पुसदच्या वीज वितरण विभागाच्या हलगर्जीपणाचा वीज ग्राहकांना फटका, बकरी ईदच्या दिवशीही वारंवार वीज पुरवठा खंडीत
पुसदच्या वीज वितरण विभागाच्या हलगर्जीपणाचा वीज ग्राहकांना फटका, बकरी ईदच्या दिवशीही वारंवार वीज पुरवठा खंडीत
प्रतिनिधी/पुसद
गेल्या दोन दिवसापासून पुसद तालुक्यात पावसाची हजेरी लागत आहे. अशातच वीज पुरवठा देखील वारंवार खंडित होत आहे. गेल्या दोन दिवसापासून गोविंदनगर, काकडदाती अभियांत्रिकी महाविद्यालय समोरील परिसर श्रीरामपूरसह आदी भागामध्ये वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे. पुसद शहरातील व आजूबाजूच्या ग्रामपंचायतीमध्ये राहणाऱ्या मुस्लिम बांधवांना तर बकरी ईदचा दिवस विजेविना व अंधारातच साजरी करण्याची वेळ येत आहे.यामुळे वीज ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून वीज वितरण विभागाच्या हलगर्जीपणाकडे वरिष्ठांनी लक्ष केंद्रित करण्याची मागणी ग्राहकाकडून आता होत आहे.
पुसदच्या विज वितरण विभागाचे अभियंता यांच्याकडून नियोजनशून्य कारभाराचा वीज ग्राहकांना फटका बसत आहे. पुसद शहरातील व ग्रामीण भागात पावसाळ्यापूर्वी कामाचा विसर पडल्यामुळे अनेक ठिकाणी डीपी जवळाल्याच्या व तार तुटल्याच्या घटना घडत आहे. वीज वितरण विभागाचे अभियंताकडून वीज वितरण विभागाने नियुक्त केलेल्या त्या ठेकेदाराला जाब सुद्धा विचारल्या सुद्धा जात नाही हे विशेष. वीज वितरण विभागाच्या इंजिनियरकडून नियोजनशून्य कारभाराचा फटका शेतकरी वर्गाला मोठ्या प्रमाणात बसत आहे.तालुक्यातील ग्रामीण भागांमध्ये राहणाऱ्या ग्रामस्थांना भर पावसाळ्यात देखील रात्रभर अंधारात राहण्याची वेळ आली आहे. पुसद तालुक्यात थोड्याफार प्रमाणात पाऊस पडला तरी देखील विद्युत पुरवठा खंडित होत आहे. पुसदच्या वीज वितरण विभागाच्या अभियंताकडून पावसाळ्यापूर्वीचे कामे कागदावरच दाखविल्याचा आरोप वीज ग्राहकांकडून होत आहे.तर अनेक कामे कागदोपत्री दाखवून फोटोबाजी करीत असल्याचा आरोप देखील वीज ग्राहकाकडून होत आहे. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे थोड्याफार प्रमाणात पडलेल्या पावसामुळे व पाऊस पडलेला नसला तरीदेखील पुसद शहरातील व आजूबाजूच्या ग्रामीण भागात वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत आहे.यामुळे शहरात राहणाऱ्या विज ग्राहकांसह व्यापारी वर्गांना सुद्धा याचा जबर फटका बसत आहे.गेल्या दोन दिवसापासून व दि.२१ जुलै रोजीच्या बकरी ईदच्या दिवशी पुसद शहरातील व आजूबाजूच्या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये तर वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे वीज ग्राहकांच्या घरातील इलेक्ट्रॉनिक उपकरणे बिघडत असल्याच्या घटना आता समोर येत आहे. पावसाळयाला सुरूवात होऊन दोन महिने होत असतांना पुसदच्या वीज वितरण विभागाचे अभियंताकडून नियोजन शून्य कारभार पहावयास मिळत आहे.याचा फटका तालुक्यातील वीज ग्राहकांना बसत असून देखील वीज बिल भरून देखील मानसिक व इतर समस्यांना सामोरे जाण्याची वेळ येत आहे.त्यामुळे वरिष्ठांनी तात्काळ या गंभीर बाबीची दखल घेऊन पुसदच्या वीज वितरण विभागाच्या अभियंत्यांना जाब विचारण्याची मागणी ग्राहकाकडून आता होत आहे.
गेल्या दोन दिवसापासून तांत्रिक अडचण निर्माण होत आहे
काकडदाती,गोविंद नगर, अभियांत्रिकी महाविद्यालय समोरील भागात राहणाऱ्या ग्राहकांचा वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत आहे.तो तांत्रिक कारणामुळे होत आहे. गेल्या दोन दिवसापासून त्या तांत्रिक अडचणी सोडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळेच वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत आहे. तेथील समस्या सोडविण्यासाठी यवतमाळ येथे आम्ही फिडरची मागणी केली आहे.ते आल्यावरच परिसरातील ग्राहकांच्या समस्या सुटतील. तोपर्यंत वीजग्राहकांना अडचणीला सामोरे जावे लागेल.-राजपुत,सहा.अभियंता, वीज वितरण विभाग,पुसद
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा