कोरोना उपचारासाठी 93 हजाराची मदत,जिल्हाधिकार्यांना दिला धनादेश;व्यापार्यांनी जपली सामाजिक बांधीलकी
यवतमाळ, ता. 28 :
देश कोराना सारख्या आजाराशी दोन हात करीत आहे. शासन स्तरावरुन विविध उपाययोजना केल्या जात आहे. यात आपलाही वाटा असावा या उद्देशाने शहरातील तीन नागरिकांनी पंतप्रधान निधी करीता 93 हजाराचा निधी दिला आहे. तसे धनादेश जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंग यांना शनिवार (ता.28)सुपूर्द केला आहे.
शहरातील राजचंद्र ज्ञान मंदीर राजेन्द्र नगर यवतमाळ येथे दरवर्षी महावीर जयंतीचा मोठा उत्सव साजरा केला जातो. यंदा देशावर कोरोना संसर्गाचे मोठे सावट पसरले आहे. अशास्थितीत आपला हातभार म्हणून महावीर जयंतीचा येणारा खर्च टाळून तो खर्च पंतप्रधान फंडासाठी देण्याचा निर्णय शहरातील व्यापारी बांधवांनी घेतला आहे. कुणाल टेक्सटाईल इंदीरा गांधी मार्केट तसेच कांता क्लाथ स्टोर्स नेताजी चोक यवतमाळ व श्रीमद राजचंद्र ज्ञान मंदिर यवतमाळ तर्फे शनिवार (ता.28) गौतम पोकर्णा, मिठालाल गांधी, विनय पोकर्णा, अभिषेक पोकर्णा, कुणाल पोकर्णा, स्नेहील पोकर्णा यांनी 93 हजार रुपयांचा धनादेश जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंग यांना दिला. यावेळी राष्ट्रीय जैन मायनॉरेटी ऑगरायझेशन महाराष्ट्र प्रदेश सदस्य विजय कुमार बुदेला उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा