मुख्य सामग्रीवर वगळा
यवतमाळ जिल्हयतिल आर्णी बायपास रस्ता बांधण्या साठी  हसूल राज्यमंत्री ना.राठोड यांचे दुर्लक्ष


दिग्रस :- 


           स्मशान भूमी रोड कडून आर्णी करिता जाण्यासाठी बायपास बनवण्यासाठी आला. त्याकरित्या बायपास जाणाऱ्या रस्तावरील अनेक नागरिकांच्या जमिनीचे शासनाने भूमी अधिग्रहण केले परंतु ३ वर्ष लोटून गेले, अधिकाऱ्यांच्या कार्यालयात चकरा मारल्या तरी सुद्धा आणखीही त्या ९ नागरिकानां शासनाने केलेल्या भूमिअधिग्रहणाचा मोबदला मिळालेला नाही. आम्हाला मोबदला लवकर न मिळाल्यास आम्ही तेथेच घर बांधणार असल्याचा इशारा प्लॉटधारकांनी दिला आहे.

            ४ वर्षा आधी दिग्रस-आर्णी बायपास करिता रस्ता मंजूर करण्यात आला. त्याकरिता तेथील प्लॉटधारकांच्या जमिनी शासनाने घेतल्या व लवकरच आपल्याला याचा मोबदला देण्यात येईल असे आश्वासनही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिले. मात्र ४ वर्ष उलटूनही त्या ९ प्लॉटधारकांना आपल्या जमिनीचा मोबदला मिळाला नाही.  तो मोबदला लवकरात लवकर द्यावा याकरिता अनेक वेळा तहसिल कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग  तसेच दिग्रस-दारव्हा मतदारसंघाचे आमदार महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांना निवेदन देऊनही याकडे त्यांनी लक्षच दिले नसल्याने आता लवकरात लवकर आम्हा प्लॉटधारकांना भूमी अधिग्रहणाचा मोबदला न दिल्यास आम्ही आमच्या प्लॉट वर बांधू असा इशारा प्लॉट धारकांनी दिला आहे. आता यावर प्रशासन काय कार्यवाही करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
           भूमी अधिग्रहण पुर्ण झाले नसल्याने तेव्हा तो रस्ता स्मशानभूमीपर्यंतच बनविण्यात आला होता. तेव्हा पासून तो रस्ता तसाच आहे तो अजूनही तयार केला गेला नाही. रस्ता पूर्ण न झाल्याने रस्त्यावर धुळीचे साम्राज्य असून सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने पाऊस येताच या रस्त्यावर चिखल होत असल्याने या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या प्रवाश्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे अशी नागरिकांची मागणी आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दाते महीला बँक वाचवण्यासाठी महिला सहकारी बँक कृती समिती यवतमाळ ची संघर्ष परिषद

दाते महीला बँक वाचवण्यासाठी महिला सहकारी बँक कृती समिती यवतमाळ ची संघर्ष परिषद यवतमाळ येथील बाबाजी दाते महीला बँक मध्ये अनेक खातेदार, ठेवीदार यांचे पैसे आहेत अनेकांच्या खूप समस्या आहेत. पण कायद्याने आपण आपले पैसे कसे काढू शकतो यासाठी आज संघर्ष परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी मुंबई येथून विश्वास उटगी यांना आमंत्रित करण्यात आले होते. विश्वास उटगी हे माजी सचिव ऑल इंडिया बँक फेडरेशन आहेत. ज्या बँका डुबले आहेत त्या बँकांमधील खातेदारांना आपले पैसे काढण्यासाठी मार्गदर्शन करतात. कायद्याने सल्ला देतात. यासाठी ते मार्गदर्शन करतात. यासाठी आज संघर्ष परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या संघर्ष परिषदेमध्ये हजाराच्या वर पीडित खातेदार, ठेवीदार सहभागी झाले होते .या संघर्ष परिषदेमध्ये येणाऱ्या समोरच्या काळात लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, कर्जदार ,संचालक यांच्या घरासमोर डफडे वाजवा आंदोलन ,रिझर्व्ह बँकेसमोर धरणे, कायदेशीर मार्गासाठी उच्च न्यायालयात धाव ,अशा अनेक आंदोलनात्मक विषय घेऊन विविध समित्यांचे गठन करण्यात आले. यावेळी नितीन बोदे, राजू पडगिलवार, सुनील पुनवटकर, शैलेश काळबांडे, पिसाळकर ...

जिल्ह्यात सर्व व्यवहार नियमितपणे सुरू करण्यास दिली जिल्हाधिकारी यांनी परवानगी; जिल्हयाचा समावेश श्रेणी एकमध्ये

 *जिल्ह्यात सर्व व्यवहार नियमितपणे  सुरू करण्यास दिली जिल्हाधिकारी यांनी परवानगी*  *जिल्हयाचा समावेश श्रेणी एकमध्ये* *लग्न व अंथविधीसाठी 50  लोकांच्या उपस्थितीस परवानगी* *शासकीय कार्यलये 100 टक्के क्षमतेने सुरू* *कोविड नियमांचे पालन तसेच दुकाने व आस्थापना चालकास व कर्मचाऱ्यांना कोविड चाचणी बंधनकारक* यवतमाळ, दि. 6 जून :    शासनाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे यवतमाळ जिल्ह्याचा समावेश श्रेणी -1 मध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी  यवतमाळ जिल्ह्याकरीता 7 जून 2021 पासून ब्रेक दि चेन अंतर्गत घालून देण्यात आलेले निर्बंध शिथिल केले असून सर्वच बाबी नियमितपणे सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे.  अत्यावश्यक सेवेंची दुकाने व अत्यावश्यक सेवा तसेच इतर दुकाने व सेवा  नियमितपणे सुरु राहतील. तथापि अत्यावश्यक सेवेंच्या व इतर आस्थापना धारकांनी दुकानात नागरिकांची होणारी गर्दी कमी करण्याच्या दृष्टीने जास्तीत जास्त होम डिलेव्हरीद्वारे वस्तूंचा पुरवठा करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. त्यादृष्टीने आस्थापना धारकांनी स्वत:चे व्हॉटसॲप नंबर दुकाना...

शिवशक्ती महाविद्यालय बाभुळगाव वतीने आयोजित "तीस दिवसीय राज्यस्तरीय व्यक्तिमत्व विकास प्रमाणपत्र कोर्स" संपन्न

 शिवशक्ती महाविद्यालय बाभुळगाव वतीने आयोजित "तीस दिवसीय राज्यस्तरीय व्यक्तिमत्व विकास प्रमाणपत्र कोर्स" संपन्न यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव येथील शिवशक्ती कला व वाणिज्य महाविद्यालय येथे अर्थशास्त्र विभाग आणि ग्रंथालय व ज्ञान संसाधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने तीस दिवसीय राज्यस्तरीय व्यक्तिमत्व विकास प्रमाणपत्र कोर्सचे आयोजन दि. 15 एप्रिल ते 15 मे 2021 दरम्यान आभासी पद्धतीने करण्यात आले होते. या कोर्सचा समारोपीय कार्यक्रम दि. 16 मे 2021 रोजी संपन्न झाला. या सोहळ्याचे अध्यक्ष सन्माननीय प्रा. बाळासाहेब धांदे व्यवस्थापक, शिवशक्ती शिक्षण संस्था, कोठा हे होते तर विशेष अतिथी म्हणून डॉ. मोहन खेरडे, संचालक, ज्ञान संसाधन केंद्र, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती हे होते. तर प्रमुख उपस्थिती म्हणून प्रा. डॉ. कविता तातेड अणे महिला महाविद्यालय यवतमाळ, डॉ. शशिकांत वानखेडे ग्रंथपाल, भारती महाविद्यालय आर्णी आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दीपक कोदूरवार हे होते. याप्रसंगी मान्यवरांनी व्यक्तिमत्व विकास प्रमाणपत्र कोर्स कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीत विद्यार्थ्यांना नवचेतना, नवउमेद...