मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

2020 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पहापळ येथील राहुल वऱ्हाडे जनसंज्ञापन व पत्रकारीता पदवी उत्तीर्ण

पहापळ येथील राहुल वऱ्हाडे जनसंज्ञापन व पत्रकारीता पदवी उत्तीर्ण  पांढरकवडा: महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक द्वारा गोपिकाबाई सिताराम गावंडे महाविद्यालय उमरखेड येथे केळापुर तालुक्यातील पहापळ येथील राहुल वऱ्हाडे या युवकाने जनसंज्ञापन व पत्रकारीता पदवी करीता २०१७ मध्ये प्रवेश घेतला या वर्षी २०२० मध्ये तृतीय वर्षात जनसंज्ञापन व पत्रकारीता पदवी राहुल वऱ्हाडे हे प्रथम श्रेणीत ६४.१३ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. पहापळ येथील सर्वसामान्य परिवारातील राहुल वऱ्हाडे शिक्षणासोबत सामाजिक कार्यात सतत अग्रसेर राहते. या वर्षी कृषी विद्यालय कोंघारा येथून कृषी तंत्र पदविका मधे यश संपादन केले असून आता जनसंज्ञापन व पत्रकारीता पदवी मध्ये पन यश संपादन केले आहे. ग्रामीण भागातून पत्रकारीतेची पदवी प्राप्त केल्या बद्दल राहुलचे सर्व क्षेत्रातून कौतूक होत आहे. राहूल ने आपल्या यशाचे श्रेय वडील संजय वऱ्हाडे व आई दिपमाला वऱ्हाडे तसेच शिक्षकवृंद तथा मार्गदर्शकांना दिले आहे.

वाचकांच्या मनावर अधिराज्य करणारा अवलिया लेखक

 वाचकांच्या मनावर अधिराज्य करणारा अवलिया लेखक  आज ख्यातनाम लेखक सुहास शिरवळकर उर्फ सुशींचा वाढदिवस.तसे पाहिले तर माझ्या ह्या आवडत्या लेखकाने आपला निरोप घेऊन तब्बल सतरा वर्ष झाली आहेत.पण सुहास शिरवळकरांची कुठलीही कादंबरी आजही हातात घ्या ती तितकीच फ्रेश वाटते.सुहास शिरवळकर आपल्यात नाहीत ह्यावर आज देखील विश्वास बसत नाही. सुहासजींचा वाचक वर्ग तसा तरुणांपासून तर प्रौढांपर्यंत सर्वच होता.पण प्रौढांनाही तारुण्यात नेणारे अफलातून कसब सुहासजींच्या लेखनात होते.एखाद्या चांगल्या लेखकाला शासनाद्वारे पुरस्कारांच्या बाबतीत जशी प्रेरणा मिळायला पाहिजे तशी प्रेरणा कदाचित सुहास शिरवळकरांना राज्य शासनाकडून मिळाली नसेल.कमीतकमी ते डीझर्व करीत होते तितकी तर नक्कीच नाही. पण गेल्या काही पिढ्यांच्या तरुणाईवर मात्र सुहासजींनी अनभिषिक्त राज्य केले.देवकी नावाच्या चित्रपटासाठी त्यांना राज्यशासनाचा सर्वोकृष्ठ लेखक हा सन्मान मिळाला आहे.सुहास शिरवळकरांची कुठलीही कादंबरी हातात घेतली की संपल्या शिवाय वाचकाला चैन पडत नसे.पुढे काय होणार? हा प्रश्न कादंबरी पूर्ण वाचल्याशिवाय सुटत नसे आणि हीच सुहासजींच्या लेखनाचे आणि यशाचे ग

ह.उमर फारूक (र.अ) उर्दू हायस्कुल ची यंदा सुद्धा उत्तुंग भरारी

ह.उमर फारूक (र.अ) उर्दू हायस्कुल ची यंदा सुद्धा उत्तुंग भरारी पुसद शहरातील उर्दू माध्यमातील सुप्रसिद्ध शाळा हजरत उमर फारूक (र.अ) उर्दू हायस्कूल ने यशाची परंपरा कायम ठेवून या वर्षी सुद्धा उत्कृष्ठ 99 टक्के निकाल दिला आहे. या मध्ये कु.तजीन फिदोस समीर खान या गुणवंत विद्यार्थीनी ने 95 टक्के घेतले तर मो.फुर्कान मो.इर्फान देशमुख याने 91% घेऊन यशाची भरारी घेतली आहे. सोबतच एकूण निकाला मध्ये उच्च श्रेणीत 46 विद्यार्थी आले असून एकूण विद्यार्थ्यां मध्ये 66 विद्यार्थी हे प्रथम श्रेणीत आले आहे. व द्वितीय श्रेणीत 50 विद्यार्थी आले आहे. शाळेतील एकूण 168 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून. एकूणच निकाल 99 टक्के लागला आहे. या यशाचे श्रेय शाळेचे मुख्याध्यापक मो. वकील सर,व एजाजोद्दीन खतीब सर आणि वर्ग शिक्षक अब्दुल करीम सर,फहिमोद्दीन मलनस सर,निसार अहेमद सर तसेच सहाय्यक शिक्षक नवेद अहेमद सर,इर्फान अहेमद खान सर, नौशाद हुसैन सर, नदीम खान सर,सिमान मुद्दसिर सर, शेख इर्फान सर,अनस सर,सय्यद सलमान सर उमेर मिर्झा, मो.जुनेद सर या सर्व शिक्षकांना श्रेय जाते. तसेच शाळेतील शिक्षेत्तर कर्मचारी यांनी सुद्धा मोलाचे सहकार्य केले

पद्मभूषण डॉ विजय भटकर यांचे मार्गदर्शन नविन शैक्षणिक धोरण,कोविड १९ मुळे पालक आणि विद्यार्थ्यांची द्विधा मनस्थिती

पद्मभूषण डॉ विजय भटकर यांचे मार्गदर्शन नविन शैक्षणिक धोरण,कोविड १९ मुळे पालक आणि विद्यार्थ्यांची द्विधा मनस्थिती पुसद अर्बन बँकेचा उपक्रम नुकतेच केंद्रशासनाने नवे शैक्षणिक धोरण जाहीर केले आहे.तर दुसरीकडे कोरोनामुळे  अद्याप शाळा सुरू न झाल्याने पालक व विद्यार्थी द्विधा मनस्थितीत आहे. गावपातळीपासून ते महानगरांमध्ये सारखीच परिस्थिती असल्याचे लक्षात आल्यानंतर अत्यंत महत्वाच्या या विषयावर सर्वांना योग्य मार्गदर्शन मिळावे या हेतूने पुसद अर्बन कॉ ऑप बँकेचे अध्यक्ष शरद मैंद यांच्या संकल्पनेतुन व बँकेच्या सामाजिक उपक्रमातुन सुपर कॉम्प्युटर चे जनक , पदमभूषण ,नालंदा विश्वविद्यापीठाचे कुलपती व पंतप्रधानांच्या सायंटिफिक ऍडव्हायजरी कमेटीचे सदस्य डॉ विजय भटकर यांचे नविन शैक्षणिक धोरण, कोविड १९ मुळे पालक आणि विद्यार्थ्यांची द्विधा मनस्थिती या विषयावर रविवार ९ ऑगस्ट २०२० रोजी दुपारी ४.३० वाजता भव्य वेबिनार चे आयोजन केले आहे. तसेच अमरावती तथा नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मुरलीधर चांदेकर, डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला चे कुलगुरु डॉ विलास भाले, डायलॉग इंडिया न्युज पेपर दिल्ली चे संपादक अनुज अग

सेतू सुविधा केंद्र बंद असल्याने शेतकरी, विद्यार्थ्यांचे हाल; गुरुदेव युवा संघाचा आंदोलनांचा इशारा

सेतू सुविधा केंद्र बंद असल्याने शेतकरी, विद्यार्थ्यांचे हाल;  गुरुदेव युवा संघाचा आंदोलनांचा इशारा  यवतमाळ :- कोरोना प्रादुर्भावाची नावावर सेतू सुविधा केंद्र बंद केल्याने नुकताच निकाल लागलेल्या १० वि १२ वि चे विध्यार्थी व शेतकरी याना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून खासगी सेतू केंद्राकडून नागरिकांची आर्थिक लूट केल्या जात आहे. तहसील कार्यालयातील सेतू सुविधा केंद्र तातडीने सुरु करावे अशी मागणी गुरुदेव युवा संघाच्या वतीने करण्यात आली आहे.  12 वी आणि 10 वी चा निकाल लागला असल्याने विद्यार्थ्याना प्रवेश घेण्यासाठी लागणारे कागदपत्र तहसिल कार्यालय यवतमाळ  येथील आपले सरकार सेतु सुविधा केंद्र सरकारने तथा कोरोना विषाणू च्या प्रादुर्भावाने मार्च ते आजरोजी पर्यंत कोणत्याही प्रकारचे कागदपत्रे काढण्यासाठी पूर्ण पणे सेतु केंद्र बंद ठेवले असुन सरकारी सेतु सुविधा केंद्रात अल्प दरात कामे होतात आणि हेच कागदपत्र काढण्यासाठी खाजगी सेतु सुविधा केंद्रात सर्व सामाण्यांची लुट होत असून या गंभीर बाबींन विषयी शासन वा प्रशासन दुर्लक्ष करून खाजगी सेतु सुविधा केंद्र सुरू ठेवुन सरकारी सेतु सुविधा केंद्र बंद करून सामाण

शेतकऱ्यांसारखी सकारात्मकता कोरोनाच्या भयावर प्रभावी उपाय- डॉ मिलिंद आपटे

शेतकऱ्यांसारखी सकारात्मकता कोरोनाच्या भयावर प्रभावी उपाय- डॉ मिलिंद आपटे  पुसद- आज कोरोना मुळे प्रत्येक क्षेत्रात अनिश्चितता निर्माण होऊन समाजाचा प्रत्येक घटक भयग्रस्त झाला आहे.मात्र ज्याप्रमाणे दरवर्षी  शेतीत नुकसान होत असले तरी पुढच्या वर्षी पुन्हा शेतीची मशागत करून पावसाची वाट पाहणाऱ्या  शेतकऱ्यासारखी सकारात्मकता बालगल्यास  कोरोनाच्या भयावर सहज मात करता येईल असे मौलिक विचार नागपूर येथील प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ मिलिंद आपटे यांनी व्यक्त केले.  पुसद अर्बन बॅंकेचे अध्यक्ष शरद मैंद यांच्या संकल्पनेतून व बँकेच्या सामाजिक उपक्रमातुन काल   कोरोनाचा  व्यापारी ,कर्मचारी ,शेतकरी व सामान्य जनतेच्या मानसिकतेवर झालेला परिणाम व उपाय या विषयावर आयोजित  वेबिनार मध्ये मार्गदर्शन करताना ते पुढे म्हणाले की आपली सुदृढ शरीर व  प्रतिकार शक्ती टिकवुन ठेवा, शारीरिक व मानसिक धैर्य ठेवा ,नकारात्मक विचाराला टाळा, पायी जास्त चाला ,घटनेनंतर नकारात्मक चर्चा  टाळून उपायावर बोला. कोरोनाला जीवनातील विराम समजा पुढील वर्षी सर्व व्यवसाय पुन्हा एकदा भरारी घेवुन देशाची अर्थव्यवस्था कात टाकेल असा आत्मविश्वास त्यांनी व्

त्याग आणि बलिदानाचा सण: ईद_उल_अजहा._

_*त्याग आणि बलिदानाचा  सण:*_            _*ईद_उल_अजहा.*_  *प्रिय भारतीय बंधु आणि भगिनींनो,* *आपला भारत देश हा विविधतेने नटला आहे.इथे वेगवेगळ्या धर्माचे, पंथाचे लोक  गुण्यागोविंदाने एकत्र रहातात आणि आपले सण उत्सव आप आपल्या परीने साजरे करतात परंतु आज सुद्धा आपल्या समाजा मध्ये एकमेकांच्या सणा बद्दल गैर समज /समजुती आहे.* *याच सर्वांत जिंवत उदाहरण म्हणजे    ईद_उल_अजहा (बकरी ईद )नेमकी काय असते..? का साजरी केली जाते..? या बद्दल खूप भ्रामक संकल्पना आहे त्या दूर करून वास्तविक  ईद_उल_अजहा समजुन घेऊ या.* *मित्रांनो इस्लाम धर्मात फक्त दोनच धार्मिक सण आहे. जे पूर्ण विश्वात एकाच वेळी साजरे केले जातात एक म्हणजे ईद_उल_फित्र ( रमजान ईद)* आणि दुसरी म्हणजे *ईद_उल_अजहा ( बकरीद)आता आपल्या कडे जे बकरी ईद  म्हणतात तो वास्तविक  चुकीचा प्रकार आहे या सणाचे खरे नांव  ईद-उल -अजहा आहे .* *▪️प्रेषित इब्राहिम यांचा परिचय..?* *ऐतिहासिक तथ्यांच्या आधारे कुर्बानी परंपरेचा इतिहास 4000  वर्षां पूर्वीचा  आहे. अब्राहम नावाच्या प्रेषितांनी बुद्धपूर्व 1500 वर्षा पूर्वी ही कुर्बानी सुरु केली.* *इस्लाम मध्यें यांचा गौरव "र

कोरोनाचा विविध वर्गाच्या मानसिकतेवर परिणाम व उपाय; मानसोपचार तज्ञ मिलिंद आपटे यांचे २ ऑगस्ट रोजी मार्गदर्शन- पुसद अर्बन बँकेचा उपक्रम

कोरोनाचा विविध वर्गाच्या मानसिकतेवर परिणाम व उपाय; मानसोपचार तज्ञ मिलिंद आपटे यांचे आज मार्गदर्शन- पुसद अर्बन बँकेचा उपक्रम     पुसद- कोरोना  संकटाचा  समाजातील विविध  वर्गाच्या मानसिकतेवर  परिणाम होत आहे.त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे या हेतूने पुसद अर्बन कॉ ऑप बँकेचे अध्यक्ष शरद मैंद यांच्या संकल्पनेतुन व बँकेच्या सामाजिक उपक्रमातुन  प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ तथा मार्गदर्शक मिलिंद आपटे यांचे उद्या रविवार २ऑगस्ट २०२० रोजी दुपारी ३ वाजता  कोरोनाचा व्यापारी, कर्मचारी,शेतकरी व सामान्य नागरिकांच्या मानसिकतेवर झालेला परिणाम व उपाय या विषयावर व्हेबिनारचे आयोजन केले आहे. या व्हेबिनार ला राष्ट्रवादी काँग्रेस लिगल सेल अध्यक्ष तथा म.गो.बार कौन्सिल चे सदस्य एड आशिष देशमुख, अ.भा. काँ.कमिटी चे सचिव एड.सचिन नाईक,यवतमाळ जिप च्या माजी अध्यक्ष डॉ आरती फुफाटे, विश्वनाथसिंह बयास पतसंस्थेचे अध्यक्ष निशांत बयास, चेम्बर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष सुरज डुब्बेवार, उपाध्यक्ष संतोष अग्रवाल,माजी अध्यक्ष बिपीन चिद्धरवार, प्रगतशील कास्तकार अभय गडम ,नारायण क्षीरसागर,  साप्ताहिक पोलिटिक्स स्पेशल चे संपादक रितेश पुरोहित तसे

यवतमाळ, दारव्हा,पांढरकवडा, नेर, पुसद व दिग्रस येथील संचारबंदी कायम

यवतमाळ, दारव्हा,पांढरकवडा, नेर, पुसद व दिग्रस येथील संचारबंदी कायम यवतमाळ, दि. 31 : यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ, दारव्हा,पांढरकवडा, नेर, पुसद, दिग्रस शहरात व या शहरालगतच्या परिसरात 31 जुलैपर्यंत लागू करण्यात आलेली संचारबंदी पुढील आदेशापर्यंत वाढविण्यात आली आहे. जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी वरील आदेश निर्गमित केले आहे.             संचारबंदीच्या कालावधीत पुढील बाबींना मुभा देण्यात आली आहे. भाजीपाला व फळे गल्ली, कॉलनी, सोसायटीमध्ये जाऊन विक्री करण्यास सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत मुभा राहील. एका ठिकाणी बसून विक्री करता येणार नाही. दुध संकलन व दुध विक्रीला सकाळी 7 ते सकाळी 10 वाजेपर्यंत मुभा राहील. तसेच फिरते दुध विक्री या बाबीस सायंकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत मुभा राहील. पेट्रोल, डिझेल पंप सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत तसेच अत्यावश्यक सेवेकरिता 24 तास सुरू राहील.  कृषी साहित्याची, रासायनिक खत विक्री, बि-बियाणे विक्री व त्यांची गोदामे सकाळी 10 ते दुपारी 2 वाजतापर्यंत सुरू राहील. स्वस्त धान्य दुकाने सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू राहतील.  यवतमाळ, दारव्हा,पांढरकवडा, नेर, पुसद व दिग्र

संचारबंदी मध्ये तिन्ही आमदारांनी पुसद मधील गरीब गरजू जनतेला जीवनावश्यक वस्तूचे वाटप करावे.

संचारबंदी मध्ये तिन्ही आमदारांनी पुसद मधील गरीब गरजू जनतेला जीवनावश्यक वस्तूचे वाटप करावे. ए आई एम आय एम पुसद च्या वतीने निवेदनाद्वारे मागणी. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला कमी करण्याच्या उद्देशाने पुसद मधील तिन्ही आमदार मा.इंद्रिनिल नाईक, मा.डॉ. वजाहत मिर्झा, मा.ऍड.निलय नाईक यांनी यवतमाळचे जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांना विंनती करून पुसद मध्ये दिनांक २१ जुलै ते २८ जुलै पर्यंत संचारबंदी लावण्यास भाग पाडले होते. परंतु या संपूर्ण प्रक्रियेत जनतेला सहभागी न करता राजकिय आणि प्रशाकासकीय लोकांद्वारे संचार बंदी दिनांक २१ जुलै ते २८ जुलै पर्यंत करण्यात आली होती. ती संचारबंदी सुद्धा पुसद येथील गोरगरीब जनतेने खूप काटेकोरपणे पालन केली आता २९ जुलै पासून गोरगरीब जनतेला काही राहत मिळेल अशी आशा असतांना पुन्हा पुसद चे तिन्ही आमदारांनी जिल्हाधिकारी यवतमाळ यांना निवेदन देवून संचारबंदी वाढविण्यासाठी विनंती केली. परंतु या तिन्ही आमदारांनी जनतेच्या समस्यांना न पाहता ही संचार बंदी पुन्हा वाढविण्याची शिफारस केली त्यामुळे पुसद येथील गोरगरीब जनतेवर उपासमारीची वेळ आली आहे.आणि खाण्या पिण्यासाठी

पुसद व दिग्रस शहरात 31 जुलैपर्यंत संचारबंदी

यवतमाळ दि.28 : कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने खबरदारीचा उपाय म्हणून उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या प्रस्तावानुसार जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी पुसद व दिग्रस शहरात व या शहरालगतच्या भागात 31 जुलै 2020 च्या मध्यरात्रीपर्यंत  संचारबंदी लागू केली आहे. संचारबंदीच्या कालावधीत पुढील बाबी, आस्थापना, व्यक्ती व समूहाला सुट राहील. सर्व शासकीय कार्यालये त्यांचे संपूर्ण अधिकारी व कर्मचाऱ्यांसह सुरू राहतील. शासकीय कर्मचाऱ्यांना कार्यालयीन ओळखपत्र सोबत बाळगणे आवश्यक असेल तसेच त्यांच्या वाहनांना कार्यालयात येणे व घरी जाणे याकरीता मुभा राहील. पुसद व दिग्रस शहरातील व शहरालगतच्या क्षेत्रातील संपूर्ण अत्यावश्यक सेवेची व इतर सेवेची, वस्तुंची दुकाने व बाजारपेठ संपूर्णत: बंद राहतील. सर्व शासकीय व खाजगी दवाखाने, आरोग्य कर्मचारी, वैद्यकीय रुग्णालयातील कर्मचारी, पशुवैद्यकीय दवाखाने व त्यांचे औषधालये दररोज 24 तास (24 X 7) सुरू राहतील. ऑनलाईन औषध वितरण सेवा व शासकीय, खाजगी दवाखान्यालगत असलेली औषधीविक्री दुकाने (24 X 7) सुरू राहतील. तसेच इतर ठिकाणी असलेली एकल औषधी दुकानेसुद्धा सुर

माहिती आयुक्त कार्यालयात अत्याधुनिक तंत्रज्ञान

माहिती आयुक्त कार्यालयात अत्याधुनिक तंत्रज्ञान Ø   नव्या सॉफ्टवेअरने जलद सुनावणी Ø   कार्यालय पेपरलेस होण्यास मदत Ø   ‘टेलिग्राम ’ वरून दररोज माहिती अमरावती, दि. 7 :  लॉकडाऊनच्या काळात राज्य माहिती आयुक्त कार्यालय अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करीत आहे. कामकाजातील सर्वात मोठा भाग असलेल्या  सुनावणी ऑनलाईन करून गती देण्यात आली आहे. याशिवाय कार्यालयीन कामकाजात तंत्रज्ञानाचा कुशलतेने उपयोग करण्यात येत आहे. अपिलाची नोटीस ते सुनावणीसाठी नवे सॉफ्टवेअर अंगीकारून प्रकरणे निकाली काढण्यात येत आहेत. या सॉफ्टवेअरच्या उपयोगामुळे येत्या काळात दररोज सुमारे 70 प्रकरणे निकाली काढण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.             राज्य माहिती आयोगाच्या अंतर्गत येणाऱ्या पाच जिल्ह्यासाठी ऑनलाईन कार्यप्रणाली तयार करण्यात आली आहे. ऑनलाईन कामकाजासाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी एक सहायक कक्ष अधिकारी नेमण्यात आला आहे. तसेच दोन कक्ष अधिकारी नियंत्रण करणार आहेत. ही प्रकरणे ऑनलाईन होण्यासाठी नव्याने विकसित करण्यात आलेल्या सॉफ्टवेअरमध्ये माहिती अधिकारांतर्गत संबंधित जनमाहिती अधिकाऱ्याकडे सादर करण्यात आलेला
राज्यात मान्सून १० जूननंतर सक्रीय होईल : हवामान विभाग ➡ मुंबई : संपूर्ण राज्यात मान्सून १० जूननंतर सक्रीय होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, चक्रीवादळानंतर केरळमधील मान्सूनची देशातील इतर राज्यांकडील वाटचाल थांबली होती. ती आता पुन्हा सुरु झाली आहे. मान्सून हळूहळू पुढे सरकत आहे. मान्सून महाराष्ट्रात पोहोचण्यास थोडासा उशीर होईल, असे सध्याच्या वाटचालीवरुन दिसून येत आहे. आता केरळातील मान्सूनची प्रगती दिसून येत आहे. हा मान्सून पुढे सरकत आहे. पुढील तीन दिवसात मान्सून हा कर्नाटक, तामिळनाडू, पद्दुचेरी, बंगालच्या दिशेने वाटचाल करत आहे. आग्नेय तसेच मध्य-पश्चिम बंगालच्या खाडी किनाऱ्याचा भाग मान्सून व्यापून टाकेल, असा अंदाज आहे. त्यानंतर गोव्यातून मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
ईडीचे ५ अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह ➡ दिल्ली : जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. अनेक खेळाडू, अभिनेते, नेते या विषाणूच्या विळख्यात अडकले आहेत. आता ईडीच्या पाच अधिकाऱ्यांना करोना व्हायरसची लागण झाल्याचं समोर आलं आहे. दिल्लीच्या खान मार्केट परिसरात असलेल्या 'लोक नायक भवन' या ईडीच्या मुख्यालयातील पाच अधिकाऱ्यांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. काल (दि.५) ईडीच्या मुख्यालयातील पाच अधिकाऱ्यांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर मुख्यालय सील करण्यात आलं असून उद्यापर्यंत हे कार्यालय सील असणार आहे.
रायगडमधील चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांसाठी १०० कोटी रुपयांची मदत निसर्ग चक्रीवादळाने मोठं नुकसान झालेल्या रायगड जिल्ह्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीची मदत म्हणून १०० कोटी रुपये जाहीर केले आहेत. ही सुरुवात आहे. त्याला पॅकेज म्हणू नका, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांना सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी रायगड जिल्ह्यातील वादळग्रस्त भागाचा दौरा केला. निसर्ग वादळाने रायगड जिल्ह्यात मोठं नुकसान झाले आहे. घरे पडली आहेत, झाडे उन्मळून पडली आहेत. होत्याचं नव्हतं झालं आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी थळ येथे जाऊन नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. मंत्री आदित्य ठाकरे आणि अस्लम शेख हेदेखिल त्यांच्याबरोबर होते. पालकमंत्री आदिती तटकरे आणि जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी मुख्यमंत्र्यांना रायगडमध्ये वादळाने झालेल्या नुकसानीबाबत माहिती दिली. घरांची पडझड झाली आहे, त्यांना तातडीने मदत करणार असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले. मच्छिमारांचे देखिल या वादळामुळे मोठे नुकसान झाले आहे. त्यांनाही सरकार मदत करेल, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. चक्रीवादळामु
अतिरीक्त गोडाऊन घेऊन तुर खरेदीचा वेग वाढवा खासदार भावनाताई गवळी यांच्या प्रशासनाला सुचना गोडाऊन नसल्यामुळे तुर, चना खरेदीचा वेग अत्यंत कमी झाला आहे. या संदर्भात शेतक-यांच्या तक्रारी प्राप्त झाल्यामुळे दारव्हा येथे सर्व अधिका-यांची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत तातडीने गोडाऊन भाड्याने घेऊन तुर, चना खरेदीचा वेग वाढविण्याची सुचना खासदार भावनाताई गवळी यांनी अधिका-यांना दिली. दारव्हा परीसरातील 4 हजार 900 शेतक-यांनी तुर, चना विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे. नाफेड ने मात्र फक्त 715 शेतक-यांजवळील  माल खरेदी केला. उपस्थित अधिका-यांनी गोडाऊन नसल्यामुळे खरेदी मध्ये उशीर होत असल्याचे स्पष्टीकरण दिले. दरम्यान तातडीने गोडाऊन घेऊन शेतक-यांजवळील तुर, चना खरेदी करण्याच्या सुचना खासदार भावनाताई गवळी यांनी दिल्या. याशिवाय कापसाच्या खरेदी मध्ये सुध्दा सर्व शेतक-यांची नोंदणी तसेच कापसाची खरेदी करुन तातडीने चुकारे देण्याचे सांगण्यात आले. दारव्हा परीसरात जीन ची संख्या कमी असल्यामुळे तसेच नेर येथे एकही जीन नसल्याची माहिती देण्यात आली. या संदर्भात जीन वाढविण्याची तसेच शेतक-यांना सुविधा
वाडेगाव इंदिरा नगर येथे आढळला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण (प्रतिनिधी: सोहेल खान) बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील इंदिरा नगर मध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने परीसरात खळबळ उडाली आहे.  प्राप्त माहितीनुसार इंदिरा नगर येथील पंचेचाळीस वर्षीय नागरिकाला दोन जुन रोजी अकोला येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान गुरुवारी प्राप्त अहवालात सदर रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह निष्पन्न झाल्याची माहिती वाडेगाव व परीसरात धडकताच खळबळ उडाली आहे. तर तालुका प्रशासनाच्या वतीने योग्य ती खबरदारी घेण्यात येवून संबंधित रुग्ण निवासस्थान परीसरात भेट देऊन परीस्थितीचा आढावा घेतला तर इंदिरा नगर येथील भागात सर्वेक्षण करण्यास प्रारंभ केला तर सदर रुग्णाच्या संपर्कातील अठरा जणांना क्वारंटाईन करण्यात आले असल्याची माहिती आहे तर संबंधित रुग्णच्या निवासस्थान परीसर सील करण्यात आले त्यावेळी उपविभागीय अधिकारी रमेश पवार तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी नायब तहसीलदार योगेश कोटकर गटविकास अधिकारी समाधान वाघ मंडळ अधिकारी देशमुख पोलिस निरीक्षक शिंदे एपीआय महादेव पडघन ग्रामविकास अधिकारी डी. एस अंभोरे तालुका वैद्यकीय अधिकारी
मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे आज रायगड दौऱ्यावर ➡ रायगड : निसर्ग चक्रीवादळात रायगड जिल्‍हयाचे अतोनात नुकसान झालंय. या पार्श्‍वभूमीवर राज्‍याचे मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे आज रायगड जिल्‍ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. मुख्यमंत्री ठाकरे दुपारी अलिबाग तालुक्यातील थळ गावात चक्रीवादळाने केलेल्या नुकसानीची पहाणी करणार आहेत. त्यानंतर ते अलिबागमधील प्रसुद्ध चुंबकिय वेधशाळेची चक्रीवादळाने केलेल्या नुकसानी पाहाणी करणार आहेत. चक्रिवादळाने केलेल्या नुकसानीची पाहाणी झाल्यावर मुख्यमंत्री ठाकरे अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व प्रमुख अधिकाऱ्यांसोबत चक्रीवादळाने झालेल्या नुकसानी संदर्भात आढावा बैठक घेणार आहेत. यावेळी मुख्‍यमंत्री नुकसान भरपाईबाबत काय घोषणा करतात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
