यवतमाळ जिल्ह्यात आता संचारबंदीची वेळ रात्री 9 ते सकाळी 5 वाजेपर्यंत
यवतमाळ, दि. 31 :
महाराष्ट्र राज्यात टाळेबंदीची मुदत 30 जून 2020 च्या मध्यरात्रीपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांनी यवतमाळ जिल्ह्याकरीता टाळेबंदीचा कालावधी 30 जूनच्या मध्यरात्रीपर्यंत वाढविण्याचे आदेश दिले आहे. तसेच 31 मे 2020 च्या मुख्य सचिवांच्या आदेशातील मार्गदर्शक सुचनेनुसार टाळेबंदीच्या अनुषंगाने यवतमाळ जिल्ह्यातील दुकाने व इतर बाबी सुरू ठेवण्याबाबत स्वतंत्र मार्गदर्शक सुचना निर्गमीत करण्यात येतील. तोपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या 20 मे 2020 च्या आदेशात नमुद केल्यानुसार दुकाने व इतर बाबी सुरू राहतील.
यवतमाळ जिल्ह्यात आता रात्री 9 ते सकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात येत आहे. सदर कालावधीत कोणीही विनाकारण बाहेर फिरू नये. मात्र यामधून अत्यावश्यक सेवेकरीता नेमण्यात आलेले अधिकारी / कर्मचारी यांना व वैद्यकीय कारणास्तव रुग्ण व त्यांच्यासोबत असलेले नातेवाईक यांना मुभा राहील. सदर वेळेत विनाकारण फिरतांना आढळल्यास अशा व्यक्तिंच्या विरोधात कलम 144 अन्वये कारवाई करण्यात येईल. तसेच घराच्या बाहेर पडतांना मास्कचा वापर व सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करावे. दुकानात एकाच वेळी पाचपेक्षा जास्त व्यक्ती राहणार नाही, याची खबरदारी घ्यावी. असे आढळल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तसेच घरातील 60 वर्षांवरील व्यक्ती आणि 10 वर्षांखालील मुलांची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी केले आहे.
वरील आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम 1897, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 आणि भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 व इतर संबंधित कायदे आणि नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी यांच्या आदेशात नमुद आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा