मुख्य सामग्रीवर वगळा

माहिती आयुक्त कार्यालयात अत्याधुनिक तंत्रज्ञान

माहिती आयुक्त कार्यालयात अत्याधुनिक तंत्रज्ञान
Ø नव्या सॉफ्टवेअरने जलद सुनावणी
Ø कार्यालय पेपरलेस होण्यास मदत
Ø ‘टेलिग्रामवरून दररोज माहिती


अमरावती, दि. 7 : 
लॉकडाऊनच्या काळात राज्य माहिती आयुक्त कार्यालय अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करीत आहे. कामकाजातील सर्वात मोठा भाग असलेल्या  सुनावणी ऑनलाईन करून गती देण्यात आली आहे. याशिवाय कार्यालयीन कामकाजात तंत्रज्ञानाचा कुशलतेने उपयोग करण्यात येत आहे. अपिलाची नोटीस ते सुनावणीसाठी नवे सॉफ्टवेअर अंगीकारून प्रकरणे निकाली काढण्यात येत आहेत. या सॉफ्टवेअरच्या उपयोगामुळे येत्या काळात दररोज सुमारे 70 प्रकरणे निकाली काढण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
            राज्य माहिती आयोगाच्या अंतर्गत येणाऱ्या पाच जिल्ह्यासाठी ऑनलाईन कार्यप्रणाली तयार करण्यात आली आहे. ऑनलाईन कामकाजासाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी एक सहायक कक्ष अधिकारी नेमण्यात आला आहे. तसेच दोन कक्ष अधिकारी नियंत्रण करणार आहेत. ही प्रकरणे ऑनलाईन होण्यासाठी नव्याने विकसित करण्यात आलेल्या सॉफ्टवेअरमध्ये माहिती अधिकारांतर्गत संबंधित जनमाहिती अधिकाऱ्याकडे सादर करण्यात आलेला पहिला अर्ज ते राज्य माहिती आयुक्तांकडे अपिल येण्यापर्यंत सर्व माहिती भरण्यात येणार आहे. याशिवाय संबंधित जनमाहिती अधिकारी, अपिलीय अधिकारी यांचे संपर्क क्रमांक आणि ई-मेलही याच सॉफ्टवेअरमध्ये भरण्यात येणार आहे. त्यामुळे प्रकरणांची निवड करून वेळी सर्व संबंधितांना एकाचवेळी नोटीस बजावणे शक्य होणार आहे. यात डाक, कागद, मनुष्यबळ यांचा कमीत कमी उपयोग होईल, त्याचबरोबर या सर्व कामासाठी लागणारा वेळी वाचणार आहे.
            सध्यास्थितीत राज्य माहिती आयुक्त कार्यालयात नऊ हजाराहून अधिक प्रकरणे प्रलंबित आहेत. ही प्रकरणे निकाली काढण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. एका दिवशी एक जिल्हा याप्रमाणे दररोज किमान 70 सुनावण्या घेऊन येत्या नऊ-दहा महिन्यात ही प्रकरणे निकाली निघतली. सुनावणीनंतर दिले जाणारे आदेशही ऑनलाईन प्रणालीद्वारे करण्यात येणार आहेत. दरम्यानच्या काळात नवीन येणारे प्रकरणेही सुनावणीसाठी घेण्यात येणार आहेत. या सॉफ्टवेअरचा पूर्ण क्षमतेने उपयोग करून घेण्यासाठी अर्जदारांनी आपला सुरवातीपासून ते राज्य माहिती आयुक्त कार्यालयापर्यंतचे सर्व अर्ज संगणकीकृत करणे गरजेचे आहे. तसेच अर्जावर भ्रमणध्वनी आणि ई-मेल आयडी लिहिणे आवश्यक आहे.
‘टेलिग्राम’वरून माहिती
जन माहिती अधिकारी, प्रथम अपिलीय अधिकारी आणि कार्यालय प्रमुखांना माहिती अधिकाराबाबत माहिती हवी असल्यास त्यांनी माहिती आयुक्तांना संपर्क साधावा, तसेच उपयुक्त माहिती ‘टेलिग्राम’ ॲपवरून देण्यात येणार आहे. त्यासाठी अधिकाऱ्यांना https://t.me/joinchat/NIqTuBfeaP6ZRhpecjssTg या लिंकवरून ग्रुपमध्ये सामिल होता येईल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दाते महीला बँक वाचवण्यासाठी महिला सहकारी बँक कृती समिती यवतमाळ ची संघर्ष परिषद

