मुख्य सामग्रीवर वगळा
कोरोना संसर्गा मध्ये प्रतिसाद फाऊंडेशनचे सेवा कार्य अविरतपणे सुरुच.


यवतमाळ -
शहरामध्ये सामाजिक व सेवा कार्यात अग्रेसर असलेल्या प्रतिसाद फाऊंडेशनच्या शेकडो सदस्यांनी कोरोना संसर्गा दरम्यान अविरतपणे आपले सेवा कार्य जोमाने सुरु ठेवले असून प्रतिसाद फाऊंडेशनच्या कार्याची जिल्हा प्रशासनाने दखल घेतली आहे. 22 मार्च पासून लागू झालेल्या लॉकडाऊन दरम्यान अविरतपणे गरजू गरीब लोकांना जेवणाचे टिफीन पोहोचविण्याचे कार्य प्रतिसाद फाऊंडेशनने अविरतपणे सुरु असून त्यांच्या या कार्याला अनेक दान दात्यांनी सहकार्य केले आहे. जवळपास 1200 पेक्षा जास्त जेवणाचे डब्बे गरजू व्यक्तींना पोहोचविण्यात येत असून जवळपास अनेक नागरिकांनी आपल्या घरातून टिफिन बनवून प्रतिसाद फाउंडेशनच्या कार्यालयात आणून देत आहे. पर राज्यातून रात्री बेरात्री पायी येणार्‍या कामगारांना सुद्धा प्रतिसाद फाउंडेशन तर्फेभोजनदान देण्यात येत आहे तसेच अतिशय गरजू गरीब व्यक्तींना प्रतिसाद फाउंडेशनच्या वतीने तांदूळ, आटा, तेल, दाळ, मिट पूडा, मिर्च पूड्याचे किट बनवून जवळपास दोन हजार लोकांना अन्न धान्याची किट पोहोचविण्याचे कार्य केले आहे. तसेच यवतमाळ शहरामधील जवळपास 60 मनोरुग्णांना तसेच रस्त्यावर फीरणार्‍या व भिक मांगुन जिवन जगणार्‍या लोकांना जेवणाचे डब्बे नियमितपणे वितरण करणे सुरु आहे. प्रतिसाद फाऊंंडेशनच्या मानव सेवेच्या या उपक्रमाला बघून यवतमाळ येथील सुप्रसिद्ध समाज सेवक अजय बोरले यांनी रुग्ण सेवेकरिता प्रतिसाद फऊंडेशनच्या टिम ला या कोरोना संसर्गा दरम्यान रुग्ण सेवेसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करुन दिली आहे
तर जिल्हा प्रशासनाच्या विनंती वरुन यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात प्रतिसाद फाऊंंडेशनचे 20 पेक्षा जास्त सदस्य हे रुग्णांना जेवण व शासकीय कामात मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या कामाकरिता प्रतिसाद फाऊंंडेशनचे अध्यक्ष मनोज गुल्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिसाद फाऊंडेशनचे सदस्य प्रयत्नशिल आहे. मानव सेवेच्या या उपक्रमाकरिता अन्नदान तसेच आर्थिक स्वरुपात दान करु इच्छिणार्‍या दानदात्यांनी प्रतिसाद फाऊंंडेशनचे कार्यालय पुष्पकुंज सोसायटी यवतमाळ येथे संपर्क साधावा तसेच गरजू बांधवांनी प्रतिसाद फाऊंंडेशनचे अध्यक्ष मनोज गुल्हाणे मो. 9423485155  या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन संस्थेचे प्रसिद्धी प्रमुख सागर बोंडे यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दाते महीला बँक वाचवण्यासाठी महिला सहकारी बँक कृती समिती यवतमाळ ची संघर्ष परिषद

दाते महीला बँक वाचवण्यासाठी महिला सहकारी बँक कृती समिती यवतमाळ ची संघर्ष परिषद यवतमाळ येथील बाबाजी दाते महीला बँक मध्ये अनेक खातेदार, ठेवीदार यांचे पैसे आहेत अनेकांच्या खूप समस्या आहेत. पण कायद्याने आपण आपले पैसे कसे काढू शकतो यासाठी आज संघर्ष परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी मुंबई येथून विश्वास उटगी यांना आमंत्रित करण्यात आले होते. विश्वास उटगी हे माजी सचिव ऑल इंडिया बँक फेडरेशन आहेत. ज्या बँका डुबले आहेत त्या बँकांमधील खातेदारांना आपले पैसे काढण्यासाठी मार्गदर्शन करतात. कायद्याने सल्ला देतात. यासाठी ते मार्गदर्शन करतात. यासाठी आज संघर्ष परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या संघर्ष परिषदेमध्ये हजाराच्या वर पीडित खातेदार, ठेवीदार सहभागी झाले होते .या संघर्ष परिषदेमध्ये येणाऱ्या समोरच्या काळात लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, कर्जदार ,संचालक यांच्या घरासमोर डफडे वाजवा आंदोलन ,रिझर्व्ह बँकेसमोर धरणे, कायदेशीर मार्गासाठी उच्च न्यायालयात धाव ,अशा अनेक आंदोलनात्मक विषय घेऊन विविध समित्यांचे गठन करण्यात आले. यावेळी नितीन बोदे, राजू पडगिलवार, सुनील पुनवटकर, शैलेश काळबांडे, पिसाळकर ...

जिल्ह्यात सर्व व्यवहार नियमितपणे सुरू करण्यास दिली जिल्हाधिकारी यांनी परवानगी; जिल्हयाचा समावेश श्रेणी एकमध्ये

 *जिल्ह्यात सर्व व्यवहार नियमितपणे  सुरू करण्यास दिली जिल्हाधिकारी यांनी परवानगी*  *जिल्हयाचा समावेश श्रेणी एकमध्ये* *लग्न व अंथविधीसाठी 50  लोकांच्या उपस्थितीस परवानगी* *शासकीय कार्यलये 100 टक्के क्षमतेने सुरू* *कोविड नियमांचे पालन तसेच दुकाने व आस्थापना चालकास व कर्मचाऱ्यांना कोविड चाचणी बंधनकारक* यवतमाळ, दि. 6 जून :    शासनाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे यवतमाळ जिल्ह्याचा समावेश श्रेणी -1 मध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी  यवतमाळ जिल्ह्याकरीता 7 जून 2021 पासून ब्रेक दि चेन अंतर्गत घालून देण्यात आलेले निर्बंध शिथिल केले असून सर्वच बाबी नियमितपणे सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे.  अत्यावश्यक सेवेंची दुकाने व अत्यावश्यक सेवा तसेच इतर दुकाने व सेवा  नियमितपणे सुरु राहतील. तथापि अत्यावश्यक सेवेंच्या व इतर आस्थापना धारकांनी दुकानात नागरिकांची होणारी गर्दी कमी करण्याच्या दृष्टीने जास्तीत जास्त होम डिलेव्हरीद्वारे वस्तूंचा पुरवठा करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. त्यादृष्टीने आस्थापना धारकांनी स्वत:चे व्हॉटसॲप नंबर दुकाना...

शिवशक्ती महाविद्यालय बाभुळगाव वतीने आयोजित "तीस दिवसीय राज्यस्तरीय व्यक्तिमत्व विकास प्रमाणपत्र कोर्स" संपन्न

 शिवशक्ती महाविद्यालय बाभुळगाव वतीने आयोजित "तीस दिवसीय राज्यस्तरीय व्यक्तिमत्व विकास प्रमाणपत्र कोर्स" संपन्न यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव येथील शिवशक्ती कला व वाणिज्य महाविद्यालय येथे अर्थशास्त्र विभाग आणि ग्रंथालय व ज्ञान संसाधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने तीस दिवसीय राज्यस्तरीय व्यक्तिमत्व विकास प्रमाणपत्र कोर्सचे आयोजन दि. 15 एप्रिल ते 15 मे 2021 दरम्यान आभासी पद्धतीने करण्यात आले होते. या कोर्सचा समारोपीय कार्यक्रम दि. 16 मे 2021 रोजी संपन्न झाला. या सोहळ्याचे अध्यक्ष सन्माननीय प्रा. बाळासाहेब धांदे व्यवस्थापक, शिवशक्ती शिक्षण संस्था, कोठा हे होते तर विशेष अतिथी म्हणून डॉ. मोहन खेरडे, संचालक, ज्ञान संसाधन केंद्र, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती हे होते. तर प्रमुख उपस्थिती म्हणून प्रा. डॉ. कविता तातेड अणे महिला महाविद्यालय यवतमाळ, डॉ. शशिकांत वानखेडे ग्रंथपाल, भारती महाविद्यालय आर्णी आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दीपक कोदूरवार हे होते. याप्रसंगी मान्यवरांनी व्यक्तिमत्व विकास प्रमाणपत्र कोर्स कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीत विद्यार्थ्यांना नवचेतना, नवउमेद...