राष्ट्रीय महामार्गाच्या चुकीच्या नियोजनाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान व अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या : जिल्हा काँग्रेस कमिटी ची मागणी तात्काळ शेतकऱ्यांना मदत न दिल्यास आंदोलनाचा इशारा : आ डॉ वजाहत मिर्झा यवतमाळ दि 31 जुलै: यवतमाळ जिल्ह्यातुन नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग चे काम सुरू असून सदर यंत्रणेने शेतकऱ्यांच्या शेतातून पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या नाल्या बुजविल्या व नव्याने पाणी वाहून जाण्यासाठी नाल्या खोदल्या नाही तसेच पाणी वाहून जाणारे पाईप चुकीच्या पद्धतीने टाकल्याने पावसाचे पाणी थेट शेतकऱ्यांच्या शेतात व इतर जागेत गेल्याने पिके वाहून जाण्यासह प्रचंड नुकसान झाले, याची तात्काळ नुकसानभरपाई देण्यात यावी व संबंधितांवर तात्काळ कारवाही करण्यात यावी तसेच अश्या चुकीच्या नियोजनाने अनेक गावातील वस्तीत सुद्धा पाणी शिरून मोठे नुकसान झाले आहे त्यांनाही राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने तात्काळ मदत देण्यात यावी. यवतमाळ जिल्यात गेल्या तीन दिवसात अचानक झालेल्या अतिवृष्टीने अनेक घरांची पडझड झाली त्याच पद्धतीने शेतीतील पिके वाहून गेली व शेत जमीन ...