मुख्य सामग्रीवर वगळा
पुसद अर्बन बँकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात बैठक सम्पन्न.


श्रीराम नवमी शोभायात्रा मार्गाचे नियोजन.

श्रीराम नवमी तयारी अंतिम टप्प्यात.


पुसद येथील रामनवमी उत्सव हा यवतमाळ जिल्ह्यातील अग्र क्रमांकाचा गणल्या जातो.दि.13 एप्रिल रोजी नियोजित श्रीराम नवमीच्या शोभायात्रेचा मार्ग नियोजित करणे,अंतर्गत सुरक्षा,झाकी,देखावे,ठिकठिकाणी चहा,नाष्टा, पाण्याची व्यवस्था आदी अनुषंगाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे यवतमाळ विभाग संघचालक प्रा.सुरेश गोफने यांचे अध्यक्षतेत तर ऍड.आशिष देशमुख व पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद यांचे प्रमुख उपस्थितीत स्थानिक पुसद अर्बन बँकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात नियोजना संबंधी बैठक पार पडली.

    सालाबादाप्रमाणे याहीवर्षी स्थानिक रामनवमी शोभयात्रेस भव्यदिव्य स्वरूप देण्याचा समितिचा मानस आहे.
   जुने श्रीराम मंदिर येथून दुपारी 2 वाजता पालखी प्रस्थान होईल.चौबारा चौक,सुवर्णकार लाईन,नगीना चौक,संभाजी राजे चौक,नेताजी सुभाष चौक,डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक,बाबासाहेब मुखरे चौक,वसंतराव नाईक चौक,जाजू चौक,गजानन महाराज मंदिर येथे प्रभू श्रीरामाची विसावा आरती व महाप्रसादाने शोभायात्रेची सांगता होईल.शोभयात्रेदरम्यान सहभागी रामभक्तांसाठी विविध संघटनाच्या वतीने 12 ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था,5 ठिकाणी अल्पोपहार तर एका ठिकाणी शितपेयाची व्यवस्था करण्यात आली आहे. लक्षवेधक शोभायात्रेत विश्व हिंदू परिषद,बजरंग दल,गोरक्षण,श्रीरामाची मूर्ती,हनुमानाची मूर्ती,छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, सीमेवरील सैनिक,श्रीराम व बजरंग बली झाकी,भारत माता,राम दरबार आदी आसनस्थ झाक्या व भव्यदिव्य मूर्त्यांसह तीन ढोलपथक, दोन डीजे,बँजो, संस्कृतिदायक भजनी मंडळ तसेच महिलांचे लाठीकाठी व तलवार बाजी प्रात्यक्षिक हे शोभायात्रेचे विशेष आकर्षण ठरणार आहे.सदर बैठकीत शोभायात्रा पाहण्याच्या उद्देशाने शहरातील तथा बाहेरू गावावरून शहरात दाखल होणाऱ्या भक्तांच्या सुरक्षेच्या दृष्टीने विश्वहिंदू परिषद, श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने 100 सुरक्षा रक्षक विदर्भ केसरी पहेलवान मंगेश करण, ऍड.अर्जुन ठाकूर यांचे देखरेखीत तैनात करण्यात येणार आहेत.
    दि.13 एप्रिल रोजी श्रीराम नवमी शोभायात्रा व दि.14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती या दोन्ही कार्येक्रमात जास्तीतजास्त संख्येने स्वयंस्फूर्तीने सहभागी होण्याचे आवाहन श्रीराम जन्मोत्सव समिती व विश्वहिंदू परिषेदेच्या वतीने यावेळी करण्यात आले आहे.

    याप्रसंगी विश्वहिंदू परिषदेचे जिल्हा संघटनमंत्री भारत अण्णा पेन्शनवार, लक्ष्मणदादा पहेलवान,दुर्गा वाहिनी प्रमुख सौ.सुनीता तगडपलेवार,सौ.वासंती सरनाईक,शोभायात्रा प्रमुख आरोग्य सभापती ऍड.भारत जाधव,रवी ग्यानचंदानी,इंद्रनील मनोहरराव नाईक,नगरसेवक राजेश साळुंके,नप.गटनेते निखिल चिदरवार, कैलास अग्रवाल, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष सुरज डूबेवार,नगरसेवक ऍड.उमाकांत पापीनवार,नगरसेवक डॉ.मोहंमद नदीम,भाजपा शहराध्यक्ष भारत पाटील,नगरसेवक धनंजय अत्रे,अजय पुरोहित, भाजपा तालुकाध्यक्ष विश्वास भवरे,अभिजित चिदरवार,ऍड.अर्जुन ठाकूर,रंजीत सांबरे,भीमराव कांबळे,अमोल व्हडगिरे,किशोर कांबळे,शेख कयुम,समीर गवळी,राजू पाटणकर,मुन्ना बनचरे,किशोर पाणपट्टे,विश्वेश्वर चिदरवार,विशाल कांबळे,रतन वाघमोडे, आकाश धाडवे,सुनील टाक,सचिन हराळ,विनोद गाडे,सतीश मस्के,अमर तुनडे, शेखर वानखेडे,विजय पुरोहित,संतोष दीक्षित,गणेश खाडे, रवी कारजकर,उमेश चरावडे, ओंकार सोनटक्के आदींची प्रमुख उपस्थिती होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

यवतमाल जिले के तरोडा गांव में शहीद जवान रहाटे को दीगई अंतिम विदाई. अरणी:- प्रतिनिधि (शाहरुख काझी) महाराष्ट्र के गडचिरोली में 1 तारीख को हुए नक्सली हमले में शहीद जवान आग्रमन रहाटे को उसके गांव में अंतिम विदाई दे दी गई लेकिन इनके परिजनों ने इनकी टुकड़ी का नेतृत्व करने वाले अधिकारी की मिलीभगत से यह हादसा होने का गंभीर आरोप लगाया है गडचिरोली के कुरखेड़ा में 1 मई के दिन नक्सलियों द्वारा पुलिस गाड़ी को विस्फोट से उड़ाकर 15 जवानों को शहीद किया था उनमें से एक यवतमाल जिले के अरणी तहसील के तरोड़ा गांव का जवान अग्रमन रहाटे भी शहीद हुआ है शहीद जवान के गांव में 3 में को नम आंखों से अंतिम विदाई दे दी गई शहीद के परिजनों ने इस हमले को इनका नेतृत्व करने वाला अधिकारी काले के मिलीभगत से अंजाम दिया गया है ऐसा गंभीर आरोप लगाया है इस अधिकारी पर कार्रवाई करने की मांग परिजनों ने की है.
पुसद विधानसभा के युवा उमेदवार इंद्रनील मनोहरराव नाईक इनकी ऐतेहासिक जीत. महाराष्ट्र - यवतमाल जिले के पुसद विधानसभा निर्वाचन क्षेत्र से महाराष्ट्र के पूर्वमंत्री मनोहरराव नाईक के सुपुत्र युवा उमेदवार इंद्रनील मनोहर नाईक ने भाजपा के उमेदवार निलय नाईक को करारी हार देते हुए कुल 89143 मत हासिल करके एक ऐतिहासिक जीत हासिल की । आपको बतादे के राष्ट्रवादी का किला माने जाने वाले इस चुनाव क्षेत्र में एक ही परिवारज के दो भाई निलय नाईक और छोटे भाई इंद्रनील नाईक चुनाव मैदान में होने के कारण पूरे महाराष्ट्र की नज़र पुसद विधानसभा की इस सीट पर बानी हुई थी । आखिरकार 2019 के इस विधानसभा चुनाव में राष्ट्रवादी के युवा उमेदवार इंद्रनील मनोहरराव नाईक की 9701 ओठों से ऐतेहासिक जीत होने के चलते पुसद विधानसभा का इतिहास कायम रहा ।
टीप्पर हॉटेलमध्ये घुसल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान,एक जखमी   पुसद प्रतिनिधी (प्रा. अकरम शेख) पुसद/ दि.१३ पी एन कॉलेज व फार्मसी कॉलेज च्या दरम्यान असलेल्या एका जगदंबा टी सेंटर मध्ये अचानक टीप्पर घुसल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन किरकोळ जखमी झाल्याची घटना आज दिनांक १३ जून रोजो दुपारी एक वाजता घडल्याने सर्वत्र खळबळ माजली होती.           याबाबत सविस्तर सविस्तर वृत्त असे की पुसद दिग्रस मार्गावरील फुलसिंग नाईक महाविद्यालय व फार्मसी कॉलेजच्या मध्यभागात असलेल्या चौकातील नूतनताई क-हाले यांच्या घरामध्येच हॉटेल व पानठेला हा व्यवसाय चालू असताना अचानकपणे दुपारी दिग्रस रोड कडून पुसद कडे येणाऱ्या टीप्पर क्रमांक एम पी 09/जी आई  7785 ने  पोलिस ब्रेकेट तोडून हॉटेलला जबर धडक दिली त्यामध्ये पानठेला, हॉटेल चे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन हॉटेल समोर असलेल्या स्कुटी क्रमांक एम एच 29/बी एल  5110 क्रमांकाच्या ॲक्टिवा गाडीला जबर धडक बसल्याने दुचाकीस्वार जखमी झाला असून त्यांना खाजगी दवाखान्यांमध्ये उपचारासाठी भरती केले  तर घर मालक तथा हॉटेलचे मालक असलेल्या नूतनताई क-हाळे यांनी हा प्रत्यक्