मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

दाते महीला बँक वाचवण्यासाठी महिला सहकारी बँक कृती समिती यवतमाळ ची संघर्ष परिषद

दाते महीला बँक वाचवण्यासाठी महिला सहकारी बँक कृती समिती यवतमाळ ची संघर्ष परिषद यवतमाळ येथील बाबाजी दाते महीला बँक मध्ये अनेक खातेदार, ठेवीदार यांचे पैसे आहेत अनेकांच्या खूप समस्या आहेत. पण कायद्याने आपण आपले पैसे कसे काढू शकतो यासाठी आज संघर्ष परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी मुंबई येथून विश्वास उटगी यांना आमंत्रित करण्यात आले होते. विश्वास उटगी हे माजी सचिव ऑल इंडिया बँक फेडरेशन आहेत. ज्या बँका डुबले आहेत त्या बँकांमधील खातेदारांना आपले पैसे काढण्यासाठी मार्गदर्शन करतात. कायद्याने सल्ला देतात. यासाठी ते मार्गदर्शन करतात. यासाठी आज संघर्ष परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या संघर्ष परिषदेमध्ये हजाराच्या वर पीडित खातेदार, ठेवीदार सहभागी झाले होते .या संघर्ष परिषदेमध्ये येणाऱ्या समोरच्या काळात लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, कर्जदार ,संचालक यांच्या घरासमोर डफडे वाजवा आंदोलन ,रिझर्व्ह बँकेसमोर धरणे, कायदेशीर मार्गासाठी उच्च न्यायालयात धाव ,अशा अनेक आंदोलनात्मक विषय घेऊन विविध समित्यांचे गठन करण्यात आले. यावेळी नितीन बोदे, राजू पडगिलवार, सुनील पुनवटकर, शैलेश काळबांडे, पिसाळकर ...

आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयास क्रांतीसुर्य बिरसा मुंडाची भव्य प्रतीमा भेट

आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयास क्रांतीसुर्य बिरसा मुंडाची भव्य प्रतीमा भेट        पुसद : महानायक धरतीआबा बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त पुसद आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय पुसद येथे नवनियुक्त पुसद आदिवासी विकास समिती अध्यक्ष तथा आदिवासी युवा परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुनील ढाले यांच्या तर्फे आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयास भगवान बिरसा मुंडा यांच्या भव्य प्रतिमेची भेट देण्यात आली. बिरसाचे विचार समस्त युवकांनी अंगीकारून वंचितांना न्याय देण्याचे काम करावे असे प्रतिपादन भेट सोहळ्याचे अध्यक्ष आदिवासी सेवक रामकृष्ण चौधरी सर , जी प सदस्य गजानन उघडे , वसंता  चिरमाडे , पुंडलिक  टारफे , श्रीकांत चव्हाण , राज्य संघटक जीवन फोपसे , जिल्हा उपाध्यक्ष संतोष गारुळे , तालुकाध्यक्ष गजानन टारफे , कर्मचारी संघटनेचे तालुका सचीव संदेश पांडे , आ.विकास परिषदेचे सचिव सुरेश बोके , श्री खूपसे , जयवंत भुरके , तुकाराम भुरके , समाधान टारफे , गंगाराम काळे साहेब , रामदास शेळके , विजय टारफे , दत्ता भडंगे , दशरथ भुरके , समाधान चोंढकर , हनुमान गोदमले , भगवान सुरोशे , सुरेश पित्रे , बालाजी शे...

पुसदच्या वीज वितरण विभागाच्या हलगर्जीपणाचा वीज ग्राहकांना फटका, बकरी ईदच्या दिवशीही वारंवार वीज पुरवठा खंडीत

पुसदच्या वीज वितरण विभागाच्या हलगर्जीपणाचा वीज ग्राहकांना फटका, बकरी ईदच्या दिवशीही वारंवार वीज पुरवठा खंडीत  प्रतिनिधी/पुसद गेल्या दोन दिवसापासून पुसद तालुक्यात पावसाची हजेरी लागत आहे. अशातच वीज पुरवठा देखील वारंवार खंडित होत आहे. गेल्या दोन दिवसापासून गोविंदनगर, काकडदाती अभियांत्रिकी महाविद्यालय समोरील परिसर श्रीरामपूरसह आदी भागामध्ये वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे. पुसद शहरातील व आजूबाजूच्या ग्रामपंचायतीमध्ये राहणाऱ्या मुस्लिम बांधवांना तर बकरी ईदचा दिवस विजेविना व अंधारातच साजरी करण्याची वेळ येत आहे.यामुळे वीज ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून वीज वितरण विभागाच्या हलगर्जीपणाकडे वरिष्ठांनी लक्ष केंद्रित करण्याची मागणी ग्राहकाकडून आता होत आहे. पुसदच्या विज वितरण विभागाचे अभियंता यांच्याकडून नियोजनशून्य कारभाराचा वीज ग्राहकांना फटका बसत आहे. पुसद शहरातील व ग्रामीण भागात पावसाळ्यापूर्वी कामाचा विसर पडल्यामुळे अनेक ठिकाणी डीपी जवळाल्याच्या व तार तुटल्याच्या घटना घडत आहे. वीज वितरण विभागाचे अभियंताकडून वीज वितरण विभागाने नियुक्त केलेल्या त्या ठेकेदाराला जाब सुद्धा विचारल्या...

महाराष्ट्रातील लोकशाही वाचवा दिन, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

महाराष्ट्रातील लोकशाही वाचवा दिन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने यवतमाळ:- आज यवतमाळ महाराष्ट्रातील लोकशाही वाचवा दिन म्हणून स्थानीक एलआयसी चौकात, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा जिल्हा महामंत्री (संघटन) राजू पडगिलवार, शहराध्यक्ष प्रशांत यादव पाटील यांच्या नेतृत्वात निदर्शने करण्यात आली.  महाराष्ट्र विधिमंडळाचे दोन दिवसाचे अधिवेशन सुरू होणार आहे.परंतु हे अधिवेशन म्हणजे लोकशाहीची क्रूर थट्टाच ठरणार आहे. कारण राज्यासमोरील कोणत्याही महत्त्वाच्या प्रश्नाची चर्चा या अधिवेशनात होणार नाही. विधिमंडळ सदस्यांचे घटनेने दिलेले अधिकार प्रश्न  विचारणे, स्थगन प्रस्ताव देणे, लक्षवेधी सूचना मांडणे इत्यादी व्यपगत केले आहे. जनतेच्या प्रश्नांना उत्तर द्यायला हे सरकार घाबरते हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आजचा 5 जुलै चा हा दिवस महाराष्ट्रातील लोकशाही वाचवा दिन म्हणून पाळला आहे.  लोकशाही वाचली पाहिजे, ठाकरे सरकारचा आघाडी सरकारचा निषेध करत आंदोलन करण्यात आले.  .   यावेळी जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा, जिल्हा महामंत्री (सघटंन)राजू पडगिलवार, शहराध्यक्ष प्रशांत यादव ...

जिल्ह्यात सर्व व्यवहार नियमितपणे सुरू करण्यास दिली जिल्हाधिकारी यांनी परवानगी; जिल्हयाचा समावेश श्रेणी एकमध्ये

 *जिल्ह्यात सर्व व्यवहार नियमितपणे  सुरू करण्यास दिली जिल्हाधिकारी यांनी परवानगी*  *जिल्हयाचा समावेश श्रेणी एकमध्ये* *लग्न व अंथविधीसाठी 50  लोकांच्या उपस्थितीस परवानगी* *शासकीय कार्यलये 100 टक्के क्षमतेने सुरू* *कोविड नियमांचे पालन तसेच दुकाने व आस्थापना चालकास व कर्मचाऱ्यांना कोविड चाचणी बंधनकारक* यवतमाळ, दि. 6 जून :    शासनाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे यवतमाळ जिल्ह्याचा समावेश श्रेणी -1 मध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी  यवतमाळ जिल्ह्याकरीता 7 जून 2021 पासून ब्रेक दि चेन अंतर्गत घालून देण्यात आलेले निर्बंध शिथिल केले असून सर्वच बाबी नियमितपणे सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे.  अत्यावश्यक सेवेंची दुकाने व अत्यावश्यक सेवा तसेच इतर दुकाने व सेवा  नियमितपणे सुरु राहतील. तथापि अत्यावश्यक सेवेंच्या व इतर आस्थापना धारकांनी दुकानात नागरिकांची होणारी गर्दी कमी करण्याच्या दृष्टीने जास्तीत जास्त होम डिलेव्हरीद्वारे वस्तूंचा पुरवठा करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. त्यादृष्टीने आस्थापना धारकांनी स्वत:चे व्हॉटसॲप नंबर दुकाना...

जिल्ह्यात २ जून पासून अत्यावश्यक सेवेसोबतच इतर दुकानेही सकाळी ७ ते २ पर्यंत चालू ठेवण्यास परवानगी ; जिल्हाधिकारी यांचे नवीन आदेश जारी

 जिल्ह्यात २ जून पासून अत्यावश्यक सेवेसोबतच इतर दुकानेही सकाळी ७ ते २ पर्यंत चालू ठेवण्यास परवानगी ; जिल्हाधिकारी यांचे नवीन आदेश जारी यवतमाळ जिल्ह्यात अत्यावश्यक सेवेसोबत इतर सेवेची दुकाने २ जून पासून १५  जून सकाळी ७ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली असून सदर दुकाने सकाळी ७ ते २ वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील. केवळ कृषिशी संबंधित दुकाने 3 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. तसेच अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता इतर दुकाने शनिवार आणि रविवार बंद राहतील, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी अमोल येडगे यांनी सोमवारी दिले आहेत.  ब्रेक दि चेन अंतर्गत घालून दिलेले निर्बंध दिनांक ०१ जून, २०२१ रोजी जश्याच्या तश्या लागू राहणार असून केवळ अत्यावश्यक सेवेची दुकाने सकाळी ७.०० ते सकाळी ११.०० वाजेपर्यंत सर्व निर्बंधांसाह  सुरु राहतील. *2 जून पासून सुरू असलेल्या सेवा*  १. सर्व किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, दुध डेअरी, बेकरी, मिठाई इ. खाद्य पदार्थाची दुकाने (ज्यामध्ये चिकन,मटन, मच्छी आणि अंडयांची दुकाने) आठवडयाची सातही दिवस सकाळी ७.०० ते दु...

शिवशक्ती महाविद्यालय बाभुळगाव वतीने आयोजित "तीस दिवसीय राज्यस्तरीय व्यक्तिमत्व विकास प्रमाणपत्र कोर्स" संपन्न

 शिवशक्ती महाविद्यालय बाभुळगाव वतीने आयोजित "तीस दिवसीय राज्यस्तरीय व्यक्तिमत्व विकास प्रमाणपत्र कोर्स" संपन्न यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव येथील शिवशक्ती कला व वाणिज्य महाविद्यालय येथे अर्थशास्त्र विभाग आणि ग्रंथालय व ज्ञान संसाधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने तीस दिवसीय राज्यस्तरीय व्यक्तिमत्व विकास प्रमाणपत्र कोर्सचे आयोजन दि. 15 एप्रिल ते 15 मे 2021 दरम्यान आभासी पद्धतीने करण्यात आले होते. या कोर्सचा समारोपीय कार्यक्रम दि. 16 मे 2021 रोजी संपन्न झाला. या सोहळ्याचे अध्यक्ष सन्माननीय प्रा. बाळासाहेब धांदे व्यवस्थापक, शिवशक्ती शिक्षण संस्था, कोठा हे होते तर विशेष अतिथी म्हणून डॉ. मोहन खेरडे, संचालक, ज्ञान संसाधन केंद्र, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती हे होते. तर प्रमुख उपस्थिती म्हणून प्रा. डॉ. कविता तातेड अणे महिला महाविद्यालय यवतमाळ, डॉ. शशिकांत वानखेडे ग्रंथपाल, भारती महाविद्यालय आर्णी आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दीपक कोदूरवार हे होते. याप्रसंगी मान्यवरांनी व्यक्तिमत्व विकास प्रमाणपत्र कोर्स कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीत विद्यार्थ्यांना नवचेतना, नवउमेद...

ब्रेक द चेन' अंतर्गत जिल्ह्यासाठी मार्गदर्शक सुचना जारी ; 1 मे पर्यंत संचारबंदी लागू

  द चेन' अंतर्गत जिल्ह्यासाठी मार्गदर्शक सुचना जारी ; 1 मे पर्यंत संचारबंदी लागू यवतमाळ : 14 एप्रिल राज्यात 14 एप्रिलच्या रात्री 8 वाजतापासून 1 मे रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत 'ब्रेक द चेन' अंतर्गत मार्गदर्शक सुचना निर्गमित केल्या आहेत. या कालावधीत कलम 144 (संचारबंदी) लागू करण्यात आली आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी अमोल येडके यांनी जिल्ह्याकरीता आदेश निर्गमित केले आहे.             संचारबंदीची अंमलबजावणी : संचारबंदीच्या कालावधी कोणत्याही व्यक्तिस अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर पडता येणार नाही. अत्यावश्यक सेवेमध्ये समाविष्ट असलेल्या बाबी वगळता इतर सर्व आस्थापना, सार्वजनिक ठिकाणे, उपक्रमे, सेवा बंद राहतील. अत्यावश्यक सेवेमध्ये वर्गवारी केलेल्या सेवा व उपक्रम यांना कामकाजाच्या सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत मुभा राहील.             अत्यावश्यक सेवेमध्ये सुरू राहणा-या बाबी : रुग्णालये, डायग्नोस्टिक सेंटर, क्लिनीक, लसीकरण केंद्र, वैद्यकीय विमा कार्यालये, औषधी दुकाने व औषधी कंपन्या, औषधी व आरोग्य सेवा व औषध निर्मिती करणारे कारखाने तसेच त्य...

पहापळ येथील राहुल वऱ्हाडे जनसंज्ञापन व पत्रकारीता पदवी उत्तीर्ण

पहापळ येथील राहुल वऱ्हाडे जनसंज्ञापन व पत्रकारीता पदवी उत्तीर्ण  पांढरकवडा: महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक द्वारा गोपिकाबाई सिताराम गावंडे महाविद्यालय उमरखेड येथे केळापुर तालुक्यातील पहापळ येथील राहुल वऱ्हाडे या युवकाने जनसंज्ञापन व पत्रकारीता पदवी करीता २०१७ मध्ये प्रवेश घेतला या वर्षी २०२० मध्ये तृतीय वर्षात जनसंज्ञापन व पत्रकारीता पदवी राहुल वऱ्हाडे हे प्रथम श्रेणीत ६४.१३ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. पहापळ येथील सर्वसामान्य परिवारातील राहुल वऱ्हाडे शिक्षणासोबत सामाजिक कार्यात सतत अग्रसेर राहते. या वर्षी कृषी विद्यालय कोंघारा येथून कृषी तंत्र पदविका मधे यश संपादन केले असून आता जनसंज्ञापन व पत्रकारीता पदवी मध्ये पन यश संपादन केले आहे. ग्रामीण भागातून पत्रकारीतेची पदवी प्राप्त केल्या बद्दल राहुलचे सर्व क्षेत्रातून कौतूक होत आहे. राहूल ने आपल्या यशाचे श्रेय वडील संजय वऱ्हाडे व आई दिपमाला वऱ्हाडे तसेच शिक्षकवृंद तथा मार्गदर्शकांना दिले आहे.

वाचकांच्या मनावर अधिराज्य करणारा अवलिया लेखक

 वाचकांच्या मनावर अधिराज्य करणारा अवलिया लेखक  आज ख्यातनाम लेखक सुहास शिरवळकर उर्फ सुशींचा वाढदिवस.तसे पाहिले तर माझ्या ह्या आवडत्या लेखकाने आपला निरोप घेऊन तब्बल सतरा वर्ष झाली आहेत.पण सुहास शिरवळकरांची कुठलीही कादंबरी आजही हातात घ्या ती तितकीच फ्रेश वाटते.सुहास शिरवळकर आपल्यात नाहीत ह्यावर आज देखील विश्वास बसत नाही. सुहासजींचा वाचक वर्ग तसा तरुणांपासून तर प्रौढांपर्यंत सर्वच होता.पण प्रौढांनाही तारुण्यात नेणारे अफलातून कसब सुहासजींच्या लेखनात होते.एखाद्या चांगल्या लेखकाला शासनाद्वारे पुरस्कारांच्या बाबतीत जशी प्रेरणा मिळायला पाहिजे तशी प्रेरणा कदाचित सुहास शिरवळकरांना राज्य शासनाकडून मिळाली नसेल.कमीतकमी ते डीझर्व करीत होते तितकी तर नक्कीच नाही. पण गेल्या काही पिढ्यांच्या तरुणाईवर मात्र सुहासजींनी अनभिषिक्त राज्य केले.देवकी नावाच्या चित्रपटासाठी त्यांना राज्यशासनाचा सर्वोकृष्ठ लेखक हा सन्मान मिळाला आहे.सुहास शिरवळकरांची कुठलीही कादंबरी हातात घेतली की संपल्या शिवाय वाचकाला चैन पडत नसे.पुढे काय होणार? हा प्रश्न कादंबरी पूर्ण वाचल्याशिवाय सुटत नसे आणि हीच सुहासजींच्या लेखनाचे आण...

ह.उमर फारूक (र.अ) उर्दू हायस्कुल ची यंदा सुद्धा उत्तुंग भरारी

ह.उमर फारूक (र.अ) उर्दू हायस्कुल ची यंदा सुद्धा उत्तुंग भरारी पुसद शहरातील उर्दू माध्यमातील सुप्रसिद्ध शाळा हजरत उमर फारूक (र.अ) उर्दू हायस्कूल ने यशाची परंपरा कायम ठेवून या वर्षी सुद्धा उत्कृष्ठ 99 टक्के निकाल दिला आहे. या मध्ये कु.तजीन फिदोस समीर खान या गुणवंत विद्यार्थीनी ने 95 टक्के घेतले तर मो.फुर्कान मो.इर्फान देशमुख याने 91% घेऊन यशाची भरारी घेतली आहे. सोबतच एकूण निकाला मध्ये उच्च श्रेणीत 46 विद्यार्थी आले असून एकूण विद्यार्थ्यां मध्ये 66 विद्यार्थी हे प्रथम श्रेणीत आले आहे. व द्वितीय श्रेणीत 50 विद्यार्थी आले आहे. शाळेतील एकूण 168 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून. एकूणच निकाल 99 टक्के लागला आहे. या यशाचे श्रेय शाळेचे मुख्याध्यापक मो. वकील सर,व एजाजोद्दीन खतीब सर आणि वर्ग शिक्षक अब्दुल करीम सर,फहिमोद्दीन मलनस सर,निसार अहेमद सर तसेच सहाय्यक शिक्षक नवेद अहेमद सर,इर्फान अहेमद खान सर, नौशाद हुसैन सर, नदीम खान सर,सिमान मुद्दसिर सर, शेख इर्फान सर,अनस सर,सय्यद सलमान सर उमेर मिर्झा, मो.जुनेद सर या सर्व शिक्षकांना श्रेय जाते. तसेच शाळेतील शिक्षेत्तर कर्मचारी यांनी सुद्धा मोलाचे सहकार्य केले...

पद्मभूषण डॉ विजय भटकर यांचे मार्गदर्शन नविन शैक्षणिक धोरण,कोविड १९ मुळे पालक आणि विद्यार्थ्यांची द्विधा मनस्थिती

पद्मभूषण डॉ विजय भटकर यांचे मार्गदर्शन नविन शैक्षणिक धोरण,कोविड १९ मुळे पालक आणि विद्यार्थ्यांची द्विधा मनस्थिती पुसद अर्बन बँकेचा उपक्रम नुकतेच केंद्रशासनाने नवे शैक्षणिक धोरण जाहीर केले आहे.तर दुसरीकडे कोरोनामुळे  अद्याप शाळा सुरू न झाल्याने पालक व विद्यार्थी द्विधा मनस्थितीत आहे. गावपातळीपासून ते महानगरांमध्ये सारखीच परिस्थिती असल्याचे लक्षात आल्यानंतर अत्यंत महत्वाच्या या विषयावर सर्वांना योग्य मार्गदर्शन मिळावे या हेतूने पुसद अर्बन कॉ ऑप बँकेचे अध्यक्ष शरद मैंद यांच्या संकल्पनेतुन व बँकेच्या सामाजिक उपक्रमातुन सुपर कॉम्प्युटर चे जनक , पदमभूषण ,नालंदा विश्वविद्यापीठाचे कुलपती व पंतप्रधानांच्या सायंटिफिक ऍडव्हायजरी कमेटीचे सदस्य डॉ विजय भटकर यांचे नविन शैक्षणिक धोरण, कोविड १९ मुळे पालक आणि विद्यार्थ्यांची द्विधा मनस्थिती या विषयावर रविवार ९ ऑगस्ट २०२० रोजी दुपारी ४.३० वाजता भव्य वेबिनार चे आयोजन केले आहे. तसेच अमरावती तथा नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मुरलीधर चांदेकर, डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला चे कुलगुरु डॉ विलास भाले, डायलॉग इंडिया न्युज पेपर दिल्ली चे संपादक अनु...

सेतू सुविधा केंद्र बंद असल्याने शेतकरी, विद्यार्थ्यांचे हाल; गुरुदेव युवा संघाचा आंदोलनांचा इशारा

सेतू सुविधा केंद्र बंद असल्याने शेतकरी, विद्यार्थ्यांचे हाल;  गुरुदेव युवा संघाचा आंदोलनांचा इशारा  यवतमाळ :- कोरोना प्रादुर्भावाची नावावर सेतू सुविधा केंद्र बंद केल्याने नुकताच निकाल लागलेल्या १० वि १२ वि चे विध्यार्थी व शेतकरी याना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून खासगी सेतू केंद्राकडून नागरिकांची आर्थिक लूट केल्या जात आहे. तहसील कार्यालयातील सेतू सुविधा केंद्र तातडीने सुरु करावे अशी मागणी गुरुदेव युवा संघाच्या वतीने करण्यात आली आहे.  12 वी आणि 10 वी चा निकाल लागला असल्याने विद्यार्थ्याना प्रवेश घेण्यासाठी लागणारे कागदपत्र तहसिल कार्यालय यवतमाळ  येथील आपले सरकार सेतु सुविधा केंद्र सरकारने तथा कोरोना विषाणू च्या प्रादुर्भावाने मार्च ते आजरोजी पर्यंत कोणत्याही प्रकारचे कागदपत्रे काढण्यासाठी पूर्ण पणे सेतु केंद्र बंद ठेवले असुन सरकारी सेतु सुविधा केंद्रात अल्प दरात कामे होतात आणि हेच कागदपत्र काढण्यासाठी खाजगी सेतु सुविधा केंद्रात सर्व सामाण्यांची लुट होत असून या गंभीर बाबींन विषयी शासन वा प्रशासन दुर्लक्ष करून खाजगी सेतु सुविधा केंद्र सुरू ठेवुन सरकारी सेतु सुविधा के...

शेतकऱ्यांसारखी सकारात्मकता कोरोनाच्या भयावर प्रभावी उपाय- डॉ मिलिंद आपटे

शेतकऱ्यांसारखी सकारात्मकता कोरोनाच्या भयावर प्रभावी उपाय- डॉ मिलिंद आपटे  पुसद- आज कोरोना मुळे प्रत्येक क्षेत्रात अनिश्चितता निर्माण होऊन समाजाचा प्रत्येक घटक भयग्रस्त झाला आहे.मात्र ज्याप्रमाणे दरवर्षी  शेतीत नुकसान होत असले तरी पुढच्या वर्षी पुन्हा शेतीची मशागत करून पावसाची वाट पाहणाऱ्या  शेतकऱ्यासारखी सकारात्मकता बालगल्यास  कोरोनाच्या भयावर सहज मात करता येईल असे मौलिक विचार नागपूर येथील प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ मिलिंद आपटे यांनी व्यक्त केले.  पुसद अर्बन बॅंकेचे अध्यक्ष शरद मैंद यांच्या संकल्पनेतून व बँकेच्या सामाजिक उपक्रमातुन काल   कोरोनाचा  व्यापारी ,कर्मचारी ,शेतकरी व सामान्य जनतेच्या मानसिकतेवर झालेला परिणाम व उपाय या विषयावर आयोजित  वेबिनार मध्ये मार्गदर्शन करताना ते पुढे म्हणाले की आपली सुदृढ शरीर व  प्रतिकार शक्ती टिकवुन ठेवा, शारीरिक व मानसिक धैर्य ठेवा ,नकारात्मक विचाराला टाळा, पायी जास्त चाला ,घटनेनंतर नकारात्मक चर्चा  टाळून उपायावर बोला. कोरोनाला जीवनातील विराम समजा पुढील वर्षी सर्व व्यवसाय पुन्हा एकदा भरारी घेवुन दे...

त्याग आणि बलिदानाचा सण: ईद_उल_अजहा._

_*त्याग आणि बलिदानाचा  सण:*_            _*ईद_उल_अजहा.*_  *प्रिय भारतीय बंधु आणि भगिनींनो,* *आपला भारत देश हा विविधतेने नटला आहे.इथे वेगवेगळ्या धर्माचे, पंथाचे लोक  गुण्यागोविंदाने एकत्र रहातात आणि आपले सण उत्सव आप आपल्या परीने साजरे करतात परंतु आज सुद्धा आपल्या समाजा मध्ये एकमेकांच्या सणा बद्दल गैर समज /समजुती आहे.* *याच सर्वांत जिंवत उदाहरण म्हणजे    ईद_उल_अजहा (बकरी ईद )नेमकी काय असते..? का साजरी केली जाते..? या बद्दल खूप भ्रामक संकल्पना आहे त्या दूर करून वास्तविक  ईद_उल_अजहा समजुन घेऊ या.* *मित्रांनो इस्लाम धर्मात फक्त दोनच धार्मिक सण आहे. जे पूर्ण विश्वात एकाच वेळी साजरे केले जातात एक म्हणजे ईद_उल_फित्र ( रमजान ईद)* आणि दुसरी म्हणजे *ईद_उल_अजहा ( बकरीद)आता आपल्या कडे जे बकरी ईद  म्हणतात तो वास्तविक  चुकीचा प्रकार आहे या सणाचे खरे नांव  ईद-उल -अजहा आहे .* *▪️प्रेषित इब्राहिम यांचा परिचय..?* *ऐतिहासिक तथ्यांच्या आधारे कुर्बानी परंपरेचा इतिहास 4000  वर्षां पूर्वीचा  आहे. अब्राहम नावाच्या प्रेषितांनी बु...

कोरोनाचा विविध वर्गाच्या मानसिकतेवर परिणाम व उपाय; मानसोपचार तज्ञ मिलिंद आपटे यांचे २ ऑगस्ट रोजी मार्गदर्शन- पुसद अर्बन बँकेचा उपक्रम

कोरोनाचा विविध वर्गाच्या मानसिकतेवर परिणाम व उपाय; मानसोपचार तज्ञ मिलिंद आपटे यांचे आज मार्गदर्शन- पुसद अर्बन बँकेचा उपक्रम     पुसद- कोरोना  संकटाचा  समाजातील विविध  वर्गाच्या मानसिकतेवर  परिणाम होत आहे.त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे या हेतूने पुसद अर्बन कॉ ऑप बँकेचे अध्यक्ष शरद मैंद यांच्या संकल्पनेतुन व बँकेच्या सामाजिक उपक्रमातुन  प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ तथा मार्गदर्शक मिलिंद आपटे यांचे उद्या रविवार २ऑगस्ट २०२० रोजी दुपारी ३ वाजता  कोरोनाचा व्यापारी, कर्मचारी,शेतकरी व सामान्य नागरिकांच्या मानसिकतेवर झालेला परिणाम व उपाय या विषयावर व्हेबिनारचे आयोजन केले आहे. या व्हेबिनार ला राष्ट्रवादी काँग्रेस लिगल सेल अध्यक्ष तथा म.गो.बार कौन्सिल चे सदस्य एड आशिष देशमुख, अ.भा. काँ.कमिटी चे सचिव एड.सचिन नाईक,यवतमाळ जिप च्या माजी अध्यक्ष डॉ आरती फुफाटे, विश्वनाथसिंह बयास पतसंस्थेचे अध्यक्ष निशांत बयास, चेम्बर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष सुरज डुब्बेवार, उपाध्यक्ष संतोष अग्रवाल,माजी अध्यक्ष बिपीन चिद्धरवार, प्रगतशील कास्तकार अभय गडम ,नारायण क्षीरसागर,  साप्त...

यवतमाळ, दारव्हा,पांढरकवडा, नेर, पुसद व दिग्रस येथील संचारबंदी कायम

यवतमाळ, दारव्हा,पांढरकवडा, नेर, पुसद व दिग्रस येथील संचारबंदी कायम यवतमाळ, दि. 31 : यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ, दारव्हा,पांढरकवडा, नेर, पुसद, दिग्रस शहरात व या शहरालगतच्या परिसरात 31 जुलैपर्यंत लागू करण्यात आलेली संचारबंदी पुढील आदेशापर्यंत वाढविण्यात आली आहे. जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी वरील आदेश निर्गमित केले आहे.             संचारबंदीच्या कालावधीत पुढील बाबींना मुभा देण्यात आली आहे. भाजीपाला व फळे गल्ली, कॉलनी, सोसायटीमध्ये जाऊन विक्री करण्यास सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत मुभा राहील. एका ठिकाणी बसून विक्री करता येणार नाही. दुध संकलन व दुध विक्रीला सकाळी 7 ते सकाळी 10 वाजेपर्यंत मुभा राहील. तसेच फिरते दुध विक्री या बाबीस सायंकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत मुभा राहील. पेट्रोल, डिझेल पंप सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत तसेच अत्यावश्यक सेवेकरिता 24 तास सुरू राहील.  कृषी साहित्याची, रासायनिक खत विक्री, बि-बियाणे विक्री व त्यांची गोदामे सकाळी 10 ते दुपारी 2 वाजतापर्यंत सुरू राहील. स्वस्त धान्य दुकाने सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू राहतील.  यवतमा...

संचारबंदी मध्ये तिन्ही आमदारांनी पुसद मधील गरीब गरजू जनतेला जीवनावश्यक वस्तूचे वाटप करावे.

संचारबंदी मध्ये तिन्ही आमदारांनी पुसद मधील गरीब गरजू जनतेला जीवनावश्यक वस्तूचे वाटप करावे. ए आई एम आय एम पुसद च्या वतीने निवेदनाद्वारे मागणी. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला कमी करण्याच्या उद्देशाने पुसद मधील तिन्ही आमदार मा.इंद्रिनिल नाईक, मा.डॉ. वजाहत मिर्झा, मा.ऍड.निलय नाईक यांनी यवतमाळचे जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांना विंनती करून पुसद मध्ये दिनांक २१ जुलै ते २८ जुलै पर्यंत संचारबंदी लावण्यास भाग पाडले होते. परंतु या संपूर्ण प्रक्रियेत जनतेला सहभागी न करता राजकिय आणि प्रशाकासकीय लोकांद्वारे संचार बंदी दिनांक २१ जुलै ते २८ जुलै पर्यंत करण्यात आली होती. ती संचारबंदी सुद्धा पुसद येथील गोरगरीब जनतेने खूप काटेकोरपणे पालन केली आता २९ जुलै पासून गोरगरीब जनतेला काही राहत मिळेल अशी आशा असतांना पुन्हा पुसद चे तिन्ही आमदारांनी जिल्हाधिकारी यवतमाळ यांना निवेदन देवून संचारबंदी वाढविण्यासाठी विनंती केली. परंतु या तिन्ही आमदारांनी जनतेच्या समस्यांना न पाहता ही संचार बंदी पुन्हा वाढविण्याची शिफारस केली त्यामुळे पुसद येथील गोरगरीब जनतेवर उपासमारीची वेळ आली आहे.आणि खाण्या पिण्यासाठी...

पुसद व दिग्रस शहरात 31 जुलैपर्यंत संचारबंदी

यवतमाळ दि.28 : कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने खबरदारीचा उपाय म्हणून उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या प्रस्तावानुसार जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी पुसद व दिग्रस शहरात व या शहरालगतच्या भागात 31 जुलै 2020 च्या मध्यरात्रीपर्यंत  संचारबंदी लागू केली आहे. संचारबंदीच्या कालावधीत पुढील बाबी, आस्थापना, व्यक्ती व समूहाला सुट राहील. सर्व शासकीय कार्यालये त्यांचे संपूर्ण अधिकारी व कर्मचाऱ्यांसह सुरू राहतील. शासकीय कर्मचाऱ्यांना कार्यालयीन ओळखपत्र सोबत बाळगणे आवश्यक असेल तसेच त्यांच्या वाहनांना कार्यालयात येणे व घरी जाणे याकरीता मुभा राहील. पुसद व दिग्रस शहरातील व शहरालगतच्या क्षेत्रातील संपूर्ण अत्यावश्यक सेवेची व इतर सेवेची, वस्तुंची दुकाने व बाजारपेठ संपूर्णत: बंद राहतील. सर्व शासकीय व खाजगी दवाखाने, आरोग्य कर्मचारी, वैद्यकीय रुग्णालयातील कर्मचारी, पशुवैद्यकीय दवाखाने व त्यांचे औषधालये दररोज 24 तास (24 X 7) सुरू राहतील. ऑनलाईन औषध वितरण सेवा व शासकीय, खाजगी दवाखान्यालगत असलेली औषधीविक्री दुकाने (24 X 7) सुरू राहतील. तसेच इतर ठिकाणी असलेली एकल औषधी दुकानेसुद्धा...

माहिती आयुक्त कार्यालयात अत्याधुनिक तंत्रज्ञान

माहिती आयुक्त कार्यालयात अत्याधुनिक तंत्रज्ञान Ø   नव्या सॉफ्टवेअरने जलद सुनावणी Ø   कार्यालय पेपरलेस होण्यास मदत Ø   ‘टेलिग्राम ’ वरून दररोज माहिती अमरावती, दि. 7 :  लॉकडाऊनच्या काळात राज्य माहिती आयुक्त कार्यालय अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करीत आहे. कामकाजातील सर्वात मोठा भाग असलेल्या  सुनावणी ऑनलाईन करून गती देण्यात आली आहे. याशिवाय कार्यालयीन कामकाजात तंत्रज्ञानाचा कुशलतेने उपयोग करण्यात येत आहे. अपिलाची नोटीस ते सुनावणीसाठी नवे सॉफ्टवेअर अंगीकारून प्रकरणे निकाली काढण्यात येत आहेत. या सॉफ्टवेअरच्या उपयोगामुळे येत्या काळात दररोज सुमारे 70 प्रकरणे निकाली काढण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.             राज्य माहिती आयोगाच्या अंतर्गत येणाऱ्या पाच जिल्ह्यासाठी ऑनलाईन कार्यप्रणाली तयार करण्यात आली आहे. ऑनलाईन कामकाजासाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी एक सहायक कक्ष अधिकारी नेमण्यात आला आहे. तसेच दोन कक्ष अधिकारी नियंत्रण करणार आहेत. ही प्रकरणे ऑनलाईन होण्यासाठी नव्याने विकसित करण्यात आलेल्या सॉफ्टव...