आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयास क्रांतीसुर्य बिरसा मुंडाची भव्य प्रतीमा भेट
पुसद : महानायक धरतीआबा बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त पुसद आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय पुसद येथे नवनियुक्त पुसद आदिवासी विकास समिती अध्यक्ष तथा आदिवासी युवा परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुनील ढाले यांच्या तर्फे आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयास भगवान बिरसा मुंडा यांच्या भव्य प्रतिमेची भेट देण्यात आली. बिरसाचे विचार समस्त युवकांनी अंगीकारून वंचितांना न्याय देण्याचे काम करावे असे प्रतिपादन भेट सोहळ्याचे अध्यक्ष आदिवासी सेवक रामकृष्ण चौधरी सर , जी प सदस्य गजानन उघडे , वसंता चिरमाडे , पुंडलिक टारफे , श्रीकांत चव्हाण , राज्य संघटक जीवन फोपसे , जिल्हा उपाध्यक्ष संतोष गारुळे , तालुकाध्यक्ष गजानन टारफे , कर्मचारी संघटनेचे तालुका सचीव संदेश पांडे , आ.विकास परिषदेचे सचिव सुरेश बोके , श्री खूपसे , जयवंत भुरके , तुकाराम भुरके , समाधान टारफे , गंगाराम काळे साहेब , रामदास शेळके , विजय टारफे , दत्ता भडंगे , दशरथ भुरके , समाधान चोंढकर , हनुमान गोदमले , भगवान सुरोशे , सुरेश पित्रे , बालाजी शेळके , मोहित तडसे , ज्ञानेश्वर मेटकर , दुर्गादास ठोंबरे , सह आखील भारतीय आदिवासी युवा परिषद तथासामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.प्रकल्प कार्यालयात सहायक प्रकल्प अधिकारी अहिरे साहेब , बोरकुटे मॅडम , विस्तार अधिकारी चव्हाण साहेब , कक्ष अधिकारी श्री राऊत साहेब , चव्हाण साहेब सह प्रकल्प कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.आकर्षक भेट दिल्याबद्दल विस्तार अधिकारी चव्हाण यांनी प्रकल समिती अध्यक्ष सुनील ढाले यांचे व उपस्थितांचे आभार मानले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा