरीद्वारे वस्तूंचा पुरवठा करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. त्यादृष्टीने आस्थापना धारकांनी स्वत:चे व्हॉटसॲप नंबर दुकाना...