मुख्य सामग्रीवर वगळा
कोरोना : वैद्यकीय महाविद्यालयात 500 खाटांच्या सुसज्ज रुग्णालयाचे नियोजन

            - पालकमंत्री संजय राठोड
 नागरिकांनी शासनाच्या आदेशाचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन

यवतमाळ, दि. 29 : 
जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग असलेल्या तीन पॉझेटिव्ह नागरिकांचे नमुने निगेटिव्ह आले. जिल्ह्यासाठी दिलासा देणारी ही बाब असून जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग अभिनंदनास पात्र आहे. मात्र असे असले तरी कोरोनाचा धोका पूर्णपणे टळला नाही. त्यामुळे या आव्हानाचा सामना करण्यासाठी वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अतिरिक्त 500 खाटांचे सुसज्ज रुग्णालय उभारण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे वने, भुकंप पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णालयाच्या पुर्वतयारीनिमित्त आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी एम.डी. सिंह, डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, डॉ. बाबा येलके, सा.बा. विभागाचे अधिक्षक अभियंता धनंजय चामलवार, कार्यकारी अभियंता चंद्रकांत मरपल्लीकर आदी उपस्थित होते.
सध्या येथील वैद्यकीय महाविद्यालयात 765 नियमित खाटा आहेत, असे सांगून श्री. राठोड म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभुमीवर येथील जुन्या रुग्णालयात 220 खाटांचे तर मुले आणि मुलींच्या वसतीगृहात प्रत्येकी 125 असे जवळपास 500 खाटांचे रुग्णालय येत्या दहा – बारा दिवसात तयार होईल. याचा लाभ यवतमाळ आणि वाशिम तसेच इतरही जिल्ह्यातील नागरिकांना होणार आहे. इतर राज्यातून जे नागरिक यवतमाळ येथे येत आहे, त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी धोरण आखण्याच्या सुचना प्रशासनाला दिल्या आहेत. इतर ठिकाणी अडकून पडलेल्या नागरिकांनी आता आहे तेथेच राहावे. त्यांच्या राहण्याची तसेच भोजनाची व्यवस्था करण्यात येईल.
सर्वांच्या सहकार्याने कोरोना विरुध्दची ही लढाई जिंकायची आहे. त्यासाठी नागरिकांनी शासन आणि प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे तंतोतंत पालन करावे. नागरिकांनी घरातच राहावे. बाहेर फिरु नये. तसेच स्वच्छता ठेवणे, वारंवार हात स्वच्छ धुणे, एकमेकांच्या संपर्कात न येणे, अत्यावश्यक कारणासाठी बाहेर गेले तर अंतर राखणे आदी सुचना आपल्या भविष्यासाठी महत्वाच्या आहेत. त्या कृपाकरून सर्वांनी पाळाव्यात. राज्यातील वन विभागाचे सर्व अधिकारी - कर्मचारी आपला एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीकरीता देणार आहे. त्यांना वनमंत्री म्हणून आवाहन केले होते, या आवाहनाला विभागाच्या सर्वांनी होकार आहे. संकटाच्या या काळात सर्व शासकीय अधिकारी, इतर सामाजिक संघटना सरकारला सहकार्य करीत आहे, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.
तसेच जिल्ह्यातील खाजगी सेवा देणा-या डॉक्टरांनी आपले दवाखाने त्वरीत उघडावे. त्यांच्या समस्यांचा विचार करून त्यांना आवश्यक बाबी उपलब्ध करून देण्याच्या सुचना प्रशासनाला दिल्या आहेत. याशिवाय किराणा दुकानदार यांनी वस्तुंच्या किमती वाढवून विक्री करू नये. असे निदर्शनास आल्यास प्रशासन त्यांच्यावर कारवाई करेल, असेही त्यांनी सांगितले.

वैद्यकीय महाविद्यालयातील शिवभोजन थाळी पूर्ववत सुरू : संचारबंदीच्या काळात वैद्यकीय महाविद्यालयात भरती असलेल्या नागरिकांच्या आप्तस्वकीयांना जेवणाचा प्रश्न भेडसावत होता. या बाबीची दखल घेऊन पालकमंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून येथील शिवभोजन थाळी पुर्ववत सुरू करून घेतली आहे. त्यामुळे नागरिकांना आता या भोजनाचा लाभ घेता येणार आहे.
    बैठकीला वैद्यकीय महाविद्यालयातील वरिष्ठ डॉक्टर्स आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दाते महीला बँक वाचवण्यासाठी महिला सहकारी बँक कृती समिती यवतमाळ ची संघर्ष परिषद

दाते महीला बँक वाचवण्यासाठी महिला सहकारी बँक कृती समिती यवतमाळ ची संघर्ष परिषद यवतमाळ येथील बाबाजी दाते महीला बँक मध्ये अनेक खातेदार, ठेवीदार यांचे पैसे आहेत अनेकांच्या खूप समस्या आहेत. पण कायद्याने आपण आपले पैसे कसे काढू शकतो यासाठी आज संघर्ष परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी मुंबई येथून विश्वास उटगी यांना आमंत्रित करण्यात आले होते. विश्वास उटगी हे माजी सचिव ऑल इंडिया बँक फेडरेशन आहेत. ज्या बँका डुबले आहेत त्या बँकांमधील खातेदारांना आपले पैसे काढण्यासाठी मार्गदर्शन करतात. कायद्याने सल्ला देतात. यासाठी ते मार्गदर्शन करतात. यासाठी आज संघर्ष परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या संघर्ष परिषदेमध्ये हजाराच्या वर पीडित खातेदार, ठेवीदार सहभागी झाले होते .या संघर्ष परिषदेमध्ये येणाऱ्या समोरच्या काळात लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, कर्जदार ,संचालक यांच्या घरासमोर डफडे वाजवा आंदोलन ,रिझर्व्ह बँकेसमोर धरणे, कायदेशीर मार्गासाठी उच्च न्यायालयात धाव ,अशा अनेक आंदोलनात्मक विषय घेऊन विविध समित्यांचे गठन करण्यात आले. यावेळी नितीन बोदे, राजू पडगिलवार, सुनील पुनवटकर, शैलेश काळबांडे, पिसाळकर ...

जिल्ह्यात सर्व व्यवहार नियमितपणे सुरू करण्यास दिली जिल्हाधिकारी यांनी परवानगी; जिल्हयाचा समावेश श्रेणी एकमध्ये

 *जिल्ह्यात सर्व व्यवहार नियमितपणे  सुरू करण्यास दिली जिल्हाधिकारी यांनी परवानगी*  *जिल्हयाचा समावेश श्रेणी एकमध्ये* *लग्न व अंथविधीसाठी 50  लोकांच्या उपस्थितीस परवानगी* *शासकीय कार्यलये 100 टक्के क्षमतेने सुरू* *कोविड नियमांचे पालन तसेच दुकाने व आस्थापना चालकास व कर्मचाऱ्यांना कोविड चाचणी बंधनकारक* यवतमाळ, दि. 6 जून :    शासनाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे यवतमाळ जिल्ह्याचा समावेश श्रेणी -1 मध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी  यवतमाळ जिल्ह्याकरीता 7 जून 2021 पासून ब्रेक दि चेन अंतर्गत घालून देण्यात आलेले निर्बंध शिथिल केले असून सर्वच बाबी नियमितपणे सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे.  अत्यावश्यक सेवेंची दुकाने व अत्यावश्यक सेवा तसेच इतर दुकाने व सेवा  नियमितपणे सुरु राहतील. तथापि अत्यावश्यक सेवेंच्या व इतर आस्थापना धारकांनी दुकानात नागरिकांची होणारी गर्दी कमी करण्याच्या दृष्टीने जास्तीत जास्त होम डिलेव्हरीद्वारे वस्तूंचा पुरवठा करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. त्यादृष्टीने आस्थापना धारकांनी स्वत:चे व्हॉटसॲप नंबर दुकाना...

शिवशक्ती महाविद्यालय बाभुळगाव वतीने आयोजित "तीस दिवसीय राज्यस्तरीय व्यक्तिमत्व विकास प्रमाणपत्र कोर्स" संपन्न

 शिवशक्ती महाविद्यालय बाभुळगाव वतीने आयोजित "तीस दिवसीय राज्यस्तरीय व्यक्तिमत्व विकास प्रमाणपत्र कोर्स" संपन्न यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव येथील शिवशक्ती कला व वाणिज्य महाविद्यालय येथे अर्थशास्त्र विभाग आणि ग्रंथालय व ज्ञान संसाधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने तीस दिवसीय राज्यस्तरीय व्यक्तिमत्व विकास प्रमाणपत्र कोर्सचे आयोजन दि. 15 एप्रिल ते 15 मे 2021 दरम्यान आभासी पद्धतीने करण्यात आले होते. या कोर्सचा समारोपीय कार्यक्रम दि. 16 मे 2021 रोजी संपन्न झाला. या सोहळ्याचे अध्यक्ष सन्माननीय प्रा. बाळासाहेब धांदे व्यवस्थापक, शिवशक्ती शिक्षण संस्था, कोठा हे होते तर विशेष अतिथी म्हणून डॉ. मोहन खेरडे, संचालक, ज्ञान संसाधन केंद्र, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती हे होते. तर प्रमुख उपस्थिती म्हणून प्रा. डॉ. कविता तातेड अणे महिला महाविद्यालय यवतमाळ, डॉ. शशिकांत वानखेडे ग्रंथपाल, भारती महाविद्यालय आर्णी आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दीपक कोदूरवार हे होते. याप्रसंगी मान्यवरांनी व्यक्तिमत्व विकास प्रमाणपत्र कोर्स कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीत विद्यार्थ्यांना नवचेतना, नवउमेद...