भूकंप परिस्थितीत घ्यावयाच्या काळजीबाबत, प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना. 👉🏻 अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन 👉🏻 मदतीकरीता नियंत्रण कक्ष क्रमांक 07232-240720 व 07232- 255077 यवतमाळ, दि. 22 : जिल्ह्यातील उमरखेड, दिग्रस, महागाव, घाटंजी, आर्णि आणि दारव्हा तालुक्यातील 24 गावांमध्ये भारतीय प्रमाण वेळेनुसार दि. 21 जून रोजी रात्री 9.22 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. यात उमरखेड तालुक्यातील कुरळी, नारळी, बोरगाव, साखरा, निंगनूर, अकाली, मल्याळी, ढाकणी, बिटरगाव, खरुस, चातारी, एकांबा, टेंभुरदराच, आर्णि तालुक्यातील राणी, धानोरा, अंजनखेड, साकूर, मुकिंदपूर, महागाव तालुक्यातील हिवरा संगम, इंजनी, घाटंजी तालुक्यातील चिखलवर्धा, कुरली, दिग्रस तालुक्यातील सिंगद आणि दारव्हा तालुक्यातील खोपडी या गावांचा समावेश आहे. हा भूकंप रिक्टर स्केलवर 3.7 तिव्रतेचा होता. भूकंपाच्या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीच्या वातावरणात खबरदारी म्हणून नागरिकांनी काय करावे किंवा काय करू नये, याबाबत जिल्हा प्रशासनाकडून मार्गदर्शक सुचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी या सुचनांचे पालन करावे व अफवांवर वि...