मुख्य सामग्रीवर वगळा
अतिरीक्त गोडाऊन घेऊन तुर खरेदीचा वेग वाढवा खासदार भावनाताई गवळी यांच्या प्रशासनाला सुचना






गोडाऊन नसल्यामुळे तुर, चना खरेदीचा वेग अत्यंत कमी झाला आहे. या संदर्भात शेतक-यांच्या तक्रारी प्राप्त झाल्यामुळे दारव्हा येथे सर्व अधिका-यांची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत तातडीने गोडाऊन भाड्याने घेऊन तुर, चना खरेदीचा वेग वाढविण्याची सुचना खासदार भावनाताई गवळी यांनी अधिका-यांना दिली.




दारव्हा परीसरातील 4 हजार 900 शेतक-यांनी तुर, चना विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे. नाफेड ने मात्र फक्त 715 शेतक-यांजवळील  माल खरेदी केला. उपस्थित अधिका-यांनी गोडाऊन नसल्यामुळे खरेदी मध्ये उशीर होत असल्याचे स्पष्टीकरण दिले. दरम्यान तातडीने गोडाऊन घेऊन शेतक-यांजवळील तुर, चना खरेदी करण्याच्या सुचना खासदार भावनाताई गवळी यांनी दिल्या. याशिवाय कापसाच्या खरेदी मध्ये सुध्दा सर्व शेतक-यांची नोंदणी तसेच कापसाची खरेदी करुन तातडीने चुकारे देण्याचे सांगण्यात आले. दारव्हा परीसरात जीन ची संख्या कमी असल्यामुळे तसेच नेर येथे एकही जीन नसल्याची माहिती देण्यात आली. या संदर्भात जीन वाढविण्याची तसेच शेतक-यांना सुविधा उपलब्ध करुन देण्याची सुचना देण्यात आली.  खरीप हंगाम सुरु झाला आहे. शेतक-यांना आता पैशाची अत्यंत गरज आहे. त्यामुळे प्रामुख्याने सरकारी यंत्रनेने शेती विषयावर लक्ष केन्द्रीत करावे. शेती उद्योगाला सुरक्षीत करणे ही काळाची गरज असल्याचे  खासदार भावनाताई गवळी यांनी सांगीतले. दारव्हा तालुक्यासाठी 50 बेडचे कोविड हेल्थ सेंटर सुरु झाले आहे. याठिकाणी एक व्यक्ती कोरोना पॉझीटीव्ह आढळला आहे. हजारो नागरीक क्वॉरेंन्टाईन करण्यात आले. मात्र डॉक्टर, परीचारीका तसेच इतर कर्मचा-यांसाठी फक्त 10 पीपीई किट उपलब्ध असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे या किट्स उपलब्ध करण्याच्या सुचना खासदार भावनाताई गवळी यांनी प्रशासनाला दिल्या. कोरोना पासून बचाव करण्यासाठी होमिओपॅथीक औषधी आर्सेनिक अल्बम 30 उपयुक्त असल्याचे आयुष मंत्रालयाने सांगीतले आहे. त्यामुळे नगर पालिकेने आपल्या उत्पन्नातून नागरीकांना या औषधीचे वाटप करावे असे सुचविण्यात आले. उपस्थित अधिका-यांना सुध्दा खासदार भावनाताई गवळी यांनी आर्सेनिक अल्बमचे वाटप केले. यावेळी उपविभागीय अधिकारी इब्राहीम चौधरी, तहसिलदार संजय जाधव, गट विकास अधिकारी राजीव शिंदे, तालुका कृषी अधिकारी श्री. थोरात, नगर परीषदेचे मुख्याधिकारी श्री. गोहाड, तालुका आरोग्य अधिकारी गजानन खारोडे यांच्यासह पोलिस, उपनिबंधक, वन कार्यालयासह विविध शासकीय विभागाचे अधिकारी, शिवसेनेचे स्नेहल भाकरे, नितीन माकोडे, यवतमाळ शहर प्रमुख पिंटु बांगर उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दाते महीला बँक वाचवण्यासाठी महिला सहकारी बँक कृती समिती यवतमाळ ची संघर्ष परिषद

