मुख्य सामग्रीवर वगळा
औषधी निर्यात करण्यापुर्वी क्लोरोक्वीन चा पर्याप्त साठा करावा, सिकंदर शहा यांचे केन्द्र सरकारला निवेदन.


यवतमाळ :-

केन्द्रातील मोदी सरकार अमेरीकेने दमदाटी करताच दबावात आल्याचे दिसून येत आहे. त्यांनी कुठलाच विचार न करता अमेरीकेसह इतर देशांना क्लोरोक्विन सह इतर औषधींचा पुरवठा करण्याचा निर्णय घोषीत केला. यामुळे देशातील नागरीकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून औषधी निर्यात करण्यापुर्वी क्लोरोक्वीन चा पर्याप्त साठा करावा असे निवेदन नागरीकांच्या वतीने शेतकरी वारकरी पक्षाचे अध्यक्ष सिकंदर शहा यांनी केन्द्र सरकारला पाठविले आहे. 

भारतात कोरोनाच्या रुग्णांची संख्या मोठया प्रमाणात वाढत आहे. आज पाच हजार पेक्षाही जास्त रुग्ण भारतात उपचार घेत आहे. यामध्ये 164 नागरीकांचा मृत्यू झाला आहे. या आजारावर कुठलाच उपचार नसल्यामुळे जगात वैद्यकीय तंत्रज्ञान प्रगत असतांनाही मरणा-यांची संख्या 80 हजाराच्या वर गेली आहे. भारतात एकीकडे 1 अब्ज 37 कोटी लोकसंख्या आहे. दुसरीकडे पर्याप्त वैद्यकीय सुविधा सुध्दा उपलब्ध नाही. त्यामुळे क्लोरोक्विन सारखी औषधी जर कोरोनावर उपाय ठरत असेल तर ही औषधी भारतीयांसाठी राखीव ठेवणे गरजेचे आहे. भारतातील मोदी सरकार मात्र अमेरीकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रंम यांनी धमकी देताच नतमस्तक झाल्याचे दिसून येत आहे. कुठलाच विचार न करता दुस-याच दिवशी निर्यात वर केलेली बंदी उठविण्यात आली आहे. त्यामुळे भारतात मोठया प्रमाणात कोरोनाचे रुग्ण वाढल्यास औषधीचा तुटवडा जानवण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी भीती सिकंदर शहा यांनी व्यक्त केली आहे. 
-------------------------------------------------------------------
कोरोनाला सरकारने गंभीरतेने घ्यावे

यवतमाळच्या अनेकांचे नमुने पाठवून पाच दिवस झाले मात्र अद्यापही त्यांचे रिपोर्ट प्राप्त झालेले नाही. त्यामुळे प्रशासनाची पुढची प्रक्रिया थंड बस्त्यात पडल्याचे दिसून येत आहे. असाच प्रकार संपुर्ण देशात आहे. कोरोनाची टेस्ट अत्यल्प होत आहे. त्यामुळे रोज वाढणारा आकडा हा अचानक मोठया प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. अशातच औषधीचा साठा पर्याप्त नसल्यास त्याचे परीनाम नागरीकांना भोगावे लागतील. म्हणून केन्द्र सरकारला नागरीकांच्या वतीने मी निवेदन पाठविले आहे. 


सिकंदर शहा
अध्यक्ष, शेतकरी वारकरी संघटना


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दाते महीला बँक वाचवण्यासाठी महिला सहकारी बँक कृती समिती यवतमाळ ची संघर्ष परिषद

दाते महीला बँक वाचवण्यासाठी महिला सहकारी बँक कृती समिती यवतमाळ ची संघर्ष परिषद यवतमाळ येथील बाबाजी दाते महीला बँक मध्ये अनेक खातेदार, ठेवीदार यांचे पैसे आहेत अनेकांच्या खूप समस्या आहेत. पण कायद्याने आपण आपले पैसे कसे काढू शकतो यासाठी आज संघर्ष परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी मुंबई येथून विश्वास उटगी यांना आमंत्रित करण्यात आले होते. विश्वास उटगी हे माजी सचिव ऑल इंडिया बँक फेडरेशन आहेत. ज्या बँका डुबले आहेत त्या बँकांमधील खातेदारांना आपले पैसे काढण्यासाठी मार्गदर्शन करतात. कायद्याने सल्ला देतात. यासाठी ते मार्गदर्शन करतात. यासाठी आज संघर्ष परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या संघर्ष परिषदेमध्ये हजाराच्या वर पीडित खातेदार, ठेवीदार सहभागी झाले होते .या संघर्ष परिषदेमध्ये येणाऱ्या समोरच्या काळात लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, कर्जदार ,संचालक यांच्या घरासमोर डफडे वाजवा आंदोलन ,रिझर्व्ह बँकेसमोर धरणे, कायदेशीर मार्गासाठी उच्च न्यायालयात धाव ,अशा अनेक आंदोलनात्मक विषय घेऊन विविध समित्यांचे गठन करण्यात आले. यावेळी नितीन बोदे, राजू पडगिलवार, सुनील पुनवटकर, शैलेश काळबांडे, पिसाळकर ...

