मुख्य सामग्रीवर वगळा

जिल्ह्यात सर्व व्यवहार नियमितपणे सुरू करण्यास दिली जिल्हाधिकारी यांनी परवानगी; जिल्हयाचा समावेश श्रेणी एकमध्ये


 *जिल्ह्यात सर्व व्यवहार नियमितपणे  सुरू करण्यास दिली जिल्हाधिकारी यांनी परवानगी* 


*जिल्हयाचा समावेश श्रेणी एकमध्ये*


*लग्न व अंथविधीसाठी 50  लोकांच्या उपस्थितीस परवानगी*


*शासकीय कार्यलये 100 टक्के क्षमतेने सुरू*


*कोविड नियमांचे पालन तसेच दुकाने व आस्थापना चालकास व कर्मचाऱ्यांना कोविड चाचणी बंधनकारक*


यवतमाळ, दि. 6 जून :   

शासनाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे यवतमाळ जिल्ह्याचा समावेश श्रेणी -1 मध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी  यवतमाळ जिल्ह्याकरीता 7 जून 2021 पासून ब्रेक दि चेन अंतर्गत घालून देण्यात आलेले निर्बंध शिथिल केले असून सर्वच बाबी नियमितपणे सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. 


अत्यावश्यक सेवेंची दुकाने व अत्यावश्यक सेवा तसेच इतर दुकाने व सेवा  नियमितपणे सुरु राहतील. तथापि अत्यावश्यक सेवेंच्या व इतर आस्थापना धारकांनी दुकानात नागरिकांची होणारी गर्दी कमी करण्याच्या दृष्टीने जास्तीत जास्त होम डिलेव्हरीद्वारे वस्तूंचा पुरवठा करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. त्यादृष्टीने आस्थापना धारकांनी स्वत:चे व्हॉटसॲप नंबर दुकानासमोर प्रसिध्द करावे व व्हॉटसॲप ग्रुपद्वारे याबाबत प्रसिध्दी द्यावी. तसेच आस्थापना धारकांनी ग्राहकांचे व्हॉटसॲप नंबर, मोबाईल नंबर घेऊन त्यांना घरपोच वस्तू  पुरवठा करण्यास प्राधान्य देण्यात यावे. जेणेकरून दुकानात प्रत्यक्ष येणाऱ्या ग्राहकांची संख्या कमी होईल व दुकानात गर्दी होणार नाही. 


अत्यावश्यक वस्तू / सेवा व इतर वस्तू पुरविण्याऱ्या आस्थापना चालक व त्यामधील सर्व कर्मचारी तसेच होम डिलेव्हरीद्वारे वस्तू / सेवा देणारे कर्मचारी यांनी लसीकरण करणे अथवा त्यांच्याकडे कोविड चाचणी निगेटिव्ह असल्याबाबतचा अहवाल सोबत बाळगणे आवश्यक आहे. कोविड चाचणी अहवाल हा अहवालाच्या दिनांकापासून 15 दिवसांसाठी वैध राहील. लसीकरण न केल्याचे किंवा वरील मुदतीतील कोविड निगेटिव्ह अहवाल नसल्यास शासकीय पथकाद्वारे पहिल्या वेळेस 100 रुपये व त्यांनतर प्रत्येक वेळेस 200 रुपये दंड आकारण्यात येईल.


अत्यावश्यक सेवेंच्या व इतर सेवेंच्या आस्थापनांमध्ये दुकान मालक / कामगार व ग्राहक यांनी मास्क लावणे, सामाजिक अंतर, सॅनिटायझर किंवा हॅन्डवॉशने नियमित हाताची स्वच्छता इ. कोविड त्रिसूत्रिचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील, सदरचे पालन न केल्याचे आढळून आल्यास संबधीत आस्थापना धारक यांचेवर पहिल्यांदा 5 हजार रुपये दंड व पुन्हा आढळून आल्यास 10 हजार रुपये दंड  आकारण्यात येईल व योग्य प्रशासकीय कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी. तसेच दुकानासमोर नो मास्क नो एन्ट्री (मास्क नाही प्रवेश नाही) असे बोर्ड त्यासोबत कोविड त्रिसूत्रिचे पालन करण्याबाबतचे ग्राहकांना आवाहन ह्याबाबत डिजीटली प्रिंटेड किंवा हस्ताक्षराने लिहलेला साधा बोर्ड दर्शनी भागात लावणे बंधनकारक राहील. 


