मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

एप्रिल, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
यवतमाळ शहरातील भाजी मंडी पुर्ववत सुरु पासधारक व आधारकार्ड धारकांनाच मिळणार प्रवेश यवतमाळ, दि. 30 : विदर्भ मुकाबला- यवतमाळ शहरातील स्थानिक विठ्ठलवाडी येथील भाजी मंडीमध्ये ठोक भाजीपाला खरेदी 1 मे 2020 पासून सुरुवात करण्यात येत आहे. पालकमंत्री संजय राठोड व जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी कोव्हिड –19 च्या प्रादुर्भावात सर्व नियमांचे पालन करण्याच्या अटीवर भाजी मंडी सुरु करण्याचे निर्देश दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत याअनुषंगाने यवतमाळ शहरामध्ये एकूण 24 ग्रीन झोन विभागातील मैदान व जागेत दररोज सकाळी 8 ते 12 या कालावधीत भाजीपाला विक्री केंद्र सुरु करण्यात येणार आहे. ठोक भाजीपाला विक्रेते व ठोक खरेदीदार, हातगाडीधारक हे भाजीपाल्याचा व्यवहार दररोज सकाळी 3 ते 6 वाजता दरम्यान विठ्ठलवाडी मार्केट मंडीमध्ये करतील. फक्त पासधारक व आधारकार्ड धारकांनाच प्रवेश मंडीत मिळेल. शहरातील प्रतिबंधित क्षेत्रातील व्यापारी व खरेदीदार यांना प्रवेश मिळणार नाही. तसेच कोणत्याही चिल्लर व वैयक्तिक ग्राहकांना प्रवेश नाही. सकाळी 6 वाजता सदर भाजी मंडी बंद करण्यात येईल. कोणत्याही संशयीत व्यक्तीने

मास्क निर्मितीमध्ये यवतमाळ जिल्हा राज्यात प्रथम

मास्क निर्मितीमध्ये यवतमाळ जिल्हा राज्यात प्रथम ‘उमेदच्या’ बचत गटाच्या महिलांनी तयार केले पाच लाख मास्क यवतमाळ, दि. 28 :  सद्यस्थितीत कोरोना विषाणुचे संकट सर्व जगावर पसरले आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी सर्वोत्तम पर्याय म्हणजे नागरिकांनी ‘मास्क’ वापरणे हाच आहे. या गोष्टीची जाणीव ठेवून यवतमाळ जिल्हा ग्रामीण व विकास यंत्रणेच्या अधिनस्त असलेल्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोनती अभियान (उमेद) च्या बचत गटातील महिला पुढे सरसावल्या. नागरिकांसाठी मास्क निर्मितीचे काम या महिलांनी हाती घेतले आणि पाहता पाहता मास्क निर्मितीमध्ये यवतमाळ जिल्हा राज्यात प्रथम ठरला. उमेदच्या महिलांनी एक, दोन नव्हे तब्बल 5 लाख 15 हजार 775 मास्क एका महिन्याच्या काळात तयार केले.   यवतमाळ जिल्ह्यातील 16 तालुक्यातील 1422 उमेदच्या महिला बचत गटांनी मास्क शिवण्याचे काम हाती घेतले. या कामासाठी जिल्ह्यातून बचत गटाच्या 2466 महिला पुढे आल्या. या महिलांनी 5 लक्ष 15 हजार 775 मास्कची निर्मिती करून एक उच्चांक गाठला. विशेष म्हणजे संकटाच्या या काळात ‘ना नफा ना तोटा’ या संकल्पनेतून त्यांनी मास्कची निर्मिती केली. सामाजि
 643 युवकांना त्यांच्या घरी जाण्याची परवानगी घ्यावी-आमदार इंद्रनील नाईक यवतमाळ जिल्ह्यातील पुसद विधानसभा मतदारसंघात मागील काही महिन्यांपासून तामिळनाडू या राज्यातील ६४३ युवक प्रशिक्षणासाठी वास्तव्यास होते. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने संपूर्ण देशात अचानक ताळेबंदी करण्यात आली. त्यामुळे हे युवक पुसदला अडकून पडले. त्यांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु आपल्या गावी परतण्यासाठी ते सतत पुसद विधानसभा मतदारसंघाचे लोकनियुक्त लोकप्रतिनिधी कर्तव्यदक्ष युवा आमदार इंद्रनिल नाईक यांना विनंती करीत आहेत.  यासंदर्भात आमदार इंद्रनिल नाईक यांनी तामिळनाडू राज्याचे मुख्यमंत्री ई. पलाईस्वामी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे यांना पत्र लिहून या सर्व 643 युवकांची त्यांच्या गृहराज्यात जाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी केली आहे.
आ.डॉ वजाहत मिर्झा व आ.इंद्रनील नाईक यांच्या हस्ते कोरोना सेफ्टी किट वाटप. पुसद :-  रविवार  दिनांक २६-०४-२०२० रोजी आमदार डॉ वजाहत मिर्झा यांच्या कडून उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर,आरोग्य सेवक,कर्मचारी यांच्या सुरक्षेसाठी 20 कोरोना सेफ्टी किट पुसद विधानसभा मतदारसंघाचे लोकनियुक्त लोकप्रतिनिधी कर्तव्यदक्ष आमदार इंद्रनील मनोहरराव नाईक व विधानपरिषद सदस्य तथा यवतमाळ जिल्हा काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ वजाहत मिर्झा यांच्या हस्ते देण्यात आली.          यावेळेस दोन्ही आमदारांनी संपूर्ण रुग्णालयाची पाहणी व रुग्णांची विचारपूस केली. रुग्णांना आणखी काय सुविधा उपलब्ध करता येईल याबाबतही माहिती घेतली.यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ हरिभाऊ फुफाटे, उपजिल्हा रुग्णालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी, डॉ अमोल मालपाणी,उपजिल्हा रुग्णालयाचे अशासकीय सदस्य अरविंद चव्हाण, इंद्रनील नाईक मित्र मंडळाचे सदस्य अभिजित पवार,अयुक खतीब,खासदार राठोड, रोहन राठोड, प्रथमेश मुदगुले, आदी उपस्थित होते.
गाण्‍याच्‍या माध्‍यमातुन महसूल विभागातील अव्‍वल कारकुनाची ‘कोरोना’ जनजागृती श्री जनार्दन बापुराव बावणे यांचे जि.प. शिक्षक मित्र श्री संदीप इंगळे व शिलवंत इंगोले या दोघांनी लिहुन दिलेले कोरोना जनजागृती वरील गाणे श्री बावणे यांनी स्‍वतः गायन करुन कोरोनाबाबत जनजागृती केली. या गाण्‍याची चर्चा सध्‍या सोशल मिडियावर सुरु आहे. श्री बावणे हे उपविभागीय अधिकारी कार्यालय, पुसद (महसूल विभाग) येथे अव्‍वल कारकुन या पदावर कार्यरत आहे. त्‍यांना गाण्‍याची आवड आहे. सर्वत्र कोरोना या विषाणुचा हाहाकार माजलेला असुन बरेच लोक रस्‍त्‍यावर विनाकारण भटकत असतात, कोरोनाबाबत जनजागृती करण्‍यासाठी प्रशासनाला मदत व्‍हावी, या उद्देशाने त्‍यांनी हे गाणे लोकप्रिय गाण्‍याच्‍या चालीवर गायिले आहे.  व्‍हाट्अप, फेसबुक, युट्युबवर त्‍यांनी कोरोनाबाबत जनजागृती करण्‍याबाबतचा व्हिडीओ प्रसारित केला असून सोशल मिडियावर सदर व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. सहज-सोप्‍या शब्‍दांचा वापर करुन रचलेल्‍या या गाण्‍याच्‍या माध्‍यमातुन कोरोना आजाराला घाबरुन न जाता घरातच थांबण्‍याबाबत तसेच शासनाच्‍या निर्देशाचे पालन करुन प्रशासन
रमजानच्या महिन्यात शासन व प्रशासनाच्या सुचनांचे पालन करा v   कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभुमीवर मुस्लीम बांधवांना आवाहन यवतमाळ, दि. 22 :  कोरोना विषाणू (कोव्हिड - 19) संसर्गामुळे आरोग्यविषयक आपात्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी शासन-प्रशासन अनेक उपाययोजना करीत आहेत. त्यातच नजीकच्या काळात मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू होत आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग लक्षात घेता रमजानच्या महिन्यात मुस्लीम बांधवांनी शासन व प्रशासनाच्या सुचनांचे कोटेकोरपणे पालन करावे, असे आदेश देण्यात आले आहे. रमजान महिन्यामध्ये मुस्लीम समाजामध्ये मोठ्या संख्येने मशीदमध्ये जाऊन सार्वजनिकरित्या नमाज अदा करण्याची प्रथा आहे. तसेच या काळात मुस्लीम समाजातील बांधव नमाज, तरावीह व इफ्तारसाठी एकत्र येतात. सध्याची स्थिती लक्षात घेता अधिक संख्येने लोक एकत्र आल्यास कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे. त्यातून जीवितहानीसुध्दा होऊ शकते. त्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी सार्वजनिकरित्या नमाज अदा न करणे मुस्लीम समाज बांधवांच्या आरोग्याच्या
दोन दिवसांत चार स्वस्त धान्य दुकानावर कारवाई v   एकाचे प्राधिकारपत्र रद्द तर तिघांचे निलंबित यवतमाळ, दि. 22 :  कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर स्वस्त धान्य दुकानांमधून गरजू व गरीब नागरिकांना नियमानुसार धान्य देण्याचे शासनाचे निर्देश आहे. मात्र या आदेशाचे उल्लंघन करून लाभार्थ्यांना कमी धान्य देणे, शासकीय दरापेक्षा जास्त भावाने धान्य देणे, अंत्योदय व प्राधान्य कुटुंबातील नागरिकांना नियमानुसार धान्य वाटप न करणे आदी बाबी निदर्शनास आल्यामुळे जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांच्या सुचनेवरून जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी जिल्ह्यातील चार स्वस्त धान्य दुकानावर कारवाई केली आहे. यात एका स्वस्त धान्य दुकानाचे प्राधिकारपत्र रद्द तर इतर तिन जणांचे निलंबित केले आहे. उमरखेड येथील स्वस्त धान्य दुकानदार डी.वाय. माळवे यांच्या दुकानाची तपासणी केली असता दुकानात फलक न लावणे, तपासणीवेळी 423  किलो गहू, 368 किलो तांदूळ, 4 किलो तूरडाळ, 3 किलो साखरेची असलेली तूट (बाजारभावाने किंमत 24176 रुपये), दुकानाच्या दर्शनी भागात योजनानिहाय सर्व योजनांचे धान्याच्या मुल्यमापनाबाबत फलक न लावणे, योजनेनिहाय अन्नधान्य वाट
पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने जिल्ह्याला 83 लक्ष रुपये प्राप्त v संजय गांधी, श्रवणबाळ, इंदिरा गांधी वृध्दापकाळच्या लाभार्थ्यांना मिळणार लाभ यवतमाळ, दि. 22 : अनेक निराधार लोकांचा उदरनिर्वाह व्हावा, या उद्देशाने त्यांच्या खात्यात शासनाच्यावतीने थेट रक्कम जमा केली जाते. कोरोनामुळे सगळे जनजीवन विस्कळीत झाल्यानंतर या निराधार लोकांना त्यांच्या हक्काची रक्कम मिळावी यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी शासनाकडे पाठपुरावा केला. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून संजय गांधी निराधार योजना, श्रवणबाळ निवृत्तीवेतन योजना तसेच इंदिरा गांधी वृध्दापकाळ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी जिल्ह्याला 83 लक्ष 45 हजार 284 रुपये प्राप्त झाले आहे. ही रक्कम कोषागार कार्यालयात जमा झाली असून वरील योजनेच्या लाभार्थ्यांना त्वरीत वाटप करण्यात येणार आहे. लॉकडाऊन तसेच संचारबंदीची झळ सर्वांनाच पोहचत आहे. रोजगार नसल्यामुळे दैनंदिन कुटुंबाचा गाडा हाकणे कठीण होत आहे. त्यामुळे निराधार तसेच वृध्दापकाळ असणा-या लोकांना मिळणारे अर्थसहाय्य त्वरीत उपलब्ध व्हावे, या उद्देशाने पालकमंत्री श्री. राठोड यांनी वित्त व कोषागार
गरीब व गरजू व्यक्तिंसाठी जीवनावश्यक वस्तुंची कीट द्या v   दानशूर व्यक्ती व सामाजिक संघटनांना प्रशासनाचे आवाहन यवतमाळ, दि. 22 :  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व प्रभावित व्यक्तिंना मदत करण्यासाठी अनेक सामाजिक संस्था, व्यावसायिक, उद्योजक, सामाजिक संघटना, दानशूर व्यक्ती आदी जण आपापल्या परीने समोर येऊन मदत करीत आहे. यवतमाळ जिल्ह्यातसुध्दा हे मदतकार्य सुरू आहे. मात्र तरीसुध्दा या संकटामुळे प्रभावित झालेल्या नागरिकांची संख्या मोठी असल्यामुळे जिल्ह्यातील गरीब व गरजू व्यक्तिंसाठी सामाजिक संघटना, उद्योजक, दानशूर व्यक्तिंनी जीवनावश्यक वस्तुंची किट उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. कोरोनाच्या संकटामधून सावरण्याकरीता गोर गरीब तसेच गरजू व्यक्तिंना द्यावयाच्या जीवनावश्यक किटमध्ये 10 किलो गहू आटा, 3 किलो तांदूळ, 1 किलो साखर, 100 ग्रॅप चहापुडा, 200 ग्रॅम मिरची पावडर, 100 ग्रॅप हळद, 1 मीठ पुडा, 1 किलो तूर डाळ, 1 किलो तेल, 1 किलो चना, 1 किलो मटकी, 2 साबण या वस्तु असल्यास गरजूंना मदत होऊ शकते. वरील सर्व वस्तु असलेली धान्यकिट सामाजिक संस्था, व्यावसायिक प्रत
आयसोलेशन वॉर्डात सहा पॉझेटिव्हसह 23 जण भरती यवतमाळ, दि. 22 :  येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात सहा पॉझेटिव्ह रुग्णांसह एकूण 23 जण भरती आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 16 पॉझेटिव्ह रुग्णांपैकी तब्बल 10 जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे.  गत 24 तासात आयसोलेशन वॉर्डात चार जण येथे भरती झाले आहे. बुधवारी वैद्यकीय महाविद्यालयाकडून एकूण 29 नमुने नागपूर येथे तपासणीकरीता पाठविण्यात आले. तर आज 19 रिपोर्ट महाविद्यालयाला प्राप्त झाले असून यात 17 रिपोर्ट निगेटिव्ह तर दोन रिपोर्ट पुन्हा फेरतपासणीकरीता पाठविण्यात येणार असल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने सांगितले. जिल्ह्यात गृह विलगीकरणात एकूण 793 जण तर संस्थात्मक विलगीकरणात एकूण 108 जण आहेत. नागरिकांनी लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात जसे सहकार्य केले तसेच सहकार्य दुस-या टप्प्यातसुध्दा करावे. आरोग्याच्या दृष्टीने घरात राहणे, अत्यावश्यक कामासाठी घराबाहेर पडल्यास एकमेकांपासून सोशल डिस्टन्सिंग ठेवणे, मास्क लावूनच अत्यावश्यक कामासाठी बाहेर येणे आदी सुचनांचे नागरिकांनी
भारती मैंद नागरी सहकारी पतसंस्थेच्या सौजण्यातून नगरपालिका परिसरात सॅनिटायझरिंग कक्षाची उभारणी. पुसद -  संपूर्ण देश कोरोना या विषाणूमुळे राष्ट्रीय आपत्तीत असतांना शहराचा मुख्य दुव्वा असलेल्या स्थानिक नगरपालिका प्रांगणात भारती मैंद नागरी सहकारी पतसंस्थेच्या सामाजिक उपक्रमांअंतर्गत उभारण्यात आलेल्या  सॅनिटायझरिंग कक्षाचे उद्घाटन दि.18 एप्रिल रोजी आ.इंद्रनील नाईक यांचेहस्ते फित कापून करण्यात आले यावेळी विधानपरिषद सदस्य तथा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ.डॉ. वजाहात मिर्झा,नगरपालिकेच्या मुख्याधिकारी सौ.निर्मला राशीनकर(यमगर),आरोग्य सभापती राजु साळुंखे,पुसद चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष सूरज डूबेवार हे प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी विशेषतः सोशल डिस्टनसिंग पाळून प्रत्येकजण उभे होते.        स्थानिक नगरपालिका प्रशासनाच्या मागणीवरून उभारण्यात आलेल्या सॅनिटायझरिंग कक्षाचा लाभ दररोज कर्मचारी, सफाई कामगार असे एकूण पाचशे ते सातशे नागरिक घेत आहेत. अत्यावश्यक सेवेत असणारा प्रत्येक नागरिक,कर्मचारी हा देशसेवेचेच कार्ये करीत असल्यामुळे त्यास घरी जाण्यापूर्वी किंवा कर्तव्यावर येत असताना निर्जंतुक
