मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑगस्ट, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ह.उमर फारूक (र.अ) उर्दू हायस्कुल ची यंदा सुद्धा उत्तुंग भरारी

ह.उमर फारूक (र.अ) उर्दू हायस्कुल ची यंदा सुद्धा उत्तुंग भरारी पुसद शहरातील उर्दू माध्यमातील सुप्रसिद्ध शाळा हजरत उमर फारूक (र.अ) उर्दू हायस्कूल ने यशाची परंपरा कायम ठेवून या वर्षी सुद्धा उत्कृष्ठ 99 टक्के निकाल दिला आहे. या मध्ये कु.तजीन फिदोस समीर खान या गुणवंत विद्यार्थीनी ने 95 टक्के घेतले तर मो.फुर्कान मो.इर्फान देशमुख याने 91% घेऊन यशाची भरारी घेतली आहे. सोबतच एकूण निकाला मध्ये उच्च श्रेणीत 46 विद्यार्थी आले असून एकूण विद्यार्थ्यां मध्ये 66 विद्यार्थी हे प्रथम श्रेणीत आले आहे. व द्वितीय श्रेणीत 50 विद्यार्थी आले आहे. शाळेतील एकूण 168 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून. एकूणच निकाल 99 टक्के लागला आहे. या यशाचे श्रेय शाळेचे मुख्याध्यापक मो. वकील सर,व एजाजोद्दीन खतीब सर आणि वर्ग शिक्षक अब्दुल करीम सर,फहिमोद्दीन मलनस सर,निसार अहेमद सर तसेच सहाय्यक शिक्षक नवेद अहेमद सर,इर्फान अहेमद खान सर, नौशाद हुसैन सर, नदीम खान सर,सिमान मुद्दसिर सर, शेख इर्फान सर,अनस सर,सय्यद सलमान सर उमेर मिर्झा, मो.जुनेद सर या सर्व शिक्षकांना श्रेय जाते. तसेच शाळेतील शिक्षेत्तर कर्मचारी यांनी सुद्धा मोलाचे सहकार्य केले

पद्मभूषण डॉ विजय भटकर यांचे मार्गदर्शन नविन शैक्षणिक धोरण,कोविड १९ मुळे पालक आणि विद्यार्थ्यांची द्विधा मनस्थिती

पद्मभूषण डॉ विजय भटकर यांचे मार्गदर्शन नविन शैक्षणिक धोरण,कोविड १९ मुळे पालक आणि विद्यार्थ्यांची द्विधा मनस्थिती पुसद अर्बन बँकेचा उपक्रम नुकतेच केंद्रशासनाने नवे शैक्षणिक धोरण जाहीर केले आहे.तर दुसरीकडे कोरोनामुळे  अद्याप शाळा सुरू न झाल्याने पालक व विद्यार्थी द्विधा मनस्थितीत आहे. गावपातळीपासून ते महानगरांमध्ये सारखीच परिस्थिती असल्याचे लक्षात आल्यानंतर अत्यंत महत्वाच्या या विषयावर सर्वांना योग्य मार्गदर्शन मिळावे या हेतूने पुसद अर्बन कॉ ऑप बँकेचे अध्यक्ष शरद मैंद यांच्या संकल्पनेतुन व बँकेच्या सामाजिक उपक्रमातुन सुपर कॉम्प्युटर चे जनक , पदमभूषण ,नालंदा विश्वविद्यापीठाचे कुलपती व पंतप्रधानांच्या सायंटिफिक ऍडव्हायजरी कमेटीचे सदस्य डॉ विजय भटकर यांचे नविन शैक्षणिक धोरण, कोविड १९ मुळे पालक आणि विद्यार्थ्यांची द्विधा मनस्थिती या विषयावर रविवार ९ ऑगस्ट २०२० रोजी दुपारी ४.३० वाजता भव्य वेबिनार चे आयोजन केले आहे. तसेच अमरावती तथा नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मुरलीधर चांदेकर, डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला चे कुलगुरु डॉ विलास भाले, डायलॉग इंडिया न्युज पेपर दिल्ली चे संपादक अनुज अग

सेतू सुविधा केंद्र बंद असल्याने शेतकरी, विद्यार्थ्यांचे हाल; गुरुदेव युवा संघाचा आंदोलनांचा इशारा

सेतू सुविधा केंद्र बंद असल्याने शेतकरी, विद्यार्थ्यांचे हाल;  गुरुदेव युवा संघाचा आंदोलनांचा इशारा  यवतमाळ :- कोरोना प्रादुर्भावाची नावावर सेतू सुविधा केंद्र बंद केल्याने नुकताच निकाल लागलेल्या १० वि १२ वि चे विध्यार्थी व शेतकरी याना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून खासगी सेतू केंद्राकडून नागरिकांची आर्थिक लूट केल्या जात आहे. तहसील कार्यालयातील सेतू सुविधा केंद्र तातडीने सुरु करावे अशी मागणी गुरुदेव युवा संघाच्या वतीने करण्यात आली आहे.  12 वी आणि 10 वी चा निकाल लागला असल्याने विद्यार्थ्याना प्रवेश घेण्यासाठी लागणारे कागदपत्र तहसिल कार्यालय यवतमाळ  येथील आपले सरकार सेतु सुविधा केंद्र सरकारने तथा कोरोना विषाणू च्या प्रादुर्भावाने मार्च ते आजरोजी पर्यंत कोणत्याही प्रकारचे कागदपत्रे काढण्यासाठी पूर्ण पणे सेतु केंद्र बंद ठेवले असुन सरकारी सेतु सुविधा केंद्रात अल्प दरात कामे होतात आणि हेच कागदपत्र काढण्यासाठी खाजगी सेतु सुविधा केंद्रात सर्व सामाण्यांची लुट होत असून या गंभीर बाबींन विषयी शासन वा प्रशासन दुर्लक्ष करून खाजगी सेतु सुविधा केंद्र सुरू ठेवुन सरकारी सेतु सुविधा केंद्र बंद करून सामाण

शेतकऱ्यांसारखी सकारात्मकता कोरोनाच्या भयावर प्रभावी उपाय- डॉ मिलिंद आपटे

शेतकऱ्यांसारखी सकारात्मकता कोरोनाच्या भयावर प्रभावी उपाय- डॉ मिलिंद आपटे  पुसद- आज कोरोना मुळे प्रत्येक क्षेत्रात अनिश्चितता निर्माण होऊन समाजाचा प्रत्येक घटक भयग्रस्त झाला आहे.मात्र ज्याप्रमाणे दरवर्षी  शेतीत नुकसान होत असले तरी पुढच्या वर्षी पुन्हा शेतीची मशागत करून पावसाची वाट पाहणाऱ्या  शेतकऱ्यासारखी सकारात्मकता बालगल्यास  कोरोनाच्या भयावर सहज मात करता येईल असे मौलिक विचार नागपूर येथील प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ मिलिंद आपटे यांनी व्यक्त केले.  पुसद अर्बन बॅंकेचे अध्यक्ष शरद मैंद यांच्या संकल्पनेतून व बँकेच्या सामाजिक उपक्रमातुन काल   कोरोनाचा  व्यापारी ,कर्मचारी ,शेतकरी व सामान्य जनतेच्या मानसिकतेवर झालेला परिणाम व उपाय या विषयावर आयोजित  वेबिनार मध्ये मार्गदर्शन करताना ते पुढे म्हणाले की आपली सुदृढ शरीर व  प्रतिकार शक्ती टिकवुन ठेवा, शारीरिक व मानसिक धैर्य ठेवा ,नकारात्मक विचाराला टाळा, पायी जास्त चाला ,घटनेनंतर नकारात्मक चर्चा  टाळून उपायावर बोला. कोरोनाला जीवनातील विराम समजा पुढील वर्षी सर्व व्यवसाय पुन्हा एकदा भरारी घेवुन देशाची अर्थव्यवस्था कात टाकेल असा आत्मविश्वास त्यांनी व्

त्याग आणि बलिदानाचा सण: ईद_उल_अजहा._

_*त्याग आणि बलिदानाचा  सण:*_            _*ईद_उल_अजहा.*_  *प्रिय भारतीय बंधु आणि भगिनींनो,* *आपला भारत देश हा विविधतेने नटला आहे.इथे वेगवेगळ्या धर्माचे, पंथाचे लोक  गुण्यागोविंदाने एकत्र रहातात आणि आपले सण उत्सव आप आपल्या परीने साजरे करतात परंतु आज सुद्धा आपल्या समाजा मध्ये एकमेकांच्या सणा बद्दल गैर समज /समजुती आहे.* *याच सर्वांत जिंवत उदाहरण म्हणजे    ईद_उल_अजहा (बकरी ईद )नेमकी काय असते..? का साजरी केली जाते..? या बद्दल खूप भ्रामक संकल्पना आहे त्या दूर करून वास्तविक  ईद_उल_अजहा समजुन घेऊ या.* *मित्रांनो इस्लाम धर्मात फक्त दोनच धार्मिक सण आहे. जे पूर्ण विश्वात एकाच वेळी साजरे केले जातात एक म्हणजे ईद_उल_फित्र ( रमजान ईद)* आणि दुसरी म्हणजे *ईद_उल_अजहा ( बकरीद)आता आपल्या कडे जे बकरी ईद  म्हणतात तो वास्तविक  चुकीचा प्रकार आहे या सणाचे खरे नांव  ईद-उल -अजहा आहे .* *▪️प्रेषित इब्राहिम यांचा परिचय..?* *ऐतिहासिक तथ्यांच्या आधारे कुर्बानी परंपरेचा इतिहास 4000  वर्षां पूर्वीचा  आहे. अब्राहम नावाच्या प्रेषितांनी बुद्धपूर्व 1500 वर्षा पूर्वी ही कुर्बानी सुरु केली.* *इस्लाम मध्यें यांचा गौरव "र

कोरोनाचा विविध वर्गाच्या मानसिकतेवर परिणाम व उपाय; मानसोपचार तज्ञ मिलिंद आपटे यांचे २ ऑगस्ट रोजी मार्गदर्शन- पुसद अर्बन बँकेचा उपक्रम

कोरोनाचा विविध वर्गाच्या मानसिकतेवर परिणाम व उपाय; मानसोपचार तज्ञ मिलिंद आपटे यांचे आज मार्गदर्शन- पुसद अर्बन बँकेचा उपक्रम     पुसद- कोरोना  संकटाचा  समाजातील विविध  वर्गाच्या मानसिकतेवर  परिणाम होत आहे.त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे या हेतूने पुसद अर्बन कॉ ऑप बँकेचे अध्यक्ष शरद मैंद यांच्या संकल्पनेतुन व बँकेच्या सामाजिक उपक्रमातुन  प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ तथा मार्गदर्शक मिलिंद आपटे यांचे उद्या रविवार २ऑगस्ट २०२० रोजी दुपारी ३ वाजता  कोरोनाचा व्यापारी, कर्मचारी,शेतकरी व सामान्य नागरिकांच्या मानसिकतेवर झालेला परिणाम व उपाय या विषयावर व्हेबिनारचे आयोजन केले आहे. या व्हेबिनार ला राष्ट्रवादी काँग्रेस लिगल सेल अध्यक्ष तथा म.गो.बार कौन्सिल चे सदस्य एड आशिष देशमुख, अ.भा. काँ.कमिटी चे सचिव एड.सचिन नाईक,यवतमाळ जिप च्या माजी अध्यक्ष डॉ आरती फुफाटे, विश्वनाथसिंह बयास पतसंस्थेचे अध्यक्ष निशांत बयास, चेम्बर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष सुरज डुब्बेवार, उपाध्यक्ष संतोष अग्रवाल,माजी अध्यक्ष बिपीन चिद्धरवार, प्रगतशील कास्तकार अभय गडम ,नारायण क्षीरसागर,  साप्ताहिक पोलिटिक्स स्पेशल चे संपादक रितेश पुरोहित तसे