 दुकानासमोर ग्राहकांना योग्य सामाजिक अंतर राखून उभे राहण्याकरीता स्पष्ट दिसेल असे वर्तूळ करण्यात यावे. दुकानासमोरील पार्किंगच्या जागेत व ओट्यावर सामान ठेवण्यात येऊ नये जेणेकरून सदर जागा ग्राहकांना उभे राहण्याकरीता वापरता येईल व गर्दी होणार नाही.

 


*मॉल,‍ थिएटर्स, नाट्यगृहे :*

 कोविड त्रिसूत्रिचे पालन होण्याच्या अनुषंगाने व देान व्यक्तीमध्ये योग्य सामाजिक अंतर राखण्याच्या अनुषंगाने एकूण आसन क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने सदर मॉल, थिएटर्स, नाट्यगृहे सुरु राहतील. सदर ठिकाणी गर्दी होणार नाही ह्याची दक्षता व्यवस्थापकांनी घ्यावी. तसेच सदर ठिकाणाचे नियमित सॅनिटाईज करणे बंधनकारक राहील. 

 

*रेस्टारंट :*

 रेस्टॉरंट समोर गर्दी होणार नाही ह्याची दक्षता रेस्टारंट मालकानी / चालकांनी घ्यावी. तसेच सदर ठिकाणाचे नियमित सॅनिटाईज करणे बंधनकारक राहील. रेस्टारंट मधील आसनांची रचना ही दोन ग्राहकांमध्ये सुरक्षित सामाजिक अंतर राखण्याच्या अनुषंगाने करण्यात यावी.


*सार्वजनिक जागा, खुली मैदाने, वॉकिंग, सायकलींग :*

 सार्वजनिक जागा, खुली मैदाने, वॉकिंग, सायकलींग करतांना सामाजिक अंतराचे पालन करणे तसेच कोविड प्रतिबंधात्मक वर्तणूक व कोविड त्रिसूत्रिचे पालन करणे बंधनकारक राहील. एकाच ठिकाणी जास्त गर्दी होणार नाही याची दक्षता नागरिकांनी घ्यावी. 

 

*क्रीडा :* एकाच ठिकाणी गर्दी होणार नाही याची दक्षता खेळाडूंनी घेऊन  कोविड त्रिसूत्रीचे पालन करणे बंधनकारक राहील. पुढील आदेशापर्यंत प्रेक्षकांनी गर्दी करून क्रीडा स्पर्धेचे आयेाजन करता येणार नाही. खेळाडूंना खेळण्यासाठी प्रतिबंध राहणार नाही परंतू कोविड प्रतिबंधात्मक वर्तणूक चे पालन करणे बंधनकारक राहील. 


*सांस्कृतीक कार्यक्रम व समारंभ :* सामाजिक अंतर राखण्याच्या अनुषंगाने हॉलमध्ये एकूण आसन क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने सक्षम प्राधिकरणाच्या पूर्वपरवानगीने सांस्कृतीक कार्यक्रम, समारंभ घेता येइल. कोविड नियमांचे पालन न केल्याचे आढळून आल्यास संबंधीत आस्थापना धारक यांचेवर पहिल्यांदा 25 हजार रुपये दंड व पुन्हा आढळून आल्यास 50 हजार रुपये दंड आकारण्यात येईल व योग्य प्रशासकीय कारवाई करण्यात येईल 


*शुटींग :* कोविड त्रिसुत्रिचे (मास्क लावणे, सामाजिक अंतराचे पालन, सॅनिटाईज किंवा हॅन्डवॅश ने नियमित हात धुणे इ.) पालन करणे बंधनकारक राहील.


*लग्न समारंभ :*  एकूण 50 व्यक्तीच्या क्षमतेच्या मर्यादेत लग्न समारंभास परवानगी राहील. 

कोविड त्रिसुत्रिचे (मास्क लावणे, सामाजिक अंतराचे पालन, सॅनिटाईज किंवा हॅन्डवॅश ने नियमित हात धुणे इ.) पालन करणे बंधनकारक राहील.नियमांचे  पालन न केल्याचे आढळून आल्यास संबंधीत आस्थापना धारक यांचेवर पहिल्यांदा 25 हजार  रुपये दंड व पुन्हा आढळून आल्यास 50 हजार रुपये दंड आकारण्यात येईल व योग्य प्रशासकीय कारवाई करण्यात येईल. 


