मुख्य सामग्रीवर वगळा

पुसद व दिग्रस शहरात 31 जुलैपर्यंत संचारबंदी



यवतमाळ दि.28 : कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने खबरदारीचा उपाय म्हणून उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या प्रस्तावानुसार जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी पुसद व दिग्रस शहरात व या शहरालगतच्या भागात 31 जुलै 2020 च्या मध्यरात्रीपर्यंत  संचारबंदी लागू केली आहे.
संचारबंदीच्या कालावधीत पुढील बाबी, आस्थापना, व्यक्ती व समूहाला सुट राहील. सर्व शासकीय कार्यालये त्यांचे संपूर्ण अधिकारी व कर्मचाऱ्यांसह सुरू राहतील. शासकीय कर्मचाऱ्यांना कार्यालयीन ओळखपत्र सोबत बाळगणे आवश्यक असेल तसेच त्यांच्या वाहनांना कार्यालयात येणे व घरी जाणे याकरीता मुभा राहील. पुसद व दिग्रस शहरातील व शहरालगतच्या क्षेत्रातील संपूर्ण अत्यावश्यक सेवेची व इतर सेवेची, वस्तुंची दुकाने व बाजारपेठ संपूर्णत: बंद राहतील. सर्व शासकीय व खाजगी दवाखाने, आरोग्य कर्मचारी, वैद्यकीय रुग्णालयातील कर्मचारी, पशुवैद्यकीय दवाखाने व त्यांचे औषधालये दररोज 24 तास (24 X 7) सुरू राहतील. ऑनलाईन औषध वितरण सेवा व शासकीय, खाजगी दवाखान्यालगत असलेली औषधीविक्री दुकाने (24 X 7) सुरू राहतील. तसेच इतर ठिकाणी असलेली एकल औषधी दुकानेसुद्धा सुरू राहतील.
प्रिंट मिडीया, ईलेक्ट्रॉनिक मिडीया यांचे संपादक, वार्ताहर, प्रतिनिधी, वर्तमानपत्र वितरक यांना घरपोच वर्तमानपत्रक वाटपासाठी मुभा राहील. आठवडी बाजार, भाजीमंडी, फळ मार्केट बंद राहील. भाजीपाला व फळे गल्ली, कॉलनी, सोसायटीमध्ये जाऊन विक्री करण्यास सकाळी 7 ते दुपारी 12 या वेळेत मुभा राहील. एका ठिकाणी बसून विक्री करता येणार नाही. दुध संकलन व दुध विक्री तसेच फिरते दुध विक्री सकाळी 7 ते सकाळी 10 पर्यंत मुभा राहील. तसेच फिरते दुध विक्री ह्या बाबीस सायंकाळी 7 ते रात्री 8 ह्या वेळेत सुद्धा मुभा राहील. सर्व केश कर्तनालय, सलुन, ब्युटी पार्लर दुकाने संपुर्णत: बंद राहतील. पेट्रोल, डिझेल पंप सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत तर अत्यावश्यक सेवेकरिता 24 तास सुरू राहतील. घरगुती गॅस फक्त घरपोच वितरण करण्यास  सकाळी 7 ते सायंकाळी 7 या वेळेत वितरण करण्यास मुभा देण्यात येत आहे. परंतु गॅस वितरक कर्मचारी यांनी गणवेश व ओळखपत्र सोबत बाळगणे अनिवार्य राहील.
कृषी साहित्य, रासायनिक खतविक्री, बी-बियाणे विक्री व वाहतुक त्यांचे गोदामे व दुकाने सकाळी 7 ते दुपारी 12 या कालावधीत चालू राहतील. शेतीची पेरणी, मशागतीस व संपुर्ण शेतीच्या कामास मुभा राहील. स्वस्त धान्य दुकाने सकाळी 7 ते दुपारी 12 वाजेपर्यंत सुरू राहतील तथापि त्याठिकाणी सामाजिक अंतराचे पालन करणे बंधनकारक राहील. मालवाहतुक सेवा पुर्ववत चालू राहील.
पुसद व दिग्रस शहरातील सर्व बँका शासकीय कामाकरीता व त्यांचे बँकींग कामासाठी त्यांच्या कार्यालयीन वेळेनुसार चालू राहतील. बँकेत ग्राहकांसाठी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत मुभा राहील.  अंत्यविधी प्रक्रिया पार पाडण्यास पुर्वी दिलेल्या अटी व शर्तीनुसार 50 लोकांची मुभा राहील. सार्वजनिक व खाजगी बस सेवा, ट्रक, टेम्पो, ट्रेलर, ट्रॅक्टर इत्यादी संपुर्णत: बंद राहतील. टु व्हीलर, थ्री व्हीलर, फोर व्हीलर, बंद राहतील तथापि अत्यावश्यक सेवेतील वाहने, पुर्व परवानगी प्राप्त वाहने व वैद्यकीय कारणास्तव प्रवासासाठी खाजगी वाहनांचा वापर अनुज्ञेय राहील. चिकन, मटन, अंडी, मासे मार्केट व विक्री बंद राहील. सर्व रेस्टॉरंट, हॉटेल, (कोविड-19 करिता वापरात असलेले वगळून), उपाहारगृह, लॉज, रिसॉर्ट, मॉल, बंद राहतील. जेवणाची घरपोच पार्सल सुविधा बंद राहील. सर्व दारुची दुकाने बंद राहतील. मंगल कार्यालये, हॉल, लग्न समारंभ, स्वागत समारंभ संपुर्णत: बंद राहतील. पुसद व दिग्रस शहरातील सर्व खाजगी कार्यालये बंद राहतील. पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरला नियमानुसार परवानगी राहील. जार वॉटर सप्लायर्स यांना सामाजिक अंतराचे पालन करत सकाळी 7 ते 12 या वेळेत ग्राहकांना घरपोच सेवा देता येईल. पुसद व दिग्रस शहरातील औद्योगिक कारखाने उद्योग शिफ्टनुसार सुरू राहतील. इलेक्ट्रीशियन्स, प्लंबर इत्यादींना घरी जाऊन ईलेक्ट्रीशियन्स, प्लंबींगचे काम करण्यास मुभा राहील. मॉर्निंग वॉक, ईव्हीनिंग वॉक, जॉगिंग, खेळाच्या मैदानारील व्यायाम इत्यादींवर बंदी राहील.
पुसद व दिग्रस शहरातील राज्य, केंद्र शासनाचे अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर्स, नर्स अंगणवाडी कर्मचारी, आशा वर्कर, वर्तमानपत्र, प्रिंटींग व डिजिटल मिडीयाचे कर्मचारी, फार्मा व औषधी संबंधीत मेडीकल शॉपचे कर्मचारी, दुध विक्रेते, अत्यावश्यक सेवा तसे कृषी, बी-बीयाणे, खते, गॅस वितरक, पाणी पुरवठा आरोग्य व स्वच्छता करणारे शासकीय व खाजगी कामगार, अग्नीशमन सेवा, जलनि:सारण तसेच पूर्वपावसाळी व पावसाळ्याच्या दरम्यान करावयाची अत्यावश्यक कामे, वीज वहन व वितरण कंपनीचे कर्मचारी, महानगरपालिकेचे कर्मचारी, पोलीस विभागाचे कर्मचारी, महसूल विभागाचे कर्मचारी, तसेच प्रतिबंधीत क्षेत्राकरिता नियुक्त कर्मचारी यांनाच चार चाकी, दुचाकी (स्वत:करीता फक्त) वाहन वापरण्यास परवानगी राहील. या सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी स्वत:चे कार्यालयाचे ओळखपत्र तसेच शासकीय कर्मचारी सोडून इतरांनी स्वत:चे आधारकार्ड सोबत ठेवावे.
सर्व शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक, प्रशिक्षण संस्था व शिकवणी वर्ग इत्यादी बंद राहतील, तथापी ऑनलाईन आंतरशिक्षण यास मुभा राहील. तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थांची दुकाने, चहाकॉफी सेंटर, पानठेला बंद राहतील. पुसद व दिग्रस शहरातील व शहरालगताच्या भागातील 65 वर्षावरील सर्व व्यक्ती आणि जोखमीचे आजार असलेल्या व्यक्ती, गरोदर महिला, 10 वर्षापेक्षा कमी वयाची मुले यांना अत्यावश्यक सेवा व वैद्यकीय सेवाशिवाय घराबाहेर जाता येणार नाही.
सदर आदेश यवतमाळ जिल्ह्यातील पुसद व दिग्रस शहर तसेच या शहरालगतच्या परिसरास लागू राहतील. उपविभागीय दंडाधिकारी पुसद यांचेवर वरिलप्रमाणे आदेशाची अंमलबजावणीच्या अनुषंगाने संनियंत्राणाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
            सदर आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, संस्था अथवा समुह यांचेवर साथरोग प्रतिबंधक कायदा, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम आणी भारतीय दंड संहिता 1860 तसेच इतर संबंधीत कायदे व नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमुद केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जस्टिस नरीमन पर क्रिमिनल केस करने वाले रशीद खान और अन्य के समर्थन में सुप्रिम कोर्ट के इतिहास में सबसे जादा वकीलों का वकालतनामा. रिटायर्ड जस्टिस रंजन गोगोई की अपराधिक साजिश उजागर सुप्रिम कोर्ट के जस्टिस रोहींटन नरीमन और विनीत सरण पर केस करने वाले रशीद खान पठाण, ऍड. निलेश ओझा और ऍड. विजय कुर्ले के समर्थन में सुप्रिम कोर्ट के हजारो वकीलो ने अपना समर्थन दिया है. ऑल इंडिया एस. सी., एस. टी एंड मायनॉरिटि लॉयर्स असोसिएशन, सुप्रिम कोर्ट एंड हाई कोर्टस लिटीगंटस असोसिएसन, इंडियन बार असोसिएशन, मानव अधिकार सुरक्षा परीषद ने लिखित रुपमे चीफ जस्टिस ऑफ़ इंडिया श्री. शरद बोबडे, राष्ट्रपती श्री. रामनाथ कोविद, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को पत्र लिखकर दोषी जजेस रोहिंटन नरीमन, विनीत सरण, अनिरुद्ध बोस, रिटायर्ड जस्टिस दीपक गुप्ता और वकील सिद्धार्थ लूथरा, मिलिंद साठे, कैवान कल्यानीवाला के खिलाफ एफ. आय. आर. (FIR) दर्ज करने, सीबीआय (CBI) को जाच आदेश देने तथा इन जजेस को जाच पूरी होने तक सुप्रीम कोर्ट की किसी भी कारवाई में भाग लेने की अनुमति नहीं देने की मांग की है. ज्ञात हो की इससे पहले भी 10 जनवरी 2020 क...

ब्रेक द चेन' अंतर्गत जिल्ह्यासाठी मार्गदर्शक सुचना जारी ; 1 मे पर्यंत संचारबंदी लागू

  द चेन' अंतर्गत जिल्ह्यासाठी मार्गदर्शक सुचना जारी ; 1 मे पर्यंत संचारबंदी लागू यवतमाळ : 14 एप्रिल राज्यात 14 एप्रिलच्या रात्री 8 वाजतापासून 1 मे रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत 'ब्रेक द चेन' अंतर्गत मार्गदर्शक सुचना निर्गमित केल्या आहेत. या कालावधीत कलम 144 (संचारबंदी) लागू करण्यात आली आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी अमोल येडके यांनी जिल्ह्याकरीता आदेश निर्गमित केले आहे.             संचारबंदीची अंमलबजावणी : संचारबंदीच्या कालावधी कोणत्याही व्यक्तिस अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर पडता येणार नाही. अत्यावश्यक सेवेमध्ये समाविष्ट असलेल्या बाबी वगळता इतर सर्व आस्थापना, सार्वजनिक ठिकाणे, उपक्रमे, सेवा बंद राहतील. अत्यावश्यक सेवेमध्ये वर्गवारी केलेल्या सेवा व उपक्रम यांना कामकाजाच्या सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत मुभा राहील.             अत्यावश्यक सेवेमध्ये सुरू राहणा-या बाबी : रुग्णालये, डायग्नोस्टिक सेंटर, क्लिनीक, लसीकरण केंद्र, वैद्यकीय विमा कार्यालये, औषधी दुकाने व औषधी कंपन्या, औषधी व आरोग्य सेवा व औषध निर्मिती करणारे कारखाने तसेच त्य...

आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयास क्रांतीसुर्य बिरसा मुंडाची भव्य प्रतीमा भेट

आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयास क्रांतीसुर्य बिरसा मुंडाची भव्य प्रतीमा भेट        पुसद : महानायक धरतीआबा बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त पुसद आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय पुसद येथे नवनियुक्त पुसद आदिवासी विकास समिती अध्यक्ष तथा आदिवासी युवा परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुनील ढाले यांच्या तर्फे आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयास भगवान बिरसा मुंडा यांच्या भव्य प्रतिमेची भेट देण्यात आली. बिरसाचे विचार समस्त युवकांनी अंगीकारून वंचितांना न्याय देण्याचे काम करावे असे प्रतिपादन भेट सोहळ्याचे अध्यक्ष आदिवासी सेवक रामकृष्ण चौधरी सर , जी प सदस्य गजानन उघडे , वसंता  चिरमाडे , पुंडलिक  टारफे , श्रीकांत चव्हाण , राज्य संघटक जीवन फोपसे , जिल्हा उपाध्यक्ष संतोष गारुळे , तालुकाध्यक्ष गजानन टारफे , कर्मचारी संघटनेचे तालुका सचीव संदेश पांडे , आ.विकास परिषदेचे सचिव सुरेश बोके , श्री खूपसे , जयवंत भुरके , तुकाराम भुरके , समाधान टारफे , गंगाराम काळे साहेब , रामदास शेळके , विजय टारफे , दत्ता भडंगे , दशरथ भुरके , समाधान चोंढकर , हनुमान गोदमले , भगवान सुरोशे , सुरेश पित्रे , बालाजी शे...