बिबट्याच्या कातडेप्रकरणी संबंधितावर गुन्हा दाखल
यवतमाळ, दि.4 : विदर्भ मुकाबला-
उत्तरवाढोणा येथे वन्यप्राणी बिबट्याची शिकार करून कातडे घरात ठेवल्याप्रकरणी आरोपी गजानन वामनराव कुनकर याच्याविरुध्द वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुनकर याने बिबट्याचे कातडे घरात लपवून ठेवल्याच्या गुप्त माहितीच्या आधारावर यवतमाळचे उपवनसंरक्षक डॉ. भानुदास पिंगळे, श्री.अर्जुणा (भावसे), दारव्हाचे उपविभागीय वनअधिकारी मकरंद गुजर व इतर स्टाफच्या फिरते पथकाने गजानन वामनराव कुनगर याच्या घरात तपासणी केली. कुनकर याच्या घरामागील टिनाच्या वर एका पोत्यामध्ये वन्यप्राणी बिबट्याची कातडी मिळाली. तसेच घरामध्ये काळविटचे शिंग, वजनकाटा अशा वस्तू मिळाल्या. सदर वस्तू वनविभागाच्या पथकाने जप्त केल्या. तसेच आरोपी गजानन कुनकर याला चौकशीकरीता ताब्यात घेतले.
त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 अंतर्गत असलेल्या कलमान्वये कारवाई करण्यात येत आहे. बिबट व काळविट हे शेड्यूल 1 अंतर्गत येणारे वन्यप्राणी आहे ज्यांना सर्वोच्च संरक्षण प्राप्त आहे. सदर प्रकरणाची अधिक चौकशी दारव्हाचे उपविभागीय वनअधिकारी डॉ.मकरंद गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली नेरचे वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद कोहळे करीत आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा