मुख्य सामग्रीवर वगळा

सेतू सुविधा केंद्र बंद असल्याने शेतकरी, विद्यार्थ्यांचे हाल; गुरुदेव युवा संघाचा आंदोलनांचा इशारा

सेतू सुविधा केंद्र बंद असल्याने शेतकरी, विद्यार्थ्यांचे हाल; 

गुरुदेव युवा संघाचा आंदोलनांचा इशारा 


यवतमाळ :- कोरोना प्रादुर्भावाची नावावर सेतू सुविधा केंद्र बंद केल्याने नुकताच निकाल लागलेल्या १० वि १२ वि चे विध्यार्थी व शेतकरी याना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून खासगी सेतू केंद्राकडून नागरिकांची आर्थिक लूट केल्या जात आहे. तहसील कार्यालयातील सेतू सुविधा केंद्र तातडीने सुरु करावे अशी मागणी गुरुदेव युवा संघाच्या वतीने करण्यात आली आहे. 

12 वी आणि 10 वी चा निकाल लागला असल्याने विद्यार्थ्याना प्रवेश घेण्यासाठी लागणारे कागदपत्र तहसिल कार्यालय यवतमाळ  येथील आपले सरकार सेतु सुविधा केंद्र सरकारने तथा कोरोना विषाणू च्या प्रादुर्भावाने मार्च ते आजरोजी पर्यंत कोणत्याही प्रकारचे कागदपत्रे काढण्यासाठी पूर्ण पणे सेतु केंद्र बंद ठेवले असुन सरकारी सेतु सुविधा केंद्रात अल्प दरात कामे होतात आणि हेच कागदपत्र काढण्यासाठी खाजगी सेतु सुविधा केंद्रात सर्व सामाण्यांची लुट होत असून या गंभीर बाबींन विषयी शासन वा प्रशासन दुर्लक्ष करून खाजगी सेतु सुविधा केंद्र सुरू ठेवुन सरकारी सेतु सुविधा केंद्र बंद करून सामाण्यांचे हाल करीत असल्याचे दिसून येत आहे तसेच निराधार योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामीण भागातील व शहरी भागातील वृध्दांचे हाल होतांना दिसत आहे.तसेच तहसिल कार्यालया जवळपास खाजगी सेतु मध्ये कोणत्याही प्रकारचे सोशल डिस्टंसिंग पाळल्याजात नाही व त्यांना कोरोना विषाणू चा परिणाम होणार नाही का?  असा सर्व सामान्यांना प्रश्नच निर्माण झाला आहे

यासोबतच राशन कार्ड ऑनलाईन करणे, जातीचा दाखला काढणे, अधिवास प्रमाणपत्र आदींची आवश्यकता विध्यार्थ्यांना आहे. मात्र तहसील कार्यालयातील कामकाज पूर्णपणे थक्क असल्याने मोठी कुचंबना होत आहे. खासगी सेतू चालकांकडून अवाजवी रक्कम उकळल्या जात असल्याने सेतू केंद्र सुरु करावे अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच तहसील परिसरात अर्जनवीस म्हणून काम करणारे सुशिक्षित बेरोजगार यांची उपासमार होत आहे. त्यामुळे सोशल डिस्टंसिंगचे पालन करून सेतू सुविधा केंद्र तात्काळ सुरु करावे अन्यथा गुरुदेव युवा संघाचे वतीने गोरगरीब नागरिकासह तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे यावेळी रत्नाबाई तेलंगे, ललिता धनगावकर , जोत्सना तेलंगे, नंदा इंगळे, देवक भजगवारे, संगीत गावडे, पुष्प खडसे,दादाराव तायडे, आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दाते महीला बँक वाचवण्यासाठी महिला सहकारी बँक कृती समिती यवतमाळ ची संघर्ष परिषद

दाते महीला बँक वाचवण्यासाठी महिला सहकारी बँक कृती समिती यवतमाळ ची संघर्ष परिषद यवतमाळ येथील बाबाजी दाते महीला बँक मध्ये अनेक खातेदार, ठेवीदार यांचे पैसे आहेत अनेकांच्या खूप समस्या आहेत. पण कायद्याने आपण आपले पैसे कसे काढू शकतो यासाठी आज संघर्ष परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी मुंबई येथून विश्वास उटगी यांना आमंत्रित करण्यात आले होते. विश्वास उटगी हे माजी सचिव ऑल इंडिया बँक फेडरेशन आहेत. ज्या बँका डुबले आहेत त्या बँकांमधील खातेदारांना आपले पैसे काढण्यासाठी मार्गदर्शन करतात. कायद्याने सल्ला देतात. यासाठी ते मार्गदर्शन करतात. यासाठी आज संघर्ष परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या संघर्ष परिषदेमध्ये हजाराच्या वर पीडित खातेदार, ठेवीदार सहभागी झाले होते .या संघर्ष परिषदेमध्ये येणाऱ्या समोरच्या काळात लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, कर्जदार ,संचालक यांच्या घरासमोर डफडे वाजवा आंदोलन ,रिझर्व्ह बँकेसमोर धरणे, कायदेशीर मार्गासाठी उच्च न्यायालयात धाव ,अशा अनेक आंदोलनात्मक विषय घेऊन विविध समित्यांचे गठन करण्यात आले. यावेळी नितीन बोदे, राजू पडगिलवार, सुनील पुनवटकर, शैलेश काळबांडे, पिसाळकर ...

शिवशक्ती महाविद्यालय बाभुळगाव वतीने आयोजित "तीस दिवसीय राज्यस्तरीय व्यक्तिमत्व विकास प्रमाणपत्र कोर्स" संपन्न

 शिवशक्ती महाविद्यालय बाभुळगाव वतीने आयोजित "तीस दिवसीय राज्यस्तरीय व्यक्तिमत्व विकास प्रमाणपत्र कोर्स" संपन्न यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव येथील शिवशक्ती कला व वाणिज्य महाविद्यालय येथे अर्थशास्त्र विभाग आणि ग्रंथालय व ज्ञान संसाधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने तीस दिवसीय राज्यस्तरीय व्यक्तिमत्व विकास प्रमाणपत्र कोर्सचे आयोजन दि. 15 एप्रिल ते 15 मे 2021 दरम्यान आभासी पद्धतीने करण्यात आले होते. या कोर्सचा समारोपीय कार्यक्रम दि. 16 मे 2021 रोजी संपन्न झाला. या सोहळ्याचे अध्यक्ष सन्माननीय प्रा. बाळासाहेब धांदे व्यवस्थापक, शिवशक्ती शिक्षण संस्था, कोठा हे होते तर विशेष अतिथी म्हणून डॉ. मोहन खेरडे, संचालक, ज्ञान संसाधन केंद्र, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती हे होते. तर प्रमुख उपस्थिती म्हणून प्रा. डॉ. कविता तातेड अणे महिला महाविद्यालय यवतमाळ, डॉ. शशिकांत वानखेडे ग्रंथपाल, भारती महाविद्यालय आर्णी आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दीपक कोदूरवार हे होते. याप्रसंगी मान्यवरांनी व्यक्तिमत्व विकास प्रमाणपत्र कोर्स कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीत विद्यार्थ्यांना नवचेतना, नवउमेद...
जस्टिस नरीमन पर क्रिमिनल केस करने वाले रशीद खान और अन्य के समर्थन में सुप्रिम कोर्ट के इतिहास में सबसे जादा वकीलों का वकालतनामा. रिटायर्ड जस्टिस रंजन गोगोई की अपराधिक साजिश उजागर सुप्रिम कोर्ट के जस्टिस रोहींटन नरीमन और विनीत सरण पर केस करने वाले रशीद खान पठाण, ऍड. निलेश ओझा और ऍड. विजय कुर्ले के समर्थन में सुप्रिम कोर्ट के हजारो वकीलो ने अपना समर्थन दिया है. ऑल इंडिया एस. सी., एस. टी एंड मायनॉरिटि लॉयर्स असोसिएशन, सुप्रिम कोर्ट एंड हाई कोर्टस लिटीगंटस असोसिएसन, इंडियन बार असोसिएशन, मानव अधिकार सुरक्षा परीषद ने लिखित रुपमे चीफ जस्टिस ऑफ़ इंडिया श्री. शरद बोबडे, राष्ट्रपती श्री. रामनाथ कोविद, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को पत्र लिखकर दोषी जजेस रोहिंटन नरीमन, विनीत सरण, अनिरुद्ध बोस, रिटायर्ड जस्टिस दीपक गुप्ता और वकील सिद्धार्थ लूथरा, मिलिंद साठे, कैवान कल्यानीवाला के खिलाफ एफ. आय. आर. (FIR) दर्ज करने, सीबीआय (CBI) को जाच आदेश देने तथा इन जजेस को जाच पूरी होने तक सुप्रीम कोर्ट की किसी भी कारवाई में भाग लेने की अनुमति नहीं देने की मांग की है. ज्ञात हो की इससे पहले भी 10 जनवरी 2020 क...