पहापळ येथील राहुल वऱ्हाडे जनसंज्ञापन व पत्रकारीता पदवी उत्तीर्ण
पांढरकवडा: महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक द्वारा गोपिकाबाई सिताराम गावंडे महाविद्यालय उमरखेड येथे केळापुर तालुक्यातील पहापळ येथील राहुल वऱ्हाडे या युवकाने जनसंज्ञापन व पत्रकारीता पदवी करीता २०१७ मध्ये प्रवेश घेतला या वर्षी २०२० मध्ये तृतीय वर्षात जनसंज्ञापन व पत्रकारीता पदवी राहुल वऱ्हाडे हे प्रथम श्रेणीत ६४.१३ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. पहापळ येथील सर्वसामान्य परिवारातील राहुल वऱ्हाडे शिक्षणासोबत सामाजिक कार्यात सतत अग्रसेर राहते. या वर्षी कृषी विद्यालय कोंघारा येथून कृषी तंत्र पदविका मधे यश संपादन केले असून आता जनसंज्ञापन व पत्रकारीता पदवी मध्ये पन यश संपादन केले आहे. ग्रामीण भागातून पत्रकारीतेची पदवी प्राप्त केल्या बद्दल राहुलचे सर्व क्षेत्रातून कौतूक होत आहे. राहूल ने आपल्या यशाचे श्रेय वडील संजय वऱ्हाडे व आई दिपमाला वऱ्हाडे तसेच शिक्षकवृंद तथा मार्गदर्शकांना दिले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा