मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जून, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
राज्यात मान्सून १० जूननंतर सक्रीय होईल : हवामान विभाग ➡ मुंबई : संपूर्ण राज्यात मान्सून १० जूननंतर सक्रीय होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, चक्रीवादळानंतर केरळमधील मान्सूनची देशातील इतर राज्यांकडील वाटचाल थांबली होती. ती आता पुन्हा सुरु झाली आहे. मान्सून हळूहळू पुढे सरकत आहे. मान्सून महाराष्ट्रात पोहोचण्यास थोडासा उशीर होईल, असे सध्याच्या वाटचालीवरुन दिसून येत आहे. आता केरळातील मान्सूनची प्रगती दिसून येत आहे. हा मान्सून पुढे सरकत आहे. पुढील तीन दिवसात मान्सून हा कर्नाटक, तामिळनाडू, पद्दुचेरी, बंगालच्या दिशेने वाटचाल करत आहे. आग्नेय तसेच मध्य-पश्चिम बंगालच्या खाडी किनाऱ्याचा भाग मान्सून व्यापून टाकेल, असा अंदाज आहे. त्यानंतर गोव्यातून मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
ईडीचे ५ अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह ➡ दिल्ली : जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. अनेक खेळाडू, अभिनेते, नेते या विषाणूच्या विळख्यात अडकले आहेत. आता ईडीच्या पाच अधिकाऱ्यांना करोना व्हायरसची लागण झाल्याचं समोर आलं आहे. दिल्लीच्या खान मार्केट परिसरात असलेल्या 'लोक नायक भवन' या ईडीच्या मुख्यालयातील पाच अधिकाऱ्यांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. काल (दि.५) ईडीच्या मुख्यालयातील पाच अधिकाऱ्यांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर मुख्यालय सील करण्यात आलं असून उद्यापर्यंत हे कार्यालय सील असणार आहे.
रायगडमधील चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांसाठी १०० कोटी रुपयांची मदत निसर्ग चक्रीवादळाने मोठं नुकसान झालेल्या रायगड जिल्ह्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीची मदत म्हणून १०० कोटी रुपये जाहीर केले आहेत. ही सुरुवात आहे. त्याला पॅकेज म्हणू नका, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांना सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी रायगड जिल्ह्यातील वादळग्रस्त भागाचा दौरा केला. निसर्ग वादळाने रायगड जिल्ह्यात मोठं नुकसान झाले आहे. घरे पडली आहेत, झाडे उन्मळून पडली आहेत. होत्याचं नव्हतं झालं आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी थळ येथे जाऊन नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. मंत्री आदित्य ठाकरे आणि अस्लम शेख हेदेखिल त्यांच्याबरोबर होते. पालकमंत्री आदिती तटकरे आणि जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी मुख्यमंत्र्यांना रायगडमध्ये वादळाने झालेल्या नुकसानीबाबत माहिती दिली. घरांची पडझड झाली आहे, त्यांना तातडीने मदत करणार असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले. मच्छिमारांचे देखिल या वादळामुळे मोठे नुकसान झाले आहे. त्यांनाही सरकार मदत करेल, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. चक्रीवादळामु
अतिरीक्त गोडाऊन घेऊन तुर खरेदीचा वेग वाढवा खासदार भावनाताई गवळी यांच्या प्रशासनाला सुचना गोडाऊन नसल्यामुळे तुर, चना खरेदीचा वेग अत्यंत कमी झाला आहे. या संदर्भात शेतक-यांच्या तक्रारी प्राप्त झाल्यामुळे दारव्हा येथे सर्व अधिका-यांची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत तातडीने गोडाऊन भाड्याने घेऊन तुर, चना खरेदीचा वेग वाढविण्याची सुचना खासदार भावनाताई गवळी यांनी अधिका-यांना दिली. दारव्हा परीसरातील 4 हजार 900 शेतक-यांनी तुर, चना विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे. नाफेड ने मात्र फक्त 715 शेतक-यांजवळील  माल खरेदी केला. उपस्थित अधिका-यांनी गोडाऊन नसल्यामुळे खरेदी मध्ये उशीर होत असल्याचे स्पष्टीकरण दिले. दरम्यान तातडीने गोडाऊन घेऊन शेतक-यांजवळील तुर, चना खरेदी करण्याच्या सुचना खासदार भावनाताई गवळी यांनी दिल्या. याशिवाय कापसाच्या खरेदी मध्ये सुध्दा सर्व शेतक-यांची नोंदणी तसेच कापसाची खरेदी करुन तातडीने चुकारे देण्याचे सांगण्यात आले. दारव्हा परीसरात जीन ची संख्या कमी असल्यामुळे तसेच नेर येथे एकही जीन नसल्याची माहिती देण्यात आली. या संदर्भात जीन वाढविण्याची तसेच शेतक-यांना सुविधा
वाडेगाव इंदिरा नगर येथे आढळला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण (प्रतिनिधी: सोहेल खान) बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील इंदिरा नगर मध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने परीसरात खळबळ उडाली आहे.  प्राप्त माहितीनुसार इंदिरा नगर येथील पंचेचाळीस वर्षीय नागरिकाला दोन जुन रोजी अकोला येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान गुरुवारी प्राप्त अहवालात सदर रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह निष्पन्न झाल्याची माहिती वाडेगाव व परीसरात धडकताच खळबळ उडाली आहे. तर तालुका प्रशासनाच्या वतीने योग्य ती खबरदारी घेण्यात येवून संबंधित रुग्ण निवासस्थान परीसरात भेट देऊन परीस्थितीचा आढावा घेतला तर इंदिरा नगर येथील भागात सर्वेक्षण करण्यास प्रारंभ केला तर सदर रुग्णाच्या संपर्कातील अठरा जणांना क्वारंटाईन करण्यात आले असल्याची माहिती आहे तर संबंधित रुग्णच्या निवासस्थान परीसर सील करण्यात आले त्यावेळी उपविभागीय अधिकारी रमेश पवार तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी नायब तहसीलदार योगेश कोटकर गटविकास अधिकारी समाधान वाघ मंडळ अधिकारी देशमुख पोलिस निरीक्षक शिंदे एपीआय महादेव पडघन ग्रामविकास अधिकारी डी. एस अंभोरे तालुका वैद्यकीय अधिकारी
मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे आज रायगड दौऱ्यावर ➡ रायगड : निसर्ग चक्रीवादळात रायगड जिल्‍हयाचे अतोनात नुकसान झालंय. या पार्श्‍वभूमीवर राज्‍याचे मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे आज रायगड जिल्‍ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. मुख्यमंत्री ठाकरे दुपारी अलिबाग तालुक्यातील थळ गावात चक्रीवादळाने केलेल्या नुकसानीची पहाणी करणार आहेत. त्यानंतर ते अलिबागमधील प्रसुद्ध चुंबकिय वेधशाळेची चक्रीवादळाने केलेल्या नुकसानी पाहाणी करणार आहेत. चक्रिवादळाने केलेल्या नुकसानीची पाहाणी झाल्यावर मुख्यमंत्री ठाकरे अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व प्रमुख अधिकाऱ्यांसोबत चक्रीवादळाने झालेल्या नुकसानी संदर्भात आढावा बैठक घेणार आहेत. यावेळी मुख्‍यमंत्री नुकसान भरपाईबाबत काय घोषणा करतात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
कोरोनाची लस विकसीत करण्यासाठी 30 माकडांवर प्रयोग   पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे होणार सुपूर्द यवतमाळ, दि. 02 :  कोरोना विषाणूमुळे (कोव्हीड - 19) होत असलेला प्रादुर्भाव टाळण्यासाठी  SARS COV- २ ही लस तात्काळ विकसीत करण्यासाठी संशोधन हाती घेण्यात आले आहे. या संशोधन प्रकल्पासाठी पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेला 30 माकडांची आवश्यकता आहे. ही 30 माकडे राज्याच्या हद्दितील देण्यात येणार असून कोरोना प्रतिबंधात्मक लसचा सर्वप्रथम प्रयोग या माकडांवर करण्यात येईल. सध्या राज्यात कोरोना विषाणुमुळे होत असलेला प्रादुर्भाव व परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता या प्रकल्पास तातडीने परवानगी देण्याबाबत राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी 30 मे 2020 रोजीच्या पत्रान्वये शासनास मान्यता देण्याची शिफारस केली आहे. त्यानुसार ही माकडे तात्काळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश वनमंत्री संजय राठोड यांनी दिले आहे. याप्रकरणी अनुभवी मनुष्यबळामार्फत या माकडांना पकडणे, त्यांना कुशलतेने हाताळणे, त्यांना सुरक्षितपणे बाळगणे, पकडलेल्या माकडांना तसेच परिसरातील इतर वन्यप्राण्यांना इजा तसेच त्या
लॉकडाऊनचा कालावधी 30 जूनपर्यंत प्रशासनाकडून मार्गदर्शक सुचना निर्गमित यवतमाळ, दि. 01 : यवतमाळ जिल्ह्यात दिनांक 30 जून 2020 च्या मध्यरात्रीपर्यंत टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाकडून पुढीलप्रमाणे सुधारित मार्गदर्शक सुचना निर्गमित करण्यात आल्या असून या सूचना 30 जूनच्या मध्यरात्रीपर्यंत अंमलात राहतील. संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात खालील बाबी या प्रतिबंधीत राहतील. सर्व शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक, प्रशिक्षण, संस्था व शिकवणी वर्ग, हॉटेल, रेस्टॉरेंट आणि इतर आदरतिथ्याची सेवा पूर्णपणे बंद राहतील. रेस्टॉरेंटला अन्नपदार्थ घरपोच देण्याची मुभा राहील. सर्व सलून, स्पा, ब्युटीपार्लर, सर्व आठवडी बाजार, सर्व ढाबे, तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची दुकाने, चहाकॉफी सेंटर, पानठेला व शितपेयाची दुकाने बंद राहतील. कपड्याच्या दुकानामधील ट्रायल रुम बंद तसेच विकलेले कपडे बदलवून देण्याचे धोरण अवलंबू नये. सर्व सार्वजनिक आणि कामाच्या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीने मास्क वापरणे बंधनकारक राहील. सार्वजनिक ठिकाणी नागरिकांनी एकमेकांमध्ये कमीत कमी 6 फुट अंतर ठेवणे आवश्यक आहे. (सामाजिक अंतर) दुकाना