मुख्य सामग्रीवर वगळा

पद्मभूषण डॉ विजय भटकर यांचे मार्गदर्शन नविन शैक्षणिक धोरण,कोविड १९ मुळे पालक आणि विद्यार्थ्यांची द्विधा मनस्थिती

पद्मभूषण डॉ विजय भटकर यांचे मार्गदर्शन नविन शैक्षणिक धोरण,कोविड १९ मुळे पालक आणि विद्यार्थ्यांची द्विधा मनस्थिती


पुसद अर्बन बँकेचा उपक्रम


नुकतेच केंद्रशासनाने नवे शैक्षणिक धोरण जाहीर केले आहे.तर दुसरीकडे कोरोनामुळे  अद्याप शाळा सुरू न झाल्याने पालक व विद्यार्थी द्विधा मनस्थितीत आहे. गावपातळीपासून ते महानगरांमध्ये सारखीच परिस्थिती असल्याचे लक्षात आल्यानंतर अत्यंत महत्वाच्या या विषयावर सर्वांना योग्य मार्गदर्शन मिळावे या हेतूने पुसद अर्बन कॉ ऑप बँकेचे अध्यक्ष शरद मैंद यांच्या संकल्पनेतुन व बँकेच्या सामाजिक उपक्रमातुन सुपर कॉम्प्युटर चे जनक , पदमभूषण ,नालंदा विश्वविद्यापीठाचे कुलपती व पंतप्रधानांच्या सायंटिफिक ऍडव्हायजरी कमेटीचे सदस्य डॉ विजय भटकर यांचे नविन शैक्षणिक धोरण, कोविड १९ मुळे पालक आणि विद्यार्थ्यांची द्विधा मनस्थिती या विषयावर रविवार ९ ऑगस्ट २०२० रोजी दुपारी ४.३० वाजता भव्य वेबिनार चे आयोजन केले आहे. तसेच अमरावती तथा नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मुरलीधर चांदेकर, डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला चे कुलगुरु डॉ विलास भाले, डायलॉग इंडिया न्युज पेपर दिल्ली चे संपादक अनुज अग्रवाल, बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अविनाश वानखेडे तसेच उन्नत भारत अभियान च्या अमरावती विभागच्या एडवायजर डॉ अर्चना बारब्दे हे वेबिनार मध्ये पॅनलिस्ट म्हणून जुळणार आहेत. यापूर्वी २६ जुलै २०२० रोजी डॉ अविनाश गावंडे यांचा COVID -19 अद्यावत माहिती, जवाबदाऱ्या व उपाय तसेच 2 ऑगस्ट रोजी मानसोपचारतज्ञ   डॉ मिलिंद आपटे सायकॉलॉजिस्ट यांचा COVID मुळे सामान्य जनतेच्या मानसिकतेवर झालेला परिणाम व उपाय या विषयावर  बँकेतर्फे आयोजित वेबिनारला प्रचंड प्रतिसाद लाभला होता हे येथे उल्लेखनीय.

सदर व्हेबिनर झूम अँप सह शरद मैंद फेस बुक पेजवर दिसणार आहे. विद्यार्थी, पालक, शिक्षकांसह सर्वांसाठी उपयुक्त अश्या या वेबिनार चा जास्तीत जास्त संख्येने लाभ घेण्याचे आवाहन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद व संचालक मंडळ यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दाते महीला बँक वाचवण्यासाठी महिला सहकारी बँक कृती समिती यवतमाळ ची संघर्ष परिषद

