मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पहापळ येथील राहुल वऱ्हाडे जनसंज्ञापन व पत्रकारीता पदवी उत्तीर्ण

पहापळ येथील राहुल वऱ्हाडे जनसंज्ञापन व पत्रकारीता पदवी उत्तीर्ण  पांढरकवडा: महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक द्वारा गोपिकाबाई सिताराम गावंडे महाविद्यालय उमरखेड येथे केळापुर तालुक्यातील पहापळ येथील राहुल वऱ्हाडे या युवकाने जनसंज्ञापन व पत्रकारीता पदवी करीता २०१७ मध्ये प्रवेश घेतला या वर्षी २०२० मध्ये तृतीय वर्षात जनसंज्ञापन व पत्रकारीता पदवी राहुल वऱ्हाडे हे प्रथम श्रेणीत ६४.१३ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. पहापळ येथील सर्वसामान्य परिवारातील राहुल वऱ्हाडे शिक्षणासोबत सामाजिक कार्यात सतत अग्रसेर राहते. या वर्षी कृषी विद्यालय कोंघारा येथून कृषी तंत्र पदविका मधे यश संपादन केले असून आता जनसंज्ञापन व पत्रकारीता पदवी मध्ये पन यश संपादन केले आहे. ग्रामीण भागातून पत्रकारीतेची पदवी प्राप्त केल्या बद्दल राहुलचे सर्व क्षेत्रातून कौतूक होत आहे. राहूल ने आपल्या यशाचे श्रेय वडील संजय वऱ्हाडे व आई दिपमाला वऱ्हाडे तसेच शिक्षकवृंद तथा मार्गदर्शकांना दिले आहे.

वाचकांच्या मनावर अधिराज्य करणारा अवलिया लेखक

 वाचकांच्या मनावर अधिराज्य करणारा अवलिया लेखक  आज ख्यातनाम लेखक सुहास शिरवळकर उर्फ सुशींचा वाढदिवस.तसे पाहिले तर माझ्या ह्या आवडत्या लेखकाने आपला निरोप घेऊन तब्बल सतरा वर्ष झाली आहेत.पण सुहास शिरवळकरांची कुठलीही कादंबरी आजही हातात घ्या ती तितकीच फ्रेश वाटते.सुहास शिरवळकर आपल्यात नाहीत ह्यावर आज देखील विश्वास बसत नाही. सुहासजींचा वाचक वर्ग तसा तरुणांपासून तर प्रौढांपर्यंत सर्वच होता.पण प्रौढांनाही तारुण्यात नेणारे अफलातून कसब सुहासजींच्या लेखनात होते.एखाद्या चांगल्या लेखकाला शासनाद्वारे पुरस्कारांच्या बाबतीत जशी प्रेरणा मिळायला पाहिजे तशी प्रेरणा कदाचित सुहास शिरवळकरांना राज्य शासनाकडून मिळाली नसेल.कमीतकमी ते डीझर्व करीत होते तितकी तर नक्कीच नाही. पण गेल्या काही पिढ्यांच्या तरुणाईवर मात्र सुहासजींनी अनभिषिक्त राज्य केले.देवकी नावाच्या चित्रपटासाठी त्यांना राज्यशासनाचा सर्वोकृष्ठ लेखक हा सन्मान मिळाला आहे.सुहास शिरवळकरांची कुठलीही कादंबरी हातात घेतली की संपल्या शिवाय वाचकाला चैन पडत नसे.पुढे काय होणार? हा प्रश्न कादंबरी पूर्ण वाचल्याशिवाय सुटत नसे आणि हीच सुहासजींच्या लेखनाचे आणि यशाचे ग