मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

एप्रिल, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ब्रेक द चेन' अंतर्गत जिल्ह्यासाठी मार्गदर्शक सुचना जारी ; 1 मे पर्यंत संचारबंदी लागू

  द चेन' अंतर्गत जिल्ह्यासाठी मार्गदर्शक सुचना जारी ; 1 मे पर्यंत संचारबंदी लागू यवतमाळ : 14 एप्रिल राज्यात 14 एप्रिलच्या रात्री 8 वाजतापासून 1 मे रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत 'ब्रेक द चेन' अंतर्गत मार्गदर्शक सुचना निर्गमित केल्या आहेत. या कालावधीत कलम 144 (संचारबंदी) लागू करण्यात आली आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी अमोल येडके यांनी जिल्ह्याकरीता आदेश निर्गमित केले आहे.             संचारबंदीची अंमलबजावणी : संचारबंदीच्या कालावधी कोणत्याही व्यक्तिस अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर पडता येणार नाही. अत्यावश्यक सेवेमध्ये समाविष्ट असलेल्या बाबी वगळता इतर सर्व आस्थापना, सार्वजनिक ठिकाणे, उपक्रमे, सेवा बंद राहतील. अत्यावश्यक सेवेमध्ये वर्गवारी केलेल्या सेवा व उपक्रम यांना कामकाजाच्या सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत मुभा राहील.             अत्यावश्यक सेवेमध्ये सुरू राहणा-या बाबी : रुग्णालये, डायग्नोस्टिक सेंटर, क्लिनीक, लसीकरण केंद्र, वैद्यकीय विमा कार्यालये, औषधी दुकाने व औषधी कंपन्या, औषधी व आरोग्य सेवा व औषध निर्मिती करणारे कारखाने तसेच त्यांचे वितरण, वाहतूक व्यवस्था, लस, सॅनिटायझर, मास्क, व