मुख्य सामग्रीवर वगळा
वीज वितरण कंपनी च्या कार्यकारी अभियंत्यांना तात्काळ निलंबित करा -जिल्हा काँग्रेस कमिटी ची मागणी


यवतमाळ: 3 ऑगस्ट

यवतमाळ शहरासह जिल्यातील विद्युत डीपी उघड्या असल्याबाबत अनेक वृत्तपत्रातून प्रसिद्धीस आले अनेकांचे प्राणही गेलेत परंतु निगरगट्ट झालेल्या प्रशासनाने याची कोणतीही दखल घेतलेली नाही या उलट सर्वत्र उघड्या डीपी आपल्याला पहावयास मिळतात अनेक ठिकाणी तर केवळ 3 फूट अंतरावर उघड्या डीपी आहेत यात लहान मुलांचा बळी जाण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे, या सर्व डीपी झाकण्याबाबत सतत दुर्लक्ष करणाऱ्या कार्यकारी अभियंत्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे ही मागणी एका प्रसिद्ध पत्रकातून जिल्हा काँग्रेस कमिटी च्या वतीने सरचिटणीस अनिल गायकवाड यांनी केलेली आहे, जर या प्रकारात जिल्यात कोणत्याही नागरिकांचा अथवा लहान मुलांचा दुर्घटना होऊन बळी गेल्यास कार्यकारी अभियंत्यांवर 302 कलमा अंतर्गत कारवाही करण्यास प्रशासनाला भाग पाडू असा ही इशारा या वेळी देण्यात आला,

भर पावसात अनेक डीपी च्या आतमध्ये सुद्धा पाणी साचलेले असून हा वीज वितरण कंपनी चा  प्रकार अत्यंत निंदनीय असून तात्काळ कार्यकारी अभियंत्यांना निलंबित करण्याची मागणी करण्यात आली व अश्या कर्तव्य शून्य अधिकाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या शासनाचा तिव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला. वडगाव रोड परिसरातील मोहन कावरे या तरुणाचा मृत्यू ताजा असतांना शहरातील दुभाजकांवर अनेक ठिकाणी लावलेल्या स्ट्रीट लाईट चे अनेक विद्युत कनेक्शन धोकादायक स्थितीत असून त्याला स्पर्श झाल्यास अप्रिय घटना घडण्याची शक्यताही नाकारण्यात येत नाही त्याची ही दुरुस्तही तात्काळ स्वरूपात व्हावी असा प्रकार दत्त चौकातील भाजी मार्केट परिसरात पहावयास मिळतो असे ही अनिल गायकवाड या वेळी म्हणाले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दाते महीला बँक वाचवण्यासाठी महिला सहकारी बँक कृती समिती यवतमाळ ची संघर्ष परिषद

दाते महीला बँक वाचवण्यासाठी महिला सहकारी बँक कृती समिती यवतमाळ ची संघर्ष परिषद यवतमाळ येथील बाबाजी दाते महीला बँक मध्ये अनेक खातेदार, ठेवीदार यांचे पैसे आहेत अनेकांच्या खूप समस्या आहेत. पण कायद्याने आपण आपले पैसे कसे काढू शकतो यासाठी आज संघर्ष परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी मुंबई येथून विश्वास उटगी यांना आमंत्रित करण्यात आले होते. विश्वास उटगी हे माजी सचिव ऑल इंडिया बँक फेडरेशन आहेत. ज्या बँका डुबले आहेत त्या बँकांमधील खातेदारांना आपले पैसे काढण्यासाठी मार्गदर्शन करतात. कायद्याने सल्ला देतात. यासाठी ते मार्गदर्शन करतात. यासाठी आज संघर्ष परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या संघर्ष परिषदेमध्ये हजाराच्या वर पीडित खातेदार, ठेवीदार सहभागी झाले होते .या संघर्ष परिषदेमध्ये येणाऱ्या समोरच्या काळात लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, कर्जदार ,संचालक यांच्या घरासमोर डफडे वाजवा आंदोलन ,रिझर्व्ह बँकेसमोर धरणे, कायदेशीर मार्गासाठी उच्च न्यायालयात धाव ,अशा अनेक आंदोलनात्मक विषय घेऊन विविध समित्यांचे गठन करण्यात आले. यावेळी नितीन बोदे, राजू पडगिलवार, सुनील पुनवटकर, शैलेश काळबांडे, पिसाळकर ...

शिवशक्ती महाविद्यालय बाभुळगाव वतीने आयोजित "तीस दिवसीय राज्यस्तरीय व्यक्तिमत्व विकास प्रमाणपत्र कोर्स" संपन्न

 शिवशक्ती महाविद्यालय बाभुळगाव वतीने आयोजित "तीस दिवसीय राज्यस्तरीय व्यक्तिमत्व विकास प्रमाणपत्र कोर्स" संपन्न यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव येथील शिवशक्ती कला व वाणिज्य महाविद्यालय येथे अर्थशास्त्र विभाग आणि ग्रंथालय व ज्ञान संसाधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने तीस दिवसीय राज्यस्तरीय व्यक्तिमत्व विकास प्रमाणपत्र कोर्सचे आयोजन दि. 15 एप्रिल ते 15 मे 2021 दरम्यान आभासी पद्धतीने करण्यात आले होते. या कोर्सचा समारोपीय कार्यक्रम दि. 16 मे 2021 रोजी संपन्न झाला. या सोहळ्याचे अध्यक्ष सन्माननीय प्रा. बाळासाहेब धांदे व्यवस्थापक, शिवशक्ती शिक्षण संस्था, कोठा हे होते तर विशेष अतिथी म्हणून डॉ. मोहन खेरडे, संचालक, ज्ञान संसाधन केंद्र, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती हे होते. तर प्रमुख उपस्थिती म्हणून प्रा. डॉ. कविता तातेड अणे महिला महाविद्यालय यवतमाळ, डॉ. शशिकांत वानखेडे ग्रंथपाल, भारती महाविद्यालय आर्णी आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दीपक कोदूरवार हे होते. याप्रसंगी मान्यवरांनी व्यक्तिमत्व विकास प्रमाणपत्र कोर्स कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीत विद्यार्थ्यांना नवचेतना, नवउमेद...

जिल्ह्यात सर्व व्यवहार नियमितपणे सुरू करण्यास दिली जिल्हाधिकारी यांनी परवानगी; जिल्हयाचा समावेश श्रेणी एकमध्ये

 *जिल्ह्यात सर्व व्यवहार नियमितपणे  सुरू करण्यास दिली जिल्हाधिकारी यांनी परवानगी*  *जिल्हयाचा समावेश श्रेणी एकमध्ये* *लग्न व अंथविधीसाठी 50  लोकांच्या उपस्थितीस परवानगी* *शासकीय कार्यलये 100 टक्के क्षमतेने सुरू* *कोविड नियमांचे पालन तसेच दुकाने व आस्थापना चालकास व कर्मचाऱ्यांना कोविड चाचणी बंधनकारक* यवतमाळ, दि. 6 जून :    शासनाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे यवतमाळ जिल्ह्याचा समावेश श्रेणी -1 मध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी  यवतमाळ जिल्ह्याकरीता 7 जून 2021 पासून ब्रेक दि चेन अंतर्गत घालून देण्यात आलेले निर्बंध शिथिल केले असून सर्वच बाबी नियमितपणे सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे.  अत्यावश्यक सेवेंची दुकाने व अत्यावश्यक सेवा तसेच इतर दुकाने व सेवा  नियमितपणे सुरु राहतील. तथापि अत्यावश्यक सेवेंच्या व इतर आस्थापना धारकांनी दुकानात नागरिकांची होणारी गर्दी कमी करण्याच्या दृष्टीने जास्तीत जास्त होम डिलेव्हरीद्वारे वस्तूंचा पुरवठा करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. त्यादृष्टीने आस्थापना धारकांनी स्वत:चे व्हॉटसॲप नंबर दुकाना...