दाते महीला बँक वाचवण्यासाठी महिला सहकारी बँक कृती समिती यवतमाळ ची संघर्ष परिषद यवतमाळ येथील बाबाजी दाते महीला बँक मध्ये अनेक खातेदार, ठेवीदार यांचे पैसे आहेत अनेकांच्या खूप समस्या आहेत. पण कायद्याने आपण आपले पैसे कसे काढू शकतो यासाठी आज संघर्ष परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी मुंबई येथून विश्वास उटगी यांना आमंत्रित करण्यात आले होते. विश्वास उटगी हे माजी सचिव ऑल इंडिया बँक फेडरेशन आहेत. ज्या बँका डुबले आहेत त्या बँकांमधील खातेदारांना आपले पैसे काढण्यासाठी मार्गदर्शन करतात. कायद्याने सल्ला देतात. यासाठी ते मार्गदर्शन करतात. यासाठी आज संघर्ष परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या संघर्ष परिषदेमध्ये हजाराच्या वर पीडित खातेदार, ठेवीदार सहभागी झाले होते .या संघर्ष परिषदेमध्ये येणाऱ्या समोरच्या काळात लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, कर्जदार ,संचालक यांच्या घरासमोर डफडे वाजवा आंदोलन ,रिझर्व्ह बँकेसमोर धरणे, कायदेशीर मार्गासाठी उच्च न्यायालयात धाव ,अशा अनेक आंदोलनात्मक विषय घेऊन विविध समित्यांचे गठन करण्यात आले. यावेळी नितीन बोदे, राजू पडगिलवार, सुनील पुनवटकर, शैलेश काळबांडे, पिसाळकर ...

शिवशक्ती महाविद्यालय बाभुळगाव वतीने आयोजित "तीस दिवसीय राज्यस्तरीय व्यक्तिमत्व विकास प्रमाणपत्र कोर्स" संपन्न

 शिवशक्ती महाविद्यालय बाभुळगाव वतीने आयोजित "तीस दिवसीय राज्यस्तरीय व्यक्तिमत्व विकास प्रमाणपत्र कोर्स" संपन्न यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव येथील शिवशक्ती कला व वाणिज्य महाविद्यालय येथे अर्थशास्त्र विभाग आणि ग्रंथालय व ज्ञान संसाधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने तीस दिवसीय राज्यस्तरीय व्यक्तिमत्व विकास प्रमाणपत्र कोर्सचे आयोजन दि. 15 एप्रिल ते 15 मे 2021 दरम्यान आभासी पद्धतीने करण्यात आले होते. या कोर्सचा समारोपीय कार्यक्रम दि. 16 मे 2021 रोजी संपन्न झाला. या सोहळ्याचे अध्यक्ष सन्माननीय प्रा. बाळासाहेब धांदे व्यवस्थापक, शिवशक्ती शिक्षण संस्था, कोठा हे होते तर विशेष अतिथी म्हणून डॉ. मोहन खेरडे, संचालक, ज्ञान संसाधन केंद्र, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती हे होते. तर प्रमुख उपस्थिती म्हणून प्रा. डॉ. कविता तातेड अणे महिला महाविद्यालय यवतमाळ, डॉ. शशिकांत वानखेडे ग्रंथपाल, भारती महाविद्यालय आर्णी आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दीपक कोदूरवार हे होते. याप्रसंगी मान्यवरांनी व्यक्तिमत्व विकास प्रमाणपत्र कोर्स कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीत विद्यार्थ्यांना नवचेतना, नवउमेद...
जस्टिस नरीमन पर क्रिमिनल केस करने वाले रशीद खान और अन्य के समर्थन में सुप्रिम कोर्ट के इतिहास में सबसे जादा वकीलों का वकालतनामा. रिटायर्ड जस्टिस रंजन गोगोई की अपराधिक साजिश उजागर सुप्रिम कोर्ट के जस्टिस रोहींटन नरीमन और विनीत सरण पर केस करने वाले रशीद खान पठाण, ऍड. निलेश ओझा और ऍड. विजय कुर्ले के समर्थन में सुप्रिम कोर्ट के हजारो वकीलो ने अपना समर्थन दिया है. ऑल इंडिया एस. सी., एस. टी एंड मायनॉरिटि लॉयर्स असोसिएशन, सुप्रिम कोर्ट एंड हाई कोर्टस लिटीगंटस असोसिएसन, इंडियन बार असोसिएशन, मानव अधिकार सुरक्षा परीषद ने लिखित रुपमे चीफ जस्टिस ऑफ़ इंडिया श्री. शरद बोबडे, राष्ट्रपती श्री. रामनाथ कोविद, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को पत्र लिखकर दोषी जजेस रोहिंटन नरीमन, विनीत सरण, अनिरुद्ध बोस, रिटायर्ड जस्टिस दीपक गुप्ता और वकील सिद्धार्थ लूथरा, मिलिंद साठे, कैवान कल्यानीवाला के खिलाफ एफ. आय. आर. (FIR) दर्ज करने, सीबीआय (CBI) को जाच आदेश देने तथा इन जजेस को जाच पूरी होने तक सुप्रीम कोर्ट की किसी भी कारवाई में भाग लेने की अनुमति नहीं देने की मांग की है. ज्ञात हो की इससे पहले भी 10 जनवरी 2020 क...