मुख्य सामग्रीवर वगळा
राष्ट्रीय महामार्गाच्या चुकीच्या नियोजनाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान व अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या : 


जिल्हा काँग्रेस कमिटी ची मागणी


तात्काळ शेतकऱ्यांना मदत न दिल्यास आंदोलनाचा इशारा : आ डॉ वजाहत मिर्झा


यवतमाळ दि 31 जुलै: 
यवतमाळ जिल्ह्यातुन नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग चे काम सुरू असून सदर यंत्रणेने शेतकऱ्यांच्या शेतातून पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या नाल्या बुजविल्या व नव्याने पाणी वाहून जाण्यासाठी नाल्या खोदल्या नाही तसेच पाणी वाहून जाणारे पाईप चुकीच्या पद्धतीने टाकल्याने पावसाचे पाणी थेट शेतकऱ्यांच्या शेतात व इतर जागेत गेल्याने पिके वाहून जाण्यासह प्रचंड नुकसान झाले, याची तात्काळ नुकसानभरपाई देण्यात यावी व संबंधितांवर तात्काळ कारवाही करण्यात यावी तसेच अश्या चुकीच्या नियोजनाने अनेक गावातील वस्तीत सुद्धा पाणी शिरून मोठे नुकसान झाले आहे त्यांनाही राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने तात्काळ मदत देण्यात यावी.

यवतमाळ जिल्यात गेल्या तीन दिवसात अचानक झालेल्या अतिवृष्टीने अनेक घरांची पडझड झाली त्याच पद्धतीने शेतीतील पिके वाहून गेली व शेत जमीन खरडून गेल्या असून संबधित शेतकरी व राहिवाश्यांना तात्काळ  मदत जाहीर करण्याच्या मागणी साठी दि 31 जुलै रोजी देशाचे पंतप्रधान व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना यवतमाळ जिल्ह्याधिकारी यांचे मार्फत निवेदन सादर करण्यात आहे यात तात्काळ मदत देण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी अशोकराव बोबडे, बाळासाहेब मांगुळकर, प्रवीण देशमुख, चंद्रशेखर चौधरी, धनराज चव्हाण, साहेबराव खडसे, जावेद अन्सारी,  दिनेश गोगरकर, नितीन जाधव, अनिल गायकवाड, शब्बीर खान, बबली भाई, सिकंदर शहा, संजय ठाकरे, अमन निर्बन, जाफर खान, कृष्णा पुसनाके, अजय चौपाणे, अजय किन्हीकर, घनश्याम दरणे, मिलिंद रामटेके, अतुल राऊत, जितेश नावाडे, शिर्के साहेब, बाळासाहेब काळे, रमेश कन्नके, हुसेन खान, चंदन खडसे, गजानन नवदुर्गे, उमेश इंगळे, अरुण ठाकूर, ललित जैन, कुणाल जतकर, अशोक शिर्के, यांचे सह अनेक पदाधिकारी व काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..
----------------------------------------------------
राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाला याबाबत पूर्ण कल्पना असतांनाही त्यांनी शेतकऱ्यांच्या शेतात, गावातील घरात व मालमत्ता धारकांच्या जागेत पाणी घुसू दिले ही बाब योग्य नसून योग्य पद्धतीने पाण्याचा निचरा होण्याची जवाबदारी त्यांची होती आता तात्काळ प्रशासनाने मदत जाहीर करावी तसेच ज्या शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने नुकसान झाले त्यांना मदत घ्यावी अन्यथा आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून आंदोलन करण्याचा इशारा आ. डॉ वाजाहत मिर्झा यांनी दिला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

यवतमाल जिले के तरोडा गांव में शहीद जवान रहाटे को दीगई अंतिम विदाई. अरणी:- प्रतिनिधि (शाहरुख काझी) महाराष्ट्र के गडचिरोली में 1 तारीख को हुए नक्सली हमले में शहीद जवान आग्रमन रहाटे को उसके गांव में अंतिम विदाई दे दी गई लेकिन इनके परिजनों ने इनकी टुकड़ी का नेतृत्व करने वाले अधिकारी की मिलीभगत से यह हादसा होने का गंभीर आरोप लगाया है गडचिरोली के कुरखेड़ा में 1 मई के दिन नक्सलियों द्वारा पुलिस गाड़ी को विस्फोट से उड़ाकर 15 जवानों को शहीद किया था उनमें से एक यवतमाल जिले के अरणी तहसील के तरोड़ा गांव का जवान अग्रमन रहाटे भी शहीद हुआ है शहीद जवान के गांव में 3 में को नम आंखों से अंतिम विदाई दे दी गई शहीद के परिजनों ने इस हमले को इनका नेतृत्व करने वाला अधिकारी काले के मिलीभगत से अंजाम दिया गया है ऐसा गंभीर आरोप लगाया है इस अधिकारी पर कार्रवाई करने की मांग परिजनों ने की है.
पुसद विधानसभा के युवा उमेदवार इंद्रनील मनोहरराव नाईक इनकी ऐतेहासिक जीत. महाराष्ट्र - यवतमाल जिले के पुसद विधानसभा निर्वाचन क्षेत्र से महाराष्ट्र के पूर्वमंत्री मनोहरराव नाईक के सुपुत्र युवा उमेदवार इंद्रनील मनोहर नाईक ने भाजपा के उमेदवार निलय नाईक को करारी हार देते हुए कुल 89143 मत हासिल करके एक ऐतिहासिक जीत हासिल की । आपको बतादे के राष्ट्रवादी का किला माने जाने वाले इस चुनाव क्षेत्र में एक ही परिवारज के दो भाई निलय नाईक और छोटे भाई इंद्रनील नाईक चुनाव मैदान में होने के कारण पूरे महाराष्ट्र की नज़र पुसद विधानसभा की इस सीट पर बानी हुई थी । आखिरकार 2019 के इस विधानसभा चुनाव में राष्ट्रवादी के युवा उमेदवार इंद्रनील मनोहरराव नाईक की 9701 ओठों से ऐतेहासिक जीत होने के चलते पुसद विधानसभा का इतिहास कायम रहा ।
टीप्पर हॉटेलमध्ये घुसल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान,एक जखमी   पुसद प्रतिनिधी (प्रा. अकरम शेख) पुसद/ दि.१३ पी एन कॉलेज व फार्मसी कॉलेज च्या दरम्यान असलेल्या एका जगदंबा टी सेंटर मध्ये अचानक टीप्पर घुसल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन किरकोळ जखमी झाल्याची घटना आज दिनांक १३ जून रोजो दुपारी एक वाजता घडल्याने सर्वत्र खळबळ माजली होती.           याबाबत सविस्तर सविस्तर वृत्त असे की पुसद दिग्रस मार्गावरील फुलसिंग नाईक महाविद्यालय व फार्मसी कॉलेजच्या मध्यभागात असलेल्या चौकातील नूतनताई क-हाले यांच्या घरामध्येच हॉटेल व पानठेला हा व्यवसाय चालू असताना अचानकपणे दुपारी दिग्रस रोड कडून पुसद कडे येणाऱ्या टीप्पर क्रमांक एम पी 09/जी आई  7785 ने  पोलिस ब्रेकेट तोडून हॉटेलला जबर धडक दिली त्यामध्ये पानठेला, हॉटेल चे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन हॉटेल समोर असलेल्या स्कुटी क्रमांक एम एच 29/बी एल  5110 क्रमांकाच्या ॲक्टिवा गाडीला जबर धडक बसल्याने दुचाकीस्वार जखमी झाला असून त्यांना खाजगी दवाखान्यांमध्ये उपचारासाठी भरती केले  तर घर मालक तथा हॉटेलचे मालक असलेल्या नूतनताई क-हाळे यांनी हा प्रत्यक्