संचारबंदीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून दोन लाखांवर दंड वसूल. 👉🏻 517 प्रकरणामध्ये कारवाई 👉🏻 मास्क न वापरणाऱ्यांची प्रकरणे सर्वाधिक यवतमाळ, दि. 18 : मुकाबला न्यूज़ संचारबंदीच्या काळात शासन व प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन न करणा-यांविरुध्द प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. नियमांचे उल्लंघन करणा-यांकडून दोन लाखांवर दंड वसूल करण्यात आला असून एकूण 517 प्रकरणात ही कारवाई केली आहे. यात सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणा-यांची प्रकरणे सर्वाधिक आहे. जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावास प्रतिबंध करण्यासाठी साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 अन्वये विविध अधिसूचना व नियमावली निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. यात सार्वजनिक ठिकाणी चेहऱ्यावर मास्क लावणे, सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे, सामाजिक अंतर ठेवणे, किराणा दुकानात दर्शनी भागात दरपत्रक लावणे यासारख्या विविध सूचनांचा समावेश आहे. तरीदेखील या नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांविरुध्द जिल्हा प्रशासनाने कारवाई करत जिल्ह्यातील 517 प्रकरणात एकूण 2 लाख 11 हजार 400 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. सार्वजन...