यवतमाळ शहरातील भाजी मंडी पुर्ववत सुरु पासधारक व आधारकार्ड धारकांनाच मिळणार प्रवेश यवतमाळ, दि. 30 : विदर्भ मुकाबला- यवतमाळ शहरातील स्थानिक विठ्ठलवाडी येथील भाजी मंडीमध्ये ठोक भाजीपाला खरेदी 1 मे 2020 पासून सुरुवात करण्यात येत आहे. पालकमंत्री संजय राठोड व जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी कोव्हिड –19 च्या प्रादुर्भावात सर्व नियमांचे पालन करण्याच्या अटीवर भाजी मंडी सुरु करण्याचे निर्देश दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत याअनुषंगाने यवतमाळ शहरामध्ये एकूण 24 ग्रीन झोन विभागातील मैदान व जागेत दररोज सकाळी 8 ते 12 या कालावधीत भाजीपाला विक्री केंद्र सुरु करण्यात येणार आहे. ठोक भाजीपाला विक्रेते व ठोक खरेदीदार, हातगाडीधारक हे भाजीपाल्याचा व्यवहार दररोज सकाळी 3 ते 6 वाजता दरम्यान विठ्ठलवाडी मार्केट मंडीमध्ये करतील. फक्त पासधारक व आधारकार्ड धारकांनाच प्रवेश मंडीत मिळेल. शहरातील प्रतिबंधित क्षेत्रातील व्यापारी व खरेदीदार यांना प्रवेश मिळणार नाही. तसेच कोणत्याही चिल्लर व वैयक्तिक ग्राहकांना प्रवेश नाही. सकाळी 6 वाजता सदर भाजी मंडी बंद करण्यात येईल. कोणत्याही संशयीत व्यक्तीने ...