कोरोनाविरुध्दच्या लढाईत सर्वांनी एकत्र यावे                  -  गृहमंत्री अनिल देशमुख v   जिल्हा प्रशासनाचे काम उत्तम यवतमाळ, दि.20 : विदर्भ मुकाबला - कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने विविध उपाययोजना केल्या आहेत. पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाने सर्व विभागामध्ये अतिशय चांगला समन्वय घडवून आणला असून प्रशासनाचे काम उत्तम आहे. कोरोना विरुध्दची लढाई ही सर्वांच्या सहकार्याने लढणे आवश्यक असल्यामुळे या लढाईत एकत्र यावे, असे आवाहन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासनाचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, आमदार सर्वश्री ख्वाजा बेग, डॉ. अशोक उईके, डॉ. संदीप धुर्वे, जिल्हाधिकारी एम.डी.सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, पोलिस अधिक्षक एम. राजकुमार आदी उपस्थित होते. 3 मे पर्यंत सर्व राज्य व जिल्ह्यांच्या सीमा सील करण्याचे आदेश देण्यात आले आहे, असे सांगून गृहमंत्री श्री. देशमुख म्हणाले, जिल्ह्यात असलेल्या परप्रांतीयांची व इतर जिल्ह
संचारबंदीत नियम मोडणाऱ्यांकडून पावणेतीन लाख दंड वसूल           यवतमाळ, दि. 19 : विदर्भ मुकाबला न्यूज- संचारबंदीच्या काळात शासनाने वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन न करणा-यांविरुध्द प्रशासनाने कडक कारवाई सुरू केली आहे. नियमांचे उल्लंघन करणा-यांकडून 822 प्रकरणात 2    लाख 77 हजार 500 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे याअगोदरच्या दिवशीही ५१७ प्रकरणात 2 लाख 11 हजार 400 रुपये दंड वसूल करण्यात आला होता. जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावास प्रतिबंध करण्यासाठी साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 अन्वये विविध अधिसूचना व नियमावली निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. यात सार्वजनिक ठिकाणी चेहऱ्यावर मास्क लावणे, सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे, सामाजिक अंतर ठेवणे, किराणा दुकानात दर्शनी भागात दरपत्रक लावणे यासारख्या विविध सूचनांचा समावेश आहे.   तरीदेखील या नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांविरुध्द जिल्हा प्रशासनामार्फत वरील कारवाई करत दंड वसूल करण्यात आला आहे.   काल दिवसभरात सार्वजनिक ठिकाणी चेहऱ्यावर मास्क न लावल्याबद्दल जिल्ह्यातील 636 प्रकरणात प्रती व्यक्ती 200 रुपये प्रमाणे एकूण 1 ल
मोफतचे तांदुळ कमी दिल्याने रास्त भाव धान्य दुकानाचा परवाना रद्द यवतमाळ, दि.19 : विदर्भ मुकाबला न्यूज- धान्य दुकानात आढळुन आलेल्या अनियमिततेवरून तसेच एकूण सहा कार्डधारकांना ३० किलो मोफतचे तांदुळ कमी दिल्याने दिग्रस येथील गांधीनगर येथे बेबी चव्हाण यांच्या मालकीच्या रास्त भाव धान्य दुकानाचे प्राधिकार पत्र रदद करण्यात आले आहे. तसेच संपूर्ण अनामत रक्कम शासन जमा करण्याचे आदेश जिल्हाधिका-यांच्या सुचनेनुसार जिल्हा पुरवठा अधिकारी एस. बी. भराडी यांनी दिले आहेत. मौजा गांधीनगर ता. दिग्रस येथील रास्तभाव दुकानदार बेबी. चव्हाण यांच्या विरुद गावातील नागरीकांच्या प्राप्त तक्रारीचे अनुषंगाने दिग्रस येथील नायब तहसिलदार यांनी दिनांक 18 एप्रिल रोजी दुकानात प्रत्यक्ष भेट देवून कार्डधारकांचे बयान नोंदवून घेतले. दुकानातील कागदपत्रांची तपासणी केली असता रास्तभाव दुकानदार यांनी एकूण 6 कार्डधारकांना 30 किलो मोफतचे तांदुळ कमी दिले. तसेच साठा रजिस्टर व विक्री रजिस्टर अदयावत न करणे, साठाफलक न लावणे, दुकानात तक्रार पुस्तिका न ठेवणे, भाव फलकावर भाव नमुद नसणे, कार्डधारकांचे सोबत समन्वयाची भाषा न वापरणे व क
नोंदणीकृत बांधकाम कामगारांना शासनातर्फे आर्थिक सहाय्य, दोन हजार रुपये थेट बँक खात्यात जमा करणार यवतमाळ, दि. 19 : विदर्भ मुकाबला न्यूूूज- कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जिल्हृयात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे.    लॉकडाऊन कालावधीत इमारत व इतर बांधकाम बंद झाले असल्याने   जिल्ह्यातील इमारत व इतर बांधकामावर काम करणाऱ्या नोंदणीकृत सक्रीय बांधकाम कामगारांना कोणतेही कामकाज करता येत नाही. त्यामुळे या सर्व नोंदणीकृत बांधकाम कामगारांना बांधकामाच्या ठिकाणी अथवा घरीच थांबावे लागत आहे. त्यांना दररोजची रोजंदारी मिळत नसल्याने दैनंदिन गरजा भागविण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे सध्याची लॉकडाऊनची परिस्थिती लक्षात घेता मंडळाकडील नोंदणीकृत सक्रीय (जिवित) बांधकाम कामगारांना प्रत्येकी दोन हजार रुपये   आर्थिक सहाय्य त्यांच्या    बँक खात्यात थेट जमा करण्यास शासनाने परवानगी दिली असल्याने ही रक्कम आता त्यांच्या खात्यात जमा करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकरी एम.डी.सिंह यांनी कळविले आहे.
प्रतिबंधित क्षेत्रात आवश्यक सेवा वगळता निर्बंध कायम        यवतमाळ, दि. 19 : विदर्भ मुकाबला न्यूज- कोरोना विषाणू संसर्गाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या 8 एप्रिल रोजीच्या आदेशान्वये यवतमाळ शहरातील प्रभाग क्रमांक 10 व प्रभाग क्रमांक 20 प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. या प्रतिबंधित क्षेत्रात आवश्यक सेवा जसे वैद्यकीय सेवा, कायदा व सुव्यवस्थेशी निगडीत सेवा वगळता इतर कोणत्याही व्यक्ती प्रतिबंधित क्षेत्राच्या आत किंवा बाहेर सोडण्यात येऊ नये, असे आदेशित करण्यात आले आहे.             सोबतच प्रतिबंधित क्षेत्रात कायदा व सुव्यवस्थेच्या अनुशंगाने पुरेसा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात यावा. सदर भागात दुध व दुग्धजन्य पदार्थाची दुकाने, पिठ गिरणी, किराणा दुकाने सकाळी 6 ते दुपारी 3 वाजेपर्यंत सामाजिक अंतर ठेवून सुरू ठेवता येतील. या भागातील नागरिक दुकानांमध्ये पायी जाणे-येणे करू शकतील.  प्रतिबंधित भागात सर्व प्रकारचे खाजगी वाहने फिरविण्यावर बंदी कायम राहील. या भागातील औषधांची दुकाने 24 बाय 7 सुरू राहतील. बँकिंग सेवा पुरविण्यासाठी बँकांना त्यांचे व्यवसायिक प्रतिनिधींमार्फत सेव
लॉकडाऊनच्या काळात कर्मचारी / कामगारांना मिळणार पासेस, तहसीलदारांना इन्सिडंट कमांडर म्हणून पासेस देण्याचे अधिकार प्रदान यवतमाळ, दि. 19 : विदर्भ मुकाबला न्यूज़- जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत दि. 20 एप्रिलपासून काही प्रमाणात शिथिलता देण्यास शासनाने मंजूरी दिली आहे. याच अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने आवश्यक आस्थापना व तेथे काम करणारे कर्मचारी / कामगारांना पासेस देण्यासाठी नियोजन केले आहे. यासंदर्भात इन्सिडंट कमांडर म्हणून जिल्ह्यातील तहसीलदारांना पासेस देण्याचे अधिकारी जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांच्या आदेशान्वये प्रदान करण्यात आले आहे. जिल्ह्यात साथरोग नियंत्रण अधिनियम 1897 मधील तरतुदींची व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 ची यशस्वी अंमलबजावणी तसेच प्रतिबंध क्षेत्र वगळता जिल्ह्यातील इतर ठिकाणी लॉकडाऊनमध्ये सुट देण्यात आलेल्या कार्यालयातील कामांच्या ठिकाणी, कारखाने, प्रतिष्ठाने आदी ठिकाणी कामावर हजर होण्यासाठी कर्मचा-यांना व कामगारांना पासेस देण्यात येणार आहे. त्याकरीता सर्व तहसीलदारांना इन्सिडंट कमांडर म्हणून प
लॉकडाऊनच्या काळात काही बाबींवर निर्बंध तर काहींमध्ये शिथिलता 👉🏻 20 एप्रिलपासून होणार अंमलबजावणी यवतमाळ, दि. 18 : मुकाबला न्यूज, कोरोना विषाणू (कोव्हिड - 19) च्या अनुषंगाने लॉकडाऊनचा कालावधी 3 मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. यादरम्यान शासनाच्या निर्देशाप्रमाणे जिल्हा प्रशासनाद्वारे विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. लॉकडाऊनच्या काळात काही प्रमाणात दैनंदिन व्यवहार सुरळीत होण्यासाठी काही बाबींमध्ये शिथिलता देण्यात येणार असून काहींवर मात्र निर्बंध कायम राहतील, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. लॉकडाऊनच्‍या कालावधीत खालील सेवा प्रतिबंधीत राहतील. सुरक्षेच्‍या उद्देशाशिवाय रेल्‍वे मधून सर्व प्रवासी हालचाल, सार्वजनिक वाहतूकीसाठीच्‍या बसेस बंद राहतील. वैद्यकीय कारणाशिवाय किंवा मार्गदर्शक तत्‍वानूसार परवानगी असलेल्‍या व्‍यक्‍ती वगळून व्‍यक्‍तींच्‍या आंतरजिल्‍हा व आंतरराज्‍य हालचालीकरीता बंदी राहील. याशिवाय सर्व शैक्षणिक प्रशिक्षण, संस्‍था व शिकवणी, विशेष परवानगी असलेल्‍या व्‍यतीरिक्‍त इतर सर्व औद्योगिक व वाणिज्यिक आस्‍थापना, विशेष परवानगी असलेल्‍या परवान्‍याशिवाय आतिथ्‍य
कोरोना चाचणी प्रयोगशाळा व अद्ययावत रूग्णालयासाठी अडीच कोटी,  खनिज विकास निधीतून पालकमंत्र्यांनी उपलब्ध करून दिला निधी यवतमाळ, दि. 18 : मुकाबला न्यूज कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने उपाययोजना करण्याच्या दृष्टीने पालकमंत्री संजय राठोड यांनी खनिज विकास निधीमधून अडीच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीतून कोरोना चाचणी प्रयोगशाळा व अद्ययावत रुग्णालय उभारण्याचे निर्देश त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहे. जिल्ह्यात कोरोना संसर्ग पसरू नये व संशयित नागरिकांची कोरोना चाचणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तातडीने व्हावी म्हणून 500 खाटांचे अद्ययावत रूग्णालय व प्रयोगशाळा उभारण्याचा निर्णय पालकमंत्री संजय राठोड यांनी घेतला. त्यासाठी खनिज क्षेत्र कल्याण योजनेच्या निधीतून तत्काळ अडीच कोटी रूपयांचे अनुदान मंजूर करण्याचे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी जिल्हाधिकारी एम. डी. सिंग यांना दिले. कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून प्रशासन सर्वतोपरी खबरदारी घेत आहे. या स्थितीत नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवू नये व त्यांच्यावर तातडीने उपचार करता यावे, यासाठी येथील शासकीय वैद्