मुख्य सामग्रीवर वगळा

यवतमाळ ग्रामीण क्षेत्रातील अल्पसंख्यकबहुल भागाच्या विकासासाठी मुस्लिम शिष्टमंडलची पालकमंत्री सोबत विशेष चर्चा. 


सार्वजनिक रसत्यांची कामे तातडीने करण्याचे पालकमंत्रीचे निर्देश

यवतमाळ : 
यवतमाळ ग्रामीण क्षेत्रातील अल्पसंख्यक मुस्लिम बहुल भागाच्या सार्वजनिक विकासा कामे व मुख्यतः रसत्यांच्या कामांसाठी मुस्लिमबहुल भागातील जनप्रतिनिधी,सामाजिक कार्यकर्ते व राजकीय नेत्यांच्या शिष्टमण्डलाने आज 9 जुलै रोजी पालकमंत्री मदन भाऊ येरावार यांची भेट घेवून चर्चा केली.
पालकमंत्री येरावार यांच्या सोबत चर्चेच्या वेळी विशेषकर मुस्लिम बहुल ग्रामीण भागातील रसत्यांच्या दुरावस्थेवर लक्ष देण्याची मागणी करण्यात आली,या प्रसंगी पालकमंत्री यांनी सकारात्मक पावले घेत या भागातील रस्ते निर्माण करण्यासाठी रसत्यांची यादि मागितली व तब्बल 7 भागातील रसत्यांच्या कामाना मंजूर करवून देण्याचे आश्वासन दिले.या भागातील शादाब बाग, गोल्डन पार्क,नवरंग सोसायटी,गुलशन नगर,कापसे लेआऊट,रचना सोसायटी,नागसेन सोसायटी,शर्मा लेआउट येथील रसत्यांची दुरावस्था पाहता पालकमंत्रीनी सार्वजनिक बांधकाम विभागाला तातडीने या भागातील रसत्यांचे काम करण्याचे निर्देश दिले आहे.प्रतिनिधिमण्डलातील नगरसेवक जावेद अन्सारी, राष्ट्रवादी नेते तारिक साहिर व सहभागी जनप्रतिनिधिनी या भागातील विकासकामासाठी होत असलेले दुर्लक्ष व रसत्यांची दुरावस्था यावर पालक्मन्त्रीचे विशेष लक्ष वेधले असता,त्यांनी मतांचे राजकारण न करता पालकमंत्री या नात्याने अल्पसंख्यक मुस्लिम बहुल भागातील सर्वच विकास व जनउपयोगी कामे व रसत्यांचे निर्माण करण्याचे, आमदार व शासकीय निधितुन राशि उपलब्ध करवून देण्याचे ठोस आश्वासन दिले.यावेळी रस्ते व विकासकामे लिखित स्वरुपात देण्याची सूचना प्रतिनिधि मंडल व सहयोगी स्वीय सहायकाना व अधिकारिंना पालकमंत्री मदन येरावार यांनी दिली.उल्लेखनिय म्हणजे यवतमाळ ग्रामीण क्षेत्र हे वर्ष 2014 पासून नगर परिषद मध्ये समाविष्ट झालेला आहे.आधी हा क्षेत्र यवतमाळ नगर परिषदेमध्ये किंवा ग्रामपंचायत मध्ये सुद्धा समाविष्ट नव्हता,त्यामुळे मागील तीस वर्षापासून या क्षेत्राच्या विकास कामांवर  जिल्हा परिषद यवतमाळ व पंचायत समितीने कोणतीही दखल न घेता दुर्लक्ष केले,त्यामुळे हा क्षेत्र आज सार्वजनिक विकास कामापासून दूर आहे.
यवतमाळ ग्रामीनच्या मुस्लिम बहुल भागामध्ये सार्वजनिक विकास कामे झाली नसल्याने वर्तमान परिस्थिति मध्ये रसत्यांच्या नावांवर  फक्त खड्डे व नाल्याच्या नावावर डोबरे व सार्वजनिक गार्डनच्या जागांवर गाजरगवत व घानीचे साम्राज्य आहे.त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना जीवन जगणे कठिन झाले आहे.त्यामुळे आज जिल्ह्याचे पालकमंत्री कड़े  राज्याचे मुख्यमंत्री यांना आग्रह करून ग्रामीण यवतमाळच्या विकासकामासाठी प्रस्तावित डीपीआरची 
एकमुश्त रक्कम मिळवून देवून,यवतमाळ ग्रामीण भागामधील मुस्लिम बहुल क्षेत्राचे विकास कामांना प्रथम प्राधान्य देवून नगर परिषदेला व सार्वजनिक बांधकाम विभागाला या बाबत निर्देश देवून यवतमाळ ग्रामीण मधील अल्पसंख्यक भाग व नगर परिषद वाढीव क्षेत्राला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी पालकमंत्री यांना निवेदन देवून करण्यात आली.पालक मंत्रीसोबत  चर्चेच्यावेळी जिल्हा कांग्रेस कमिटीचे महासचिव व नगरसेवक जावेद परवेज अन्सारी,शब्बीर खान उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस अल्पसंख्यक सेल,राष्ट्रवादी कांग्रेसचे नेते मो.तारिक साहिर लोखंडवाला,सामाजिक कार्यकर्ते जुल्फिकार अहमद बबली भाई,शकील पत्रकार,जावेद अख्तर,हुसैन खान आरिफ खान,राजू खान,बाबा काजी, मोहम्मद फारुख,मोहसिन खान,शाकिर नजीब अहमद, शाकिर अहमद पत्रकार,सैय्यद जाकिर,मुझफ्फर पटेल,अहमद शाह,शकील भाई,नईम पहलवान,आसिफ भाई,रिजवान भाई,सुहैल काजी, कलीम काजी, आबिद अली,आदि हजर होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दाते महीला बँक वाचवण्यासाठी महिला सहकारी बँक कृती समिती यवतमाळ ची संघर्ष परिषद

दाते महीला बँक वाचवण्यासाठी महिला सहकारी बँक कृती समिती यवतमाळ ची संघर्ष परिषद यवतमाळ येथील बाबाजी दाते महीला बँक मध्ये अनेक खातेदार, ठेवीदार यांचे पैसे आहेत अनेकांच्या खूप समस्या आहेत. पण कायद्याने आपण आपले पैसे कसे काढू शकतो यासाठी आज संघर्ष परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी मुंबई येथून विश्वास उटगी यांना आमंत्रित करण्यात आले होते. विश्वास उटगी हे माजी सचिव ऑल इंडिया बँक फेडरेशन आहेत. ज्या बँका डुबले आहेत त्या बँकांमधील खातेदारांना आपले पैसे काढण्यासाठी मार्गदर्शन करतात. कायद्याने सल्ला देतात. यासाठी ते मार्गदर्शन करतात. यासाठी आज संघर्ष परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या संघर्ष परिषदेमध्ये हजाराच्या वर पीडित खातेदार, ठेवीदार सहभागी झाले होते .या संघर्ष परिषदेमध्ये येणाऱ्या समोरच्या काळात लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, कर्जदार ,संचालक यांच्या घरासमोर डफडे वाजवा आंदोलन ,रिझर्व्ह बँकेसमोर धरणे, कायदेशीर मार्गासाठी उच्च न्यायालयात धाव ,अशा अनेक आंदोलनात्मक विषय घेऊन विविध समित्यांचे गठन करण्यात आले. यावेळी नितीन बोदे, राजू पडगिलवार, सुनील पुनवटकर, शैलेश काळबांडे, पिसाळकर ...

जिल्ह्यात सर्व व्यवहार नियमितपणे सुरू करण्यास दिली जिल्हाधिकारी यांनी परवानगी; जिल्हयाचा समावेश श्रेणी एकमध्ये

 *जिल्ह्यात सर्व व्यवहार नियमितपणे  सुरू करण्यास दिली जिल्हाधिकारी यांनी परवानगी*  *जिल्हयाचा समावेश श्रेणी एकमध्ये* *लग्न व अंथविधीसाठी 50  लोकांच्या उपस्थितीस परवानगी* *शासकीय कार्यलये 100 टक्के क्षमतेने सुरू* *कोविड नियमांचे पालन तसेच दुकाने व आस्थापना चालकास व कर्मचाऱ्यांना कोविड चाचणी बंधनकारक* यवतमाळ, दि. 6 जून :    शासनाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे यवतमाळ जिल्ह्याचा समावेश श्रेणी -1 मध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी  यवतमाळ जिल्ह्याकरीता 7 जून 2021 पासून ब्रेक दि चेन अंतर्गत घालून देण्यात आलेले निर्बंध शिथिल केले असून सर्वच बाबी नियमितपणे सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे.  अत्यावश्यक सेवेंची दुकाने व अत्यावश्यक सेवा तसेच इतर दुकाने व सेवा  नियमितपणे सुरु राहतील. तथापि अत्यावश्यक सेवेंच्या व इतर आस्थापना धारकांनी दुकानात नागरिकांची होणारी गर्दी कमी करण्याच्या दृष्टीने जास्तीत जास्त होम डिलेव्हरीद्वारे वस्तूंचा पुरवठा करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. त्यादृष्टीने आस्थापना धारकांनी स्वत:चे व्हॉटसॲप नंबर दुकाना...

शिवशक्ती महाविद्यालय बाभुळगाव वतीने आयोजित "तीस दिवसीय राज्यस्तरीय व्यक्तिमत्व विकास प्रमाणपत्र कोर्स" संपन्न

 शिवशक्ती महाविद्यालय बाभुळगाव वतीने आयोजित "तीस दिवसीय राज्यस्तरीय व्यक्तिमत्व विकास प्रमाणपत्र कोर्स" संपन्न यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव येथील शिवशक्ती कला व वाणिज्य महाविद्यालय येथे अर्थशास्त्र विभाग आणि ग्रंथालय व ज्ञान संसाधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने तीस दिवसीय राज्यस्तरीय व्यक्तिमत्व विकास प्रमाणपत्र कोर्सचे आयोजन दि. 15 एप्रिल ते 15 मे 2021 दरम्यान आभासी पद्धतीने करण्यात आले होते. या कोर्सचा समारोपीय कार्यक्रम दि. 16 मे 2021 रोजी संपन्न झाला. या सोहळ्याचे अध्यक्ष सन्माननीय प्रा. बाळासाहेब धांदे व्यवस्थापक, शिवशक्ती शिक्षण संस्था, कोठा हे होते तर विशेष अतिथी म्हणून डॉ. मोहन खेरडे, संचालक, ज्ञान संसाधन केंद्र, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती हे होते. तर प्रमुख उपस्थिती म्हणून प्रा. डॉ. कविता तातेड अणे महिला महाविद्यालय यवतमाळ, डॉ. शशिकांत वानखेडे ग्रंथपाल, भारती महाविद्यालय आर्णी आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दीपक कोदूरवार हे होते. याप्रसंगी मान्यवरांनी व्यक्तिमत्व विकास प्रमाणपत्र कोर्स कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीत विद्यार्थ्यांना नवचेतना, नवउमेद...