कोरोनाची लस विकसीत करण्यासाठी 30 माकडांवर प्रयोग   पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे होणार सुपूर्द यवतमाळ, दि. 02 :  कोरोना विषाणूमुळे (कोव्हीड - 19) होत असलेला प्रादुर्भाव टाळण्यासाठी  SARS COV- २ ही लस तात्काळ विकसीत करण्यासाठी संशोधन हाती घेण्यात आले आहे. या संशोधन प्रकल्पासाठी पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेला 30 माकडांची आवश्यकता आहे. ही 30 माकडे राज्याच्या हद्दितील देण्यात येणार असून कोरोना प्रतिबंधात्मक लसचा सर्वप्रथम प्रयोग या माकडांवर करण्यात येईल. सध्या राज्यात कोरोना विषाणुमुळे होत असलेला प्रादुर्भाव व परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता या प्रकल्पास तातडीने परवानगी देण्याबाबत राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी 30 मे 2020 रोजीच्या पत्रान्वये शासनास मान्यता देण्याची शिफारस केली आहे. त्यानुसार ही माकडे तात्काळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश वनमंत्री संजय राठोड यांनी दिले आहे. याप्रकरणी अनुभवी मनुष्यबळामार्फत या माकडांना पकडणे, त्यांना कुशलतेने हाताळणे, त्यांना सुरक्षितपणे बाळगणे, पकडलेल्या माकडांना तसेच परिसरातील इतर वन्यप्राण्यांना इजा तसेच त्या
लॉकडाऊनचा कालावधी 30 जूनपर्यंत प्रशासनाकडून मार्गदर्शक सुचना निर्गमित यवतमाळ, दि. 01 : यवतमाळ जिल्ह्यात दिनांक 30 जून 2020 च्या मध्यरात्रीपर्यंत टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाकडून पुढीलप्रमाणे सुधारित मार्गदर्शक सुचना निर्गमित करण्यात आल्या असून या सूचना 30 जूनच्या मध्यरात्रीपर्यंत अंमलात राहतील. संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात खालील बाबी या प्रतिबंधीत राहतील. सर्व शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक, प्रशिक्षण, संस्था व शिकवणी वर्ग, हॉटेल, रेस्टॉरेंट आणि इतर आदरतिथ्याची सेवा पूर्णपणे बंद राहतील. रेस्टॉरेंटला अन्नपदार्थ घरपोच देण्याची मुभा राहील. सर्व सलून, स्पा, ब्युटीपार्लर, सर्व आठवडी बाजार, सर्व ढाबे, तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची दुकाने, चहाकॉफी सेंटर, पानठेला व शितपेयाची दुकाने बंद राहतील. कपड्याच्या दुकानामधील ट्रायल रुम बंद तसेच विकलेले कपडे बदलवून देण्याचे धोरण अवलंबू नये. सर्व सार्वजनिक आणि कामाच्या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीने मास्क वापरणे बंधनकारक राहील. सार्वजनिक ठिकाणी नागरिकांनी एकमेकांमध्ये कमीत कमी 6 फुट अंतर ठेवणे आवश्यक आहे. (सामाजिक अंतर) दुकाना
यवतमाळ जिल्ह्यात आता संचारबंदीची वेळ रात्री 9 ते सकाळी 5 वाजेपर्यंत यवतमाळ, दि. 31 :  महाराष्ट्र राज्यात टाळेबंदीची मुदत 30 जून 2020 च्या मध्यरात्रीपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांनी यवतमाळ जिल्ह्याकरीता टाळेबंदीचा कालावधी 30 जूनच्या मध्यरात्रीपर्यंत वाढविण्याचे आदेश दिले आहे. तसेच 31 मे 2020 च्या मुख्य सचिवांच्या आदेशातील मार्गदर्शक सुचनेनुसार टाळेबंदीच्या अनुषंगाने यवतमाळ जिल्ह्यातील दुकाने व इतर बाबी सुरू ठेवण्याबाबत स्वतंत्र मार्गदर्शक सुचना निर्गमीत करण्यात येतील. तोपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या 20 मे 2020 च्या आदेशात नमुद केल्यानुसार दुकाने व इतर बाबी सुरू राहतील. यवतमाळ जिल्ह्यात आता रात्री 9 ते सकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात येत आहे. सदर कालावधीत कोणीही विनाकारण बाहेर फिरू नये. मात्र यामधून अत्यावश्यक सेवेकरीता नेमण्यात आलेले अधिकारी / कर्मचारी यांना व वैद्यकीय कारणास्तव रुग्ण व त्यांच्यासोबत असलेले नातेवाईक यांना मुभा राहील. सदर वेळेत विनाकारण फिरतांना आढळल्यास अशा व्यक्तिंच्या विरोधात कलम 144 अन्वये कारवाई करण्
महाराष्ट्र के जिला वर्धा में ट्रेन पटरी के नीचे उतर गई, कोई हताहत नही.
शैक्षणीक सल्लागार समितिची ऑनलाइन बैठक आज संपन्न 15 जून पासुन ऑनलाइन शाळा सुरु होण्याचे सन्केत दारव्हा-  राज्य स्तरावर गठीत केलेल्या शैक्षणीक सल्लागार समितिची आज ऑनलाइन बैठक मा मुख्यमंत्री आणि मा शालेय शिक्षण मंत्री राज्य शिक्षण मंत्री ,शिक्षण सचिव ,मुख्यमंत्र्यांचे सचिव प्राथमिक व माध्यमिक शिक्षण चे संचालक व शैक्षणीक सल्लागार समितीचे सदस्य यांचेमध्ये पार पडली या बैठकीत कोरोना प्रादुर्भाव परिस्थितीत उद्भवनारे प्रश्न व त्यावरिल उपाय यावर विचार मंथन झाले या बैठकीत 15 जून  पासुन ऑनलाइन शाळा सुरु कराव्या व पावसाळ्यानंतर कोरोना प्रादुर्भावाच्या परिस्थितीचा विचार करुन ऑफलाइन शाळा सुरु करता येईल असा सुर  निघाला या सोबतच वसंत घुइखेडकर  यानी विना अनुदानित शाळांना अनुदान द्यावे, विनाअनुदानीत शाळाना अनुदान द्यावे,शाळाना  वतनेत्तर अनुदान द्यावे, अनुकम्पावरील नियुक्त्यान्ना मान्यता द्यावी,संच मान्यते साठी अधारकार्डा ची सक्ती करु नये , deputation  वर शिक्षकांना पाठविण्याचे अधिकार शिक्षणाधिकारी यानाच द्यावे,ज्या शाळेत अर्ध्यापेक्षा जास्त पदे रिक्त आहेत ती भरती करावी, सेवकांची पदे भरावी, पदभर्
