मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जून, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
भूकंप परिस्थितीत घ्यावयाच्या काळजीबाबत, प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना. 👉🏻 अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन 👉🏻 मदतीकरीता नियंत्रण कक्ष क्रमांक 07232-240720 व 07232- 255077 यवतमाळ, दि. 22 :  जिल्ह्यातील उमरखेड, दिग्रस, महागाव, घाटंजी, आर्णि आणि दारव्हा तालुक्यातील 24 गावांमध्ये भारतीय प्रमाण वेळेनुसार दि. 21 जून रोजी रात्री 9.22 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. यात उमरखेड तालुक्यातील कुरळी, नारळी, बोरगाव, साखरा, निंगनूर, अकाली, मल्याळी, ढाकणी, बिटरगाव, खरुस, चातारी, एकांबा, टेंभुरदराच, आर्णि तालुक्यातील राणी, धानोरा, अंजनखेड, साकूर, मुकिंदपूर, महागाव तालुक्यातील हिवरा संगम, इंजनी, घाटंजी तालुक्यातील चिखलवर्धा, कुरली, दिग्रस तालुक्यातील सिंगद आणि दारव्हा तालुक्यातील खोपडी या गावांचा समावेश आहे. हा भूकंप रिक्टर स्केलवर 3.7 तिव्रतेचा होता. भूकंपाच्या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीच्या वातावरणात खबरदारी म्हणून नागरिकांनी काय करावे किंवा काय करू नये, याबाबत जिल्हा प्रशासनाकडून मार्गदर्शक सुचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी या सुचनांचे पालन करावे व अफवांवर विश्वा
जमीन हडपल्याप्रकरणी पुसद येथे अवैध सावकारावर धाड. सहाय्यक निबंधक कार्यालयाची कारवाई यवतमाळ, दि. 21 :   शेतक-याची जमीन हडपल्याप्रकरणी पुसद येथील अवैध सावकारावर धाड टाकून महत्वाचे दस्तऐवज जप्त करण्यात आले. ही कारवाई पुसद येथील सहकारी संस्था तथा सावकाराचे सहाय्यक निबंधक कार्यालयाने केली. अवैध सावकारीमध्ये जमीन हडपल्याबाबत संभाजी लिंबाजी मुरमुरे (रा.बिजोरा ता.महागाव) व उकंडा पुंजाजी पांडे (रा. राजुरा ता. महागाव) यांनी 23 एप्रिल 2019 रोजी पुसद येथील सहाय्यक निबंधक कार्यालयाकडे पुसद तालुक्यातील श्रीरामपूर येथील अवैध सावकार सुरज माधवराव वैध व माधवराव रुखमाजी वैध यांच्याविरुध्द तक्रार दाखल केली होती. सदर तक्रारीवर कार्यालयात सुनावणी होती. अवैध सावकार वैध यांना जमिनीचे दस्तावेज तसेच अवैधरित्या ताब्यात असलेली चल, अचल संपत्ती सादर करण्यास फर्माविण्यात आले. मात्र त्यांनी याप्रकरणी कोणतेही दस्तऐवज सादर केले नाही. त्यामुळे याप्रकरणी झडती घेण्याचे आवश्यक वाटल्याने सहाय्यक निबंधक यांनी महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम 2014 चे कलम 16 अन्वये अधिकाराचा वापर करून झडती घेतली. यात काही महत्वपूर्
टीप्पर हॉटेलमध्ये घुसल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान,एक जखमी   पुसद प्रतिनिधी (प्रा. अकरम शेख) पुसद/ दि.१३ पी एन कॉलेज व फार्मसी कॉलेज च्या दरम्यान असलेल्या एका जगदंबा टी सेंटर मध्ये अचानक टीप्पर घुसल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन किरकोळ जखमी झाल्याची घटना आज दिनांक १३ जून रोजो दुपारी एक वाजता घडल्याने सर्वत्र खळबळ माजली होती.           याबाबत सविस्तर सविस्तर वृत्त असे की पुसद दिग्रस मार्गावरील फुलसिंग नाईक महाविद्यालय व फार्मसी कॉलेजच्या मध्यभागात असलेल्या चौकातील नूतनताई क-हाले यांच्या घरामध्येच हॉटेल व पानठेला हा व्यवसाय चालू असताना अचानकपणे दुपारी दिग्रस रोड कडून पुसद कडे येणाऱ्या टीप्पर क्रमांक एम पी 09/जी आई  7785 ने  पोलिस ब्रेकेट तोडून हॉटेलला जबर धडक दिली त्यामध्ये पानठेला, हॉटेल चे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन हॉटेल समोर असलेल्या स्कुटी क्रमांक एम एच 29/बी एल  5110 क्रमांकाच्या ॲक्टिवा गाडीला जबर धडक बसल्याने दुचाकीस्वार जखमी झाला असून त्यांना खाजगी दवाखान्यांमध्ये उपचारासाठी भरती केले  तर घर मालक तथा हॉटेलचे मालक असलेल्या नूतनताई क-हाळे यांनी हा प्रत्यक्
(A.I.M.I.M.) पुसदच्या निवेदनाची दखल घेत पुसद नगर परिषद ने सुरू केले शहरात स्वच्छता अभियान. पुसद शहरात सर्वत्र घाणीचे साम्रज्य निर्मान झाल्याने रोगराईचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने शहरातील नागरीकांनी संतापाचे वातावरण निर्माण झाले होते.  ही गंभिर बाब लक्षात घेवून A.I.M.I.M.पक्षाचे शहर अध्यक् सय्यद  सिद्दीकोद्दीन यांनी पवित्र रमजान महिण्याचे औचित्य साधुन या गंभीर प्रकार बाबत शहरातील स्वच्छतेचे महत्व लक्षात घेवून या प्रकारा बाबत पुसद नगर परिषद  मुख्याधिकारी यांना शहरातील स्वच्छतेचे बाबत तक्रार दाखल केली होती.   व त्याच्या प्रतिलिपी वरिष्ठाकडे पाठवून या गंभिर प्रकाराचा पाठपुरावा करत शहरात पुसद नगर परिषद तर्फे स्वच्छता अभियान राबवून दखल न घेतल्यास पुसद नगर परिषद प्रशासना विरूध्द आव्हान उभाण्याचा इशारा दिला होता.  त्याची दखल म्हणून पुसद शहरातील समस्त वार्डत पुसद नगर परिषद तर्फे स्वच्छता अभियान राबविण्यात येत असल्याने शहरातील नागरीकांच्या वतीने A.I M.I.M. चे शहर अध्यक्ष सैय्यद सिद्दीकोद्दीन यांचे आभार मानल्या जात आहे.
मुंबईत जोरदार वादळाचा एक बळी, पावसाची रिपरिप जोरदार वादळामुळे मुंबईत एकाचा बळी गेला आहे. चर्चगेटजवळ डोक्यावर सिमेंटचे ब्लॉक पडून वृद्धाचा मृत्यू झाला. पुढील २४ तास समुद्रकिनाऱ्यावर न जाण्याचा हवामान खात्याने इशारा दिला आहे. दरम्यान, पुढच्या २४ तासांत मुंबई, ठाणे, पालघर आणि कोकण किनारपट्टीजवळ चक्रीवादळाचा परिणाम जाणवेल, असा इशारा वेधशाळेने दिला आहे.  सोसाट्याचा वारा तसेच मोठा पाऊस होईल. त्यामुळे लोकांनी समुद्रकिनारी जाऊ नये, तसेच झाडाजवळ, विजेच्या खांबाजवळ उभे राहू नये, असे सांगण्यात आले आहे. वायू वादळी वाऱ्याचा सर्वाधिक फटका किनारपट्टी भागास बसत आहे. समुद्राच्या पाण्याची पातळी वाढली असून, समुद्र खवळला आहे. यामुळे किनार्‍यावर समुद्री लाटांचे रौद्ररूप दिसून येत आहे. समुद्रातील वायू वादळाचा परिणाम किनारपट्टीवर जाणवत असून, वादळी वाऱ्यामुळे मच्छीमारांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. वायू चक्रीवादळामुळे रायगड किनारपट्टीवर देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. १२ आणि १३ जून हे दोन दिवस धोक्याचे असून उत्तर रायगडात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राष्ट्रीयकृत बँकांनी पीककर्ज वाटपाची गती वाढवावी                                                 -पालकमंत्री मदन येरावार v दुष्काळ निवारणासंदर्भात आढावा बैठक v जिल्ह्यात 33 के.व्ही. व 11 के.व्ही. साठी दुहेरी जोडणीचे नियोजन         यवतमाळ, दि. 12 :   दरवर्षीपेक्षा यावर्षी पीक कर्जासाठी पात्र लाभार्थ्यांची संख्या जास्त आहे. शासनाने एनपीएची रक्कम बँकांना दिली आहे. त्यामुळे शेतक-यांना खरीप हंगामात वेळेवर पीक कर्ज मिळण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकांनी कर्जवाटपाची गती वाढवावी, अशा सुचना पालकमंत्री मदन येरावार यांनी केल्या.             जिल्हाधिकारी कार्यालयात दुष्काळ निवारण व इतर विषयांचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, जिल्हा उपनिबंधक अर्चना माळवे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) संगिता राठोड आदी उपस्थित होते.             जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तुलनेत राष्ट्रीयकृत बँकांची पीक कर्ज वाटपाची गती कमी आहे, असे सांगून पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, पीक कर्जासाठी जिल्ह्यातील सर्व गावे बँकांना दत्तक देण्यात आली आहे. प
ढाणकी नगर पंचायत आरक्षण सोडत 13 जून ते 20 जूनपर्यंत हरकती व सूचना आमंत्रित         यवतमाळ, दि. 12 :  जिल्ह्यातील ढाणकी नगरपंचायतीच्या (क वर्ग) आगामी सार्वत्रिक निवडणुकीकरीता दिनांक 10 जून 2019 रोजी सकाळी 11 वाजतापासून सोडत पध्दतीने आरक्षण निश्चित करण्यात आले. राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार ढाणकी नगरपंचायतची यापुढे होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शहराची विभागणी नवीन प्रभागात केली आहे. त्यांचे क्षेत्र दर्शविणारा नकाशा व सिमा प्रदर्शित केलेल्या प्रारुप रचनेचा मसुदा ढाणकी नगरपंचायत कार्यालयाच्या सुचना फलकावर तसेच जिल्हाधिकारी यवतमाळ यांचे कार्यालयातील सुचना फलकावर आणि yavatmal.nic.in या संकेतस्थळावर दिनांक 13 जून 2019 रोजी प्रसिध्दी करण्यात येणार आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, उमरखेड तहसिल कार्यालय व नगरपंचायत ढाणकी येथे कार्यालयीन वेळेत पाहण्यासाठी उपलब्ध करण्यात येईल. ढाणकी नगरपंचायत क्षेत्रातील ज्या नागरिकांना या संबंधात काही हरकती व सूचना दाखल करावयाच्या असतील त्यांनी जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या कार्यालयात दिनांक 13 जून 2019 ते दिनांक 20 जून 2019 पर्यंत कार्यालयीन वे
शहरी आवास योजनेसाठी पालिकांच्या मुख्याधिका-यांनी पुढाकार घ्यावा                                                     - पालकमंत्री मदन येरावार         यवतमाळ, दि. 12 :   सन 2022 पर्यंत ‘सर्वांसाठी घरे’ ही केंद्र शासनाची महत्वाकांक्षी योजना आहे. ग्रामीण भागात जिल्हा परिषदेमार्फत प्रधानमंत्री आवास योजनेची वेगाने अंमलबजावणी होत आहे. मात्र नगर पालिका क्षेत्रात हा वेग कमी आहे. त्यामुळे प्रधानमंत्री शहरी आवास योजना वेगाने कार्यान्वित करण्यासाठी सर्व नगर पालिकांच्या मुख्याधिका-यांनी पुढाकार घ्यावा, अशा सुचना पालकमंत्री मदन येरावार यांनी केल्या.             जिल्हाधिकारी कार्यालयात प्रधानमंत्री शहरी आवास योजनेंतर्गत लाभार्थी पुरस्कृत बांधकामाचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, डीआरडीएचे प्रकल्प संचालक राजेश कुलकर्णी, पालिका प्रशासन अधिकारी शशीमोहन नंदा, यवतमाळ नगर पालिकेचे मुख्याधिकारी अनिल अढागळे, कळंबचे मुख्याधिकारी चारुदत्त इंगोले, दिग्रसचे मुख्याधिकारी शेषराव टाले आदी उपस्थित होते.             प्रधानमंत्री आवास योजनेसा
पोलीस अधिकारी कर्मचारी यांचे करिता पुसद येथे व्यायामाचे उद्घाटन. महाराष्ट्र शासनाद्वारे जिल्हा क्रीडा विभागातर्फे पोलीस विभागातील अधिकारी कर्मचारी यांचे आरोग्य चांगले राहावे या उदात्त हेतूने पुसद उपविभागाकरिता पोलीस अधिकारी कर्मचारी यांचे करिता व्यायामाचे संपुर्ण साहित्य पूरविण्यात आले आहे.  तसेच नगर परिषद पुसद यांचे सहकार्याने व्यायाम शाळेकरिता जागा उपलब्ध करुन देण्यात आली आहे सदर व्यायाम शाळेचे उद्घाटन दिनांक १० जून २०१९ रोजी मा. श्री मुमक्का सुदर्शन सहा. पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब पुसद व मा मुख्याधिकारी नगर परिषद पुसद यांचे शुभहस्ते करण्यात आले आहे.  सदर कार्यक्रमास श्री राठोड साहेब नगरपरिषद पुसद, स.पो.नि. श्री धिरज चव्हाण वाहतूक शाखा पुसद, स.पो.नि. श्री भंडारे ठाणेदार पो स्टे वसंतनगर, स.पो.नि. श्री हुलगे, स.पो.नि. श्री पांडव पो स्टे पुसद शहर हे तसेच पोलीस विभागातील व नगर परिषद पुसद येथील सर्व अधिकारी/कर्मचारी वृंद उपस्थित होते .