भाजपाच्या शक्तीकेंद्रप्रमुखांसह पदाधिका-यांची रविवारी बैठक,माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री व तीन विद्यमान मंत्री उपस्थित राहणार.
यवतमाळ : भारतीय जनता पार्टीच्या, यवतमाळ जिल्ह्यातील शक्तीकेंद्रप्रमुखांसह पदाधिका-यांच्या जिल्हा बैठकीचे आयोजन रविवार दि. 28 जुलै रोजी, दुपारी एक वाजता, यवतमाळ येथील आर्णी बायपास मार्गावरील समर्थ लॉनमध्ये करण्यात आले आहे. या बैठकीला माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, राज्याचे कामगार मंत्री ना. संजय कुटे, पालकमंत्री मदन येरावार, आदिवासी विकास मंत्री ना.डा. अशोक उईके, भाजपाचे विदर्भ संघटनमंत्री उपेंद्रजी, जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे, आ.निलय नाईक,आ. संजय रेड्डी बोदकुरवार, आ. राजूभाऊ तोडसाम, आ. राजेंद्र नजर्धने, माजी आ. अण्णासाहेब देशमुख पारवेकर, माजी मंत्री संजय देशमुख प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
रविवारी होणाऱ्या या बैठकीसाठी यवतमाळ जिल्हयातील सर्व शक्तीकेंद्र प्रमुख, तालुका व शहर अध्यक्ष, तालुका व शहर सरचिटणीस, जिल्हा आघाडी अध्यक्ष, नगर परिषद सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, विधानसभा विस्तारक, व जिल्हा पदाधिकाऱ्यांनी वेळेवर उपस्थित राहणे अनिवार्य आहे. असे आवाहन जिल्हा सरचिटणीस अमोल ढोणे यांनी केले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा