मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मे, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जिल्ह्यात २ जून पासून अत्यावश्यक सेवेसोबतच इतर दुकानेही सकाळी ७ ते २ पर्यंत चालू ठेवण्यास परवानगी ; जिल्हाधिकारी यांचे नवीन आदेश जारी

 जिल्ह्यात २ जून पासून अत्यावश्यक सेवेसोबतच इतर दुकानेही सकाळी ७ ते २ पर्यंत चालू ठेवण्यास परवानगी ; जिल्हाधिकारी यांचे नवीन आदेश जारी यवतमाळ जिल्ह्यात अत्यावश्यक सेवेसोबत इतर सेवेची दुकाने २ जून पासून १५  जून सकाळी ७ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली असून सदर दुकाने सकाळी ७ ते २ वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील. केवळ कृषिशी संबंधित दुकाने 3 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. तसेच अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता इतर दुकाने शनिवार आणि रविवार बंद राहतील, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी अमोल येडगे यांनी सोमवारी दिले आहेत.  ब्रेक दि चेन अंतर्गत घालून दिलेले निर्बंध दिनांक ०१ जून, २०२१ रोजी जश्याच्या तश्या लागू राहणार असून केवळ अत्यावश्यक सेवेची दुकाने सकाळी ७.०० ते सकाळी ११.०० वाजेपर्यंत सर्व निर्बंधांसाह  सुरु राहतील. *2 जून पासून सुरू असलेल्या सेवा*  १. सर्व किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, दुध डेअरी, बेकरी, मिठाई इ. खाद्य पदार्थाची दुकाने (ज्यामध्ये चिकन,मटन, मच्छी आणि अंडयांची दुकाने) आठवडयाची सातही दिवस सकाळी ७.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंतच सु

शिवशक्ती महाविद्यालय बाभुळगाव वतीने आयोजित "तीस दिवसीय राज्यस्तरीय व्यक्तिमत्व विकास प्रमाणपत्र कोर्स" संपन्न

 शिवशक्ती महाविद्यालय बाभुळगाव वतीने आयोजित "तीस दिवसीय राज्यस्तरीय व्यक्तिमत्व विकास प्रमाणपत्र कोर्स" संपन्न यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव येथील शिवशक्ती कला व वाणिज्य महाविद्यालय येथे अर्थशास्त्र विभाग आणि ग्रंथालय व ज्ञान संसाधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने तीस दिवसीय राज्यस्तरीय व्यक्तिमत्व विकास प्रमाणपत्र कोर्सचे आयोजन दि. 15 एप्रिल ते 15 मे 2021 दरम्यान आभासी पद्धतीने करण्यात आले होते. या कोर्सचा समारोपीय कार्यक्रम दि. 16 मे 2021 रोजी संपन्न झाला. या सोहळ्याचे अध्यक्ष सन्माननीय प्रा. बाळासाहेब धांदे व्यवस्थापक, शिवशक्ती शिक्षण संस्था, कोठा हे होते तर विशेष अतिथी म्हणून डॉ. मोहन खेरडे, संचालक, ज्ञान संसाधन केंद्र, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती हे होते. तर प्रमुख उपस्थिती म्हणून प्रा. डॉ. कविता तातेड अणे महिला महाविद्यालय यवतमाळ, डॉ. शशिकांत वानखेडे ग्रंथपाल, भारती महाविद्यालय आर्णी आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दीपक कोदूरवार हे होते. याप्रसंगी मान्यवरांनी व्यक्तिमत्व विकास प्रमाणपत्र कोर्स कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीत विद्यार्थ्यांना नवचेतना, नवउमेद