यवतमाळ, दारव्हा,पांढरकवडा, नेर, पुसद व दिग्रस येथील संचारबंदी कायम यवतमाळ, दि. 31 : यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ, दारव्हा,पांढरकवडा, नेर, पुसद, दिग्रस शहरात व या शहरालगतच्या परिसरात 31 जुलैपर्यंत लागू करण्यात आलेली संचारबंदी पुढील आदेशापर्यंत वाढविण्यात आली आहे. जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी वरील आदेश निर्गमित केले आहे. संचारबंदीच्या कालावधीत पुढील बाबींना मुभा देण्यात आली आहे. भाजीपाला व फळे गल्ली, कॉलनी, सोसायटीमध्ये जाऊन विक्री करण्यास सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत मुभा राहील. एका ठिकाणी बसून विक्री करता येणार नाही. दुध संकलन व दुध विक्रीला सकाळी 7 ते सकाळी 10 वाजेपर्यंत मुभा राहील. तसेच फिरते दुध विक्री या बाबीस सायंकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत मुभा राहील. पेट्रोल, डिझेल पंप सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत तसेच अत्यावश्यक सेवेकरिता 24 तास सुरू राहील. कृषी साहित्याची, रासायनिक खत विक्री, बि-बियाणे विक्री व त्यांची गोदामे सकाळी 10 ते दुपारी 2 वाजतापर्यंत सुरू राहील. स्वस्त धान्य दुकाने सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू राहतील. यवतमा...