दाते महीला बँक वाचवण्यासाठी महिला सहकारी बँक कृती समिती यवतमाळ ची संघर्ष परिषद यवतमाळ येथील बाबाजी दाते महीला बँक मध्ये अनेक खातेदार, ठेवीदार यांचे पैसे आहेत अनेकांच्या खूप समस्या आहेत. पण कायद्याने आपण आपले पैसे कसे काढू शकतो यासाठी आज संघर्ष परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी मुंबई येथून विश्वास उटगी यांना आमंत्रित करण्यात आले होते. विश्वास उटगी हे माजी सचिव ऑल इंडिया बँक फेडरेशन आहेत. ज्या बँका डुबले आहेत त्या बँकांमधील खातेदारांना आपले पैसे काढण्यासाठी मार्गदर्शन करतात. कायद्याने सल्ला देतात. यासाठी ते मार्गदर्शन करतात. यासाठी आज संघर्ष परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या संघर्ष परिषदेमध्ये हजाराच्या वर पीडित खातेदार, ठेवीदार सहभागी झाले होते .या संघर्ष परिषदेमध्ये येणाऱ्या समोरच्या काळात लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, कर्जदार ,संचालक यांच्या घरासमोर डफडे वाजवा आंदोलन ,रिझर्व्ह बँकेसमोर धरणे, कायदेशीर मार्गासाठी उच्च न्यायालयात धाव ,अशा अनेक आंदोलनात्मक विषय घेऊन विविध समित्यांचे गठन करण्यात आले. यावेळी नितीन बोदे, राजू पडगिलवार, सुनील पुनवटकर, शैलेश काळबांडे, पिसाळकर ...
जस्टिस नरीमन पर क्रिमिनल केस करने वाले रशीद खान और अन्य के समर्थन में सुप्रिम कोर्ट के इतिहास में सबसे जादा वकीलों का वकालतनामा. रिटायर्ड जस्टिस रंजन गोगोई की अपराधिक साजिश उजागर सुप्रिम कोर्ट के जस्टिस रोहींटन नरीमन और विनीत सरण पर केस करने वाले रशीद खान पठाण, ऍड. निलेश ओझा और ऍड. विजय कुर्ले के समर्थन में सुप्रिम कोर्ट के हजारो वकीलो ने अपना समर्थन दिया है. ऑल इंडिया एस. सी., एस. टी एंड मायनॉरिटि लॉयर्स असोसिएशन, सुप्रिम कोर्ट एंड हाई कोर्टस लिटीगंटस असोसिएसन, इंडियन बार असोसिएशन, मानव अधिकार सुरक्षा परीषद ने लिखित रुपमे चीफ जस्टिस ऑफ़ इंडिया श्री. शरद बोबडे, राष्ट्रपती श्री. रामनाथ कोविद, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को पत्र लिखकर दोषी जजेस रोहिंटन नरीमन, विनीत सरण, अनिरुद्ध बोस, रिटायर्ड जस्टिस दीपक गुप्ता और वकील सिद्धार्थ लूथरा, मिलिंद साठे, कैवान कल्यानीवाला के खिलाफ एफ. आय. आर. (FIR) दर्ज करने, सीबीआय (CBI) को जाच आदेश देने तथा इन जजेस को जाच पूरी होने तक सुप्रीम कोर्ट की किसी भी कारवाई में भाग लेने की अनुमति नहीं देने की मांग की है. ज्ञात हो की इससे पहले भी 10 जनवरी 2020 क...

आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयास क्रांतीसुर्य बिरसा मुंडाची भव्य प्रतीमा भेट

आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयास क्रांतीसुर्य बिरसा मुंडाची भव्य प्रतीमा भेट        पुसद : महानायक धरतीआबा बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त पुसद आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय पुसद येथे नवनियुक्त पुसद आदिवासी विकास समिती अध्यक्ष तथा आदिवासी युवा परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुनील ढाले यांच्या तर्फे आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयास भगवान बिरसा मुंडा यांच्या भव्य प्रतिमेची भेट देण्यात आली. बिरसाचे विचार समस्त युवकांनी अंगीकारून वंचितांना न्याय देण्याचे काम करावे असे प्रतिपादन भेट सोहळ्याचे अध्यक्ष आदिवासी सेवक रामकृष्ण चौधरी सर , जी प सदस्य गजानन उघडे , वसंता  चिरमाडे , पुंडलिक  टारफे , श्रीकांत चव्हाण , राज्य संघटक जीवन फोपसे , जिल्हा उपाध्यक्ष संतोष गारुळे , तालुकाध्यक्ष गजानन टारफे , कर्मचारी संघटनेचे तालुका सचीव संदेश पांडे , आ.विकास परिषदेचे सचिव सुरेश बोके , श्री खूपसे , जयवंत भुरके , तुकाराम भुरके , समाधान टारफे , गंगाराम काळे साहेब , रामदास शेळके , विजय टारफे , दत्ता भडंगे , दशरथ भुरके , समाधान चोंढकर , हनुमान गोदमले , भगवान सुरोशे , सुरेश पित्रे , बालाजी शे...