दाते महीला बँक वाचवण्यासाठी महिला सहकारी बँक कृती समिती यवतमाळ ची संघर्ष परिषद यवतमाळ येथील बाबाजी दाते महीला बँक मध्ये अनेक खातेदार, ठेवीदार यांचे पैसे आहेत अनेकांच्या खूप समस्या आहेत. पण कायद्याने आपण आपले पैसे कसे काढू शकतो यासाठी आज संघर्ष परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी मुंबई येथून विश्वास उटगी यांना आमंत्रित करण्यात आले होते. विश्वास उटगी हे माजी सचिव ऑल इंडिया बँक फेडरेशन आहेत. ज्या बँका डुबले आहेत त्या बँकांमधील खातेदारांना आपले पैसे काढण्यासाठी मार्गदर्शन करतात. कायद्याने सल्ला देतात. यासाठी ते मार्गदर्शन करतात. यासाठी आज संघर्ष परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या संघर्ष परिषदेमध्ये हजाराच्या वर पीडित खातेदार, ठेवीदार सहभागी झाले होते .या संघर्ष परिषदेमध्ये येणाऱ्या समोरच्या काळात लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, कर्जदार ,संचालक यांच्या घरासमोर डफडे वाजवा आंदोलन ,रिझर्व्ह बँकेसमोर धरणे, कायदेशीर मार्गासाठी उच्च न्यायालयात धाव ,अशा अनेक आंदोलनात्मक विषय घेऊन विविध समित्यांचे गठन करण्यात आले. यावेळी नितीन बोदे, राजू पडगिलवार, सुनील पुनवटकर, शैलेश काळबांडे, पिसाळकर ...
जस्टिस नरीमन पर क्रिमिनल केस करने वाले रशीद खान और अन्य के समर्थन में सुप्रिम कोर्ट के इतिहास में सबसे जादा वकीलों का वकालतनामा. रिटायर्ड जस्टिस रंजन गोगोई की अपराधिक साजिश उजागर सुप्रिम कोर्ट के जस्टिस रोहींटन नरीमन और विनीत सरण पर केस करने वाले रशीद खान पठाण, ऍड. निलेश ओझा और ऍड. विजय कुर्ले के समर्थन में सुप्रिम कोर्ट के हजारो वकीलो ने अपना समर्थन दिया है. ऑल इंडिया एस. सी., एस. टी एंड मायनॉरिटि लॉयर्स असोसिएशन, सुप्रिम कोर्ट एंड हाई कोर्टस लिटीगंटस असोसिएसन, इंडियन बार असोसिएशन, मानव अधिकार सुरक्षा परीषद ने लिखित रुपमे चीफ जस्टिस ऑफ़ इंडिया श्री. शरद बोबडे, राष्ट्रपती श्री. रामनाथ कोविद, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को पत्र लिखकर दोषी जजेस रोहिंटन नरीमन, विनीत सरण, अनिरुद्ध बोस, रिटायर्ड जस्टिस दीपक गुप्ता और वकील सिद्धार्थ लूथरा, मिलिंद साठे, कैवान कल्यानीवाला के खिलाफ एफ. आय. आर. (FIR) दर्ज करने, सीबीआय (CBI) को जाच आदेश देने तथा इन जजेस को जाच पूरी होने तक सुप्रीम कोर्ट की किसी भी कारवाई में भाग लेने की अनुमति नहीं देने की मांग की है. ज्ञात हो की इससे पहले भी 10 जनवरी 2020 क...

जिल्ह्यात २ जून पासून अत्यावश्यक सेवेसोबतच इतर दुकानेही सकाळी ७ ते २ पर्यंत चालू ठेवण्यास परवानगी ; जिल्हाधिकारी यांचे नवीन आदेश जारी

 जिल्ह्यात २ जून पासून अत्यावश्यक सेवेसोबतच इतर दुकानेही सकाळी ७ ते २ पर्यंत चालू ठेवण्यास परवानगी ; जिल्हाधिकारी यांचे नवीन आदेश जारी यवतमाळ जिल्ह्यात अत्यावश्यक सेवेसोबत इतर सेवेची दुकाने २ जून पासून १५  जून सकाळी ७ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली असून सदर दुकाने सकाळी ७ ते २ वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील. केवळ कृषिशी संबंधित दुकाने 3 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. तसेच अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता इतर दुकाने शनिवार आणि रविवार बंद राहतील, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी अमोल येडगे यांनी सोमवारी दिले आहेत.  ब्रेक दि चेन अंतर्गत घालून दिलेले निर्बंध दिनांक ०१ जून, २०२१ रोजी जश्याच्या तश्या लागू राहणार असून केवळ अत्यावश्यक सेवेची दुकाने सकाळी ७.०० ते सकाळी ११.०० वाजेपर्यंत सर्व निर्बंधांसाह  सुरु राहतील. *2 जून पासून सुरू असलेल्या सेवा*  १. सर्व किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, दुध डेअरी, बेकरी, मिठाई इ. खाद्य पदार्थाची दुकाने (ज्यामध्ये चिकन,मटन, मच्छी आणि अंडयांची दुकाने) आठवडयाची सातही दिवस सकाळी ७.०० ते दु...