मुख्य सामग्रीवर वगळा

शेतकऱ्यांसारखी सकारात्मकता कोरोनाच्या भयावर प्रभावी उपाय- डॉ मिलिंद आपटे

शेतकऱ्यांसारखी सकारात्मकता कोरोनाच्या भयावर प्रभावी उपाय- डॉ मिलिंद आपटे 

पुसद- आज कोरोना मुळे प्रत्येक क्षेत्रात अनिश्चितता निर्माण होऊन समाजाचा प्रत्येक घटक भयग्रस्त झाला आहे.मात्र ज्याप्रमाणे दरवर्षी  शेतीत नुकसान होत असले तरी पुढच्या वर्षी पुन्हा शेतीची मशागत करून पावसाची वाट पाहणाऱ्या  शेतकऱ्यासारखी सकारात्मकता बालगल्यास  कोरोनाच्या भयावर सहज मात करता येईल असे मौलिक विचार नागपूर येथील प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ मिलिंद आपटे यांनी व्यक्त केले. 
पुसद अर्बन बॅंकेचे अध्यक्ष शरद मैंद यांच्या संकल्पनेतून व बँकेच्या सामाजिक उपक्रमातुन काल 
 कोरोनाचा  व्यापारी ,कर्मचारी ,शेतकरी व सामान्य जनतेच्या मानसिकतेवर झालेला परिणाम व उपाय या विषयावर आयोजित  वेबिनार मध्ये मार्गदर्शन करताना ते पुढे म्हणाले की आपली सुदृढ शरीर व  प्रतिकार शक्ती टिकवुन ठेवा, शारीरिक व मानसिक धैर्य ठेवा ,नकारात्मक विचाराला टाळा, पायी जास्त चाला ,घटनेनंतर नकारात्मक चर्चा  टाळून उपायावर बोला. कोरोनाला जीवनातील विराम समजा पुढील वर्षी सर्व व्यवसाय पुन्हा एकदा भरारी घेवुन देशाची अर्थव्यवस्था कात टाकेल असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान कोरोनामुळे विद्यार्थांसाठी ऑनलाइन शिक्षण प्रणाली घातक असून कोरोना पर्व संपल्यानंतर त्याचे दुष्परिणाम दिसतील अशी भीती त्यांनी व्यक्त केली. बँकेचे अध्यक्ष शरद मैंद यांनी प्रास्ताविकात कोरोनामुळे अनिश्चीततेच्या वातावरणात असलेल्या सर्वसामान्य लोकांना योग्य मार्गदर्शन मिळावे या हेतूने प्रेरीत होऊन वेबिनार आयोजित केल्याचे सांगितले. यावेळी पॅनलिस्ट म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस लिगल सेल अध्यक्ष तथा म.गो.बार कौन्सिल चे सदस्य एड आशिष देशमुख, अ.भा. काँ.कमिटी चे सचिव एड.सचिन नाईक,यवतमाळ जिप च्या माजी अध्यक्ष डॉ आरती फुफाटे, मराठा सेवा संघ राज्य उपाध्यक्ष अरविंद गावंडे तसेच सिंदखेड राजा येथील जिजाऊ श्रुष्टी चे सचिव सचिन चौधरी विश्वनाथसिंह बयास पतसंस्थेचे अध्यक्ष निशांत बयास,
चेम्बर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष सुरज डुब्बेवार, उपाध्यक्ष संतोष अग्रवाल,माजी अध्यक्ष बिपीन चिद्धरवार, प्रगतशील कास्तकार अभय गडम ,नारायण क्षीरसागर,  साप्ताहिक पोलिटिक्स स्पेशल चे संपादक रितेश पुरोहित तसेच काळी दौ.येथील माजी सरपंच गौतम रणवीर व तेथील शेतकरी तसेच वालतुर रेल्वे येथील शेतकरी,बँकेचे संचालक सुदीप जैन, गोपालसेठ अग्रवाल,नीलकंठ पाटील, प्रवीर व्यवहारे,  बा.ना.अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ अविनाश वानखेडे, ,कृषिभूषण दीपक आसेगावकार यांनी प्रश्नोत्तर सत्रात सहभाग घेतला.सुरवातीचे संचलन बँकेचे संचालक ललित सेता तर आभार प्रदर्शन बँकेचे उपाध्यक्ष राकेश खुराणा यांनी केले.झूम अँप व शरद मैंद लाईव्ह फेसबुक पेज वर हजारो लोकांनी वेबिनार मधील मार्गदर्शनाचा लाभ घेतला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

यवतमाल जिले के तरोडा गांव में शहीद जवान रहाटे को दीगई अंतिम विदाई. अरणी:- प्रतिनिधि (शाहरुख काझी) महाराष्ट्र के गडचिरोली में 1 तारीख को हुए नक्सली हमले में शहीद जवान आग्रमन रहाटे को उसके गांव में अंतिम विदाई दे दी गई लेकिन इनके परिजनों ने इनकी टुकड़ी का नेतृत्व करने वाले अधिकारी की मिलीभगत से यह हादसा होने का गंभीर आरोप लगाया है गडचिरोली के कुरखेड़ा में 1 मई के दिन नक्सलियों द्वारा पुलिस गाड़ी को विस्फोट से उड़ाकर 15 जवानों को शहीद किया था उनमें से एक यवतमाल जिले के अरणी तहसील के तरोड़ा गांव का जवान अग्रमन रहाटे भी शहीद हुआ है शहीद जवान के गांव में 3 में को नम आंखों से अंतिम विदाई दे दी गई शहीद के परिजनों ने इस हमले को इनका नेतृत्व करने वाला अधिकारी काले के मिलीभगत से अंजाम दिया गया है ऐसा गंभीर आरोप लगाया है इस अधिकारी पर कार्रवाई करने की मांग परिजनों ने की है.
पुसद विधानसभा के युवा उमेदवार इंद्रनील मनोहरराव नाईक इनकी ऐतेहासिक जीत. महाराष्ट्र - यवतमाल जिले के पुसद विधानसभा निर्वाचन क्षेत्र से महाराष्ट्र के पूर्वमंत्री मनोहरराव नाईक के सुपुत्र युवा उमेदवार इंद्रनील मनोहर नाईक ने भाजपा के उमेदवार निलय नाईक को करारी हार देते हुए कुल 89143 मत हासिल करके एक ऐतिहासिक जीत हासिल की । आपको बतादे के राष्ट्रवादी का किला माने जाने वाले इस चुनाव क्षेत्र में एक ही परिवारज के दो भाई निलय नाईक और छोटे भाई इंद्रनील नाईक चुनाव मैदान में होने के कारण पूरे महाराष्ट्र की नज़र पुसद विधानसभा की इस सीट पर बानी हुई थी । आखिरकार 2019 के इस विधानसभा चुनाव में राष्ट्रवादी के युवा उमेदवार इंद्रनील मनोहरराव नाईक की 9701 ओठों से ऐतेहासिक जीत होने के चलते पुसद विधानसभा का इतिहास कायम रहा ।
टीप्पर हॉटेलमध्ये घुसल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान,एक जखमी   पुसद प्रतिनिधी (प्रा. अकरम शेख) पुसद/ दि.१३ पी एन कॉलेज व फार्मसी कॉलेज च्या दरम्यान असलेल्या एका जगदंबा टी सेंटर मध्ये अचानक टीप्पर घुसल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन किरकोळ जखमी झाल्याची घटना आज दिनांक १३ जून रोजो दुपारी एक वाजता घडल्याने सर्वत्र खळबळ माजली होती.           याबाबत सविस्तर सविस्तर वृत्त असे की पुसद दिग्रस मार्गावरील फुलसिंग नाईक महाविद्यालय व फार्मसी कॉलेजच्या मध्यभागात असलेल्या चौकातील नूतनताई क-हाले यांच्या घरामध्येच हॉटेल व पानठेला हा व्यवसाय चालू असताना अचानकपणे दुपारी दिग्रस रोड कडून पुसद कडे येणाऱ्या टीप्पर क्रमांक एम पी 09/जी आई  7785 ने  पोलिस ब्रेकेट तोडून हॉटेलला जबर धडक दिली त्यामध्ये पानठेला, हॉटेल चे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन हॉटेल समोर असलेल्या स्कुटी क्रमांक एम एच 29/बी एल  5110 क्रमांकाच्या ॲक्टिवा गाडीला जबर धडक बसल्याने दुचाकीस्वार जखमी झाला असून त्यांना खाजगी दवाखान्यांमध्ये उपचारासाठी भरती केले  तर घर मालक तथा हॉटेलचे मालक असलेल्या नूतनताई क-हाळे यांनी हा प्रत्यक्