शिवशक्ती महाविद्यालय बाभुळगाव वतीने आयोजित "तीस दिवसीय राज्यस्तरीय व्यक्तिमत्व विकास प्रमाणपत्र कोर्स" संपन्न

 शिवशक्ती महाविद्यालय बाभुळगाव वतीने आयोजित "तीस दिवसीय राज्यस्तरीय व्यक्तिमत्व विकास प्रमाणपत्र कोर्स" संपन्न यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव येथील शिवशक्ती कला व वाणिज्य महाविद्यालय येथे अर्थशास्त्र विभाग आणि ग्रंथालय व ज्ञान संसाधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने तीस दिवसीय राज्यस्तरीय व्यक्तिमत्व विकास प्रमाणपत्र कोर्सचे आयोजन दि. 15 एप्रिल ते 15 मे 2021 दरम्यान आभासी पद्धतीने करण्यात आले होते. या कोर्सचा समारोपीय कार्यक्रम दि. 16 मे 2021 रोजी संपन्न झाला. या सोहळ्याचे अध्यक्ष सन्माननीय प्रा. बाळासाहेब धांदे व्यवस्थापक, शिवशक्ती शिक्षण संस्था, कोठा हे होते तर विशेष अतिथी म्हणून डॉ. मोहन खेरडे, संचालक, ज्ञान संसाधन केंद्र, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती हे होते. तर प्रमुख उपस्थिती म्हणून प्रा. डॉ. कविता तातेड अणे महिला महाविद्यालय यवतमाळ, डॉ. शशिकांत वानखेडे ग्रंथपाल, भारती महाविद्यालय आर्णी आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दीपक कोदूरवार हे होते. याप्रसंगी मान्यवरांनी व्यक्तिमत्व विकास प्रमाणपत्र कोर्स कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीत विद्यार्थ्यांना नवचेतना, नवउमेद...
जस्टिस नरीमन पर क्रिमिनल केस करने वाले रशीद खान और अन्य के समर्थन में सुप्रिम कोर्ट के इतिहास में सबसे जादा वकीलों का वकालतनामा. रिटायर्ड जस्टिस रंजन गोगोई की अपराधिक साजिश उजागर सुप्रिम कोर्ट के जस्टिस रोहींटन नरीमन और विनीत सरण पर केस करने वाले रशीद खान पठाण, ऍड. निलेश ओझा और ऍड. विजय कुर्ले के समर्थन में सुप्रिम कोर्ट के हजारो वकीलो ने अपना समर्थन दिया है. ऑल इंडिया एस. सी., एस. टी एंड मायनॉरिटि लॉयर्स असोसिएशन, सुप्रिम कोर्ट एंड हाई कोर्टस लिटीगंटस असोसिएसन, इंडियन बार असोसिएशन, मानव अधिकार सुरक्षा परीषद ने लिखित रुपमे चीफ जस्टिस ऑफ़ इंडिया श्री. शरद बोबडे, राष्ट्रपती श्री. रामनाथ कोविद, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को पत्र लिखकर दोषी जजेस रोहिंटन नरीमन, विनीत सरण, अनिरुद्ध बोस, रिटायर्ड जस्टिस दीपक गुप्ता और वकील सिद्धार्थ लूथरा, मिलिंद साठे, कैवान कल्यानीवाला के खिलाफ एफ. आय. आर. (FIR) दर्ज करने, सीबीआय (CBI) को जाच आदेश देने तथा इन जजेस को जाच पूरी होने तक सुप्रीम कोर्ट की किसी भी कारवाई में भाग लेने की अनुमति नहीं देने की मांग की है. ज्ञात हो की इससे पहले भी 10 जनवरी 2020 क...