जस्टिस नरीमन पर क्रिमिनल केस करने वाले रशीद खान और अन्य के समर्थन में सुप्रिम कोर्ट के इतिहास में सबसे जादा वकीलों का वकालतनामा. रिटायर्ड जस्टिस रंजन गोगोई की अपराधिक साजिश उजागर सुप्रिम कोर्ट के जस्टिस रोहींटन नरीमन और विनीत सरण पर केस करने वाले रशीद खान पठाण, ऍड. निलेश ओझा और ऍड. विजय कुर्ले के समर्थन में सुप्रिम कोर्ट के हजारो वकीलो ने अपना समर्थन दिया है. ऑल इंडिया एस. सी., एस. टी एंड मायनॉरिटि लॉयर्स असोसिएशन, सुप्रिम कोर्ट एंड हाई कोर्टस लिटीगंटस असोसिएसन, इंडियन बार असोसिएशन, मानव अधिकार सुरक्षा परीषद ने लिखित रुपमे चीफ जस्टिस ऑफ़ इंडिया श्री. शरद बोबडे, राष्ट्रपती श्री. रामनाथ कोविद, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को पत्र लिखकर दोषी जजेस रोहिंटन नरीमन, विनीत सरण, अनिरुद्ध बोस, रिटायर्ड जस्टिस दीपक गुप्ता और वकील सिद्धार्थ लूथरा, मिलिंद साठे, कैवान कल्यानीवाला के खिलाफ एफ. आय. आर. (FIR) दर्ज करने, सीबीआय (CBI) को जाच आदेश देने तथा इन जजेस को जाच पूरी होने तक सुप्रीम कोर्ट की किसी भी कारवाई में भाग लेने की अनुमति नहीं देने की मांग की है. ज्ञात हो की इससे पहले भी 10 जनवरी 2020 क
बिबट्याच्या कातडेप्रकरणी संबंधितावर गुन्हा दाखल यवतमाळ, दि.4 : विदर्भ मुकाबला- उत्तरवाढोणा येथे वन्यप्राणी बिबट्याची शिकार करून कातडे घरात ठेवल्याप्रकरणी आरोपी गजानन वामनराव कुनकर याच्याविरुध्द वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुनकर याने बिबट्याचे कातडे घरात लपवून ठेवल्याच्या गुप्त माहितीच्या आधारावर यवतमाळचे उपवनसंरक्षक डॉ. भानुदास पिंगळे, श्री.अर्जुणा (भावसे), दारव्हाचे उपविभागीय वनअधिकारी मकरंद गुजर व इतर स्टाफच्या फिरते पथकाने गजानन वामनराव कुनगर याच्या घरात तपासणी केली. कुनकर याच्या घरामागील टिनाच्या वर एका पोत्यामध्ये वन्यप्राणी बिबट्याची कातडी मिळाली. तसेच घरामध्ये काळविटचे शिंग, वजनकाटा अशा वस्तू मिळाल्या. सदर वस्तू वनविभागाच्या पथकाने जप्त केल्या. तसेच आरोपी गजानन कुनकर याला चौकशीकरीता ताब्यात घेतले. त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 अंतर्गत असलेल्या कलमान्वये कारवाई करण्यात येत आहे. बिबट व काळविट हे शेड्यूल 1 अंतर्गत येणारे वन्यप्राणी आहे ज्यांना सर्वोच्च संरक्षण प्राप्त आहे. सदर प्रकरणाची
लॉकडाऊनच्या काळात काही बाबींना प्रतिबंध   17 मे पर्यंत वाढविला कालावधी यवतमाळ, दि.4 : विदर्भ मुकाबला- महाराष्ट्र राज्यात टाळेबंदीची मुदत दिनांक 17 मे 2020 पर्यंत वाढविलेली असून शासनाने मार्गदर्शक सुचना दिलेल्या आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांनी यवतमाळ जिल्ह्याकरीता 17 मे 2020 पर्यंत टाळेबंदीचा कालावधी वाढविण्याचे आदेश दिले आहे. जिल्ह्याकरीता प्रतिबंधीत क्षेत्रास खाली दिलेल्या मार्गदर्शक सुचना लागू असणार नाहीत. तसेच लॉकडाऊनच्या कालावधीत खालील सेवा प्रतिबंधीत राहतील. सुरक्षेच्या उद्देशाशिवाय रेल्वे मधून सर्व प्रवासी हालचाल बंद राहील. वैद्यकीय कारणाशिवाय किंवा या मार्गदर्शक तत्वानुसार परवानगी असलेल्या व्यक्ती वगळून व्यक्तींच्या आंतरजिल्हा व आंतर ज्य हालचालीकरीता बंदी राहील. सर्व शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक, प्रशिक्षण, संस्था व शिकवणी वर्ग बंद राहतील. तथापी ऑनलाईन, आंतर शिक्षण यास मुभा राहील. सर्व सिनेमा हॉल, शॉपींग मॉल, व्यायामशाळा व क्रीडा कॉम्प्लेक्स, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, थिएटर, बार आणि सभागृह, असेंब्ली हॉल व इतर तत्सम ठिकाणे बंद राहील. सर्व साम