*अंत्ययात्रा :* एकूण 50 व्यक्तीच्या क्षमतेच्या मर्यादेत परवानगी राहील. 


*शासकीय कार्यालयाच्या स्थानिक बैठका व निवडणूक कार्यक्रम :* कोविड त्रिसूत्रिचे पालन होण्याच्या अनुषंगाने  हॉलमध्ये एकूण आसन क्षमतेच्या  50 टक्के क्षमतेने शासकीय कार्यालयाच्या स्थानिक बैठका, निवडणूक कार्यक्रम घेतला येईल. 


बांधकाम,  कृषी , ई – कॉमर्स व्यवहार कोविड त्रिसूत्रीचे पालन करून  नियमितपणे सुरू राहतील. 

जीम, सलून, ब्युटी पार्लर, स्पॉ : जीम, सलून, ब्युटी पार्लर, स्पॉच्या ठिकाणी गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी, ग्राहकांना टोकन पध्दतीने, मोबाईल एस.एम.एस. व्हॉटसॲप संदेशद्वारे सेवेबाबत माहिती द्यावी, जेणेकरून आस्थापनामध्ये ग्राहकांची गर्दी होणार नाही. नियमांचे  पालन न केल्याचे आढळून आल्यास संबंधीत आस्थापना धारक यांचेवर पहिल्यांदा 5 हजार  दंड व पुन्हा आढळून आल्यास 10 हजार रुपये दंड आकारण्यात येईल व योग्य प्रशासकीय कारवाई करण्यात येईल.  


*सार्वजनिक वाहतूक, कार्गो वाहतूक : कोविड त्रिसुत्रिचे  पालन करणे बंधनकारक राहील.*


*उत्पादन निर्यातक्षम क्षेत्र :* 1. अत्यावश्यक वस्तू – उत्पादन क्षेत्र (अत्यावश्यक वस्तू म्हणून वर्गीकृत करण्यात आलेल्या वस्तू आणि त्याकरीता आवश्यक असलेल्या कच्चा माल, वेष्टन आणि संपूर्ण पुरवठा साखळी करीता लागणाऱ्या वस्तू तयार करणारी क्षेत्रे), 2. सर्व निरंतर प्रक्रिया उद्योग, 3.राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षणा संदर्भात आवश्यक असलेल्या वस्तूंचे उत्पादन, 4. डाटा सेंटर्स /क्लाऊड सर्व्हिस प्रोव्हायडर्स / आय.टी. सर्व्हिसेस  : नियमितपणे कोविड त्रिसुत्रिचे पालन करून सुरू राहतील.  


उत्पादन -  अत्यावश्यक नसलेले, निरंतर प्रक्रिया उद्योग किंवा निर्यातक्षम उत्पादक क्षेत्रामध्ये अंतर्भुत नसलेले इतर उत्पादक क्षेत्र : नियमितपणे सुरू राहतील.  

 

शासकीय व सर्व प्रकारची खाजगी कार्यालये 100 टक्के क्षमतेने सुरु राहतील. 


जिल्ह्यात जमावबंदी / संचारबंदी लागू राहणार नाही  परंतु वर नमूद केल्यानुसार प्रत्येक बाबींसाठी लोकांच्या उपस्थितीच्या संख्येवर निर्बंध राहील, लोकांनी सर्व ठिकाणी आवश्यक सामाजिक अंतर पाळण्यासोबतच कोविड प्रतिबंधात्मक वर्तणूक व कोविड त्रिसूत्रिचा काटेकोरपणे अवलंब (मास्क लावणे, सामाजिक अंतराचे पालन, सॅनिटायझज्ञर किंवा हॅडवॉशने हाताची नियमित स्वच्छता) प्रत्येक नागरिकास बंधनकारक राहील. 


 आदेशांचे उल्लंघन करतील त्यांचेवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897, भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 व इतर संबंधीत कायदे व नियम यांचे अंतर्गत कारवाई करण्यात येईल असे आदेशात नमूद आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

यवतमाल जिले के तरोडा गांव में शहीद जवान रहाटे को दीगई अंतिम विदाई. अरणी:- प्रतिनिधि (शाहरुख काझी) महाराष्ट्र के गडचिरोली में 1 तारीख को हुए नक्सली हमले में शहीद जवान आग्रमन रहाटे को उसके गांव में अंतिम विदाई दे दी गई लेकिन इनके परिजनों ने इनकी टुकड़ी का नेतृत्व करने वाले अधिकारी की मिलीभगत से यह हादसा होने का गंभीर आरोप लगाया है गडचिरोली के कुरखेड़ा में 1 मई के दिन नक्सलियों द्वारा पुलिस गाड़ी को विस्फोट से उड़ाकर 15 जवानों को शहीद किया था उनमें से एक यवतमाल जिले के अरणी तहसील के तरोड़ा गांव का जवान अग्रमन रहाटे भी शहीद हुआ है शहीद जवान के गांव में 3 में को नम आंखों से अंतिम विदाई दे दी गई शहीद के परिजनों ने इस हमले को इनका नेतृत्व करने वाला अधिकारी काले के मिलीभगत से अंजाम दिया गया है ऐसा गंभीर आरोप लगाया है इस अधिकारी पर कार्रवाई करने की मांग परिजनों ने की है.
पुसद विधानसभा के युवा उमेदवार इंद्रनील मनोहरराव नाईक इनकी ऐतेहासिक जीत. महाराष्ट्र - यवतमाल जिले के पुसद विधानसभा निर्वाचन क्षेत्र से महाराष्ट्र के पूर्वमंत्री मनोहरराव नाईक के सुपुत्र युवा उमेदवार इंद्रनील मनोहर नाईक ने भाजपा के उमेदवार निलय नाईक को करारी हार देते हुए कुल 89143 मत हासिल करके एक ऐतिहासिक जीत हासिल की । आपको बतादे के राष्ट्रवादी का किला माने जाने वाले इस चुनाव क्षेत्र में एक ही परिवारज के दो भाई निलय नाईक और छोटे भाई इंद्रनील नाईक चुनाव मैदान में होने के कारण पूरे महाराष्ट्र की नज़र पुसद विधानसभा की इस सीट पर बानी हुई थी । आखिरकार 2019 के इस विधानसभा चुनाव में राष्ट्रवादी के युवा उमेदवार इंद्रनील मनोहरराव नाईक की 9701 ओठों से ऐतेहासिक जीत होने के चलते पुसद विधानसभा का इतिहास कायम रहा ।
टीप्पर हॉटेलमध्ये घुसल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान,एक जखमी   पुसद प्रतिनिधी (प्रा. अकरम शेख) पुसद/ दि.१३ पी एन कॉलेज व फार्मसी कॉलेज च्या दरम्यान असलेल्या एका जगदंबा टी सेंटर मध्ये अचानक टीप्पर घुसल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन किरकोळ जखमी झाल्याची घटना आज दिनांक १३ जून रोजो दुपारी एक वाजता घडल्याने सर्वत्र खळबळ माजली होती.           याबाबत सविस्तर सविस्तर वृत्त असे की पुसद दिग्रस मार्गावरील फुलसिंग नाईक महाविद्यालय व फार्मसी कॉलेजच्या मध्यभागात असलेल्या चौकातील नूतनताई क-हाले यांच्या घरामध्येच हॉटेल व पानठेला हा व्यवसाय चालू असताना अचानकपणे दुपारी दिग्रस रोड कडून पुसद कडे येणाऱ्या टीप्पर क्रमांक एम पी 09/जी आई  7785 ने  पोलिस ब्रेकेट तोडून हॉटेलला जबर धडक दिली त्यामध्ये पानठेला, हॉटेल चे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन हॉटेल समोर असलेल्या स्कुटी क्रमांक एम एच 29/बी एल  5110 क्रमांकाच्या ॲक्टिवा गाडीला जबर धडक बसल्याने दुचाकीस्वार जखमी झाला असून त्यांना खाजगी दवाखान्यांमध्ये उपचारासाठी भरती केले  तर घर मालक तथा हॉटेलचे मालक असलेल्या नूतनताई क-हाळे यांनी हा प्रत्यक्