मुख्य सामग्रीवर वगळा

शिवशक्ती महाविद्यालय बाभुळगाव वतीने आयोजित "तीस दिवसीय राज्यस्तरीय व्यक्तिमत्व विकास प्रमाणपत्र कोर्स" संपन्न


 शिवशक्ती महाविद्यालय बाभुळगाव वतीने आयोजित "तीस दिवसीय राज्यस्तरीय व्यक्तिमत्व विकास प्रमाणपत्र कोर्स" संपन्न




यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव येथील शिवशक्ती कला व वाणिज्य महाविद्यालय येथे अर्थशास्त्र विभाग आणि ग्रंथालय व ज्ञान संसाधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने तीस दिवसीय राज्यस्तरीय व्यक्तिमत्व विकास प्रमाणपत्र कोर्सचे आयोजन दि. 15 एप्रिल ते 15 मे 2021 दरम्यान आभासी पद्धतीने करण्यात आले होते. या कोर्सचा समारोपीय कार्यक्रम दि. 16 मे 2021 रोजी संपन्न झाला. या सोहळ्याचे अध्यक्ष सन्माननीय प्रा. बाळासाहेब धांदे व्यवस्थापक, शिवशक्ती शिक्षण संस्था, कोठा हे होते तर विशेष अतिथी म्हणून डॉ. मोहन खेरडे, संचालक, ज्ञान संसाधन केंद्र, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती हे होते. तर प्रमुख उपस्थिती म्हणून प्रा. डॉ. कविता तातेड अणे महिला महाविद्यालय यवतमाळ, डॉ. शशिकांत वानखेडे ग्रंथपाल, भारती महाविद्यालय आर्णी आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दीपक कोदूरवार हे होते. याप्रसंगी मान्यवरांनी व्यक्तिमत्व विकास प्रमाणपत्र कोर्स कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीत विद्यार्थ्यांना नवचेतना, नवउमेद, नवसंकल्पना, नवविचार देऊन त्यांच्यामध्ये परिस्थितीशी सामना करण्याचे सामर्थ्य निश्चितच निर्माण करेल आणि परिपूर्ण व्यक्तिमत्त्व बनविण्याच्या दृष्टीने हा कोर्स अतिशय महत्त्वाची भूमिका बजावेल असे मत व्यक्त केले. याप्रसंगी कु. प्रांजली गावंडे, कु. अनुश्री गोडे व आशिष साबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कोर्समध्ये एकूण 430 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. त्यात यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा, नागपूर, रामटेक व इतरही जिल्ह्यातील विविध महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.

या कोर्समध्ये व्यक्तिमत्व विकास अर्थ व गुणवैशिष्ट्ये, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासात महाविद्यालयाची भूमिका, प्रभावी देहबोली, व्यक्तिमत्व विकासात खेळ व आध्यात्मिक मूल्यांचे योगदान, श्रवण कौशल्य, व्यक्तिमत्व विकासात माहिती व तंत्रज्ञानाची भूमिका, ताण तणाव व्यवस्थापन, व्यक्तिमत्व विकासात आध्यात्मिक व नैतिक मूल्यांचे महत्व, ध्येयनिश्चिती, संवाद कौशल्य, वेळेचे व्यवस्थापन, विविध जीवन कौशल्यांचा परिचय, वाचन संस्कार, SWOT ANALYSIS, मुलाखत तंत्र व मंत्र, स्वतःला ओळखा, नेतृत्वगुण इ. विषयावर प्रा. डॉ. कविता तातेड, प्रा. डॉ. स्वाती दामोदरे, प्रा. डॉ. ममता दयणे, डॉ. विकास टोणे,संचालक शारीरिक शिक्षण, प्रा. डॉ. संजय राचलवार, प्रा. डॉ. माणिक ठिकरे,

ग्रंथपाल डॉ. शशिकांत वानखेडे, प्रा. डॉ. दिलीप खूपसे, प्रा. शितल राऊत संचालक शारीरिक शिक्षण, प्रा. डॉ. नरेश महाजन, प्रा. डॉ. रंजना जीवने, प्रा. डॉ. आशा धारस्कर, प्रा. डॉ. निलेश सुलभेवार, प्रा. डॉ. चंद्रकांत सरदार, ग्रंथपाल डॉ. संजय शेणमारे, प्रा. अभिषेक  काळमेघ, प्रा. डॉ. प्रतिभा काळमेघ, श्री. कैवल्य पाटील इ. तज्ञ मार्गदर्शकांनी वरील सर्व विषयांवर अभ्यासपूर्ण सादरीकरण व्हिडिओ द्वारे केले. याशिवाय शिवशक्ती महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी जे स्पर्धा परीक्षेद्वारे उच्च पदावर कार्यरत आहे व ज्यांनी एमपीएससीच्या विविध परीक्षा उत्तीर्ण केलेल्या आहे त्यात श्री. निखिल वाघ, श्री. मनोज बारसे या विद्यार्थ्यांचे 'स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन' या विषयावर लाईव्ह लेक्चर देण्यात आले व त्यात विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरे व शंका समाधान त्यांनी केले.

सोबतच विद्यार्थ्यांना बोलते करण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांसाठी विविध विषयावर गटचर्चा- प्रश्नमंजुषा अशा कार्यक्रमांचे आयोजन या कोर्स दरम्यान करण्यात आले. कोर्सच्या यशस्वीतेसाठी

या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा. डॉ. प्रतिभा काळमेघ व ग्रंथपाल डॉ. संजय शेणमारे यांनी अथक परिश्रम केले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामुळे  शिवशक्ती शिक्षण संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी, प्राचार्यांनी समाधान व्यक्त केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दाते महीला बँक वाचवण्यासाठी महिला सहकारी बँक कृती समिती यवतमाळ ची संघर्ष परिषद

दाते महीला बँक वाचवण्यासाठी महिला सहकारी बँक कृती समिती यवतमाळ ची संघर्ष परिषद यवतमाळ येथील बाबाजी दाते महीला बँक मध्ये अनेक खातेदार, ठेवीदार यांचे पैसे आहेत अनेकांच्या खूप समस्या आहेत. पण कायद्याने आपण आपले पैसे कसे काढू शकतो यासाठी आज संघर्ष परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी मुंबई येथून विश्वास उटगी यांना आमंत्रित करण्यात आले होते. विश्वास उटगी हे माजी सचिव ऑल इंडिया बँक फेडरेशन आहेत. ज्या बँका डुबले आहेत त्या बँकांमधील खातेदारांना आपले पैसे काढण्यासाठी मार्गदर्शन करतात. कायद्याने सल्ला देतात. यासाठी ते मार्गदर्शन करतात. यासाठी आज संघर्ष परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या संघर्ष परिषदेमध्ये हजाराच्या वर पीडित खातेदार, ठेवीदार सहभागी झाले होते .या संघर्ष परिषदेमध्ये येणाऱ्या समोरच्या काळात लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, कर्जदार ,संचालक यांच्या घरासमोर डफडे वाजवा आंदोलन ,रिझर्व्ह बँकेसमोर धरणे, कायदेशीर मार्गासाठी उच्च न्यायालयात धाव ,अशा अनेक आंदोलनात्मक विषय घेऊन विविध समित्यांचे गठन करण्यात आले. यावेळी नितीन बोदे, राजू पडगिलवार, सुनील पुनवटकर, शैलेश काळबांडे, पिसाळकर ...

जिल्ह्यात सर्व व्यवहार नियमितपणे सुरू करण्यास दिली जिल्हाधिकारी यांनी परवानगी; जिल्हयाचा समावेश श्रेणी एकमध्ये

 *जिल्ह्यात सर्व व्यवहार नियमितपणे  सुरू करण्यास दिली जिल्हाधिकारी यांनी परवानगी*  *जिल्हयाचा समावेश श्रेणी एकमध्ये* *लग्न व अंथविधीसाठी 50  लोकांच्या उपस्थितीस परवानगी* *शासकीय कार्यलये 100 टक्के क्षमतेने सुरू* *कोविड नियमांचे पालन तसेच दुकाने व आस्थापना चालकास व कर्मचाऱ्यांना कोविड चाचणी बंधनकारक* यवतमाळ, दि. 6 जून :    शासनाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे यवतमाळ जिल्ह्याचा समावेश श्रेणी -1 मध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी  यवतमाळ जिल्ह्याकरीता 7 जून 2021 पासून ब्रेक दि चेन अंतर्गत घालून देण्यात आलेले निर्बंध शिथिल केले असून सर्वच बाबी नियमितपणे सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे.  अत्यावश्यक सेवेंची दुकाने व अत्यावश्यक सेवा तसेच इतर दुकाने व सेवा  नियमितपणे सुरु राहतील. तथापि अत्यावश्यक सेवेंच्या व इतर आस्थापना धारकांनी दुकानात नागरिकांची होणारी गर्दी कमी करण्याच्या दृष्टीने जास्तीत जास्त होम डिलेव्हरीद्वारे वस्तूंचा पुरवठा करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. त्यादृष्टीने आस्थापना धारकांनी स्वत:चे व्हॉटसॲप नंबर दुकाना...